- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Updates: कर्जाचे पुनर्गठन नाही, संपूर्ण कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरणार आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा कढण्यात येणार...More
बुलढाणा : चांदीच्या दराने आज नवा उच्चांक गाठला असून खामगावच्या प्रसिद्ध बाजारपेठेत प्रति किलो दर 1,75,500 रुपये इतका झाला आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल 55,000 रुपये प्रति किलो दरवाढ झाली आहे. चांदी खरेदीदारांमध्ये घबराट तर गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
DK Rao: खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या गँगस्टर DK राव याला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र DK राव गँगस्टर असल्यानेच खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.
Bharat Gogawale on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी, यासाठी आज हंबरडा मोर्चा काढला. यावरून मंत्री भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सरकारसाठी जाहीर केलेल्या मदतीची रक्कम ऐकूनच उद्धव ठाकरे यांनी हा हंबरडा फोडला असल्याचे टीका भरत गोगावले यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर “हंबरडा मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी लातुरात तीव्र प्रतिक्रिया दिली. शिरसाट म्हणाले, “हा मोर्चा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी नव्हता, तर शेतकऱ्यांचा हंबरडा कसा फोडतात याचे प्रदर्शन दाखवण्यासाठी होता. शेतकऱ्यांची खरी मदत करण्याऐवजी हा मोर्चा केवळ इव्हेंट म्हणून राबवण्यात आला.” त्यांनी पुढे सांगितले की, “ठाकरेंच्या शिवसेनेने आतापर्यंत कधीच कोणाला मदत केली नाही. या संकटाच्या काळात तरी शेतकऱ्यांच्या मदतीला पुढे यायला हवे होते, पण त्याऐवजी मोर्चाचे राजकारण करण्यात आले. इव्हेंटशिवाय या मोर्च्याला कोणताही अर्थ नव्हता,” असे त्यांनी म्हटले.
आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरण...
चंदगड मधून 25 वर्षीय मोहन पवारला चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतल
मोहन पवार हा मांडेदुर्ग या गावचा रहिवासी
याप्रकरणी अधिक तपासासाठी ठाणे पोलीस आरोपीला ताब्यात घेणार ?
गेल्या वर्ष भरापासून आमदार शिवाजी पाटील यांना येत होते मॅसेज आणि अश्लील विडिओ..
आरोपीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याची प्राथमिक माहिती..
चंदगड तालुक्यातील एका मनोरुग्णानेच मेसेज पाठवल्याने खळबळ
सातारा: सासपडे येथील अल्पवयीन युवतीचा खून करणाऱ्या संशयित आरोपीच्या घरावर जमावाचा हल्ला...
पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केल्यानंतर ग्रामस्थांनी घरावरील पत्रे उचकटून घरातील साहित्याचे केले नुकसान...
राहुल यादव असे संशयित आरोपीचे नाव
सासपडे गावात पोलिसांचा मोठा फौज फाटा....
काल दुपारच्या सुमारास संबंधित अल्पवयीन तेरा वर्षाची युवती स्वतःच्या घरामध्ये मृत अवस्थेत आढळून आली होती...
स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयित आरोपीला काही तासातच घेतले ताब्यात...
सातारा: सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील तुपेवाडी गावात स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ४० किलो वजनाचा, सुमारे १० लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे.शहाजी दाजी तुपे यांनी त्यांच्या शेतात गांजाची लागवड करून विक्रीसाठी जोपासना केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला.सदर आरोपीवर एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या जनता दरबार कार्यक्रम रद्द
अधिकाऱ्यांची तयारी नसल्यामुळे जनता दरबार कार्यक्रम रद्द
मंत्री मंगल प्रभात लोढा अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जनता दरबार कार्यक्रमावर नाराजगी व्यक्त केली आहे
आज पर्यंत असा जनता दरबार कार्यक्रम झाला नव्हता जसा मालाड मध्ये हा जनता दरबार चा आयोजन करण्यात आला आहे
अधिकाऱ्याने मनात घेऊन हा जनता दरबार आयोजन केला नाही
अधिकाऱ्यांना वाटतो हा जनता दरबार टीव्ही शो कार्यक्रम आहे
महानगरपालिका चा दुर्भाग्य आहे असे अधिकारी मालाड पी उत्तर विभाग कार्यालयात आहे
जनता दरबार पुढे 14 तारखेला होणार आजचा रद्द करण्यात आला आहे..
धाराशिव बस स्थानकामध्ये पीओपी ढासळला, सहा महिन्यापूर्वीच कोट्यावधी रुपये खर्चून इमारतीचे काम
चालक वाहक आराम करणाऱ्या रूमचा पीओपी अचानकपणे ढासळला
चालक वाहक झोपलेले असताना ही घटना घडली, सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा पोहोचली नाही
सहा महिन्यापूर्वीच दहा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे बस स्थानकाची इमारत
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 30 एप्रिल रोजी बस स्थानकाचे करण्यात आले होते उद्घाटन
Beed News: बीड जिल्ह्यात ऑनलाईन कापूस खरेदीच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. अतिवृष्टीने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र जे पीक शिल्लक आहे त्याला हमीभावाने विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना भारतीय कापूस महामंडळाच्या कॉटन फार्मर मोबाईल ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि यालाच 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बीड, गेवराई, शिरूर आणि वडवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. मात्र अतिवृष्टीने या क्षेत्रातील कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या क्षेत्रात कापसाचे चांगले पीक आहे. अशा शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ आवश्यक होती. 30 सप्टेंबर पर्यंत नोंदणीची मुदत होती. परंतु शेतकऱ्यांच्या आणि राज्य सरकारच्या विनंतीनुसार ही मुदत वाढवण्यात आली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.
महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसात होणार
जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रकरणे लागणार मार्गी
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय
मोजणी प्रकरणांचा 30 दिवसात निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करणार
राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सिमांकन आणि मालकीहक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक
महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसात होणार
जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रकरणे लागणार मार्गी
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय
मोजणी प्रकरणांचा 30 दिवसात निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करणार
राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सिमांकन आणि मालकीहक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक
राज्यामध्ये एकूण सुमारे 65 लाख हेक्टर क्षेत्राचे शेतीपिक / शेतीचे नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यातून समोर
जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत 26.69 लाख हेक्टर क्षेत्राचे तर सप्टेंबर 2025 या महिन्यात जवळ-जवळ 39 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती
जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत
राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीतील अतिवृष्टी व पूर, पेरणी खालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून तालुके आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येत आहेत.
शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे
सदर तालुक्यातील सर्व बाधितांना दुष्काळ सदृष्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्यात येणार आहे.
सदर सवलती खालील प्रमाणे
1. जमीन महसूलात सूट
2. सहकारी कर्जाचे पुनर्गठन
3. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती (एक वर्षासाठी)
4. तिमाही वीज बिलात माफी
5. परीक्षा शुल्कात माफी व 10वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांची फी माफी.
मोठी बातमी: दिल्लीत सुधीर मुनगंटीवारांनी घेतली अमित शाहांची भेट; भेटीचं कारण अजूनही गुलदस्त्यात
सुधीर मुनगंटीवार यांचा दिल्ली दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही घेतली भेट
नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची भेट
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही सदिच्छा भेट
अमित शाह यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
भंडारा : आगामी नगरपालिका निवडणुकीचं आरक्षण आता जाहीर झालेलं आहे. अशात शिंदेंच्या शिवसेनेचे युवा नेते आणि भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे भंडारा - गोंदिया लोकसभा युवा सेनेचे प्रमख जॅकी रावलानी हे भाजपच्या वाटेवर आहेत. जॅकी रावलानी हे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून मागील काही वर्षांपासून त्यांनी तशी मोर्चेबांधणी केली आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांना निवडून आणण्यात जॅकी रावलानी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मागील काही दिवसांपासून भोंडेकर आणि रावलानी यांच्यात ऑल इज वेल नसल्याने रावलानी हे आता भाजपाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. रावलानी हे भाजपात गेल्यास शिंदेंच्या शिवसेनेसह आमदार भोंडेकरांना हा फार मोठा धक्का मानला जाईल.
धाराशिव तालुक्यातील आळणी येथील पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे.कला केंद्राला घालु दिलेल्या अटी व नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आदेशानुसार परवाना तत्काळ रद्द करण्यात आला आहे.या कलानाट्य केंद्राच्या संचालकाने परवाना मिळालेल्या अटींचे पालन न करता बेकायदेशीर कृत्ये केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासणीत आढळून आले. त्यामुळे पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला होता.या अहवालाच्या आधारे परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासून दौरा सुरु
पुण्यातील वारजे भागातील विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत
वारजेतील चौधरी चौकापासून पाहणीला सुरुवात करणार
वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची पाहणी
महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित
पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासून दौरा सुरु
पुण्यातील वारजे भागातील विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत
वारजेतील चौधरी चौकापासून पाहणीला सुरुवात करणार
वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची पाहणी
महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधलाय...उद्धव ठाकरेंनी आधी आरशात पाहावं त्यानंतर मोर्चे काढावेत असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय...त्यामुळे मोर्चाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री फडणवीसांना काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज संभाजीनगरमध्ये मोर्चा
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 'हंबरडा मोर्चा'चं आयोजन
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी द्या, ठाकरेसेनेची मागणी
पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याच्या मागणीसाठी मोर्चा
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: कर्जाचे पुनर्गठन नाही, संपूर्ण कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल