Maharashtra Live: पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड; हॉस्पिटलच्या हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: आज सकाळी अकरा वाजल्यापासून अलिबागच्या नागावमध्ये बिबटयाची दहशत कायम आहे.आतापर्यंत या बिबटयाने पाच जणांना जखमी केल्याची माहिती समोर आलीय.यामध्ये तीन स्थानिक ग्रामस्थ, एक वनअधिकारी आणि एक...More
भाजपचे नेते तथा मंत्री नितेश राणे आज परभणी दौऱ्यावर होते जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी या गावात भेट दिल्यानंतर त्यांनी परभणी शहरातील प्रभावती नगर मध्ये एका ठिकाणी सदिच्छा भेट दिली आहे यानंतर परतत असताना शहरातील रायगड कॉर्नर परिसरामध्ये SDPI पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या निषेधासाठी थांबले होते निषेध करण्या अगोदरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.रायगड कॉर्नर परिसरातील डियेड कॉलेजच्या मैदानामध्ये हे कार्यकर्ते जमले होते आम्हाला आंदोलन करू द्या त्यांनतर ताब्यात घ्या असे ते पोलिसांना म्हणत आहेत यावरून त्यांची किरकोळ बाचाबाची ही झाल्याचे पाहायला मिळाले नितेश राणे मात्र निघून गेले.
केज : बीड जिल्हाधिकारी यांच्या बनावट सह्या करून कोट्यावधी रुपयाचे शासनाची फसवणूक करण्याचे प्रकरण ताजे असताना आता चक्क महसूल विभागात आता नवा घोटाळा समोर आला आहे. केजमध्ये थेट तहसीलदारांच्या बनावट सही करून पाच क्षेत्र दुरुस्तीचे आदेश काढल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर तहसिलदार राकेश गिड्ढे यांनी प्राथमिक चौकशी करुन अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला आहे. यामध्ये सह्या बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला असून या प्रकरणी विभागीय चौकशी करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
केज : बीड जिल्हाधिकारी यांच्या बनावट सह्या करून कोट्यावधी रुपयाचे शासनाची फसवणूक करण्याचे प्रकरण ताजे असताना आता चक्क महसूल विभागात आता नवा घोटाळा समोर आला आहे. केजमध्ये थेट तहसीलदारांच्या बनावट सही करून पाच क्षेत्र दुरुस्तीचे आदेश काढल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर तहसिलदार राकेश गिड्ढे यांनी प्राथमिक चौकशी करुन अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला आहे. यामध्ये सह्या बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला असून या प्रकरणी विभागीय चौकशी करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
गडचिरोली : कर्तव्यावर जात असलेल्या शिक्षिकेच्या दुचाकीला ट्रकने मागून धडक दिल्याने शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना गडचिरोली शहरात चंद्रपूर मार्गावर सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. ममता बांबोळे (42) असे मृतक शिक्षिकेच्या नाव आहे. त्या कारमेल हायस्कूल येथे कार्यरत होत्या. त्या दुचाकीने शाळेत जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्या गंभीर जखमी झाल्या. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नागपूर : किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांच्या बाबतीत स्थलांतरासाठी यापुढे नोंदणीकृत सोसायटीची 'ना हरकत' घेणे बंधनकारक राहील आणि या निर्णयाची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
पिंपरी- चिंचवड येथील काळेवाडी-रहाटणी परिसरातील नियमबाह्य दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याबाबत सदस्य शंकर जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड मधील बजाज देशी दारू दुकान आणि विक्रांत वाईन्स शॉप या दोन्ही दुकानांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. परंतु त्यातील एकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
नागपूर : किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांच्या बाबतीत स्थलांतरासाठी यापुढे नोंदणीकृत सोसायटीची 'ना हरकत' घेणे बंधनकारक राहील आणि या निर्णयाची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
पिंपरी- चिंचवड येथील काळेवाडी-रहाटणी परिसरातील नियमबाह्य दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याबाबत सदस्य शंकर जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड मधील बजाज देशी दारू दुकान आणि विक्रांत वाईन्स शॉप या दोन्ही दुकानांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. परंतु त्यातील एकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
नागपूर : किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांच्या बाबतीत स्थलांतरासाठी यापुढे नोंदणीकृत सोसायटीची 'ना हरकत' घेणे बंधनकारक राहील आणि या निर्णयाची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
पिंपरी- चिंचवड येथील काळेवाडी-रहाटणी परिसरातील नियमबाह्य दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याबाबत सदस्य शंकर जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड मधील बजाज देशी दारू दुकान आणि विक्रांत वाईन्स शॉप या दोन्ही दुकानांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. परंतु त्यातील एकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट
येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी सेवेतून बडतर्फ
१९ मे २०२४ रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात एका भरधाव पोर्शे कार ने २ जणांचा जीव घेतला होता
अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलिस ठाण्याचे २ अधिकारी शासकीय सेवेतून बडतर्फ
पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंदा भोसले या दोघांना पाच वर्ष पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश
प्रत्यक्षदर्शी म्हणून घटनास्थळी पोहचलेल्या दोन पोलिसांनी ही माहिती कंट्रोल रुमला न कळवल्याने अपघाताची माहिती रात्री ऑन ड्युटी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचली नव्हती
ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काल शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची एक व्हिडिओ क्लिप सर्वांसमोर आणत मोठा राजकीय बॉम्ब टाकला आणि राज्यभरात खळबळ निर्माण झाली. त्यानंतर काल रायगड मध्ये ठिकठिकाणी अंबादास दानवे यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांची प्रतिमा सुद्धा जाळली.आज अलिबाग मधील शिवसैनिकांनी पोलीस मुख्यालयात जाऊन अंबादास दानवे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून त्यांच्यावर दळवींची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.यावेळी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी जिल्हाप्रमुख राजा केनी आणि अन्य शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते
- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथील नऊ लहान मुलांना नाशिकच्या निरीक्षण बालगृहात केले दाखल...
- मुलांच्या विक्रीचा आरोप केल्यानंतर प्रशासनाकडून समिती गठीत करत प्रकरणाचा सखोल तपास सुरू...
- सहा मुलं आणि तीन मुली यांची वैद्यकीय तपासणी सुरू, मुलांच्या सर्व आरोग्याची देखील होणार सखोल तपासणी...
- घोटी ग्रामीण पोलिसांकडून विष्णू हंडोगे आणि बच्चूबाई हंडोगे या दोघांनाही घेण्यात आले आहे ताब्यात...
- मुलांना विक्री केले की दत्तक दिले या संदर्भातली चौकशी करत कायदेशीर कारवाईला वेग...
पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल ची तोडफोड
पुण्यातील हडपसर मध्ये असलेल्या सह्याद्री हॉस्पिटल ची तोडफोड
रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप
हॉस्पिटल च्या हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप
रुग्णांच्या नातेवाईकांनी धरला रुग्णालयाच्या बाहेर ठिय्या
बीड: बीड मधील द कुटे ग्रुपच्या ज्ञानराधा पतसंस्थेच्या आणखी 27 मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सध्या सुरू आहे. याच अनुषंगाने ज्ञानराधा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह इतर दोन सहकाऱ्यांना बीड पोलिसांकडून तपास यंत्रणे ताब्यात घेतले आहे. जास्त व्याजदराचे आमिष दाखवून चार लाख ठेवीदारांना 3 हजार 715 कोटींचा गंडा ज्ञानराधा पतसंस्थेच्या माध्यमातून घालण्यात आला. त्यामुळे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासमोर कारवाईचा फास अधिक घट्ट केला जात आहे.
यापूर्वी 80 मालमत्ता जप्त केल्यानंतर आता सुरेश कुटे त्याची पत्नी अर्जुना कुटे आणि उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी या तिघांच्या छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्हा हद्दीतील आणखी 27 स्थावर मालमत्ता आणि सहा बँक खाते गोठविण्यात आले. तपास यंत्रणांनी गृह विभागाला पाठविलेल्या अहवालावर गृह विभागाने मान्यता दिली आहे. मागील वर्षभराहून अधिकचा काळ कुटे यांचा पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीत आहे.
पुणे : शितल तेजवानी भोगणार14 दिवसांची पोलिस कोठडी?
शितल तेजवानीच्या ताब्याची पिंपरी चिंचवड पोलिसांना पहावी लागणार वाट
पुणे पोलिस उद्या तेजवानी ची पोलिस कोठडी वाढून मिळावी यासाठी करणार न्यायालयाला विनंती
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी सर्व दस्त तेजवानी ने सुपूर्द केल्यावर दस्ताची होणार तपासणी
उद्या न्यायालयाला पुणे पोलिस आणखी 6 दिवसांची पोलिस कोठडी मागणार
कला केंद्रातील नर्तकीच्या नादाला लागून उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर आता धाराशिव मध्ये नर्तकीच्या नादाला लागून 25 वर्ष तरुणांना आत्महत्या केली. अश्रुबा कांबळे असे तरुणाचं नाव आहे. धाराशिव येथील साई कला केंद्रातील नर्तकीने सततचा तगादा लावला घरातील सोनं पैसे दिले त्यानंतरही वारंवार पैशाची मागणी होत होती असा आरोप कुटुंबीय कडून केला जात आहे. शिवा अश्रूवाची आत्महत्या नसून हत्या आहे आम्हाला न्याय द्या अशी मागणी कुटुंबाने केली.
गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर दक्षिण गोव्यात पर्यटन आस्थापनांमध्ये फटाके, पायरोटेक्निक उपकरणे, स्पार्कलर, धुराचे परिणाम किंवा तत्सम आग व धूर निर्माण करणारी उपकरणे वापरणे पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहेत. आदेशांचे पालन न झाल्यास गुन्हा नोंद करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. दक्षिण गोवा पोलीस अधिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर करत नाईट क्लब, बार आणि रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि रिसॉर्ट्स, रॉक्स, तात्पुरत्या संरचना आणि कार्यक्रम स्थळे आणि मनोरंजन ठिकाणासह पर्यटन आस्थापनांमध्ये फटाके, आतिशबाजी उपकरणे, फटाके, ज्वाला तसेच धुराचे परिणाम आणि तत्सम आग, धूर निर्माण करणारी उपकरणे वापरणे यावर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी बंदी घातली आहे.
बीड : नगरपरिषद मतदान प्रक्रिये दरम्यान बीडच्या गेवराई येथे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे मतदान प्रक्रियेला गालबोट लागले. दरम्यान आता याच अनुषंगाने पोलीस प्रशासन अलर्ट असून स्ट्रॉंग रूमला विशेष सुरक्षा दिली जातेय. शस्त्रधारी जवानांसह L शेप मध्ये एसआरपीएफ सह पोलिसांचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्षांना स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही पाहण्याची विशेष सोय करण्यात आलीय. मतदाना दिवशी घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांकडून मतमोजणी प्रक्रियेसाठी विशेष बंदोबस्त असणार आहे.
महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीमध्ये हरकतीवर आज उच्च न्यायालयात सुनावणी..
आज 10 डिसेंबरला उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात हरकतींवर सुनावणी होणार...
महाबळेश्वर गिरीश धनगर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे शिवसेना शिंदे गट उमेदवार कुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील शिंदे,लोकमित्र जनसेवा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष डी. एम बावळेकर त्यांच्या सह प्रभागातील काही उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रावर आक्षेप घेतला होता..
त्यामुळे या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती याच याचिकेची सुनावणी आज असून या निकालाकडे महाबळेश्वर सह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे..
उच्च न्यायालयाचा निकाल महाबळेश्वर मधील दोन्ही आघाड्या तसेच उमेदवार आणि मतदारांसाठी लक्षवेधी ठरणार..
महाबळेश्वर मध्ये पुन्हा निवडणूक प्रक्रिया पार पडत असून आज 10 डिसेंबर अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने न्यायालय काय निर्णय घेणार तो महाबळेश्वरकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे
यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातुन आदिलाबाद येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश वाहतुकीचे तीन आयशर ट्रक पोलिसांनी पकडले. यामध्ये दोघांना अटक केली. तसेच 62 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून दोन जनावरांचा मृत्यू झाला. ही कारवाई यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी साखरा मार्गावर केली. अमीर अली असलम अली , इरफान अहमद फिरोज अहमद अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. तर दोन ट्रक चालक वाहन सोडून पसार झाले., घाटंजी तालुक्यातून आदिलाबाद कडे काही कंटेनरमधून जनावरांची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक होत आहे. अशी माहिती ग्रामस्थांकडून घाटंजी पोलिसांना मिळाली.या माहितीवरून पोलिसांसह ग्रामस्थांनी संबंधित वाहनांचा पाठलाग सुरू केला. अखेरीस साखरा येथे ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांना तीन कंटेनर अडविण्यात यश आले. मात्र, यातील एक कंटेनर पींपळखूटी मार्गाने पळ काढण्यास यशस्वी झाला. यावेळी जप्त करण्यात आलेल्या ट्रकची पाहणी केली, तेव्हा त्यामध्ये निर्दयीपणे गोवंश जनावर कोंबलेली आढळून आली. यावेळी पोलिसांनी पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये 64 जनावरे होती. यामध्ये दोन जनावरांचा मृत झाला होता. या तिन्ही कंटेनरमधील जनावरे घाटी येथील गोशाळेत ठेवण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव मोझरी मध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर असल्यामुळे या परिसरात प्रचंड भीतीच वातावरण निर्माण झाल आहे, त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहे, दिवसा आणि रात्री देखील मजूर किंवा शेतकरी शेतात जात नाही, त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी रात्री वन विभागाने जंगलात पिंजरा लावला आणि या पिंजरामध्ये बकरी देखील टाकण्यात आली.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा झालेला नुकसान यावरून विरोधक सरकारला आज घेणार
सुधीर मुनगंटीवार, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या लक्षवेधी वरती होणार चर्चा
शेतकऱ्यांचे एवढं मोठं नुकसान झाल्यानंतरही अनेक भागांमध्ये अद्याप मदत पोहचलेली नाही
ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्याच ठिकाणी मदत पोहचवल्याचा विरोधक करणार आरोप
सुधीर मुनगंटीवार काय भुमिका मांडणार याकडे लक्ष
मालेगाव : तरुणाकडून वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मालेगावच्या रमजानपुरा भागात घडली..विशेष म्हणजे मृत विवाहितेचे दीड महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता..मात्र आसिफ नावाचा तरुण सतत फोन करून मयत पिडितेला त्रास देत होता..त्या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली..तशी सुसाईट नोट त्याच्या वडिलांना मिळाल्याने या प्रकाराला वाचा फुटली..वडिलांच्या. फिर्यादीवरून त्रास देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमजानपुरा पोलिस अधिक तपास करीत आहे.
मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता
पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी येणार असल्याची शक्यता
चौकशीची नोटीस बजावल्यानंतर 10 तारखेला हजर राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या विवाहासाठी बहरीनला गेले होते त्यामुळे 10 डिसेंबरची तारीख देण्यात आली होती.
आता आज पुणे पोलीस दिग्विजय पाटील हजर झाल्यास कसून चौकशी करणार
दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीचे भागीदार आहे.
मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी गैरव्यवहार करणाऱ्या शितल तेजवाणीची कसून चौकशी केल्यानंतर तिला पुणे पोलिसांनी एटक केली आहे.
याच प्रकरणातील सब रजिस्टर असलेल्या रवींद्र तारुलादेखील अटक करण्यात आली आहे.
त्यामुळे आता दिग्विजय पाटील यांच्या चौकशीत काय समोर येतं. त्यानंतर त्यांच्यावरही अटकेची कारवाई केली जाते का?, हे पाहावं लागणारे .
दिव्यांगांसाठी असलेले वैश्विक ओळखपत्र सादर न केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या बारा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी ही कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दहा शिक्षक आणि दोन अभियंत्यांचा समावेश आहे. दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्हा परिषदेने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रिये दरम्यान अनेक वेळा संधी देऊन देखील वैश्विक ओळखपत्र सादर न केलेल्या बारा कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या 12 कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त वैश्विक दिव्यांग ओळखपत्र सादर न करणारे आणखी काही कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आहे.
नागपुरातील पारडी शिवरामध्ये बिबट्याच्या धुमाकूळ
दोन दिवसांपूर्वी कापसी भागामध्ये बिबट्या दिसून आला होता, मात्र त्यावेळेस सर्चिंग केल्यावर बिबट्या मिळून आला नाही
त्याच बिबट्याने आज पहाटे दोन पेक्षा अधिक लोकांचार हल्ला केल्याची प्राथमिक माहिती
दोन ते तीन जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची प्राथमिक माहिती.
मोठा पोलिस बंद होता तैनात, बघ्यांची मोठ्या संप्रमानात गर्दी,
नागरिकांमध्ये भीतीच वातावरण,
नागपूर खंडपीठाचा मनाई आदेश असतानाही विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे शहरभर अवैध राजकीय पोस्टर्स, बॅनर्स, कट-आऊटस् व होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. राजकीय नेते व कार्यकर्त्याच्या या मनमानी वागणुकीची उच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर दखल घेऊन सर्व अवैध राजकीय होर्डिंग्जसह इतर साहित्य तातडीने हटविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले. तसेच, यासंदर्भात बुधवारी (ता. १०) दुपारी ४ वाजेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.
४ मार्च २०१० रोजी उच्च न्यायालयाने दोन जनहित याचिका निकाली काढताना अवैध होर्डिंग्जसह इतर साहित्यांवरील कारवाईसंदर्भात विविध आदेश दिले होते. परंतु, त्या आदेशांचे काटेकोर पालन केले जात नाही.
छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील पोलीस कर्मचारी पोलिसांच्या स्कार्पिओ वाहनाने नागपूरच्या दिशेनं जात असताना पाठीमागून आलेल्या एका भरधाव ट्रकनं त्यांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात एका महिला पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झालेत. ही घटना भंडाऱ्याच्या मानेगाव सडक येथील एका पेट्रोलपंपासमोर घडली. या पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही थरारक घटना कैद झाली आहे. हे पोलीस कर्मचारी डोंगरगड इथं दाखल असलेल्या एका पोक्सो गुन्हाच्या तपासाकरिता नागपूरकडे जात असताना हा अपघात घडला. रामेश्वरी बघेल (41), रोजलीन सामीयल (40), सोमेश साहू (25) असं गंभीर जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचं नावं आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला?
भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 33 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळणार असल्याची चर्चा
कोल्हापूर महापालिकेत एकूण 20 वार्डात 81नगरसेवक
स्थानिक नेत्यांच्या पातळीवर फॉर्मुला ठरला, वरिष्ठांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
- कारंजा येथे एमडीच्या गोडाऊनवर छापा
- नागपूर पोलिसांची कारवाई असल्याची माहिती
- पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याचीही माहिती
- एमडी मादक पावडर तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती
- नागपूर पोलिसांनी वर्धा जिल्ह्यात येऊन केलीय कारवाई
- कारंजा येथील गोकुल सिटी परिसरात एमडी मादक पदार्थ तयार करून नागपूरला जात होता विक्रीला
- सूत्रांच्या माहितीनुसार वैभव उर्फ भय्यु हिरालाल अग्रवाल, सोहम संजय धायगोडे आणी एक अल्पवयीन आरोपी यांना ताब्यात घेतल्याची माहिती
- या संदर्भात कारंजा आणी वर्धा पोलिसांना माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलंय
- वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) या ठिकाणी सुरू असलेला ड्रग्स कारखाना महसूल गुप्तचर संचालनालयाने उद्धवस्त केला,"ऑपरेशन हिंटरलँड ब्रू" अंतर्गत कारवाई
- वर्धा जिल्हात बेकायदेशीर पद्धतीने सुरू होती ड्रग्ज फॅक्टरी, १९२ कोटी रुपयांचे १२८ किलो मेफेड्रोन जप्त; तिघांना अटक
- या कारवाईदरम्यान, अधिकाऱ्यांनी मेफेड्रोनच्या बेकायदेशीर उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या तात्पुरत्या भट्ट्या,आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आले आहेत
पुणे विमानतळावर मोठी कारवाई
२.२९ कोटी रुपये किंमतीचा हायड्रोपोनिक वीड (गांजा) जप्त
बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाकडून गांजा जप्त
हायड्रोपोनिक गांजासह एक जण अटक
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) पुणे आयुक्तालयाने मोठी कारवाई करत बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाकडून सुमारे २.२९ कोटी रुपये किंमतीचा हायड्रोपोनिक वीड (मारिजुआना) जप्त केला आहे.
ही कारवाई ०८ डिसेंबरला करण्यात आली.
गुप्तचर माहिती आणि प्रवाशांच्या प्रोफाइलिंगच्या आधारे विमानाने आलेल्या एका प्रवाशाला थांबवून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान त्याच्या चेक-इन लगेजमधून २ एअर टाइट पॅकेट्समध्ये लपवून ठेवलेले २२९९.४४ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा आढळून आला.
अधिकाऱ्यांनी तत्काळ हा माल जप्त करून संबंधित प्रवाशाला NDPS अंतर्गत अटक केली.
राष्ट्रीय शिक्षण धोरणात आता अमुलाग्रह बदल करण्यात येत आहे. शिक्षणाचे खाजगीकरण करीत कार्पोरेट भांडवलदारांच्या हातात शिक्षणाची सूत्रे दिली जाण्याचा भीती व्यक्त होतं आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा घाट सरकार करीत असल्याचा आरोप ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशननं केला आहे. खाजगी शाळेतील अमर्याद शुल्क आणि विविध प्रकारची लूट थांबवून सरकारी शाळा बळकट करण्याऐवजी त्यांना बंद करण्याचे काम सरकार करीत असल्याची चिंता व्यक्त होत असतानाच कमी पटसंख्येचे कारण दाखवून जिल्हा परिषद शाळा बंद करण्यात येत आहे. शाळाबंदी आणि शाळा संकुल अशा संकल्पना मांडल्या जात आहे. महाराष्ट्रातील 18000 पेक्षा अधिक शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा आरोप ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने केला असून 65 हजार सरकारी शाळा दत्तक योजनेच्या नावाखाली भांडवलदारांच्या ताब्यात दिल्या जात आहेत. यामध्ये सुमारे 2 लाख सर्वसामान्य गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. जिल्हा परिषद शाळांसोबतच 419 आयटीआय संस्था खाजगी संस्थांना व मंदिर ट्रस्टला देण्याची योजना आखण्यात आल्याचा आरोप ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने केला आहे.
क्रिकेट खेळत असताना अचानक चक्कर येऊन कोसळल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नरेंद्र गुडशेलू असे 42 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. काल संध्याकाळी गुडशेलू हे सोलापुरातील होम मैदान येथे आपल्या मित्रासह क्रिकेट खेळत होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जागेवरच कोसळले. सोबत असलेल्या मित्रानी त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेची नोंद सोलापूरच्या सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे.
महावितरणकडून शेतीपंपासाठी नवीन वीज कनेक्शन ही दिलं जात नाही. शेतकऱ्यांना सोलार सक्ती केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात सोलर पंपही मिळत नाही त्यामुळे शेतकरी कात्रित सापडला आहे. मागेल त्याला सोलर पंप ही योजना सरकार राबवत आहे. नुकताच महिनाभरात 45 हजार सोलार पंप बसवण्याचा वर्ल्ड रेकॉर्डचा सोहळा साजरा झाला. मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकरी अजूनही सोलर पंपाच्या प्रतीक्षेत आहेत. धाराशिवच्या गोवर्धनवाडी येथील शेतकऱ्यान दोन वर्षांपूर्वी सोलर पंपासाठी पैसे भरले मात्र अजूनही पंप मिळाला नाही. तर ढोकी येथील शेतकऱ्याने पतसंस्थेकडून व्याजानं पैसे काढले आणि पंपासाठी भरले मात्र वर्षभरानंतरही प्रतीक्षा संपलेली नाही. महावितरण वीज कनेक्शन ही देत नाही आणि सोलार पंपही देत नाही तर आम्ही पिकाला पाणी द्यावं कसं असावा शेतकरी करत आहे ? शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील तब्बल ३३,७७० दुबार मतदारांची पडताळणी महापालिका प्रशासनाने सुरू केली असून अनेक मतदारांची संपूर्ण माहिती, पत्ता आणि छायाचित्र उपलब्ध नसल्याने पथकांना घरभेटीदरम्यान मोठ्या अडचणी येत आहेत. दुबार मतदार प्रत्यक्ष कुठे मतदान करणार हे निश्चित करण्यासाठी मनपाची १९ पथके घराघरांत फिरत असून २२ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. वेळ हातातून निसटत असल्याने ताण अधिक वाढला आहे. तर दुसरीकडे एकाच व्यक्तीचे नाव १७ वेळा नोंदलेले आढळल्याने मनपा सतर्क झाली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून प्रत्यक्ष पडताळणी न करता ‘बसल्या जागी पंचनामे’ होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
- नागपूरात हिवाळी अधिवेशनात धरणे मोर्चेस्थळी यशवंत स्टेडियममध्ये आंदोलनकर्ती सीताबाई धांडे यांनी अचानक आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर एकच खळबळ उडाली.
- यशवंत स्टेडियम परिसरात अचानक घडलेली घटना, पोलीस दलाची मोठी तारांबळ, आग आत्मदाहणाचा प्रयत्न करताना धावले आंदोलनकरी...
- पुण्यातील खराडी-चंदन नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बिल्डर आणि प्रशासनाकडून झालेल्या अन्यायाविरोधात केले होते आंदोलन
- बोगस संमतीपत्रावर बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप, त्या ठिकाणी लावलेल्या आगीत 100 झोपड्या जळाल्याचे आंदोलनकर्त्यांचे आरोप...
- 23 एप्रिल 2025 रोजी पुण्यात लागलेल्या आगीत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता, मात्र बिल्डरवर अद्याप गुन्हा दाखल न केल्याचा ही आंदोलकांचा आरोप.
- राजकीय दबावामुळे अटक होत नसल्याचा आरोप, त्यामुळे महिलांनी नागपुरात येऊन केले आंदोलन.
- यावेळी सीताबाई धांडे यांनी रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न कारताच पोलिसांनी तातडीने आग विझवली..
- महिला आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता... रुमाल जाळला असताना पोलीसानी धाव घेतली आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू दिले नाही... पोलीस या घटनेची पुढील चौकशी करत आहे..
नाशिकच्या त्रंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव पैकी बरड्याची वाडी या गावात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेने तब्बल १४ मुला मुलींना जन्म दिला, मात्र या महिलेने घरची परिस्थिती हलाकीची असल्याने या १४ मुलामुलींपैकी ६ मुल आणि मुली विकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केला आहे. या आरोपाने खळबळ उडाली आहे,मात्र याप्रकरणी पोलीससात अद्याप कोणतीही तक्रार दाखल नसून पोलिसांनी तपास करण्याची मागणी केली जात आहे.
अलिबागच्या नागावमध्ये बिबटयाची दहशत कायम आहे.आतापर्यंत या बिबटयाने पाच जणांना जखमी केल्याची माहिती समोर आलीय. यामध्ये तीन स्थानिक ग्रामस्थ, एक वनअधिकारी आणि एक बचाव पथकातील सदस्याचा समावेश आहे. जखमींना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बिबटयाला पकडण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच असून पुण्याहून रेस्क्यू पथक आणि कोलाड सह्याद्री रेस्क्यू टीम आणि वनविभागाचे अधिकारी या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागाव मध्ये दहशतीचा वातावरण तयार झाल्याने जो पर्यंत बिबट्या हातात लागत नाही तोपर्यंत नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज येथील सर्व शाळा देखील बंद ठेवण्यात आल्यात.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live: पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड; हॉस्पिटलच्या हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप