Maharashtra Live Updates: धाराशिवच्या पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराकडून मोठी फसवणूक; शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लेटेस्ट अपडेटस जाणून घेण्यासाठी क्लिक करा. आज राज्यातील पावसाची स्थिती कशी असणार?

रोहित धामणस्कर Last Updated: 30 Jun 2025 05:35 PM

पार्श्वभूमी

फ्लॉवरच्या पिकावर शेतकऱ्याकडून रोटावेटर.सततच्या पावसामुळे पीक गेल वाया, ट्रॅक्टरने जमिनीत गाडण्याची वेळ. पावसामुळे खर्च वाढला, पीकही गेले वाया, बाजारभाव नसल्याने शेतकऱ्याचे मोठं नुकसान. शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. मात्र...More

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिस्ती समाजाचा मोर्चा; गुन्हा दाखल करण्याची मागणी

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या कथित चिथावणीखोर वक्तव्याच्या विरोधात उल्हासनगरात ख्रिस्ती समाज आक्रमक झाला आहे. ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात केलेल्या अपमानकारक वक्तव्यावरून पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ख्रिस्ती समाजाने आज उल्हासनगर येथील पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा नेला.


उल्हासनगर शहरातील विविध चर्च संघटना, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी “गोड बोलून गळा कटणार नाही”, “धर्माचा अपमान सहन करणार नाही” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिकरित्या दिलेली विधाने ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आहेत. ही विधाने समाजात तेढ निर्माण करणारी व द्वेष पसरवणारी आहेत. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी मोर्चात सहभागी प्रतिनिधींशी चर्चा करून निवेदन स्वीकारले. यावर योग्य कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
.