- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog: मोठी बातमी! 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog: वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांचं संरक्षण करता यावं, यासाठी शेतीला सोलरवर प्रवाहित विद्युत तारांचं कुंपण करण्यात आलं होतं. मात्र, काल दुपारच्या सुमारास साकोलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी...More
2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
राज्य सरकारला मोठा दिलासा
मुख्य न्या श्री चंद्रशेखर आणि न्या गौतम अंखड यांच्या खंडपीठाचा निर्वाळा
हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयास दाखल करण्यात आल्या होत्या याचिका
कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून रीट याचिकांच्या माध्यमातून शासन निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे.
२ सप्टेंबरचा शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची आहे याचिकाकर्त्यांची मागणी
2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
राज्य सरकारला मोठा दिलासा
मुख्य न्या श्री चंद्रशेखर आणि न्या गौतम अंखड यांच्या खंडपीठाचा निर्वाळा
हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयास दाखल करण्यात आल्या होत्या याचिका
कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून रीट याचिकांच्या माध्यमातून शासन निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे.
२ सप्टेंबरचा शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची आहे याचिकाकर्त्यांची मागणी
ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल
ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांच्या सुशोभीकरण प्रकल्पांना मंजुरी
कामांसाठी ३५८.८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर
मालवण येथील शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी ९०.८९ कोटी रुपयांचा निधी
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी केले जाणार
ताराराणी समाधी सुशोभीकरणासाठी १३३ कोटी, अजिंक्यतारा किल्ला सुशोभीकरणासाठी १३५ कोटी रुपयांचा निधी
मुख्यमंत्री म्हणतात “नोटीस नाही”, तरीही बँकांचा सपाटा कायम! औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना नोटिसा, मनसेची आक्रमक भूमिका
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री अनेकदा “कोणत्याही शेतकऱ्याला बँकांकडून नोटीस देऊ नका” असे स्पष्ट आदेश देत असतानाही, जिल्ह्यातील बँकांकडून नोटिसा देण्याचा सपाटा सुरुच आहे.
काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना अशाच नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना देखील बँकांकडून नोटिसा दिल्याचे समोर आले आहे.
औसा तालुक्यातील विशाल करंडे या शेतकऱ्याला एका बँकेने कर्जफेडीसाठी नोटीस पाठवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली. मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी थेट बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. त्यावर अधिकाऱ्याने “मी नवीनच आलो आहे” असं सांगत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र, शेतकरी आणि मनसे कार्यकर्त्यांनी घेराव घालताच अधिकारी तिथून पळ काढताना दिसला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री म्हणतात “नोटीस नाही”, तरीही बँकांचा सपाटा कायम! औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना नोटिसा, मनसेची आक्रमक भूमिका
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री अनेकदा “कोणत्याही शेतकऱ्याला बँकांकडून नोटीस देऊ नका” असे स्पष्ट आदेश देत असतानाही, जिल्ह्यातील बँकांकडून नोटिसा देण्याचा सपाटा सुरुच आहे.
काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना अशाच नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना देखील बँकांकडून नोटिसा दिल्याचे समोर आले आहे.
औसा तालुक्यातील विशाल करंडे या शेतकऱ्याला एका बँकेने कर्जफेडीसाठी नोटीस पाठवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली. मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी थेट बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. त्यावर अधिकाऱ्याने “मी नवीनच आलो आहे” असं सांगत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र, शेतकरी आणि मनसे कार्यकर्त्यांनी घेराव घालताच अधिकारी तिथून पळ काढताना दिसला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Wardha : वर्ध्याच्या पुलंगाव रोडवरील धोत्रा शिवारातील एका फॉर्म हाऊसवर एवोनिथ कंपनीच्या अधिकाऱ्यांची दारू पार्टी रंगलीय. वर्ध्यात दारू बंदी असताना दारू पार्टी रंगल्याने पोलिसांनी छापा टाकत 13 जणांना अटक केलीय. फॉर्म हाऊसचा मालक करंडे फरार असल्याची पोलिसांची माहिती आहेय. हातात दारूचा ग्लास आणि स्विमिंग पुलमध्ये डीजेच्या तालावर दारूची पार्टी करण्यात आलीय. एवोनिथ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिवसाढवळ्या पार्टी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेय. दारूबंदी जिल्ह्यात दारूची पार्टी रंगल्याने खळबळ निर्माण झालीय. तीन विदेशी दारूच्या बॉटल,23 खाली दारूच्या शिश्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
कोलेटी ते आमटेम या परिसरात 3 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा
रखडलेल्या रस्त्याच्या कामाची दुरुस्ती सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक काही भागात सुरू असल्यामुळे वाहतुकीत अडथळा
अनेक प्रवासी एसटी बस वाहतूक कोंडीत अडकल्या
मुंबई गोवा महामार्गावरील, पाबळ आमटेम, गडब, परिसरात वाहनांच्या रांगा
मालवणच्या शिवसृष्टी प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक सुरू
बैठकीला मंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले पोहचले
बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देखील ऑनलाईन उपस्थित
तडीपार गुंडाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती
जाहीर मंचवरून भाजप शहराध्यक्षांविरोधात वक्तव्य, अध्यक्षाचे वागणे चुकीचे असल्याचे आमदार देशमुख यांचे मतं..
यामुळे भाजप पक्षातील अंतर्गत धुसफूस पून्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे
दरम्यान बाहेरील पक्षातून भाजपमध्ये येऊन कार्यकर्त्यांना दमदाटी करणाऱ्यांना कमरेत लाथ घाला, असा सल्ला देखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलाय
सोलापूर आणि धाराशिव मधून तडीपार असलेल्या श्रीशैल हुळ्ळे याने आयोजित केलेल्या जनसंवाद बैठकीला आमदार विजयकुमार देशमुखांची उपस्थिती
‘’समाजाची बैठक का घेतली असं काही लोकं म्हणतात, जर असं कोणी दमदाटी करत असेल तर त्याच्या कमरेत लाथ घाला, त्यात कसलीही हयगय करू नका‘’
‘’कोणीतरी कुठल्या तरी पक्षातून इकडं आमच्याकडं चमचेगिरी करत यायचं, इथं येऊन दादागिरी करत असेल तर खपवून घेऊ नका आपण सगळे वीरशैव लिंगायत आहोत‘’
‘’भाजप कार्यकर्त्यांनी समाजाची बैठज घेऊ नये असे जर भाजप शहराध्यक्ष याना वाटत असेल तर ते चुकीचे आहे‘’
‘’मी स्वतः वीरशैव आहे, समाजाला एकत्रित करण्यासाठी मी एक काय दहा बैठक घेईन, समाजाचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास‘’
असे विधान भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी या जाहीर कार्यक्रमात केले आहे
धक्कादायक बाब म्हणजे तडीपार करण्यात आल्यानंतर देखील शहरात फिरत असल्याने श्रीशैल हुळ्ळे विरोधात पोलिसांनी गुन्हा देखील नोंद केलाय
त्यामुळे एका तडीपार गुंडाला पाठीशी घालत आमदार विजय देशमुख यांनी कार्यक्रमला उपस्थिती लावत केलेल्या विधानाची सध्या सोलापुरात जोरदर चर्चा होतेय
इस्लामपूर शहरातील अंबाबाई मंदिर परिसरात राहणाऱ्या वर्षीय २५ नवविवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. लग्नानंतर कर्करोगाने त्रस्त असलेल्या सासूवर उपचार करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन यावेत, या कारणावरून मृत अमृता हिला वरील पाचजणांकडून शिवीगाळ करत मानसिक व शारीरिक जाचहाट केला जात होता आणि पैशासाठी तगादा लावल्याने तिने हे पाऊल उचलल्याची तक्रार आहे. याप्रकरणी सासरच्या पाचजणांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा नोंद केला आहे. अमृता ऋषीकेश गुरव असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. ११ महिन्यांपूर्वी तिचा ऋषीकेश गुरव याच्याशी प्रेमविवाह झाला होता. याप्रकरणी वंदना अनिल कोले यांनी मुलीच्या आत्महत्येबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती ऋषीकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरे अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा अनिल गुरव (सर्व रा. इस्लामपूर) आणि पतीचा मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव (रा. वडणगे, जि. कोल्हापूर) अशा पाचजणांविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज दुपारी बैठक...
महिला विकास मंडळ हॉल इथे आज दुपारी 3 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे..
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची असणार आहे...
संघटनात्मक बांधणी, निवडणुकीची तयारी या सर्वांवर आजच्या बैठकीत चर्चा होणार...
अमरावती कारागृहातील अंडा सेल मधील दोन कैद्यांजवळ चक्क आयफोन सह दोन मोबाईल...
अमरावती मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर...
फ्रेजरपुरा पोलिसांनी शिक्षाधीन बंदी तरवेज दरवेश खान आणि दस्तगीर गफूर शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल...
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्याच्या बराकित चक्क आयफोन सह दोन कीपॅड मोबाईल आणि दोन मोबाईल बॅटरी आढळून आल्याने खळबळ...
कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अंडा सेलच्या विशेष झडती दरम्यान प्रकार उघडकीस...
कारागृहात राहूनही कैदी व्हिडिओ कॉल करत होते?...
अमरावती मध्यवर्ती कारागूह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच दुर्लक्ष...
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात एकाच दिवशी सर्पदंशाने दोन युवा शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. भाऊजी भोयर आणि प्रफुल चरडुके अशी मृतक शेतकऱ्यांची नावं आहेत. हे दोन्ही शेतकरी शेतात काम करीत असतांना त्यांना सापाने चावा घेतल्याने त्यांचा मृत्यू झालाय. २ तरुण शेतकऱ्यांच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून मदत देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सोलापुरातील बाहुबली आणि दानम्मा देवी मंदिरात मूर्ती आणि दानपेटीतील पैसे चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केलीय. आकाश सुरेश पवार आणि अशपाक मौला शेख यांना पोलिसांनी अटक केलीय. तर करण उर्फ करण्या केंगार हा आरोपी अद्याप फरार आहे. ४ ते ५ ऑक्टोबरदरम्यान मध्यरात्री रात्री सोलापुरातील दानम्मा देवी मंदिर आणि बाहुबली जैन मंदिरामध्ये चोरी झाली होती. यामध्ये देवीच्या मंदिरातील दानपेटीतून रोख रक्कम आणि बाहुबली जैन मंदिरातून विविध देव देवतांच्या पंचधातूच्या मुर्त्या चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी सोलापुरात गुन्हे दाखल झाल्यानंतर अवघ्या 12 तासात दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 12 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून चोरी करणाऱ्यांचे चेहरे पोलिसांनी ओळखले. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांना लक्षात आल्यानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. यावेळी त्यांनी मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पंचधातूंच्या मूर्तीसह 1 लाख 65 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिली.
- मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिले जलसंपदा आणि नंतर कृषी विभागाचे नुकसान भरपाई यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होत आहे
- नुकसान भरपाई चे 80 टक्के आकडे आले आहेत, दहा-वीस टक्के आकडे बाकी आहेत
- आज उद्या राज्यातील सर्व पंचनामाच्या आकडे राज्य सरकारकडे येतील, मग राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून जो काही शेतकऱ्यांना मदत करायची आहे त्याची घोषणा करतील
- केंद्र सरकारकडे अपेक्षित प्रस्ताव जातील
- मुख्यमंत्री, आमचे सरकार हे शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई, मदत करण्याकरिता त्या ठिकाणी ताकद देणार आहे, जे काही करावे लागेल ते करणार
- नियोजन सुरू आहे शेतकऱ्यांना मदत करण्याची पूर्ण भूमिका आहे
नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे विवाहित प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली .. 35 वर्षीय गजानन गव्हाळे आणि 30 वर्षीय उमा कपाटे अशी मयताची नावे आहेत .. दोघेही विवाहित होते .. मात्र दोघात प्रेम संबंध निर्माण झाले .. वर्षभरापूर्वी दोघे गावातून पळून गेले होते .. काल गावात परत आले .. पण घरच्यांनी त्यांना विरोध केला .. त्यामुळे दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली ...
हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी आज परभणीत बंजारा समाजाकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी १२ वाजता हा मोर्चा शहरातील डीएड कॉलेजच्या मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे व तिथे जाहीर सभा ही घेतली जाणार आहे या मोर्चात आमदार बाबूसिंह महाराज,रामराव महाराज या महंतांसह राज्यातील बंजारा समाजाचे आमदार तुषार राठोड,राजेश राठोड,आदी नेते आणि मोठ्या प्रमाणावर बंजारा समाज बांधव पारंपारिक वेशभूशा परिधान करून या मोर्चात सहभागी होणार आहेत
- विषारी कफ सिरप मुळे आणखी एका बाळाचा मृत्यू
- धानी डेहरिया या 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू
- नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान धानीचा मृत्यू
- मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून धानी ला नागपुरात उपचारासाठी गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले होते
- किडनी निकामी होऊन मेंदूवर सूज आल्याने धानी वर मेडिकल मध्ये उपचार सुरू होते
- धानी डेहरियाच्या मृत्यूनंतर कफ सिरप मुळे नागपुरात उपचार दरम्यान एकूण मृत्यूसंख्या पोहचली दहा वर
मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याने निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट दिल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावरच पुस्तके फेकून त्यांना माफी मागायला भाग पाडले. यावरून आता वाद निर्माण झाला असून प्रबोधनकारांचे पुस्तक भेट देण्यात गैर काय, असा सवाल मुंबई महापालिकेतील कामगार संघटनेने केला आहे...
निवृत्त कर्मचाऱ्यावर पुस्तके फेकणाऱ्या आणि अपमान करणाऱ्या सहाय्यक अधिसेविका व संबंधित परिचारिका, तसेच महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे. कस्तुरबा रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी ३० ऑगस्ट रोजी सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये समाजप्रबोधनात्मक पुस्तकांचे वितरण केले होते. त्यात त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘देव आणि देवळांचा धर्म’ हे पुस्तकही सहकाऱ्यांना वितरित केले होते....
- राज्यातील बहुप्रतीक्षित १४७नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले
- नागपूर जिल्ह्यातील नगरपंचायतींमध्ये तब्बल सात महिलांना नगराध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळणार आहे.
- आरक्षणामध्ये सर्वांत मोठ्या हिंगणा नगरपंचायतीमध्ये महिला नगराध्यक्षाला संधी मिळाली.
- नीलडोह, गोधनी रेल्वे, कांद्री (कन्हान), बेसा-पिपळा, बहादुरा, भिवापूर या सात नगरपंचायतींचे आरक्षणात नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाले आहे.
- येरखेडा, भिसीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
- आरक्षणामुळे राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. दरम्यान, नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार, यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरणार आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून घोषणा होण्याची दाट शक्यता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता आतापर्यंतच्या सर्वाधिक मदतीची घोषणा होण्याची शक्यता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 14 ते 15 हजार कोटी रुपयांची मदतची गरज. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीपेक्षा अधिक ची मदतीची घोषणा होण्याची शक्यता. जवळपास 70 लाख शेतकऱ्यांचं 60 लाख हेक्टर वरून अधिकच नुकसान झालय. 2 हजार 963 हेक्टर जमीन खरडून गेल्याने जवळपास 26 हजार शेतकऱ्यांचा याचा फटका बसलाय. तर 61 हजाराहून अधिकच पशुधन मृत्यूमुखी पडलय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या आधीच आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणा होण्याची शक्यता
सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा पुढाकार
पूरग्रस्तांसाठी तब्बल 50 लाख रुपयांचे 5 हजार किट्स पूरग्रस्तांना होणार वाटप
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचं केलं होत आवाहन
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने घेतला पुढाकार
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वात रबावला जातोय हा उपक्रम
पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी तब्बल 5 हजार धान्य किट तसेच 1 हजार साड्या प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत
तळकोकणात ओंकार हत्ती भातशेती, बागायती, भर वस्तीत, रस्त्यात अक्षरशः धुडगुस घालत आहे. सावंतवाडीतील कास आणि मडूरा गावात ओंकार हत्तीने धुडगुस घातला आहे. भात शेती आता कापणीला आली असून ती कापता येत नाही, कारण ओंकार हत्तीची दहशत. उभ्या भातपिकात हत्ती फिरून नासधूस करत आहे. हा ओंकार हत्ती भरवस्तीत किंवा रस्त्याने देखील फिरतोय, त्यामुळे वनविभागाच्या पथकाकडून २४ तास गस्त घातली जात असून ओंकार हत्तीच्या हालचाली वर लक्ष ठेवून आहेत. ओंकार हत्तीला लवकरात लवकर पकडावं, वनताराला त्यांचं काम करायला द्यावं. त्यामुळे शेतकऱ्यांचं होणार नुकसान थांबेल, असं स्थानिक आमदार दिपक केसरकर म्हणतात. तर हत्तीचा बंदोबस्त करा अशी शेतकरी आर्त हाक वनविभागाकडे करतेय. वनविभागाने देखील लवकरच ओंकार हत्तीला पकडण्यासाठी कंबर कसली आहे. वनातारा टीमच्या माध्यमातून हत्तीची हालचाल, वजन, स्थानिक परिस्थिती याचा अभ्यास करत आहे. २००० किलोचा आणि १० ते १२ वर्षाचा ओंकार हत्ती पकडणे आणि त्याला रेस्क्यू करणं यासाठी दोन ते तीन जागा निवडल्या असून लवकरच ओंकार हत्ती पकडला जाईल अशी माहिती वनविभागाने दिली. तर ओंकार हत्तीला ३ दिवसात पडणार असल्याची माहिती वनविभागाने दिली होती, यावर शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक होत आहेत, कारण हत्ती पकडला गेला नाही. त्यामुळे ओंकारला पकडलं जाणार का? हे पाहणं महत्वाचे आहे.
पावसाने उभे पीक पाण्याखाली आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनमध्ये अक्षरशः तळे असाव असं पाणी आहे. गुडघाभर पाण्यातून शेतकरी कसरत करत सोयाबीनची काढणी करत आहे. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथील हे चित्र आहे. गुडघाभर पाण्यात बाजेचा वापर करत सोयाबीन काढले जाते. अगोदरच पावसानं मोठ नुकसान झालंय. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जातोय. काहीतरी पदरात पडावे यासाठी संकटाशी शेतकऱ्यांचा सामना सुरू आहे.
:बीड तालुक्यातील कपिलधारवाडी गावाला मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसाने मोठा धोका निर्माण झालाय. गावातील घरं, शाळा आणि रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने ग्रामस्थ भयभीत आहेत. दरम्यान ही गंभीर परिस्थिती पाहता तहसील प्रशासनासह भूगर्भ अभ्यासकांनी गावात पाहणी केली. परंतु अद्याप प्रशासनाने ग्रामस्थांसाठी ठोस पावलं उचललेली नाही. ग्रामस्थांनी स्थलांतर करून पुनर्वसनाची मागणी केली. गावातील रस्त्यांना जवळपास एक ते चार फूट अंतराच्या भेगा पडल्या आहेत. चार दिवसांपासून या गावातील ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहत आहेत. प्रशासनाने कपिलधार कडे जाण्याचा रस्ता तूर्तास बंद केला आहे.
डोंबिवली सर्पदंश मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई!
एका रात्रीत दोन जीव गेले — भाची आणि मावशीचा सर्पदंशाने मृत्यू
चार वर्षीय प्रणवी भोईर आणि तिची मावशी श्रुती ठाकूर यांचा मृत्यू झाला होता
उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप — शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर संजय जाधव निलंबित!
जनआंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासन हतबल — आयुक्तांचा तडकाफडकी निर्णय!
“नाईट शिफ्टमध्ये डॉक्टर गैरहजर; त्यामुळे कारवाई अनिवार्य!”.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीदेवीची पाच दिवसाच्या श्रमनेद्रीनंतर आज भल्या पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. महंत पुजारी आणि मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अश्विन पौर्णिमेनिमित्त देवींची विधिवत पूजा करण्यात आली. आज सायंकाळी सोलापूरच्या मानाच्या काठ्यांची तुळजापुरातून मिरवणूक काढल्यानंतर ह्या काट्या तुळजापूर मंदिरात आणून देवीचा छबीनाही मिरवणूक काढण्यात येणार.. रात्री उशिरा महंत पुजारी यांनी आई तुळजाभवानीचा जोगवा मागितल्यानंतर अश्विन पौर्णिमा यात्रेची सांगता होणार आहे. अश्विन पौर्णिमेत्रेसाठी महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश कर्नाटकातूनही भावी तुळजापुरात दाखल झाले आहेत.
वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांचं संरक्षण करता यावं, यासाठी शेतीला सोलरवर प्रवाहित विद्युत तारांचं कुंपण करण्यात आलं होतं. मात्र, काल दुपारच्या सुमारास साकोलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. यात विद्युत तारा शेतात तुटून पडल्या होत्या. या तारांना स्पर्श झाल्यानं गाईच्या गोऱ्यासह मयलेकाचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मालूटोला या गावात काल सायंकाळी घडली. वादळी वाऱ्यानं विद्युत तारा शेतात पडून असताना गाईचा गोरा तिथून गेल्यानं त्या तारा स्पर्श झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. गोरा का निपचित पडला हे बघण्याकरिता गेलेल्या मायलेेकांनाही तुटून पडलेल्या तारांचा स्पर्श झाल्यानं दोघांचाही शेतातचं दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, रात्र घेऊनही शेतात गेलेले मायलेक घरी नं आल्यानं कुटुंबीयांनी शेतात जाऊन बघितलं असता ही घटना उघडकीस आली. महानंदा इलमकर (50) आणि सुशील इलमकर (30) असं मृत मायलेकाचं नावं आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog: मोठी बातमी! 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार