Maharashtra Live blog: 'कर्जमाफीत कटकारस्थान झाल्यास कोणालाही सोडणार नाही', बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

Advertisement

रोहित धामणस्कर Last Updated: 31 Oct 2025 03:58 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog updates: गोरगरिबांच्या जमिनी अल्पदरात लाटून बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे 72 एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या...More

रायगडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांची पुन्हा तारांबळ

रायगड : जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, अलिबाग, मुरूड आणि रोहा परिसरात मुसळधार सरींना सुरुवात झाली आहे. हिवाळ्याच्या उंबरठ्यावर पाऊस सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवडाभरापासून सुरू असलेला हा अवकाळी पाऊस भातपिकांवर मोठं संकट बनला आहे. हातातोंडाशी आलेली पिकं पावसामुळे खराब होण्याची शक्यता वाढली असून, शेतकरी राजा हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. रायगडकरांची अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा तारांबळ उडाली आहे.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.