- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Updates: किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर; जन्म-मृत्यू नोंद घोटाळाप्रकरणी गौप्यस्फोट करणार?
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं सोमवारी आयोजित उपशाखाप्रमुखांच्या मेळाव्यात संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा असा नारा दिला जाणार आहे. या मेळाव्याचं पोस्टर आज प्रसिद्ध करण्यात आलं. ठाकरेंच्या शिवसेनेनं...More
परतीच्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढलं आहे... दिवसभर कडाक्याचं उन्ह पडल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास पावसाने झोडपून काढलं आहे...त्यामुळे कोल्हापूर शहरात नागरिकांची तारांबळ उडाली आहे...सध्या शेतामध्ये भात कापणीची काम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत... परतीच्या या पावसामुळे शेतकऱ्यांचा भात कापणीचा खोळंबा झाला आहे...
लहुजी नगर मधील ५ महिलांसह ३ जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले कल्याण न्यायालयाने ५ महिलेला न्यायालिय कोठडी सुनावली असून तिघांना पोलिस कोठडी सुनावली आहे
दोन्ही घाटातील आरोपींना २६ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
कल्याण मोहने परिसरामध्ये झालेल्या राड्या प्रकरणी पोलिसांनी लहुजी नगर आणि मोहने गावातील गावगुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली असून आज या आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले
मोहने गावातील सात गावगुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी सहा जणांना पोलिस कस्टडी रिमांड, तर एका आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गावगुंडांनी लहुजी नगर मध्ये घुसून मारहाण केली होती पोलिसांनी या प्रकरणात लहुजी नगरमधील आठ जणांना आरोपी केले असून त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले
पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, तर तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
लहुजी नगर मधील ५ महिलांसह ३ जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले कल्याण न्यायालयाने ५ महिलेला न्यायालिय कोठडी सुनावली असून तिघांना पोलिस कोठडी सुनावली आहे
दोन्ही घाटातील आरोपींना २६ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
कल्याण मोहने परिसरामध्ये झालेल्या राड्या प्रकरणी पोलिसांनी लहुजी नगर आणि मोहने गावातील गावगुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली असून आज या आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले
मोहने गावातील सात गावगुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी सहा जणांना पोलिस कस्टडी रिमांड, तर एका आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गावगुंडांनी लहुजी नगर मध्ये घुसून मारहाण केली होती पोलिसांनी या प्रकरणात लहुजी नगरमधील आठ जणांना आरोपी केले असून त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले
पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, तर तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
अहिल्यानगर शहरासह परिसरात जोरदार पावसाची हजेरी...
या जोरदार पावसामुळे सखल भागात साचले पावसाचे पाणी...
हवामान खात्याने आजपासून पुढील दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाचा व्यक्त केला होता अंदाज...
जोरदार पावसामुळे काढणीला आलेल्या कपाशी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता...
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारी हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामध्ये उर्वरित राहिलेलं सोयाबीन कापूस यासह इतर पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान शक्यता आहे
पुण्यातील जैन बोर्डिंग वसतिगृहाच्या जागेवर सध्या धर्मदाय आयुक्त कडून पाठवण्यात आलेले काही अधिकारी पोहोचले आहेत..
जैन बोर्डींग वसतिगृहाच्या जागेची पाहणी करतात त्या ठिकाणी काय काय आहे सगळं पाहिलं जात आहे..
त्याचबरोबर या जैन बोर्डिंग च्या बॉडीवर असलेले ट्रस्टीन पैकी एक ट्रस्टी सुद्धा पोहोचले आहेत..
त्या ठिकाणी असलेले जे जैन मुनी, गुरु आहेत त्यांनी या अधिकाऱ्यांना आणि ट्रस्टीला घेराव घातला आहे..
या संपूर्ण जागेवर सध्या पोलिसांनी मोठा बंदोबस्त सुद्धा लावला आहे
अखेर दाजीपूर जंगल सफारी सुरु
पर्यटकांच्या हस्ते नारळ वाढवून जंगल सफारी सुरु
पहिल्या दिवशीच पर्यटकांनी केली हाउसफुल्ल गर्दी
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक पर्यटक घेत असतात जंगल सफारीचा लाभ
दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी आहे प्रसिद्ध
रायगड : सध्या दिवाळीची सुट्टी आपल्या मुलांसोबत कशी घालवता येईल याकरिता अनेक पालकांनी समुद्रकिनाऱ्याला पसंती दिली आहे. रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर राज्यभरातील पर्यटक दाखल झालेत. एकीकडे ऑफिस आणि शाळा यांना सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी श्रीवर्धन हरिहरेश्वर दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिली आहे.
दिवाळी सणात मुंबईतल्या कचऱ्यात वाढ
महापालिकेने गेल्या काही दिवसात गोळा केला ३ हजार मेट्रिक टन अधिक कचरा
२,०७५ मेट्रिक टन कचरा कांजूर आणि देवोनार डेपोत पाठवण्यात आला तर १,००० मेट्रिक टन कचरा ट्रान्स्फर स्टेशनवरून उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
सप्टेंबर २०२५ पर्यंत सरासरी कचरा ६,९०० टन असायचा तर गेल्या काही दिवसांत वाढून ७,३०० टन प्रतिदिन इतका
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून घेतली आहे. त्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत.
निलेश घायवळची चार चाकी पोलिसांनी केली जप्त
उसाच्या शेतात लपवून ठेवली होती चारचाकी
अहिल्यानगर मधील जामखेड मध्ये असलेल्या एका गावात ही गाडी लपवून ठेवण्यात आली होती
८०५५ नंबर असलेल्या या गाडीला "BOSS" असे नंबर प्लेट होता
पुणे पोलिसांनी थेट जामखेड मधील खर्डा गावात जाऊन केली कारवाई
नाशिक : सध्या दिवाळीच्या सण आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे नाशिकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर पर्यटक आणि भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी राज्यासह पर राज्यातून पर्यटक नाशिकच्या रामकुंड, गोदा घाट, काळाराम मंदिर, आणि पर्यटन स्थळांवर गर्दी करताना पाहायला मिळत आहे.
- दिवाळी संपताच भाजपचे माजी खा.किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर..
- मालेगावातील महापालिका कार्यालय, व अपर पोलिस अधीक्षकांची घेणार भेट..
- जन्म मृत्यू घोटाळा प्रकरणी घेणार महापालिका कार्यालय, व दाखल गुन्ह्यासंदर्भात घेणार पोलिस अपर अधीक्षक कार्यालयाकडून आढावा..
- मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमैया यांच्या दौऱ्याला महत्व...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १ नोव्हेंबरला पुण्यात राज्यव्यापी मेळावा
पुण्यातील मेळाव्याच्या पूर्वतयारी साठी आज दुपारी ३ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाने काय भूमिका घ्यावी यासंदर्भात या मेळाव्यात घोषणा होण्याची शक्यता
भाजपकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची भूमिका असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढवणार?
यासंदर्भातील घोषणा ही १ नोव्हेंबर च्या मेळाव्यात होण्याची शक्यता
पिंपरी चिंचवड शहरात पत्नीने केली पतीची हत्या
-पती सामाजिक कार्यकर्ता तर पत्नी आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहे
-नकुल भोईर अस हत्या झालेल्या सामजिक कार्यकर्त्याच नाव
-नकुल भोईर हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याची प्राथमिक माहिती
-काल सायंकाळी देखील दोघांत वाद झाला होता,मग रात्री देखी नकुलचा आणि पत्नीचा वाद झाला त्यात वादात नकुलच्या पत्नी ओढणीन गळा दाबून केली हत्या
-आरोपी पत्नी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात
बीड: जिल्ह्यातील शेतकरी आधीच संकटात सापडला असताना या शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक नवसंकट उभे राहिलंय. जनावरांमध्ये लंपी आजाराने डोके वर काढले असून गेवराई तालुक्यात सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. गेवराई तालुक्यातील तांदळा कोळगाव आणि आसपासच्या अनेक गावांमध्ये लंपी आजाराने जनावरांचा जीव धोक्यात आणलाय. अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता लंपी आजाराची दुसरी अडचण उभा राहिली आहे. जनावरांमध्ये लंपी आजार झपाट्याने वाढत असून शेकडो जनावरांना या आजाराची लागण होतेय. लंपीने जनावरे दगावण्याची भीती पशुपालकासह शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते. मात्र अद्याप पशुसंवर्धन विभागाकडून याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
राज्यपाल आचार्य देवव्रत घेणार आमदार खासदारांचा क्लास
नैसर्गिक शेती या विषयावर राज्यपाल करणार लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन
आज दुपारी साडेबारा वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये संमेलनाचे आयोजन
राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील हजर राहणार
आचार्य देवव्रत यांच्या नैसर्गिक शेती या विषयावरील कामाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते कौतुक
महायुतीसह इतरही पक्षांचे आमदार खासदार संमेलनाला उपस्थित राहणार
नैसर्गिक शेतीसमोरील आव्हाने, नव्याने उद्भवणारे प्रश्न आणि इतर विषयांवर राज्यपाल लोकप्रतिनिधींशी साधणार संवाद
शेगाव : दिवाळी आणि सलगच्या सु्टीमुळे देशभरातून लाखो भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी शेगावात बघायला मिळत आहे. शेगावातील रस्त्या रस्त्यावर देशभरातून आलेल्या भाविकांनी पर्यटकांची गर्दी फुलून दिसत आहे राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून राजस्थान कर्नाटक छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात शेगाव शहरात संत गजानन महाराजांच्या दर्शनाला दाखल होत आहे. शेगाव शहरातील सर्व गेस्ट हाऊस आणि भक्तनिवास हाउसफुल झालं असून पुढील आठवडाभर शेगाव शहरात मोठी गर्दी असणार आहे.
रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरामध्ये परप्रांतीयांकडून दारूची पार्टी..
रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंग साठी जात असताना शिवप्रेमींना परप्रांतीय तरुण रस्त्याच्या कडेला दारू पार्टी करताना आढळले...
शिवप्रेमी कडून दारू पार्टी करणाऱ्यांना चोप...
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...
किल्ले रायरेश्वराच्या पायथ्याशी शिवप्रेमींनी दारू पार्टी करणाऱ्यांना दिला चोप...
गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी शिवप्रेमी झाल्या आक्रमक..
राज्यपाल आचार्य देवव्रत घेणार आमदार, खासदारांचा क्लास
नैसर्गिक शेती या विषयावर राज्यपाल करणार लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन
आज दुपारी साडेबारा वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये संमेलनाचे आयोजन
राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील हजर राहणार
आचार्य देवव्रत यांच्या नैसर्गिक शेती या विषयावरील कामाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते कौतुक
महायुतीसह इतरही पक्षांचे आमदार खासदार संमेलनाला उपस्थित राहणार
नैसर्गिक शेतीसमोरील आव्हाने, नव्याने उद्भवणारे प्रश्न आणि इतर विषयांवर राज्यपाल लोकप्रतिनिधींशी साधणार संवाद
गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठाने हिवाळी 2025 च्या परीक्षा दिवाळीच्या सुट्टयात घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र याला युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन आणि विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे आता विद्यापीठाने हिवाळी परीक्षा 20 दिवसांनी पुढे ढकलल्या आहेत. नवीन परिपत्रकानुसार 2025 च्या हिवाळी परीक्षा 17 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहेत. लेखी परीक्षांसह प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकातही आता बदल करण्यात आला असून पूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा मुख्य परीक्षा नंतर 15 दिवसाच्या आत घेण्याचे ठरले होते. मात्र आता प्रात्यक्षिक परीक्षा 1 ते 15 नोव्हेंबर या काळात घेण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणीसोबत साजरी केली भाऊबीज
- यावेळी फडणवीस कुटुंबातील सर्व सदस्य होते उपस्थित
- लाडक्या बहिणींनी औक्षण करून देवेंद्र फडणवीस यांना ओवाळल
- पारंपरिक पद्धतीने पार पडला भाऊबीजेचा सोहळा
आरएसएस वर बंदी घालावी या मागणीसाठी छत्रपती संभाजी शहरातील आरएसएसच्या मुख्य कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे .पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून रात्रीतून नोटीस देण्यात आले आहेत. मोर्चाला बंदी असताना देखील मोर्चा काढल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्याला दोषी धरण्यात येईल असं या नोटीस मधून पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी सांगितल आहे..
जत मधील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञात सभासदांनी रात्रीत बदलले
राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा नवीन फलक कारखान्याच्या कमानीवर लावला
काही दिवसांपूर्वी जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही असा आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना दिला होता इशारा
सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब
दिल्लीत राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे सादरीकरण केलं अगदी तशाच प्रकारे मुंबईतील मतदार यादीतील घोळाचा सादरीकरण आदित्य ठाकरे करणार
मुंबईच्या मतदार याद्यातील घोटाळा सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे उघड करणार असल्याची माहिती
मुंबईत शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केली असून त्यात प्रचंड घोळ असून तो कशा पद्धतीने करण्यात आला? आणि आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे याचा मार्गदर्शन आदित्य ठाकरे सोमवारी होणाऱ्या निर्धार मेळाव्यात करणार
या निर्धार मेळाव्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील नेते विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख हे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत
वरळी डोम येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजता हा मेळावा होणार आहे
छत्रपती संभाजीनगर शहरात रात्री जोरदार पाऊस झाला. तर ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली . पावसाळा संपल्यानंतर देखील अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
भंडारा नगरपालिकेत मागील चार वर्षांपासून प्रशासक आहे. त्यामुळे या नगरपालिकेत कुणाचंही अंकुश नसल्यानं मोठ्या प्रमाणात घोटाळा होतोय. भंडारा नगरपालिकेत कामांचा बोगस टेंडर घोटाळा उघडकीस आला असून याची पोलखोल भाजप आमदार केली आहे. वीस कोटींच्या बोगस कामांचं टेंडर काढल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना करताच निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली. या बोगस टेंडरच्या नावावर 20 टक्के कमिशनचा आर्थिक व्यवहारही झाल्याचा गंभीर आरोप फुके यांनी केला असून यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार परीणय फुके यांनी केली.
रवींद्र धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईचं काय, उदय सामंतांचा सवाल...गणेश नाईकांचा संदर्भ देत धंगेकरांची पाठराखण केल्याचा चर्चांना जोर
आगामी निवडणुकांसाठी शिंदेसेनेकडून डोअर टू डोअर कॅम्पेन...वार्डातील मतदार पक्षाकडे वळवण्याची जबाबदारी विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांवर...'लक्षवेध' आणि 'आनंद दिघे कल्याणकारी योजना'ही राबवणार...
येत्या २७ ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेकडून निर्धार मेळावाचे आयोजन...ठाकरे देणार मुंबई जिंकण्याचा नारा..
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर; जन्म-मृत्यू नोंद घोटाळाप्रकरणी गौप्यस्फोट करणार?