पुणे अपघाताप्रकरणी पोलिसांनी फास आवळला, आणखी दोन गुन्हे दाखल करणार, विशाल अगवरवालचा पाय खोलात!

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लीकवर

प्रज्वल ढगे Last Updated: 24 May 2024 08:44 PM

पार्श्वभूमी

मुंबई : कल्याणीनगर अपघात प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा होत आहे. नुकतेच या घटनेतील विधिसंघर्ष मुलाने अपघातावर एक रॅप साँग तयार केल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर या मुलाच्या आईने समोर...More

उष्माघातामुळे छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्याचा मृत्यू

संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव तालुक्यातील कवली येथे उष्माघात मुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतातून खरीप पूर्व मशागतीची कामे आटोपून दुपारी घरी आलेल्या शेतकऱ्यांला सायंकाळी घाम आल्यामुळे अत्यवस्थ होऊन त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यास तातडीच्या उपचारासाठी पिंपळगाव येथे हलविण्यात आले होते. पुढील उपचारासाठी पाचोरा येथे घेऊन जात असताना त्यांचा उष्माघातमुळे मृत्यू झाला. प्रकाश भागवत तराल (वय 62) असे उष्मांघात मुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.