Maharashtra Live Updates : मोठी बातमी! आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय; अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार
Maharashtra Live Updates : राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates : राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा....More
जालन्यात राज्य जीएसटी विभागाकडून छापा..
एस . जी . देवीदान इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात तीन दिवसापासून पासून तपासणी.
मुंबईच्या जीएसटी पथकाकडून कंपनी चे ओनर यांच्या घरी आणि कार्यालयात कंपनी व्यवहाराच्या कागदपत्रांची पथाकडून कसून तपासणी.
कंपनीच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायाच्या आणि कंपनीला मिळालेल्या कंत्राटांच्या बिलांची तपासणी..
जीएसटी पथकाकडून कारवाई विषयी गोपनीयता..
या कंपनी कडून इतर बोगस फर्म सोबत व्यवहार करून जीएसटी दडवल्याचा संशय..
नातेवाईकांच्या सिमेंट कंपनी सोबत झालेल्या व्यवहारांच्या बिला बाबत देखील पथकाला संशय असल्याची माहिती...
नाशिक हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून आणखी सात जणांना करण्यात आली अटक यामध्ये एमआयएमचे शहराध्यक्ष मुख्तार शेख याचाही समावेश आहे. नाशिक पोलिसांकडून आज सुट्टीच्या दिवशी या सात संशयित आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले आहे. काठे गल्ली हिंसाचार प्रकरणात एकूण आत्तापर्यंत नाशिक पोलिसांकडून 38 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सोलापुरात संभाजी ब्रिगेड आक्रमक
आमदार गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेवर केलेल्या टिकेनंतर कार्यकर्ते आक्रमक
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोवर मंगळसूत्र चोर लिहीत मंगळसूत्र दाखवत केला निषेध
‘पडळकर यांना संभाजी ब्रिगेडबद्दल माहिती नाही, जातीत तेढ निर्माण करण्याचे काम पडळकर यांचेच‘
संभाजी ब्रिगेड संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्याम कदम यांचे पडळकर यांना प्रतिउत्तर
- नाशिक काठे गल्ली हिंसाचार प्रकरण, नाशिक पोलिसांकडून आतापर्यंत 38 जणांना केली अटक...
- गुन्हे शोध पथक पथक युनिट एकने रात्री एम एम शहराध्यक्ष मुक्तार शेख सह 7 जणांना केली अटक
- गुन्हे शोध पथकाकडून अटक केलेल्या संशयित आरोपींना आडगाव पोलिसांकडून मुबंई नाका पोलिसांकडे केले जात आहे स्वाधीन
त्यानंतर जिल्हा न्यायालयात हजर केले जाईल
- नाशिक पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू,
आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय
अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता व तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात येणार
दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयाने आरोग्य शिबिर घेऊन किमान ५ रुग्णांवर कॅशलेस उपचार करणे बंधनकारक
योजनेतील विविध सुधारणांसाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून एक महिन्यात अहवाल सादर करावा लागणार
आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेस गती देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार व सेवा केंद्रांच्या मदतीने वाटप होणार
या योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे देखील आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
Pune News : पुण्यातील चंदनगर परिसरात भावाने, आईने आणि मित्राने आपल्या बहिणीच्या बॉयफ्रेंडला फरशीच्या तुकड्याने मारहाण करुन हत्या केली आहे. प्रदीप अडागळे हा ऋषी काकडे यांच्या बहिणीचा बॉयफ्रेंड होता. वर्षभरापासून दोघांमध्ये खुन्नस होती. बहिणीला त्रास का देतो म्हणत कायम दोघामध्ये वादावादी व्हायची. काल रात्री साडे अकराच्या सुमारास दोघे चंदननगर परिसरात असलेल्या भाजी मंडीमध्ये ऋषी काकडे त्यांची आई सविता आणि मित्र शुभम मांढरे याने प्रदीपला थेट फरशीने मारहाण केली. यात प्रदीप गंभीर जखमी झाला. रात्रीच प्रदीपला ससूनला उपचारासाठी नेण्यात आल होत. सकाळी साडे सहा दरम्यान प्रदीपचा मृत्यू झाला.
मुंडेंच्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कार्यकर्त्यांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर उद्या शरद पवार गटाने परळी मध्ये बैठक बोलावलीय. या बैठकीला खासदार बजरंग सोनवणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.
परळीत व्यापाऱ्यांमध्ये भयमुक्त वातावरण करण्यासाठी देखील शरद पवार गटाकडून पुढाकार घेतला जाणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांशी देखील या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. तर आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला पराभव पत्करावा लागला. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार गटाकडून मुंडेंना आव्हान देण्याची तयारी सुरू केलीय..
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील काठोडा पारधी बेडा येथील वेदिका चव्हाण हिचा पाण्यासाठी अरुणावती नदीमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे याला शासन प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार आहे जल जीवन मिशन अंतर्गत सारख्या दहा-बारा योजना एकत्र आणायच्या आणि एकाच ठेकेदाराला काम द्यायचं कमिशन ओरिएंटल काम करायचं असे या सरकारचा काम आहे. त्या गावात एक वर्षापासून पाईपलाईन आहे मात्र पाणी त्यामुळे या ठिकाणी विहीर खोदल्या गेली नाही असाही माझा संशय आहे. त्यामुळे कमिशन ओरिएंटल हे सरकार असून नागरिकांचा बळी घेत आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील भंडाऱ्याच्या जवाहरनगर ऑर्डनन्स फॅक्टरीच्या रुग्णालयातचं सुविधा आणि औषधोपचाराचा अभाव बघायला मिळाला. खासदार पडोळे यांनी ऑर्डनन्स फॅक्टरी रुग्णालयाची पाहणी केली असता हा प्रकार समोर आलाय. रुग्णालयाच्या ऑपरेशन थेअटरमधील एअर कंडिशनर बंद आणि त्यात लपलेली पाल आढळून आली. तर, ४० खाटांच्या रुग्णालयात केवळ ८ नर्स कार्यरत असून, डॉक्टरांची संख्याही कमी असल्याचं समोर आलं. यासोबत औषधसाठा, यंत्रसामग्री आणि स्वच्छतेचा अभाव अशा एक ना तर अनेक समस्या आढळून आल्यानं खासदार प्रशांत पडोळेंनी संताप व्यक्त केलाय. जानेवारी महिन्यात झालेल्या भीषण स्फोटात ९ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या ऑर्डनन्स फॅक्टरीच्या रुग्णालयात असलेल्या सुविधांची माहिती आणि पाहणी करण्याकरिता खासदार डॉ प्रशांत पडोळे हे रुग्णालयात गेले असता हा प्रकार समोर आल्यानं त्यांनी, तातडीनं आरोग्य सुविधेत सुधारणा करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेत.
रायगड ब्रेकींग
म्हसळा मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
जमिनीच्या मोजनीकरीता आकारफोड करून देण्याकरिता भुकरमापक सर्वेअर कडून 50000 हजाराची शेतकऱ्याकडून मागणी. विशाल भीमा रसाळ अस लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव
अलिबाग मधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला अधिकारी
माणगाव येथील बस स्थानकात लाच स्वीकारताना करण्यात आली कारवाई
तळेगांव ते आर्वी रस्त्यावर दोन दुचाकींच्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झालेय. युवकाने स्टंट करीत गाडी भरधाव वेगात चालवत समोरच्या दुचाकीला धडक दिली. युवकाच्या गाडीवर मागे बसून असलेल्या महिलेचा यात मृत्यू झाला आहेय. मोनिका अतुल गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहेय. गाडी भरधाव वेगात असल्याने हा अपघात घडलाय. तळेगाव पोलिसात याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहेय.
Ujjani Dam : गेल्या पावसाळी हंगामात 110% भरलेले उजनी धरण आज वजा पातळीत गेले असून यामुळे सीना माढा उपसा सिंचन योजना बंद झाली आहे. सध्या उजनी धरणाच्या मृतसाठ्यात 63 टीएमसी एवढा मुबलक पाणीसाठा असल्याने संपूर्ण उन्हाळ्यात कसलीही पाणीटंचाई जाणवणार नाही असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
गेल्या वर्षी उजनी धरण नीचांकी पातळीला पोहोचल्यानंतर केवळ 60 टक्के भरले होते. त्यामुळे गेल्या हंगामात 21 जानेवारी रोजी धरणाने वजा पातळी गाठली होती. मात्र यावर्षी धरणात जवळपास 123 टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाल्याने आज 18 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता धरणाने मृतसाठ्यात प्रवेश केला आहे. आता सीना माढा उपसा सिंचन योजना बंद झाली असून पुढील दोन दिवसात दहिगाव उपसा सिंचन योजना ही पाणी पातळी कमी झाल्याने बंद पडणार आहे. कालवा सल्लागार समितीमध्ये ठरल्याप्रमाणे 15 मे पर्यंत उजनीच्या कालव्यातून शेतीसाठी पाणी देता येणार असल्याने सर्व उन्हाळी पिकांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय सोलापूर महापालिकेसह पंढरपूर, मंगळवेढा ,सांगोला या नगरपालिका व शेकडो पाणीपुरवठा योजनांना भीमा नदीतून सध्या पाणी सोडण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता ही मिटली आहे. भीमा नदीत सोडलेले हे पाणी औज बंधाऱ्यापर्यंत पोहोचले असून पुढील दोन दिवसात हिल्लि बंधाऱ्यापर्यंत पोहोचेल. यावर्षी पाण्याचे काटेकोर नियोजन झाल्यामुळे संपूर्ण उन्हाळी हंगामात कोठेही पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे
पुण्यातील कोंढव्यात कोयताधारी युवकांकडून वाहनांची तोडफोड,
तोडफोडीत वाहनांचे मोठे नुकसान.
कोंढवा परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात कोयताधारी टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला.
टोळक्याने हातात कोयते व हत्यारे घेऊन परिसरातील वाहनांची केली तोडफोड
या घटनेत दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे.
तोडफोडीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Crime News: गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या काठे गल्ली सिग्नलवर एका रिक्षा चालकाची मुजोरी समोर आली होती या रिक्षाचालकाने थेट पोलिसाच्याच अंगावर रिक्षा घातल्याचा व्हिडिओ समोर आला होता.. रिक्षा चालकांने समोरच असलेल्या पोलिसांसोबत अरे रावे देखील केली होती.. यावर पोलिसांनी या मुजोर रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे.. याच परिसरात गेल्या दोन दिवसापासून पोलिसांचा बंदोबस्त आहे अनधिकृत बांधकाम काढण्याच्या कारणावरून या परिसरात बंदोबस्त असताना या रिक्षा चालकाने सिग्नल तोडून थेट पोलिसाच्या अंगावर रिक्षा नेली होती... यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्या कारणाने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
- नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरण, मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे १४००- १५०० ज्ञात अज्ञातांवर गुन्हे दाखल
- पोलिसांवर दगडफेक प्रकरणी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी...
- MIM शहराध्यक्ष मुख्तार शेख याला ही नाशिक पोलिसांनी दगडफेक प्रकरणी केली अटक...
- गुन्हा दाखलमध्ये काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार पक्षासह आता MIM च्या शहराध्यक्ष गुन्हा...
- MIM शहराध्यक्ष मुख्तार शेख याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केल्याची सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली माहिती...
- नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरण, मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे १४००- १५०० ज्ञात अज्ञातांवर गुन्हे दाखल
- पोलिसांवर दगडफेक प्रकरणी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी...
- MIM शहराध्यक्ष मुख्तार शेख याला ही नाशिक पोलिसांनी दगडफेक प्रकरणी केली अटक...
- गुन्हा दाखलमध्ये काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार पक्षासह आता MIM च्या शहराध्यक्ष गुन्हा...
- MIM शहराध्यक्ष मुख्तार शेख याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केल्याची सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली माहिती...
नाशिकमध्ये सीएनजी गॅसचा तुटवडा. पेट्रोल पंप चालकांनी mngl कंपनीला दिला इशारा. 25 एप्रिल पर्यत cng पुरवठा सुरळीत न झाल्यास 26 एप्रिल पासून गॅस वितरण बंद ठेवण्याचा इशारा. गेल्या काही दिवसांपासून cng पुरवठा सुरळीत नसल्याने पेट्रोल पंप चालक त्रस्त, cng भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागत असल्यानं वाहनचालक हैराण. सीएनजी पुरवठा करणाऱ्या MNGL कंपनीला वारंवार सांगून देखील सुधारणा होत नसल्याने पेट्रोल पंप चालक आक्रमक. रोज किमान दहा तास सीएनजी पुरवठा करण्याची मागणी. 25 एप्रिल पर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत न झाल्यास 26 तारखेपासून पंप बंद ठेवण्याचा इशारा
नाशिकच्या तपोवन परिसरातील फर्निचर च्या गोडाऊनला लागलेली आग अजुनही धुमसत आहे. आठ तास झाल्यानंतर ही आगीवर पूर्णपणे नियंत्रण नाही. रात्री 12 वाजेच्या सुमारास लागली भीषण आग. आगीत फर्निचर बनविण्याचे प्लायवूड आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक ,कोट्यवधी रुपयांचे झाले नुकसान. नाशिक महापालिका सह, सिन्नर पिंपळगाव नगरपालिका, अंबड midc, करन्सी नोट प्रेस आशा ठीक ठिकाणाहून आगीचे बंब बोलविण्यात आले होते. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करून ही आग पूर्णपणे आटोक्यात नाही. ज्या ठिकाणी गोडावून आहे त्या जवळ वस्ती नाही नवीन रहिवासी इमारतीचे बांधकाम सुरू आहे तर बाजूला मोकळे भूखंड आहे त्यामुळे आगीची झळ इतर कोणाला बसली नाही. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही
पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास मायनस मध्ये गेलेले आहे. उजनी धरण प्रशासनाकडून सकाळी सहा वाजता देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार उजनी धरण सध्या 0.06 टक्के वजा मध्ये आहे. सध्या उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 63 पूर्णांक 62 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ही 123 टीएमसी इतकी आहे.जेव्हा उजनी धरण 100 टक्के क्षमतेने भरतं तेव्हा उजनी धरणात 117 टीएमसी इतका पाणीसाठा मावतो त्यापैकी 54 टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून ग्राह्य धरला जातो तर उर्वरित 63 टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो आणि आज उजनी ही मायनस मध्ये म्हणजे मृत पातळीत गेलेली आहे.
Nanded News : नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरात नात्याला काळिमा फासणारी घटना घडलीय. लहान भावाने आपल्या मोठ्या भावाची चाकूने भोसकून हत्या केलीय. हत्येनंतर आरोपीने बनाव रचत भावाला कुणीतरी मारल्याचा आव आणला होता. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासांतच हत्येचे गूढ उकळत आरोपी भाऊ नागेश लाखेला अटक केलीय. वडिलोपार्जित संपत्तीत वाटेकरी नको म्हणून लहान भावाने मोठ्या भावाला संपवल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या घटनेने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडालीय.
Maharashtra News : शिक्षण घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या महेंद्र म्हैसकरला अटक करण्यात आली असून तो गोंदिया जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत होता. आरोपी हा शिक्षक भरती संदर्भातील बनवाट कागपत्र तयार करून त्यांचे प्रस्ताव तयार करायचा. आणि त्या मोबदल्यात पैसे घ्यायचा. यापूर्वी विभागीय शिक्षक उपसंचालक उल्हास नरडसह एकूण पाच जणांना अटक केली असून आता आरोपींची संख्या सहा वर पोहोचली आहे.
Dharashiv News : महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेला चेक पोस्ट बंद करण्याच्या मागणीसाठी मोटार मालक संघटना आक्रमक. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तलमोड चेक पोस्ट केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार बंद करण्याची मागणी केली. 15 एप्रिलपर्यंत चेक पोस्ट बंद करण्याची अंतिम मुदत असताना बेकायदेशीररीत्या चेक पोस्ट सुरू असल्याचा संघटनेचा आरोप आहे. 30 एप्रिलपर्यंत चेक पोस्ट बंद न केल्यास 2 मे पासून संघटनेकडून चेक पोस्ट बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तुरोरी वाहतूक संघटनेकडून तलमोड चेक पोस्टवरील अधिकाऱ्यांना निवेदन देत इशारा दिला आहे.
Maharashtra News Update : अंबाजोगाई तालुक्यात घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केली गेली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट केल्यानंतर मारहाणीचा प्रकार समोर आला.
Maharashtra News : ड्रग्ज प्रकरणामुळे तुळजापूर चर्चेत आले आहे. यामध्ये राजकीय पक्षांचे काही कार्यकर्ते असल्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र, तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापुरातून नशेखोरी हद्दपार करण्यासाठी ठोस निर्णयाची गरज आहे. तुळजापुरात यापूर्वी नशेखरीचा प्रश्न उद्भवला होता 265 वर्षांपूर्वी तात्कालीन राज्यकर्ते असलेल्या छत्रपती रामराजेंनी तुळजापुरातील नशेखोरी थांबवण्यासाठी दारूबंदीचा निर्णय घेतला होता. तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जपण्यासाठी आता ही ड्रग्ज असेल किंवा इतर अवैध धंदे सर्वांनी एकत्र येत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. इतिहास अभ्यासक सतीश कदम यांनी छत्रपती रामराजे यांनी घेतलेल्या निर्णयाची आठवण करून दिली.
Maharashtra News Update : नाशिकच्या तपोवन परिसरातील एका प्लायवूडच्या गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास लागली भीषण आग लागली आहे. रात्री 12 साडेबाराच्या सुमारास मोठी आग लागली. पहाटे पर्यत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. नाशिक महापालिका अग्निशमन दलाचे 11 बंब यासह अंबड एमआयडीसी, करन्सी नोट प्रेस, सिन्नर आणि पिंपळगाव नगरपालिका असे एकूण 15 बंब बोलावून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. यात लाखो रुपयांचं नुकसान झालं असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
Bhiwandi News : सहकारी मित्र दारुच्या नशेत सतत आई-वडिलांवरून शिवीगाळ करत असल्याच्या रागातून सहकारी मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शहरातील दत्तुनगर भादवड येथे घडली होती. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत होता. भिवंडी गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे केलेल्या तपासातून या हत्येतील आरोपीच्या मुसक्या मध्य प्रदेशातील कटनी येथून आढळून आरोपीस अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलिसांनी दिली आहे. रवीकुमार विष्णू सिंग वय 29 वर्ष रा. कदमटोली जिल्हा जसपुर, राज्य छत्तीसगढ असे अटक आरोपीचे नाव आहे तर चित्तरंजन नागेशिया वय 30 वर्ष राहणार कदम टोली असे हत्या झालेल्या दुर्दैवी इसमाचे नाव आहे. आरोपी रविकुमार आणि मयत चित्तरंजन हे दोघेही एकमेकांचे साथीदार असून भादवड येथील दत्तुनगर परिसरात राहत होते. काही दिवसांपूर्वी दोघेही एकत्र दारू पिण्यास बसले असताना मयत चित्तरंजन याने आरोपी रवी कुमार यास आई-वडिलांवरून शिवीगाळ केली होती. या गोष्टीचा राग म्हणून मनात धरून रविकुमार याने दगडाने ठेचून व धारदार हत्याराने चित्तरंजन याची हत्या केली आणि मध्य प्रदेश येथे पळून गेला होता.
भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी रविकुमार हा मध्य प्रदेश येथे पळून गेला असल्याची माहिती मिळताच भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार पोलीस यांच्या पथकाने आरोपीचा तपास करून मध्य प्रदेश येथील कटनी रेल्वे स्टेशन येथून सीआरपीएफ पोलिसांच्या मदतीने पळून जाण्याचा तयारीत असलेला आरोपी रवीकुमार यास अटक केली.
Mumbai News : देवनार डंपिंगच्या नंतर आता कांजूरमार्ग डंपिंगवरही हा प्रकल्प उभारण्यासाठी प्राथमिक स्तराच्या बैठका सुरू आहेत. उद्या मुंबईत मंत्रालयात कचऱ्यापासून वीजनिर्मिंतीच्या प्रकल्पाची बैठक पार पडणार आहे. यावेळी पीएमओ कार्यालयातील अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा पालिकेच्या प्रकल्पाला गती देण्याचे काम सध्या सुरु आहे. कांजूरमार्ग येथील डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी ही बैठक होणार आहे. सध्या देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील 9 एकर जागेवर 'वेस्ट टू पॉवर प्लांट’ उभारण्यात येत आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates : मोठी बातमी! आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय; अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार