- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live: उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग थांबवला, वारकऱ्यांना चंद्रभागेत सुरक्षित स्नान करता येणार
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि घटनांचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यातील पावसाची स्थिती काय, अधिवेशनातील लाईव्ह अपडेटस्
पार्श्वभूमी
हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेले डॉ. मारोती क्यातमवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करत भगवा झेंडा हाती घेतला आहे. मागील अनेक वर्षापासून...More
Anc: बीड जिल्ह्यातील जवळपास दहा मल्टीस्टेटने ठेवीदारांची फसवणूक करत आपला गाशा गुंडाळल्याची प्रकरणे ताजी असताना आता बीड अर्बन मल्टीस्टेट मध्ये बनावट स्वाक्षऱ्या करून 50 लाखांचा अपहार झाल्याचं समोर आलंय. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये दिलीप रामगोपाल चितलांगे यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांच्या नावे एचयुएफ खाते उघडले होते. मात्र याच खात्यातून तब्बल 50 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करत त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर नियमानुसार खात्याचा कर्ता ज्येष्ठ मुलगा होतो. मात्र पतसंस्थेने आरबीआय आणि आयकर विभागाचे नियम धाब्यावर बसून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली नाही.. याउलट बनावट स्वाक्षऱ्या वापरून ठेवींचा अपहार केला असा गंभीर आरोप चितलांगे यांनी केला. दरम्यान या प्रकरणात मल्टीस्टेटने आपली बाजू मांडली नसून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत..
विजेच्या धक्क्यानं तरुणाचा मृत्यू
भंडाऱ्याच्या राजनी गावातील घटना
Anchor : प्रवाहित वीज तारांना स्पर्श झाल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील राजनी या गावात घडली. युवराज थेरे (३५) असं मृत तरुणाचं नावं आहे. मृतक युवराज यानं गवातचं एक नवीन घरं बांधलं, मात्र गृहप्रवेश कार्यक्रम व्हायचा असल्यानं, तो रोज रात्री नवीन घरी झोपायला जात होता. मात्र, सकाळ होऊनही युवराज जुन्या घरी नं परतल्यानं कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता ही घटना समोर आली.
लोणंद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
फलटण तालुक्यातील सालपे येथे विहिरीत बुडुन आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. माधुरी लक्ष्मण कचरे वय 28 आणि शंभुराज लक्ष्मण कचरे वय- 7 वर्षे अशी दोघांची नावे आहेत. माधुरी आणि मुलगा शंभूराज हे दोघे 30 जूनला सायंकाळी 5 नंतर मिळून येत नव्हते. त्यांचा शोध नातेवाईकांनी घेतला परंतु मिळून येत नव्हते. मात्र एका शेतातील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले असून याप्रकरणी लोणंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास लोणंद पोलीस करत आहेत.
बाईट:- सुशील भोसले (सहा. पोलीस निरीक्षक लोणंद पोलीस स्टेशन)
अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलाचा निर्घृणपणे खून करून मृतदेह अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात फेकून देण्यात आलाय.. सावत्र वडिलांनी मित्राच्या मदतीने या नऊ वर्षीय मुलाची निर्घृणपणे हत्या केलीय.
दरम्यान, भविष्यात संपत्तीत हिस्सा मागणार, या संशयातून सावत्र बापाने त्याच्या मित्राच्या मदतीने हत्याकांड घडवून आणलं. दर्शन वैभव पळसकर असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तर आकाश साहेबराव कान्हेरकर (राहणार हिरापूर ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती) असं मारेकरी सावत्र बापाचं नाव आहे. याशिवाय गौरव वसंतराव गायगोले (रा. हिरापूर ता. अंजनगाव जिल्हा अमरावती.) असं मारेकऱ्याला मदत करणाऱ्या साथीदाराचे नाव आहे. अकोट पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहे.
गोरेगाव पूर्वेतील ओबेराय स्क्वेअर इमारतीच्या 45 मजल्यावरून उडी मारून 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या
अंधेरीत राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने ओबेराय स्क्वेअर इमारतीच्या 45 व्या मजल्यावरील रिफ्यूजी एरियातून उडी मारून केली आत्महत्या
आत्महत्या केलेल्या मुलाचे वडील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीमध्ये मोठा व्यवसायिक आहेत
दोन दिवस पूर्वी कुटुंबीयांनी जर्मनीमध्ये मुलाच्या प्रोजेक्ट सबमिट करण्यासाठी मुंबई विमानतळावर सोडले होते
मात्र मुलांनी मुंबई एअरपोर्ट मधून रिक्षा पकडून गोरेगाव ला येत इमारतीमधून उडी मारून आत्महत्या केली
मुलगा जर्मनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करत होता,तीन महिन्यासाठी मुलगा मुंबईत आला होता पुन्हा कॉलेजच्या प्रोजेक्ट सबमिट करण्यासाठी जर्मनीला जाण्यासाठी निघाला होता
मुलांनी मुंबई विमानतळा मधून जर्मनीला न जाता गोरेगाव चा घरी येऊन इमारतीच्या 45 व मजल्यावर जाऊन उडी मारून आत्महत्या केली
आरे पोलिसांनी या प्रकरणी ADR दाखल करून मुलांनी टोकाचा पाऊल का उचलला या संदर्भात अधिक तपास करत आहे
छत्रपती संभाजीनगर
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार
चंद्रकांत खैरे 121
राज्याच्या राजकारणावर जबरदस्त परिणाम होणार..
लोकांना आता नवीन पाहिजे आहे..
दोन्ही भाऊ एकत्र आल्याने महाराष्ट्राचे वैभव वाढेल..
दोन्ही भाऊ एकत्र यावेत म्हणून माझी खूप इच्छा होती ती आता पूर्ण होताना दिसत आहे..
उद्धव ठाकरे संयमी, राज ठाकरे यांचं जबरदस्त भाषण त्यांना लोक ऐकतात..
देवेंद्र फडणीस यांना खूप वाटतं की ते एकत्र येऊ नयेत म्हणून.
नारायण राणे वेडा माणूस काहीही बडबड करतो..
शिंदे ना वाटते हे दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये.. त्यांची खालची फळी सोडून जात आहे.
शिंदे आताच आऊट होऊ लागले आहेत, फडणवीस त्यांना हळूहळू बाजूला करू लागले आहेत
दोन्ही एकत्र आल्याचा मराठी माणसाला आनंद होईल..
त्यांच्यामुळेच मराठी माणूस ताठ मानेने फिरेल.
मुंबई तुमची भांडी घासा आमची अशी परिस्थिती होती..आता नाही. आता कोणी डोकं वर काढू शकत नाही.
ठाकरे ब्रॅण्ड आहे, ठाकरेंचंच राज्य आहे बाकी कोणाचंच नाही.
चंद्रकांत खैरे 121
सोलापूर ब्रेकिंग :
काँग्रेस-एमआयएम आघाडीबाबत एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारूक शाब्दिंचे मोठे विधान
काँग्रेस सन्मानाने आले तर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत युती करू
‘’काँग्रेस शहराध्यक्षांचे विधान होते की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस कोणासोबतही युतीसाठी तयार आहोत‘’
‘’मात्र असं असलं तरी काँग्रेस सन्मानाने आमच्याकडे आली तर आम्ही आघाडीसाठी तयार आहे‘’
‘’एमआयएम पक्ष भाजप सोडून कोणासोबतही युतीसाठी तयार आहे‘’
- ऑन मुस्लिमेतर उमेदवारी देणार :
एमआयएम पक्ष केवळ मुस्लिम दलित उमेदवार न देता मराठा लिंगायत तसेच इतर कोणत्याही समाजाला उमेदवारी देणार आहे
‘’आम्ही प्रत्येक समाजाच्या उमेदवारासाठी तेवढीच मेहनत करणार आहोत.‘’
एमआयएम प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दि यांची माहिती
बाईट : फारूक शाब्दी (प्रदेश कार्याध्यक्ष एम आय एम पार्टी)
V/O - आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेच्या पात्रात सुरक्षित पवित्र स्नान करता यावे यासाठी उजनी धरणातून गेले काही दिवसापासून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आज पूर्णपणे थांबविण्यात आला आहे.
गेले पंधरा दिवस सातत्याने उजनी धरणात मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्याने चंद्रभागेची पाणी पातळी सातत्याने कमी जास्त होत होती. मात्र आता आषाढी सोहळ्याला केवळ तीन दिवस उरल्याने आज पासून उजनी धरणा मधून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आला आहे. त्यामुळे सध्या पात्राच्या बाहेर आलेली चंद्रभागा उद्या पुन्हा पात्रात जाणार आहे. काही दिवसापूर्वी पात्रात गेलेली चंद्रभागा पुन्हा पाणी सोडल्यामुळे वाळवंटात आली होती. आता ही पाणी पातळी उतरू लागली असून उद्यापासून भाविकांना चंद्रभागेत सुरक्षित स्नान करता येणार आहे.
सध्या उजनी धरणात 102 टीएमसी एवढा पाणीसाठा असून अजूनही धरणात जवळपास बारा हजार क्युसेक निसर्गाने पाणी जमा होत आहे. आषाढी यात्रा काळात पूर परिस्थिती टाळण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आषाढीपूर्वीच उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याच्या सूचना दिल्याने आता धरणात पाणी साठवण्यासाठी बफर स्टॉक तयार झाला आहे. त्यामुळे यात्रा काळात जरी पाऊस वाढल्याने उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले तरी भीमा नदीत पाणी सोडण्याची गरज असणार नाही. आषाढी सोहळ्याला येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेच्या सुरक्षित पाण्यात स्नान करता यावे यासाठी हे नियोजन केले होते. त्यानुसार आता आजपासून उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा प्रवेश थांबविल्याची माहिती
सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांचा आज होणार होता भाजप प्रबेश
दोघांवर नुकताच गुन्हा दाखल झाल्यानं प्रबेश थांबविल्याची माहिती
दोघांच्या जामीन अर्जवर पाच तारखेला होणार सूनवणी
मुख्यमंत्र्यांच्या आषाढी एकादशीसाठी शासकीय पूजेचे महावस्त्र तयार, आचार्य तुषार भोसलेंकडे होती जबाबदारी...
अँकर:
अँकर:
आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची सपत्नीक महापूजा होणार आहे. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महावस्त्रांची जबाबदारी अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडे देण्यात आली होती. रविवारी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेची महावस्त्र घेऊन तुषार भोसले हे नाशिकहून पंढरपूरला रवाना होत आहे. त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी शुभम बोडकेनी...
TT तुषार भोसले ( श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महावस्त्र)
महादेव मुंडे खून प्रकरणात बांगर यांचा जबाब घेऊन कारवाई करण्यात यावी
पोलीस प्रशासन आरोपीची पाठराखण का करत आहे
महादेव मुंडे यांच्या पत्नीची मागणी
Ac - बीडच्या परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात मोठा खुलासा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला होता यानंतर आता यावर परळीतील मयत व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बांगर यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करण्यात यावी कारण त्यांना आरोपी माहित आहेत आणि त्यांची फिर्याद देखील घ्यावी.
अशी माझी एस पी साहेबांना विनंती आहे त्याचबरोबर एसपी साहेबांना देखील आरोपी निष्पन्न झाले आहेत,पण ते आरोपीची पाठराखण का करत आहेत.तत्कालीन पोलीस निरीक्षक सानप यांचे देखील चौकशी करावी.
या प्रकरणाची चौकशी केज येथील पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आलीय मात्र ते भेटायला देखील आले नाहीत.याबाबतीत आंदोलन उपोषण केले मात्र अद्याप आम्हाला न्याय नाही. काल बांगर यांनी आरोपीचे नाव घेऊन टेबलवर मांस ठेवल्याचे सांगितले.तरी देखील एसपी आणखी शांत का आहेत.
पोलिसांवर कोणाचा दबाव आहे हे तपासले पाहिजे आणि सानप यांचे सीडीआर काढले पाहिजेत. एसपी सरांनी यात कुणाचा दबाव आहे का ते सांगावे नाहीतर केस बंद करून टाकावी. या प्रकरणात प्रशासन दुर्लक्ष करत आहे हे दिसून येतय. आरोपीची पाठ राखण का केली जात आहे हे तपासले पाहिजे.
महादेव मुंडे खून प्रकरणात बांगर यांचा जबाब घेऊन कारवाई करण्यात यावी
पोलीस प्रशासन आरोपीची पाठराखण का करत आहे
महादेव मुंडे यांच्या पत्नीची मागणी
Ac - बीडच्या परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात मोठा खुलासा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला होता यानंतर आता यावर परळीतील मयत व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बांगर यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करण्यात यावी कारण त्यांना आरोपी माहित आहेत आणि त्यांची फिर्याद देखील घ्यावी.
अशी माझी एस पी साहेबांना विनंती आहे त्याचबरोबर एसपी साहेबांना देखील आरोपी निष्पन्न झाले आहेत,पण ते आरोपीची पाठराखण का करत आहेत.तत्कालीन पोलीस निरीक्षक सानप यांचे देखील चौकशी करावी.
या प्रकरणाची चौकशी केज येथील पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आलीय मात्र ते भेटायला देखील आले नाहीत.याबाबतीत आंदोलन उपोषण केले मात्र अद्याप आम्हाला न्याय नाही. काल बांगर यांनी आरोपीचे नाव घेऊन टेबलवर मांस ठेवल्याचे सांगितले.तरी देखील एसपी आणखी शांत का आहेत.
पोलिसांवर कोणाचा दबाव आहे हे तपासले पाहिजे आणि सानप यांचे सीडीआर काढले पाहिजेत. एसपी सरांनी यात कुणाचा दबाव आहे का ते सांगावे नाहीतर केस बंद करून टाकावी. या प्रकरणात प्रशासन दुर्लक्ष करत आहे हे दिसून येतय. आरोपीची पाठ राखण का केली जात आहे हे तपासले पाहिजे.
सातारा:शाहूपुरी येथे साडेदहा तोळे सोन्यावर घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला, संशयित महिलेला पोलिसांनी केली अटक, 9 लाख 60 हजाराचे सोने हस्तगत
सातारा: शाहूपुरी येथे घरकाम करणाऱ्या महिलेने घरातील सुमारे साडेदहा तोळे वजनाच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना पोलीस तपासात उघड झाली आहे. सीमा कोकरे असे अटक केलेल्या घरकाम करणाऱ्या महिलेचे नाव आहे पोलिसांनी तिच्याकडून 9 लाख 60 हजारांचे सोने हस्तगत केले आहे. ही चोरीची घटना मे महिन्यामध्ये घडली होती याबाबतची तक्रार संबंधित मालकाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती या प्रकरणात घरकाम करणाऱ्या महिलेची पोलिसांनी विचारपूस केली असता महिलेने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांच्या कौशल्य पूर्ण तपासा मध्ये या चोरीची संबंधित महिलेने कबुली दिली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
शिरपूर पिपल्स बँकेच्या शिरपूर शाखेत तब्बल 1 कोटी 66 लाख 58 हजार 851 रुपयांचा आर्थिक अपहार केल्या प्रकरणी कनिष्ठ बँक अधिकारी योगेश पुना गुजर यांच्याविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक नरेंद्र रघुनाथ माळी यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली असून योगेश गुजर हे मार्च 2020 ते 26 जून 2025 या कालावधीत बँकेच्या शिरपूर शाखेत कनिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी बँकेतील मोठ्या प्रमाणात रक्कम स्वतःच्या तसेच पत्नीच्या बँक खात्यांत वर्ग केली. याआर्थिक गैरव्यवहारामुळे बँकेला तब्बल 1 कोटी 66 लाख 58 हजार 851 रुपयांचा आर्थिक फटका बसला असून खातेदारांच्या विश्वासाला तडा गेला. बँकेच्या अंतर्गत तपासणीत हा अपहार उघडकीस आला. त्यानुसार, योगेश गुजर विरुध्द विश्वासघात व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
प्रताप सरनाईक -
ओला उबेर रिपीडो भारतात काम करतात कोणतीही परवानगी नसताना या बाईक चालु आहेत
माझ्यासमोर हे प्रश्न आले , चालु आहे की नाही हे चेक केलं
त्या ड्रायव्हरची चुकी नाही तर त्या कंपनीची आहे
बाईक स्वाराने कोणत्याही नियमावलीचे पालन केलं नव्हेत
त्याच्यवर गुन्हा दाखल करण्यापेक्षा कंपनीवर गुन्हा दाखल करावा असे सांगितले आहे
ते कोणालाही साॅन्परशीप दिली म्हणजे त्याने विकत घेतले नाही , चुकीची गोष्ट पाठीशी घालणार नाही
ज्याची मुलं बाॅम्बे स्काॅटीश मध्ये त्यांनी मला मराठी बाबात सांगु नये
रिक्षा चालक टॅक्सी चालक यांनी नियमावलींचे पालन केले नाही तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल
आॅन आदीत्य ठाकरे
ओशिवरा पोलिसांनी जे कोर्टात शपथपत्र दिले तेच शपथपत्र पुन्हा कोर्टात दिले मात्र ते शपथपत्र खोटं असुन पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी दिशा सालियन चे वडील आणि वकिलांची आहे*
ऑन अवजड मालवाहतूक चालक संप
२५ जून रोजी बैठक घेऊन आम्ही समिती गठीत केली आहे त्यांच्या मागण्यांवर चर्चा करून समितीला काम करून अहवाल सादर करण्यास १ महिन्याचा कालावधी लागणार असल्यामुळे आम्ही एक महिना मागितला होता पण बस चालक आणि इतर संघटनांनी संप मागे घेतलाय पण अवजड वाहन चालक यांनी संप मागे घेतला नाही
त्यांनी सरकारला वेळ द्यावा असे आवाहन केले आहे
633 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून केल्याची माहिती शिक्षण संचालकाच्या समितीच्या प्राथमिक चौकशी अहवालातून समोर आली आहे..
- नागपूर विभागात बनावट शालार्थ आयडी तयार करून 633 बोगस शिक्षकांचे अनेक महिने पगार काढण्यात आल्याचे समोर आले आहे.
- या प्रकरणाच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्तांनी मार्चमध्ये समिती स्थापन केली होती.. जवळपास 1000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी तपासल्यानंतर अहवाल सादर करण्यात आला आहे.
- आता या 633 शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी एक स्तरीय समितीकडून केली जाईल. त्यानंतर जे शिक्षक आणि कर्मचारी कागदपत्र सादर करू शकणार नाही, त्यांच्यावर पुढील कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयटी पार्क हिंजवडीत आज हातोडा पडणार, तत्पूर्वी स्वतःहून अतिक्रमण काढायला सुरुवात.
हिंजवडी वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने पुणे पीएमआरडीए कडून आज पहिली कारवाई होणार आहे. मारुंजी ते फेज दोनच्या विप्रो सर्कल मार्गावरील अतिक्रमण हटवायला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवायला सुरुवात केलीये. मारुंजी ते विप्रो सर्कल असा अडीच किलोमीटरचा हा मार्ग 2200 मीटर पूर्ण आहे, मात्र 300 मीटर मार्ग गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला आहे. शेतकरी आणि इरिगेशन यांच्यातील वादातून या मार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. मात्र सध्या ही जमीन इरिगेशनच्या नावाने असल्याचा पुरावा पीएमआरडीए कडे प्राप्त असल्याचा दावा महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी केलाय. त्याच आधारावर रखडलेला 300 मीटरचा मार्ग आठवड्यात पूर्ण करण्याचा मानस आहे. यासाठी पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई होणार आहे, त्याआधीच स्थानिकांनी अतिक्रमण हटवायला सुरुवात केलीये. मात्र स्थानिकांची नाराजी आहे.
डी जी सूर्यवंशी, जिल्हा प्रमुख शिबसेना उबाठा
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा दबाव आला
गुन्हा दाखल झाला रॉबरी आणि इतर गुन्हे दाखल केले
आम्ही पोलीस आयुक्त यांची भेट घेतली
त्यानंतर बाहेर भेटून दबाव आणला
आणि पक्ष प्रबेश होत आहेत
ठाण्यात पुन्हा एकदा कचरा डम्पिंग ग्राउंड विषय पेटणार
सत्ताधारी शिवसेनेने महानगरपालिकेला दिला अल्टिमेटम
येत्या 10 जुलैपर्यंत सीपी तलाव कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड हटवले गेले नाही तर ठाणे महापालिका मुख्यालयासमोर टाकणार कचरा
याआधी कचऱ्याच्या समस्या वरून शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी टाकला होता मुख्यालयासमोर कचरा
तर दुसरीकडे भाजपच्या वतीने देखील महानगरपालिकेचा निषेधार्थ वागळे परिसरात बॅनर बाजी..
ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव येथील कचऱ्याचे डम्पिंग वरून सत्ताधारी शिवसेनेचा अल्टिमेट तर भाजपच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात निषेध म्हणून बॅनर बाजी
ठाणे महानगरपालिकेला स्वतःचे डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे भिवंडी येथील आतकोली येथे डम्पिंग ग्राउंड ची व्यवस्था केली आहे ...मात्र तरीसुद्धा वारंवार वागळे परिसरातील सीपी तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा पुन्हा एकदा टाकायला सुरुवात झाली आहे...
येत्या 10 जुलै पर्यंत कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड हरवले गेले नाही तर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर कचरा टाकला जाणार असल्याचा इशारा शिवसेना सचिव राम रेपाळे आणि विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांनी दिला आहे...
त्यामुळे महानगरपालिका कशा प्रकारे आता डंपिंग कचऱ्याच्या पाऊल उचलणार हे पहावे लागणार
पंकज देशमुख यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी...!
भाजपा आ.संजय कुटे यांची विधिमंडळात मागणी.
उद्या जळगाव जामोद शहर बंद च कृती समितीच आवाहन.
जळगाव जामोद मधील भाजपा कार्यकर्ता व आ.संजय कुटे यांचा कार चालक पंकज देशमुख याचा गेल्या तीन मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता प्रथम दर्शनी पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली मात्र पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी पंकज देशमुख यांच्या मृत्यू बाबत काही प्रश्न उपस्थित करत हा घातपात असल्याचं म्हटलं आहे.... यामुळे अनेक दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाला आहे. पंकज देशमुख याला न्याय मिळावा यासाठी एक कृती समिती देखील स्थापन करण्यात आली आहे व या कृती समितीने उद्या दिनांक 4 जुलै रोजी जळगाव जामोद शहर बंद चा आवाहनही केला आहे. काल विधिमंडळात भाजप आ. संजय कुटे यांनीही पंकज देशमुख यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
धाराशिव ब्रेकिंग
..........
एबीपी माझाच्या बातमीची दखल, तुळजापुरातील सावरगाव येथील जिल्हा परिषद शाळा स्थलांतरित केली जाणार
शाळेचे नवीन बांधकाम होईपर्यंत पर्यायी जागा बघण्याच्या शाळा व्यवस्थापनाला सूचना
जिल्हा परिषदेचे सीईओ मैनक घोष यांनी आज बोलावली तातडीची बैठक
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनंतर बैठकीच आयोजन
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून यापूर्वीच 18 वर्गखोल्या धोकादायक ठरवत निर्गमित करण्याचे दिले आहेत आदेश
शासन दरबारी शाळेची नोंदच नसल्याने शाळा बांधकामा बाबतही येत आहेत अडचणी
जिल्हा परिषदे कडून बोलावलेल्या आजच्या बैठकीत त्यावर काय तोडगा निघणार याकडे लक्ष
सुधीर मुनगंटीवार-
On आदित्य
विरोधी पक्षाने एका बाबतीत लक्ष दिला पाहिजे
की पोलीस तत्थ्य च्या आधारे शोध घेता
पण यात विरोधक सरकार वर खापर फोडतात
On
मनीषा कायंदे
मनीषा कायंदे काय बोलले हे माला माहित नाही
पण एखाद्या सदस्य ने मुद्दा मांडला तर त्यानी आपलं. मत मांडावा आणि त्याच चौकशी करावी..
एखाद्याच्या मनात जर शंका असेल. तर पोलिसांनी त्याची चौकशी करावी..
On जिल्हा अध्यक्ष
भाजप चा जिल्हाअध्यक्ष असेल तर त्यात चौकशी होईल..
आणि काही आढळलं तर त्वरित कडून टाकण्यात येईल..
*काही गर्दी आमच्या कडे बाहेर ची झाली आहे त्यांच्या कडून काही प्रकार झालं आहे का हे पाहतो पण बघावं लागेल*
ऑन संजय राऊत.
काही प्रश्नावर मी उत्तर देना टाळलं आहे ..
ऑन सरनाईक..
जर मंत्री स्वतः उतरून अशी कारवाई करत आहेत तर चंगल आहे
आर आर आबा हे आधी अशी कारवाई करायची
On डान्स बार
अश्या प्रकारावर पोलिसांनी कारवाई करावी द
पोलिसांनी सगल्या चॅनेल पाहिलं पाहिजे बातम्या पाहून चेक केला पाहिजे
कोणी तक्रार करण्याच्या ऐवजी..
पोलिसांनी सुमोटो घेतला पाहिजे..
On अनिल परब प्रवीण दरेकर
भाजप मध्ये कोणावर अन्याय होत नाही..
निदान मला तरी हा प्रश्न विचारू नका..
On निधी
सरकार कोणाचं असुद्या हे प्रश्न उपस्थित होतात
आघाडी सरकार युती सरकार सगळ्या मध्ये हे प्रश्न असतात....
कधीही हे प्रश्न सुटत नाही..
On आमदार निधी
आमदारानां वर अन्याय होत हे सरकार मध्ये चिरंजीव प्रश्न आहे पण सामन्य नागरिक यांच्यावर अन्याय होऊ नये..
On विधानसभा
मी उपस्थित केलेल्या मुद्याला सरकार मधील आमदार असतात सोबत
आणि काही विषय मी बोललो त्याला विरोधक यांनी पाठींबा दिला तर हे सामाजिक मुद्दे असतात..
On पुणे
यावर कडक कारवाई केली पाहिजे
मी आता list मागितली आहे किती क्राईम झाला त्याचा क्राईम रेट आहे..
किती नियंत्रणात आहे..त्याचा डेटा घेणार आहे.. आणि त्यावर बोलणार आहे..
Anc: बीड मधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात तिच्या मैत्रिणीचा जबाब नोंदविण्यात आला. पीडित मुलीने शिक्षकांकडून होणारा लैंगिक छळाचा प्रकार मैत्रिणीला सांगितला होता.. यावेळी 'सरांचा रिस्पेक्ट करायचा असतो' असे पिडीतेची मैत्रीण म्हणाली होती. या प्रकरणात आता तिच्यासह इतर मुलींचे जबाब घेतले जात आहेत. महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे विशेष पथक हे काम करत असून मानसोपचारतज्ञांची ही नियुक्ती करण्यात आलीय.
शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात कोचिंग क्लासेस मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा तिच्या शिक्षकांनीच लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे दोन्ही शिक्षक पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणाशी संबंधित पीडितेच्या मैत्रिणी आणि इतर काही लोकांचे गोपनीय जबाब घेतले जात आहेत. यासाठी महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले. 18 वर्षाखालील मुली असल्याने पथकात मानसोपचारतज्ञांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग
जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळून कर्ली नदीला पूर. कर्ली नदीला पूर आल्याने माणगाव खोऱ्यातील ४ ते ५ काजवे ( छोटे पूल) पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत. कर्ली नदीला पूर असल्याने कुडाळ शहरातून कुडाळ रेल्वे स्थानकावर जाणारा रस्ता पाण्याखाली गेला तर गुलमोहर हॉटेल जवळ रस्त्यावर पाणी साचलं आहे. तिलारी धरणातून तिलारी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने तिलारी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात १४० मी.मी. पावसाची नोंद जिल्हात झाली आहे. आज सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी केला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी........
Wkt : सदाशिव लाड
देवगड 104 मी.मी.
मालवण 65 मी.मी.
सावंतवाडी 180 मी.मी
वेंगुर्ला 115 मी.मी
कणकवली 220 मी.मी
कुडाळ 175 मी.मी
वैभववाडी 120 मी.मी
दोडामार्ग 140 मी.मी
भारतीय जनता पक्षात आज पुन्हा एकदा प्रवेश होत आहेत यात गणेश गिते , कमलेश बोडके यांची घरवासपी होणार आहे
तर शिवसेनेतुन राष्ट्रवादी काँग्रेस भाजाप आणि ठाकरेंची शिवसेना आणि आता पुन्हा भाजप असा प्रवेश करणारे सुनिल बागुल, त्यांचे चिरंजीव मनपाचे संभाव्य नगरसेवक पदाचे उमेदवार शंभू बागुल, पुतणे अजय बागुल ,ठाकरेंच्या शिबसेनाचे महानगर प्रमुख मामा राजवाडे यांचा आज प्रबेश होत।आहे
या प्रबेश बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली रात्री उशिरा पर्यत मुबंईत खलबत सुरू होती त्यात आजच प्रबेश करण्याचा निर्णय घेण्यात आला, यातप्रामुख्याने सुनील बागुल मामा राजवाडे यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, सुनील बागुल यांच्या विषयीं आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होत, त्यामुळे ज्याने पोस्ट टाकली होतो त्याला बागूल आणि मामा राजवाडे यांच्यां कार्यकर्त्यांनी मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे आजच्या प्रवेशाकडे लक्ष लागले आहे
अशी असणार विजयी मेळाव्याची रूपरेषा…
व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह फक्त सहभागी होणाऱ्या पक्षांचे पक्षाध्यक्ष, पक्षप्रमुख / प्रदेशाध्यक्ष आसनस्थ होणार.
वरळी डोममध्ये जवळपास ७ ते ८ हजार लोक बसण्याची व्यवस्था आहे.
वरळी डोमच्या हॉलमध्ये तसेच हॉलच्या बाहेर आणि रस्त्यावरही एलईडी स्क्रीनिंग लावण्यात येणार.
मोठी गर्दी झाल्यास वरळी डोममध्ये जागा शिल्लक राहिली नाही तरी बाहेरही उभे राहून कार्यक्रम पाहता यावा यासाठी एलईडी स्क्रीन्स लावण्यात येणार.
पार्किंगसाठी वरळी डोमच्या बेसमेंटमध्ये ८०० गाड्यांच्या पार्किंगची उपलब्धता आहे.
वरळी डोमच्या समोर कोस्टल रोडच्या पुलाखाली दुचाकी पार्क करण्याची व्यवस्था करण्यात येणार.
महालक्ष्मी रेसकोर्समध्येही पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात येणार असून तिथे बसेस आणि बाहेरून येणाऱ्या मोठ्या गाड्या पार्क करण्याची व्यवस्था करण्यात येणार.
कार्यक्रम जय्यत पद्धतीने व्हायला हवा हा नेत्यांचा मानस असल्याने तशी तयारी सुरू आहे.
अकोल्यातल्या अकोट शहरातील कालपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय दर्शन वैभव पळसकर याची हत्या झाल्याची पोलिसांना संशय. या 9 वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करून मृतदेह अकोट तालुक्यातील खिरकुंड धरणात फेकून दिल्याचा संशय. काल रात्रीपासून पोलिसांसह शोध व बचाव आपत्कालीन पथकाकडून शोध मोहीम सुरु. सावञ बापाने दर्शनची हत्या केल्याची प्राथमिक माहिती... पोलिसांनी सावत्र बापाला ताब्यात घेत मुलाच्या शोधात धरणाच्या ठिकाणी शोध मोहीम सुरू.. काल दुपारी 3 वाजता कुणालाही न सांगता दर्शन घराबाहेर निघून गेला असल्याची आकोट शहर पोलीस ठाण्यात होती तक्रार दाखल. मुलाच्या बेपत्ता प्रकरणी तपास सुरू असतानाच सावत्र वडिलांवर संशय आल्याने पोलिसांनी घेतले ताब्यात. सावत्र वडिलांनेच मुलाची हत्या करून मृतदेह धरणाच्या पाण्यात फेकून दिलाचा संशय.
वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची बदली....अर्पित चौहान यांची नियुक्ती
वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची मुंबई येथे बदली झाली असून वाशिम मध्ये त्यांच्या जागेवर IAS अधिकारी अर्पित चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वैभव वाघमारे यांनी जानेवारी २०२४ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेच्या 'मुख्यकार्यकारी अधिकारी ' पदाची सूत्रे स्वीकारली होती. सुमारे दीड वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आरोग्य शिक्षण, बोलक्या अंगणवाड्या, घरकुल बांधकाम कुपोषण निर्मूलन, जलसंधारण रोजगार निर्मिती आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली.व
मुख्यमंत्री १०० दिवस कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या मूल्यांकनात त्यांना राज्यात तिसरा क्रमांक मिळाला होता....
मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्याचा निषेध करत दिली पोलीस स्थानकात तक्रार.
बुलढाण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली तक्रार.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या अवमान जनक वक्तव्याचा निषेध करत काल बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे पोलीस स्थानकात मंत्रिमंडल प्रभात लोढा यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. "महाराणा प्रताप पराजित झाले आहे कारण त्यांनी शिवाजी महाराजांसारखं नियोजन केलं नाही..." असं वक्तव्य सार्वजनिक व्यासपीठावर मंत्रिमंडल प्रभात लोढा यांनी केलं होतं. याच वक्तव्याच्या विरोधात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धामणगाव बढे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.
विठुरायाची भेट अपूर्ण राहिली!
मृदुंगाचा गजर आणि विठुनामाच्या गजरात आहे. एकीकडे वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची ओढ लागली असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे. आषाढी वारीला पायी गेले ल्या उषा अशोक व्यवहारे वय ५0(रा- सिंदफळ तालुका- तुळजापूर) यांचा वाखरीजवळ पंढरपुर रात्री १:३० सुमारास रोड कॉस करतान त्यांच्या च दिंडीतील वाहनाने(ट्रक ) त्यांना चिरडले त्यांत त्यांचा मृत्यू झाला आहे आहे.
आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांनी पेंशन काढून देतो या नावाखाली माझी १७ एकर जमीन हडपली आहे असा आरोप पडळकरवाडीच्या रहिवासी विठाबाई बापू पडळकर यांनी केला आहे. विठाबाई पडळकर ह्या ८२ वर्षाच्या असून आज विधान भवन बाहेर त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. विठाबाई पडळकर ह्या आपल्या कुटुंबासह विधानभवन बाहेर आंदोलन करत आहेत. विठाबाई पडळकर यांच म्हणणं आहे की गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या भावाने बोगस दस्त करून स्वतःच्या मॅनेजरच्या नावे १७ एकर जमीन करून घेतली आहे. विठाबाई पडळकर यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीनी
राज्यात ४०० पेक्षा जास्त धर्मादाय रुग्णालये असून देखील गरीब रुग्णांना नाममात्र दरात उपचार देण्यास रुग्णालयाकडून होतं असलेली टाळाटाळ यासोबतच धर्मादाय रुग्णालयांना सरकारने कोट्यावधी रुपयांची जमीनी नाममात्र दरात उपलब्ध करून दिली आहे यासोबतच ३० टक्के सवलत आयकरात दिली आहे असं असताना देखील धर्मादाय रुग्णालयानी उपचारातून मिळणाऱ्या एकूण मिळकतीमधील २ टक्के निधी निर्धन निधी म्हणून राखून ठेवणे बंधनकारक असताना देखील हे कुठेच होतं नाही. याच निधीतून गरीब रुग्णांसाठी २० टक्के खाटा राखून ठेवणे, १० टक्के निधी निर्धन रुग्णांना विनामूल्य उपचार तर १० टक्के गरीब रुग्णांना ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार देणे बंधनकारक आहे मात्र हे होतं नाही
२) राज्यातील पाणीपुरवठा संस्थांची कर्ज माफ करण्याची घोषणा माननीय राज्यपाल यांनी हिवाळी अधिवेशन २०२४ च्या अभिभाषणात केली होती मात्र त्यानंतर सहकार खात्याने कर्ज माफ केल्याचा शासन निर्णय काढला नाही त्यामुळे बँकेच्या पाणीपुरवठा संस्थानी शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज परतफेड करण्यासाठी सध्या बँकानी तगादा लावला आहे. अनेक ठिकाणी बँकांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लिलाव प्रक्रिया करून कर्ज वसुलीला सुरुवात देखील केली आहे
विधान परिषद
कालची अमली पदार्थावरील लक्षवेधी आज घेतली जाईल.
आजच्या कामकाजात मुंबईतील कबुतरखाने बंद करणे, मुंबईतील नाले सफाई गोंधळ, मुंबईतील कचरा कर यावर चर्चा होणार आहे.
प्रसाद लाड हे मुंबई महापालिका शाळेतील दिव्यांग शिक्षक घोटाळा उघडकीस आणणार आहेत.
आमदार अनिल परब हे सार्वजनिक बांधकाम खात्यातील एक नवा घोटाळा बाहेर काढणार आहेत.
सिडकोची कोट्यावधींची घरे पडून राहिली असल्याचा प्रश्न आज उपस्थित केला जाणार आहे.
खळखळत्या नाल्यातून आदिवासी नागरिकांचा जीवघेणा प्रवास
भामरागड तालुकावासियांच्या नरक यातन दूर कधी होणार?
गडचिरोली : एकीकडे देशात बुलेट ट्रेन धावणार आहे. समृध्दी महामार्गाचे काम वेगात झालंय. शक्तिपीठ महामार्गही पूर्णत्वास नेण्याचा विचार सुरू आहे. मात्र आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागातील रस्ते आणि पुलांचे बांधकाम पूर्ण होताना दिसत नाहीये. त्यामुळे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात देखील आदिवासी बांधवांना तुडुंब भरलेल्या नदी, नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाल्यावर पूलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र ते अपूर्ण असल्याने अतिदुर्गम लाहेरी पलीकडील डझनभर गावांना खळखळत्या नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पाच दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात पाऊस सुरू असून नदी नाले प्रवाहित झालेत. अशातच गुंडेनूर नालाही खळखळून वाहत असून या नाल्यातून दुचाकी खांद्यावर घेऊन नाला पार करताना विकसित भारताचे हे दृश्य.
सोलापूर ब्रेकिंग
---
शरद पवार गटाच्या आमदारांची पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाठी जाहिरात
माणसातला देव हा, माणसात देव असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्याच्या स्वागताची जाहिरात
वारीच्या निमित्ताने व्यवस्थांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेंत
त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने स्वागत करण्यासाठी मोहोळचे शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी दिली स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात
या आधी देखील अनेकवेळा आमदार राजू खरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या स्वागतसाठी जाहिरात, बॅनर्स लावलेत
तर अक्कलकोट येथे काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या कार्यक्रमात थेट मंचावर उपस्थिती लावली होती
त्यानंतर आता पुन्हा एकदा आमदार राजू खरे यांनी एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी जाहिरात दिलीय
बिल्डरांच्या लाप्रवाहीमुळे 4 अल्पवयीन मुलांचा मृत्यू....
अँकर
बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात पडून 9 वर्षीय मुलाचा मूत्यू झाल्याची धाकादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. दोन दिवसांत हि दुसरी घटना असून चार अल्पवयीन मुलांचा मूत्यू झाला आहे.नाशिक अंबड लिंकरोडवरील सातपूर शिवारात असलेल्या भोर टाऊनशिपजवळ मोकळ्या मैदानात तीन ते चार शाळकरी मुले खेळत होती. जवळच एका गृहप्रकल्पासाठी खोदललेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावासाचे पाणी साचलेले असून, या खड्ड्यात नऊ वर्षीय मुलगा पाय घसरून बुधवारी दुपारी पडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत आझाद शेख या युवकाने खड्ड्यात उडी घेत बुडणाऱ्या मयूर संजय भोंडवे या शाळकरी मुलाला बाहेर काढले. त्यास शासकिय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आपत्कालीन कक्षात रात्री अकरा वाजता त्यास मृत घोषित करण्यात आले. दोन दिवसांत ही दुसरी घटना नाशिक शहरात घडली आहे.विडी कामगार नगरमधील अमृतधाम येथे गृहप्रकल्पाच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेची पुनरावृत्ती बुधवारी सातपूर भागात झाली.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आलं आहे.
- राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढलेले गणेश गीते आज करणार भाजप मध्ये प्रवेश
-
- गणेश गीते यांच्या सोबत ठाकरे गटाच्या नगरसेविका सीमा ताजने,नगरसेवक प्रशांत दिवे,नगरसेवक कमलेश बोडके हे देखील करणार प्रवेश
-
- शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि त्यांचे चिरंजीव सुनील बागुल यांचाही होणार आज भाजप मध्ये प्रवेश
- सुनील बागुल यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वीच नाशिक मध्ये झाला होता मारहाणीचा गुन्हा
-
- शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख मामा राजवाडे हे देखील भाजपच्या वाटेवर चार दिवसांपूर्वीच राजवाडे याना शिबसेना ठाकरे गटाने दिले होते महानगर प्रमुख पद
-
- आज सकाळी 10:30 ते 11 वाजता मुंबई प्रदेश कार्यालयात होणार प्रवेश
-
- सुनील बागुल यांच्या प्रवेशाने ठाकरे सेनेला बसणार मोठा धक्का
- तर गणेश गीते यांच्या घरवापसीने वाढणार भाजपचे बळ
मागील पाच महिन्यांत बीड जिल्ह्यात बाललैंगिक अत्याचाराचे तब्बल 78 गुन्हे नोंद
यातील 42 गुन्हे अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराचे असून 36 गुन्हे विनयभंगाचे आहेत
धक्कादायक म्हणजे पाच महिन्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये एकूण 49 टक्के पीडिता अल्पवयीन आहेत
बीड मधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणानंतर माहिती घेतली असता पाच महिन्यांची ही आकडेवारी समोर आलीय
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यात 23 गुन्ह्यांची वाढ झालीय
पुण्यातील कोंढवा भागातील एका सोसायटीमधे डीलिव्हरी बॉय म्हणून आलेल्या व्यक्तीकडून एका २५ वर्षीय महिलेच्या घरात घुसुन तीच्या घरातील संपत्ती लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित महिलेच्या घराची बेल वाजवली असता तीने घराचे दार उघडले आणि आपण कोणते पार्सल ऑर्डर केले नव्हते असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत आरोपीने त्याच्याजवळील स्प्रे त्या महिलेच्या तोंडावर मारला आणि घरात घुसला. बुधवारी रात्री हा प्रकार घडला असुन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
रत्नागिरी, रायगड, आणि सिंधुदुर्गात जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलाय. यादरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान काल दुपारनंतर तिन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली. मुसळधार अशा पावसाच्या बरसत आहेत. रात्रभर पावसाची कोसळधार रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतांश भागात दिसली. पण पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली असून सध्या कोसळणारा पाऊस हा जोरदार सरींवरती आहे. अद्याप तरी या पावसाचा जनजीवनावरती कोणताही परिणाम झाला नाहीये. पावसामुळे मात्र भात शेतीच्या लावणीच्या कामांना वेग येणार आहे.
अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी...
आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे आली धमकी...
कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल...
या मेसेजमध्ये “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा थेट जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला आहे...
हिंदुत्वासंदर्भातील भूमिका आणि वक्तव्यांमुळे आमदार जगताप चर्चेत ...
हिंदुत्ववाचा मुद्दा हाती घेतल्याने थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने हिंदुत्ववाद्यांमध्ये संतापाचे वातावरण...
पुण्याला रात्रभर पावसाने झोडपले...
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले होते
पुणे शहरांसह घटमाथ्यावर पावसाने रात्री जोरदार हजेरी लावली
घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय...
रात्री 12 पासून 6451 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलाय...
पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलीय...
धाराशिव च्या परंडा तालुक्यातील चिंचपुर बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील मद्यपी शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.28 जुन रोजी शिक्षक पी.एन मोहोळकर हे मद्यपान करुन आल्याचे उघड झाले होते. या प्रकारानंतर शालेय समीती पालक व ग्रामस्थ संतप्त झाल्याने मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी रिपोर्ट केला होता. यावरुन शिक्षणाधिकारी मापारी यांनी निलंबीत केले असून त्यांना कळंब येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे व मुख्यालय सोडु नये असे आदेश देण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं. त्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. सकाळपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. तिलारी धरण ७० टक्के भरले असून तिलारी धरणातील पाण्याचा विसर्ग तिलारी नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आज जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता वर्तविली असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तिलारी धरणातील पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊन तिलारी धरणातील पाण्याचा चारही दरवाजातून विसर्ग सुरू झाला आहे.
बीडच्या केज तालुक्यातील शेलगाव येथे शेतकऱ्यांनी पेरणी केलेले पन्नास एकर क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेले नाही.यामुळे आता या बावीस शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.बियाण्यासाठी व खतासाठी मोठा खर्च केला परंतु आता हे बियाणेच उगवले नसल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यासंदर्भात केज पंचायत समितीतील कृषी विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.याचे पंचनामे करावे तसेच संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी या ठिकाणचे शेतकरी करत असून गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणचे 20 ते 25 शेतकरी यासाठी पाठपुरावा करत असले तरी कृषी विभागाचे अधिकारी मात्र या ठिकाणी पोहोचलेले नाहीत.
बीडच्या केज तालुक्यामध्ये एका गतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडलीय.2 जून रोजी सदर तरुणी आपल्या नातेवाईक महिलेसोबत आरोग्य उपकेंद्रात जात असताना थांबली होती.यावेळी तिला तेथेच थांबवून ती महिला उपकेंद्रात गेल्यानंतर नानासाहेब चौरे याने या गतिमंद तरुणीवर अत्याचार केला.
हा प्रकार सोबत असलेल्या महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर त्या महिलेला देखील कोणाला काही सांगू नको असे म्हणत धमकावले.आरोपी नानासाहेब चौरे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर आता केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता अधिकचा तपास केज पोलीस करत आहेत.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये नारायणा इंग्लिश स्कूल ही खाजगी इंग्लिश स्कूल मागील दोन वर्षापासून हिंगोली शहरात शिक्षण विभागाची किंवा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अवैधपणे सुरू आहे. ज्युनिअर केजी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये शिकवले जात आहे ही शाळा बोगस असून या शाळेवर दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे यात विशेष म्हणजे मागील दोन वर्षापासून ही शाळा राजरोसपणे कोणतीही परवानगी न घेता अशा पद्धतीने सुरू असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय नोव्हेंबर महिन्यात या शाळेला आठ लाख रुपयाचा दंड ठेवण्यात आला असून दर दिवशी दहा हजार रुपये इतका अतिरिक्त दंड लावण्यात येतोय पुढील आठ ते दहा दिवसात या शाळेला सील ठोकले जाईल अशी माहिती सुद्धा हिंगोलीचे शिक्षणाधिकारी प्रशांत डीग्रसकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे
उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला .. आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेत सुरक्षित स्नान करता यावे यासाठी केलेल्या नियोजनानुसार आज पासून पाण्याचा विसर्ग पूर्ण बंद करण्यात आला आहे .. त्यामुळे सहा जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याला लाखो भाविक चंद्रभागेचे पवित्र स्नान सुरक्षितपणे करू शकणार आहेत
गोंदिया जिल्ह्यात मागील 5 दिवसात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे वैनगंगा नदीवर बनविण्यात आलेल्या धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे उघडले असुन 45,825 क्युसेकने सध्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जोरदार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे बॅरेज मधून पाणी सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी महागडे बियाणे आणून नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मका पिकाची पेरणी केली..मात्र एक महिना उलटूनही मकाची वाढ होत नसल्याने तसेच मकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ठाणगाव येथील शेतकरी प्रवीण शेळके यांनी आपल्या सहा एकर मका पिकावर रोटावेटर फिरून संताप व्यक्त केला आहे..शेतकऱ्याला आता दुबार पेरणी करावी लागणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवडीनंतर शुभेच्छांचे बॅनर हिंगोली शहरांमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले होते हे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालेला आहे हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक यासह इतर ठिकाणी हे बॅनर लावले होते रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हे बॅनर फाडल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे दरम्यान बॅनर कोणी व का फाडले याचा शोध पोलीस प्रशासनाने घ्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरू आणि बॅनर फाडल्याचे उत्तर जशास तसे देऊ अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी दिली आहे
हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेले डॉ. मारोती क्यातमवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करत भगवा झेंडा हाती घेतला आहे. मागील अनेक वर्षापासून डॉ. क्यातमवार हे जिल्हाभरात काँग्रेस वाढीसाठी काम करत होते क्यातमवार यांच्या पक्षप्रवेशामुळे वसमत शहरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आता नवं बळ मिळणार आहे
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live: उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग थांबवला, वारकऱ्यांना चंद्रभागेत सुरक्षित स्नान करता येणार