Maharashtra Live blog: सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांत गुन्हा दाखल; प्रकरणाचा सीआयडी करणार तपास

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडी आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. पुण्यातील यवतमध्ये तणावपूर्ण वातावरण जमावबंदी लागू

रोहित धामणस्कर Last Updated: 02 Aug 2025 02:54 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडी आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. पुण्यातील यवतमध्ये तणावपूर्ण वातावरण जमावबंदी लागू.मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मिठी नदी गैरव्यवहारप्रकरणात केतन कदम...More

अकोल्यात 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्याचं मोठ रॅकेट? मार्केटमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा आल्याची चर्चा

अकोल्यात 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्याचं मोठ रॅकेट?.  पाचशे रुपयांच्या नोटा मोजतांना आणि सुकण्यासाठी वाळू घातलेल्या नोटांचा एक फोटो समोर आलाय. हा फोटो 'ABP माझा'च्या हाती लागलाय..  3 ते 4 व्यक्ती एका घरामध्ये या पाचशे रुपयांच्या नोटा मोजत असल्याचे फोटोत दिसत आहे. तर काही नोटा टोपल्यामध्ये वाळू घातलेल्या आहेत.. या सर्व नोटा बनावट असल्याची शक्यता आहे. दरम्यान, हा फोटो कधीचा आणि कुठला आहे? हे कळू शकले नाहीय.. मात्र हा फोटो अकोल्यातीलच असल्याचे बोलल्या जातंये. पोलिसांचे काही पथक त्यांच्या मागावर आहे. 


दरम्यान, नुकतेच मागील महिन्यात अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातल्या एका महिलेने दुकादाराला 500 रुपयांच्या बनावट नोटा देत गंडवलं होतंये. त्यामुळ अकोल्याच्या मार्केटमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा आल्याची चर्चा रंगु लागलीय. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर मोठं चर्चेत आहे.. या बनवाट नोटा बहुतांश 500 अथवा 100 रुपयांच्या असतायेत.. या हुबेहुब बनवण्यात आलेल्या नोटांमुळे अनेकदा नागरिकांना गंडवल्या जातंय.. त्यामुळे नोटा तपासुनच स्विकाराव्यात असे आवाहन करण्यात आलेय.