Maharashtra Live blog: 'पहलगाममध्ये सहभागी असलेले तिन्ही दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा', गृहमंत्री अमित शाह यांचा लोकसभेत खुलासा
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी आणि ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात कुठे-कुठे पाऊस पडणार?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर LPG गॅस वाहून नेणारा टँकरला अपघात. सोमवारी रात्री हातखंबा येथे पुलावरून टँकर खाली कोसळला. या अपघातानंतर टँकरमधून वायूगळती सुरु झाली. एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमने ही...More
आमिर खान आता यूट्यूब क्षेत्रात पाऊल टाकणार आहे ...आमिर खान टॅाकिज जनता का थिएटर आता एक नवा यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे
आमिरचे सिनेमे आता यूट्यूब वर येणार …
सितारे जमीन पर थेट थिएटरनंतर सरल यूट्यूब वर येणार …
कोणत्याही OTT चॅनलवर हा सिनेमा येणार नाही ...
एक नवीन दिशा सिनेसृष्टीला आमिर खान देणार आहे
फक्त १०० रूपयेत आता यूट्यूब वर आमिरचा सिनेमा येणार आहे …
आमिर पहिला अभिनेता आहे ज्यांनी ताचा सिनेमा कोणत्याही OTT वाहिनीवर दिला नाही ...
सितारे जमीन पर आता थिएटरनंतर १ ॲगस्टला यूट्यूबवर प्रदर्शित होणार आहे...
आमिर खान भाषण पॉईंटर
३ ते साडे कोटी लोक म्हणजे २ ते ३ टक्के लोक फिल्म थेटर मध्ये बघतात.भारताची लोकसंखा १४५ कोटी आहे.इतर लोकांसमोर कसं पोहचायचं.मी यावर विचार केला कस पोहचताच अनेक आयडिया आल्या पण त्यातून काही झालं नाही.सरकार ने UPI आणलं.त्यामुळे सोप झालं.भारतात डिजिटल पेमेंट मध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे.आता हीच वेळ आहे अस मला वाटत.याच उत्तर आज आहे डिजिटल प्लॅटफॉर्म प्रत्येक लोकांपर्यंत पोहचू शकतो.यू ट्यूब च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचू शकतो.५५ करोड भारतीय रोज youtube बघतात.याच उत्तर मी शोधाल आणि यू ट्यूब वर येऊ.तशी तयारी केली.शंभर वर्षापासून एकच मॉडेल आहे.तिकीट खरेदी करतात आणि फिल्म बघतात.आमिर खान टॉकीज यू ट्यूबवर लाँच केलं.मी प्रत्येक भारतीयापर्यंत पोहचू अस स्वप्न होत.जनता का थिएटर हे नाव दिलं.यू ट्यूब हेड यांना भेटलो.भारतात ८ ते ९ हजार स्क्रीन आहेत अमेरिकेत ३५ हजार चीन मध्ये ८० ते ९० हजार स्क्रीन आहेत.सिनेमा घर घर गाव गाव नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.स्मार्ट फोन आल्यावर जीवनशैली बदलली आहे.भारतात सर्वं जास्त सिनेमे तयार होतात.युवांना यामुळे संधी मिळत नाही.ही संधी त्यांना देणार आहे.यू ट्यूब वर १०० रुपयात सिनेमा रिलिज करणार आहे. यामुळं सर्व कुटुंब,नातेवाईक मित्रपरिवार यात बघू शकतात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू असताना गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या खांद्यावर एका पक्ष्याने बसून सर्वांनाच सुखद धक्का दिला. विशेष म्हणजे, ज्यावेळी पंतप्रधानांनी पक्षी आणि त्यांच्या संवर्धनाबद्दल चर्चा केली, त्याचवेळी हा अनपेक्षित प्रसंग घडला. व्हिडिओमध्ये खंवटे शांतपणे हसत, संयम राखत बसलेले दिसत आहेत, तर पक्षी त्यांच्या खांद्यावर आरामात बसून होता. पंतप्रधानांच्या पक्ष्यांवरील भाषणाशी जुळल्याने तो क्षण अधिकच लक्षवेधी ठरला. पक्ष्यांना त्रास न देता त्यांना ओळखण्यासाठी ध्वनी रेकॉर्डिंग उपकरणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्यात आला. जेव्हा तंत्रज्ञान आणि संवेदनशीलता एकत्र येतात, तेव्हा निसर्गाला समजून घेणे किती सोपे आणि सखोल होते. हे एकीकडे पंतप्रधान पक्षी आणि तंत्रज्ञानावर बोलत होते, तर दुसरीकडे गोव्यात मंत्र्याच्या खांद्यावर बसलेल्या या पक्ष्याने आपला संदेश कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता, जुन्या पद्धतीनेच, अचानक प्रकट होऊन दिला. हा प्रसंग निसर्ग आणि मानवी जीवनातील सुंदर समन्वयाचे एक अनोखे उदाहरण आहे.
चंद्रशेखर बावणकुळे
- आज महाराष्ट्राचे काॅग्रेसचे नेते सूरेश वरपूडकर याचा भाजपमध्ये प्रवेश केला
- सूरेश यांच्यासोबत हजारो पदाधिकारी यांनी प्रवेश केला
- मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही मोदींच्या संकल्पेतला विकसीत देश या संकल्पनेला मला जोडायचं आहे हे सांगून प्रवेश केला आहे
- मराठवाड्यात काॅग्रेसमध्ये मोठी फूट पडली
- पश्चिम महाराष्ट्रात संग्रामसिंग आल्यने खिंडार पडलं
- भविष्यात विदर्भातील काॅग्रेस पार्टी फुटणार आहे
- राहुल गांधींचा विचार भारताच्या विकासाचा नाही
- राहुल गांधी पक्षं संपवायला निघाले आहेत
- कार्यकर्तयावर अडचण आली की पक्ष मदतीला जात नाही
- मात्र भाजपमध्ये साद्या कार्यकरत्याच्या मागे उभे राहते
- विदर्भात काॅग्रेस पार्टीला सोडायला अनेक कार्यकर्ते तयार आहेत
- रविंद्र चव्हाणांच्या प्रयत्नाने मोठा नेता प्रवेश करणारआहे
Slug-: पलूस तालुक्यातील आमणापूरच्या वैष्णोदेवी मंदिरात चोरी...चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
Anchor-: पलूस तालुक्यातील आमणापूरच्या वैष्णोदेवी मंदिरात चोरी झाली असून मंदिराच्या गाभाऱ्यातील सीसीटीव्ही मध्ये चोरटे चोरी करताना सापडलेत. चोरट्यानी वैष्णोदेवीच्या गळ्यातील दागिन्यांमधील मोतीहार आणि बदाम चोरून नेलेत. सकाळी पुजाऱ्याना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले. आमणापूर येथील येळावी-आमणापूर रोडवर हे वैष्णोदेवी मंदिर असून या मंदिरात पहाटे ३ च्या सुमारास ही चोरीची घटना घडली आहे. मंदिरातील चोरीची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चोरट्याचा शोध घेत तपास सुरू केलाय
ब्रेकिंग
गुहागर समुद्र किनारपट्टीला लाटांचा मोठा तडाखा.
किनारपट्टी भागातील जवळपास एक किमी परिसरातील जमीन समुद्राने केली गिळंकृत.
कासव संवर्धन केंद्राच्या ठिकाणी जमिनीची मोठी धूप.
झाडांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड.
भरतीचे पाणी थेट वस्तीकडे वळू लागल्याने स्थानिकांमध्ये भीती.
दरवर्षी किनारपट्टीची होणारी धूप संशोधनाचा विषय....स्थानिकांकडून चौकशीची मागणी.
गुहागर मधील वरचा पाट भागात समुद्र किनारपट्टीचा सर्वाधिक हानी
सोलापूर ब्रेकिंग
---
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेच्या विरोधात सोलापुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक
ऑपरेशन सिंदूर बाबतीत प्रणिती शिंदेनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपची निदर्शने
भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वखाली भाजपचे प्रणिती शिंदेविरोधात आंदोलन
गाढवावर प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांचे फोटो लावून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
ऑपरेशन सिंदूर हे मीडियासाठी केलेला तमाशा होता असे विधान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेनी संसदेत केले होते
त्यानंतर सोलापुरात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक असून प्रणिती शिंदेच्या वक्तव्यचा निषेध केला जातोय
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना अखेर सहायक पोलीस आयुक्तपदी बढती
निवृत्तीच्या दोन दिवस आधी मिळाली बढती
३१ जुलैला दया नायक होणार पोलीस सेवेतून निवृत्त
सध्या दया नायक गुन्हे शाखा ९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक
Parliament Monsoon Session Live: काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा म्हणाल्या, "केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज माझ्या आईच्या अश्रूंबद्दल बोलले. मला यावर उत्तर द्यायचे आहे. दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांना मारले तेव्हा माझ्या आईचे अश्रू वाहत होते. आज जेव्हा मी त्या 26 लोकांबद्दल (पहलगाम हल्ल्यातील बळी) बोलतो तेव्हा मला त्यांचे दुःख समजते."
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 मिनिटे घेतला मंत्र्यांचा क्लास
वादग्रस्त विधाने, कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही
असेच प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते.
ही अखेरची संधी, काय कारवाई करायची ती करूच
पण आता एकही प्रकार खपवून घेणार नाही
सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी दिली तंबी
20 मिनिटे चालली फक्त मंत्र्यांची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली
मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू
रात्री 11 वाजता घडला होता अपघात; दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी वाहतूक झाली सुरु
एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर रत्नागिरी जिल्ह्यातला हातखंबा इथं पलटी झाल्यामुळे वाहतूक होती ठप्प
टँकरमधील गॅस दुसरा टँकरमध्ये भरल्यानंतर वाहतूक सुरू
बारा तासाहून अधिक काळ मुंबई गोवा महामार्ग ठप्प राहण्याची मागच्या दोन महिन्यातील दुसरी घटना
परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार करुणा शर्मा यांनी केली होती.परळीच्या न्यायालयात याबाबत आज सुनावणी होती. मात्र धनंजय मुंडे यांचे वकील काही कारणास्तव गैरहजर राहिले त्यामुळे पुढील सुनावणी आता 16 ऑगस्ट रोजी होणार आहे.
पुढील तारखेला धनंजय मुंडे यांचे वकील गैरहजर राहिले तर हे प्रकरण न्यायालय निकाली काढणार असल्याचा दावा करुणा शर्मा यांच्या वकिलांकडून करण्यात आलाय.दरम्यान पासपोर्ट आणि इतर ठिकाणी धनंजय मुंडे यांनी माझ्या मुलाला नाव दिले असले तरी निवडणूक शपथ पत्रात मात्र माझा उल्लेख नसल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.
शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन 2 ऑगस्ट ला पनवेल येथे आयोजित केला आहे. या निमित्ताने शनिवारी सकाळी दहा वाजता, नवीन पनवेल येथे शेकापचा मेळावा होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज साहेब ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती या मेळाव्यात असणार आहे. शेकाप सरचिटणीस जंयत पाटील यांच्यासह शेकाप ची सर्व नेतेमंडळी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत काही दिवसापूर्वीच शेकापचे नेते जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेत चर्चा केली होती.
मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी मनसेतील फेरबदलांचं सत्र सुरुच
मनसेचे विभागध्यक्ष बदलल्या नंतर आता शाखाध्यक्षही बदलणार
आज पासून मनसेची केंद्रीय समिती शाखाध्यक्षांचा कामकाजांचा आढावा घेणार
शाखध्यक्षांच्या कामकाजाचा आतापर्यंत चा अहवाल पाहण्यासाठी आज मनसे नेत्यांची दुपारी १ वाजता पक्ष कार्यालयात बैठक पार पडेल
गडचिरोली : 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताह पाळला जात आहे. आज सप्ताहाचा दुसरा दिवस असून या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांकडून हाय अलर्ट घोषित करण्यात आले असून सुरक्षा यंत्रणा सतर्क केली आहे. दरम्यान नक्षलवाद्यांनी बाजारपेठा बंद ठेवण्याचे केलेले आवाहन झुगारून तब्बल 20 वर्षानंतर कोरची येथील मुख्य आठवडी बाजारपेठ सोमवारी सुरळीत सुरू होती. नक्षली नेत्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी पाळला जाणाऱ्या या शहीद सप्ताह दरम्यान कोरची येथील बाजारपेठ 20 वर्षापासून बंद असायची. मात्र यावर्षी पोलिसांच्या सहकार्याने व्यापाऱ्यांनी बाजारपेठ सुरू होती. तर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनेक बाजारपेठा सुरू असल्याचे दिसून आले. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांकडून सीमावरती भागामध्ये नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र केले असून सतर्कता बाळगली जात आहे. नक्षल्यांचा मुख्य कमांडर बसवराजू मारल्या गेल्यानंतरचा हा पहिलाच शहीद सप्ताह असून या सप्ताहामध्ये सरकारी मालमत्तेचे नुकसान, सुरक्षा दलांवर हल्ले, खबरी असल्याच्या संशयावरून निष्पापांची हत्या, रस्ते बंद करणे अशी कृत्य नक्षली संघटनेकडून केली जातात.
बीड: बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचवन गावात निसर्गाचा अजब प्रकार समोर आला. 2019 साली घेतलेली एक बंद बोअरवेल अचानक सक्रिय झाली आणि भूगर्भातून जोराचा आवाज आला. या बोअरवेल मधून 200 फूट पाण्याचा फवारा बाहेर पडल्याच शेतकरी सांगतायत..
याच इतकं प्रेशर होतं की 25 फूट लांब क्रिसिन पाईप हवेत उडून बाजूला पडला. विशेष म्हणजे, कोणतीही मोटार न लावता हे पाणी सातत्याने बाहेर येत आहे. हा अद्भुत प्रकार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. हा संपूर्ण प्रकार किसन दोडताले यांच्या शेतात घडला. त्यांच्या कपाशीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपासून पाण्याचा प्रवाह अद्याप थांबलेला नाही.
तब्बल 23 वर्षानंतर आज सांगलीच्या बत्तीस शिराळ्यात जिवंत नागाचे दर्शन घेता येणार आहे.... आज नागपंचमी आहे आणि नागदेवतेसाठी संपूर्ण देशामध्ये बत्तीस शिराळा हे प्रसिद्ध आहे.... मात्र गेल्या 23 वर्षांपासून या ठिकाणी जिवंत नागाची पूजा किंवा खेळ करण्यास कोर्टाने बंदी घातली होती... यावेळी मात्र केंद्रातील विविध विभागांनी परवानगी दिल्यानंतर 21 जणांना जिवंत नागाचे दर्शन देण्यासाठी परवानगी दिली आहे... मात्र यामध्ये नागाला कोणतीही इजा करायची नाही, कोणतेही खेळ करायचे नाहीत.. केवळ नागाच्या संदर्भात प्रबोधन करायचं इतकीच परवानगी दिली आहे... सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळाच्या अंबाबाई मंदिरातून आढावा घेतला आहे
भाजपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशांचा धडाका
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेत शरद पवार गटाला मोठं खिंडार
शरद पवार गटातील अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते आज भाजपात दाखल होणार
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश
आज दुपारी ३ वाजता भाजप प्रदेश कार्यालयात होणार पक्ष प्रवेश सोहळा
राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये भाजपा अधिक भक्कमपणे उतरण्याच्या हालचालींना वेग
अशात, भाजपकडून आयारामांच्या इन्कमिंगला ग्रीन सिग्नल
वानखेडे स्टेडियममधून आयपीएल संघांच्या जर्सी चोरीला, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल
वानखेडे स्टेडियमच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बीसीसीआयच्या अधिकृत स्टोअरमधून आयपीएल खेळाडूंच्या एकूण २६१ जर्सीं चोरी गेल्याप्रकरणी सुरक्षा व्यवस्थापक फारुख असलम खान याच्याविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही घटना १३ जून २०२५ रोजी घडली होती. याप्रकरणी १७ जुलै २०२५ रोजी अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली होती.
हेमांग भारतकुमार अमीन (४४) हे महिम येथे राहतात आणि वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआयच्या कार्यालयात कार्यरत आहेत.त्यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमीन यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी फरुख असलम खान (४६), मीरारोड (पूर्व) येथील गौरव एक्सेलन्सी येथील रहिवासी असून सुरक्षा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे.
त्याने बीसीसीआयच्याच्या अधिकृत स्टोअरमध्ये परवानगीशिवाय प्रवेश करून मुंबई इंडियन, दिल्ली कॅपिटल, सन रायझर्स हैद्राबाद, कोलकाता नाईट राईडर्स, गुजरात, राजस्थान व चेन्नई अशा विविध संघांच्या मिळून २६१ जर्सी चोरल्या. त्यांची किंमत सहा लाख ५२ हजार रुपये आहे.
याप्रकरणी इतर आरोपींच्या सहभागाबाबत मरीनड्राईव्ह पोलीस तपास करत आहेत.
येवला येथील विंचूर चौफुली येथे गाळेधारकांच्या प्रश्नावर आंदोलन करताना वाहतूक कोंडी झाल्याने, शिक्षक आमदार किशोर दराडे, शिवसेना शहरप्रमुख अतुल घटे, किशोर सोनवणे यांच्यासह 58 जणांविरुद्ध येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. गाळेधारकांच्या मागण्यासाठी सुरू केलेले हे आंदोलन सुमारे तीन तासांहून अधिक काळ सुरू होते..त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती..
रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर पलटी झाल्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प
गेल्या 9 तासांपासून मुंबई गोवा महामार्ग ठप्प
मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा
छोट्या वाहनांना बावनदी ते पाली असा पर्याय मार्ग
अवजड वाहन महामार्गावरील हातखंबा येथे थांबवण्यात आली
गॅस शिफ्टिंगचे काम युद्धपातळीवर सुरू
अजून अंदाजे चार ते पाच तास मुंबई गोवा मार्ग सुरळीत होण्यासाठी लागु शकतो
मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतला दादर येथील छत्रपती शिवाजी महारज पार्क परिसराचा आढावा
छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसराची आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पाहणी करण्यात आली
यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत उपस्थित होते
आयुक्तांनी थेट मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी संवाद साधत समस्या ही जाणून घेतल्या
राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आता राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याची माहिती
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली माहिती
सत्ताधारी मंत्री आणि आमदारांच्या तक्रारीचा पाढा वाचत ठाकरेंच्या आमदारांनी काल राज्यपालांची भेट घेतली त्यांना निवेदन दिले
राज्यपाल यावर कारवाई करण्याचे सरकारला आदेश देतात का? ही ठाकरे यांची शिवसेना वाट पाहणार असून राष्ट्रपतींची सुद्धा या सगळ्या प्रकरणांमध्ये भेट घेणार आहेत
राष्ट्रपतींची ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी वेळ मागितली असून पुढील आठवड्यात भेटीची शक्यता आहे, यामध्ये अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि दिल्लीतील काही खासदार भेटीसाठी जाण्याची शक्यता आहे
काल ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार आणि नेत्यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन काही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली
मंत्र्यांची बाहेर येणारी प्रकरण, त्यांच्या संबंधित पुरावे मंत्र्यांची बेताल वक्तव्य या सगळ्या संबंधित तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेने राज्यकरण कधी केले अगदी तशीच तक्रार आता राष्ट्रपतींची भेट घेऊन करणार असून राष्ट्रपतींना सुद्धा निवेदन देणार आहेत
पावसाळा ऋतूत वादळी वारे आणि समुद्राला आलेले उधाण लक्षात घेत जिल्हा प्रशासन आणि मत्स्य विभाग मासेमारी करण्यावर दोन महिने बंदी घालते.अस असतानाही काही महाशय हे शासनाचे आदेश झुगारून मासेमारी करण्यासाठी जातात.मात्र यंदा अशा मासेमारी करणाऱ्या बोटींवर मत्स्यविभागाने कारवाई केली आहे.या कारवाईत एकूण 8 बोटी आणि 38 मच्छीमार यांच्यावर कारवाई करत 29 लाखांचा दंड वसूल केलाय. मत्स्यविभागाने अशा व्यक्तींवर करडी नजर ठेवली होती अखेर 38 जण बंदी काळात मासेमारी करताना आढळून आलेत. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असतो त्यामुळे शासनाकडून 2 महिने मासेमारी करण्यावर बंदी असते.
Pune News: मुलासोबत वाद घातला म्हणून सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केलीये. किशोर भेगडे असं या आरोपीचे नाव आहे. भेगडे हा मावळ विधानसभेची निवडणूक लढलेल्या बापू भेगडेंचा पुतण्या आहे. पुण्यातील गहूंजे येथील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोढा सोसायटीत ही घटना घडलीये. या मारहाणीचा व्हिडीओ सुद्धा समोर आलाय. या प्रकरणी शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भेगडेला बेड्या ठोकण्यात आल्यात. काल सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये किशोर भेगडेचा मुलगा आणि त्याचे मित्र खेळत होते. खेळता-खेळता अगदी क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाले. हे भेगडेला समजले मग त्याने मुलाच्या मित्रांना गाठले अन त्यांना बेदम मारहाण केली. पोटात किती जोराचा मुक्का मारला हे व्हिडीओत स्पष्टपणे दिसतंय. म्हणूनचं 15 वर्षीय मुलाच्या नातेवाईकांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय. भेगडे हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्या हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. आता त्याला अल्पवयीन मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्यात.
धाराशिव : विजेच्या धक्क्याने धाराशिवच्या खामसवाडी येथील अनिल गुंड या शेतकऱ्याचा मृत्यू झाला घरातील कर्ता पुरुष गेल्याने तीन मुलींचा पत्नीचा परिवार उघड्यावर आला. त्यांना मदतीसाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावलेत. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या गुंड कुटुंबाला तात्पुरत्या स्वरूपात एक लाखांची मदत केली असून त्यांना हक्काचं घर उभा करण्यासाठी ही मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितले.
अनिल गुंड शेतात काम करत असताना विजेच्या तुटलेल्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाला. मुलींना शिकऊन मोठं करायचं अनिल यांचे स्वप्न अर्धवटच राहील, उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला मदतीसाठी गावकऱ्यांकडून मदतीचा आवाहन करण्यात आलं होतं. तीन मुलींपैकी मोठी मुलगी पाचवीत, दुसरी मुलगी तिसरीत आणि लहान मुलगी अंगणवाडीत अनिल गुंड यांच्या पश्चात एकट्या पत्नीवर तीन मुलींना संभाळण्याची जबाबदारी आहे
उद्धव ठाकरे येत्या गणेशोत्सवात राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवर जाणार??
राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमीत्त मातोश्रीवर गेल्यानंतर आता थोरले ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी कधी येणार अशी चर्चा सुरु झालीय
राज ठाकरेंकडे गणेशोत्सवात गणेशआगमन मोठ्या थाटामाटात होते
अनेकजण राजकीय नेते आणि इतर क्षेत्रातील मान्यवरही राज ठाकरेंच्या निवासस्थानी श्रीगणेश दर्शनासाठी जातात
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमीत्तानं राज ठाकरे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले.. आता गणेशोत्सवाच्या निमीत्तानं उद्धव ठाकरेही राज ठाकरेंच्या निवासस्थानी येणार अशी चर्चा सध्या दोन्ही ठाकरेंच्या अंतर्गत गोटात रंगलीये
ही शक्यता एका बडे नेत्याने बोलून दाखवली आहे
यावर्षी राज ठाकरे यांच्या बाप्पाचं तिसरं वर्ष असून आतापर्यंत पहिल्याच दिवशी अनेक राजकीय नेत्यांनी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती... यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते दर्शनासाठी येत असतात...
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आता पोलिसांचीच राज्यपातळीवर एसआयटी गठित करण्यात आली आहे..
बोगस शिक्षक भरती प्रकरणी सर्व तक्रारीची या एसआयटी अंतर्गत एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे..
नागपुरातील झोन 2 चे पोलिस उपायुक्त नित्यानंद झा हे सध्या नागपुरात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करत आहेत..
आता त्यांच्याच नेतृत्वात राज्यातील ईतरही जिल्ह्यात या घोटाळा प्रकरणात दाखल गुन्ह्याची चौकशी केली जाणार..
नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातून आतापर्यंत या घोटाळ्यात 24 अधिकारी आणि मुख्याध्यापकांना अटक करून प्राथमिक आरोपपत्रही न्यायालयात दाखल केले आहे..
नागपूर पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथेही बनावट शालार्थ आयडी प्रकरणाशी संबंधित 3 गुन्हे दाखल आहेत..
घोटाळ्याची व्याप्ती राज्यभरात असल्याने तपास पथकाची अधिकार कक्षा वाढवण्यास पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंजुरी दिली आहे.
मनसे नेते बाळा नांदगांवकर दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत
त्यांनी भेटीकरता मुख्यमंत्र्यांकडे वेळही मागितली आहे
नाशिकमधील आदिवासी आश्रम शाळा आणि मुंबईतील कोळीबांधवांच्या प्रश्नांसंदर्भात ही भेट होणार असल्याचं समजतंय
मात्र राज ठाकरेंच्या मातोश्री भेटीनंतर मनसे नेते फडणवीसांची भेट घेत असल्यानं या भेटीत काही राजकीय चर्चा होतेय का पाहणं महत्वाचं
याआधीही ठाकरे बंधुंच्या एकीकरणाची चर्चा जोमात सुरु असतांना अचानकच राज ठाकरेंनी एका हॉटेलमध्ये फडणवीसांची भेट घेतली होती
आता देखिल राज ठाकरेंच्या मातोश्री वारीनंतर ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चा जोमात सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा मनसे- फडणवीस भेटीच्या बातमीनं भुवया उंचावल्या गेल्यात
निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम आणि दोन दिवसांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीनं रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेत. या खड्ड्यांचा अंदाज नं आल्यानं तिथून जाणाऱ्या दुचाकीला अपघात होऊन दोन वेगवेगळ्या घटनेत दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना भंडाऱ्याच्या करचखेडा ते भिलेवडा मार्गावर घडली. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य मुख्य पिठाच्या रुग्णवाहिकेनं दोन्ही जखमींना तातडीनं भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.
हातखंबा गावातील एलपीजी टँकरमधील गॅस ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
तज्ञ टीमच्या मार्गदर्शनाखाली केला जातोय गॅस ट्रान्सफर
गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प
क्रेनच्या साहाय्याने टँकर केला गेला सरळ
चंद्रभागेत 90 हजार क्युसेकपेक्षा जास्त वेगाने पाण्याचा विसर्ग. पाणी पातळी सव्वा लाख क्युसेक पर्यंत पोहोचणार ..
चंद्रभागेचे घाट निम्म्यापेक्षा जास्त पाण्याखाली गेले .. वाळवंटातील मंदिरेही पाण्यात ..
आजही आपत्ती व्यवस्थापन गायब .. अतिशय धोकादायक पाण्यात भाविकांचे स्नान सुरू ..
प्रशासनाने केवळ काही ठिकाणी लोखंडी बॅरिगेट लावली मात्र भाविक ते पाडून थेट चंद्रभागेच्या बुडलेल्या घाटांवर उतरून अंघोळी करू लागले ..
भाविकांना रोखण्यासाठी प्रशासनाचा एकही कर्मचारी कोणत्याच घाटावर उपस्थित नाही .. मोठी दुर्घटना होण्याची भीती .. प्रशासनाला काही जाग येईना ..
बारामतीत भीषण अपघात, वडिलांचा पोटापासून खालच्या भागाचा चेंदामेंदा, तरीही हातांवर उठून म्हणाला, "माझ्या लेकींना तरी वाचवा हो!" सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर दोन दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती मात्र, रात्रीपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. तर रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आला असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस येत आहे
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात आज सकाळपासून पुन्हा एकदा हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालीय. दोन दिवसापूर्वी भंडाऱ्यात अतिवृष्टी झाली होती आणि सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर पावसानं उसंत घेतली होती. आज सकाळपासून पुन्हा एकदा सरी बरसायला सुरुवात झाली आहे. हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला असला तरी सकाळपासूनचं हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नाशिक शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांशी अल्प परिचय करून इच्छुक उमेदवार अर्ज स्वीकारत मुलाखती घेतल्या जात आहेत... नाशिकच्या काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकारी इच्छुकांची संवाद साधत शहरात प्रबळ उमेदवारांची चाचपणी करत आहेत
पुण्यातील रेव्ह पार्टीप्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी एकनाथ खडसे मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेणार आहे. यामध्ये ते काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महादेवी हत्तीणीला निरोप देताना नांदणीकरांना अश्रू अनावर झाले...काल कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाचा हत्ती वनतारा संग्रहालयाकडे सुपूर्त करण्यात आला... सर्वोच्च न्यायालयाने नांदणी मठाची याचिका फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयाचे आदेश मान्य केले... काल रात्री महादेवी हत्तीणीची गावातून मिरवणूक काढण्यात आली...नांदणीच्या मठामध्ये स्वामीजींच्या हस्ते पूजन झाले यावेळी स्वामीजींना देखील महादेवी हत्तीला निरोप देताना अश्रू अनावर झाले...नांदणीच्या ग्रामस्थांनी महादेवीला वनताराकडे देण्यास विरोध दर्शवला... यामधूनच पोलिसांचा आणि ग्रामस्थांचा वाद झाला... आक्रमक जमावाने पोलिसांच्या दोन गाड्या फोडल्या... त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण बनले.. मात्र यानंतर मध्यरात्री एक वाजता महादेवी हत्तीणीला वनताराकडून आलेल्या ॲनिमल ॲम्बुलन्समध्ये भरण्यात आलं... आणि पोलीस बंदोबस्तात महादेवीला वनतारा संग्रहालयाकडे पाठवण्यात आले...
मुंबई-गोवा महामार्गावर LPG गॅस वाहून नेणारा टँकरला अपघात. सोमवारी रात्री हातखंबा येथे पुलावरून टँकर खाली कोसळला. या अपघातानंतर टँकरमधून वायूगळती सुरु झाली. एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमने ही वायूगळती तात्पुरती थांबवली होती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केली पाहणी
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog: 'पहलगाममध्ये सहभागी असलेले तिन्ही दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा', गृहमंत्री अमित शाह यांचा लोकसभेत खुलासा