- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog: बच्चू कडू नागपुरात आंदोलन करण्यावर ठाम; सरकारची विनंतीही धुडकावली
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच. महामार्ग अजून ही रोखून धरले आहे. कालची रात्र बच्चू कडू आणि आंदोलकांनी जामठा येथे महामार्गावर काढली आहे.. कालच्या तुलनेत गर्दी कमी झाली...More
नागपूरमध्ये (Nagpur) प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात शेतकरी (farmers), शेतमजूर (farm laborers), दिव्यांग (disabled) आणि मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन तीव्र झाले आहे. 'आमची माणसं अडवली तर आम्ही रेल्वेकडे जाऊ,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिला आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी, बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले, तर दुसरीकडे, काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ते संतप्त झाले. आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्यासोबत चर्चेची शक्यता वर्तवली जात असताना, सरकारने मागण्या मान्य न केल्यास 'रेल रोको' करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे नागपूरमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परिस्थिती तणावपूर्ण आहे
आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी अडवल्या आहे..
त्या प्रशासनाने सोडायला लावाव्या, बच्चू कडू यांचे प्रशासनाला आवाहन
रेल्वे रुळावर गेलेल्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अडवू नये..
इथे आपली सरकार सोबत चर्चा सुरू आहे.. तेव्हा रेल्वे अडवून आणखी प्रकरण चिघळू नका...
रेल्वे रुळावर गेलेल्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अडवू नये.. इथे आपली सरकार सोबत चर्चा सुरू आहे.. तेव्हा रेल्वे अडवून आणखी प्रकरण चिघळू नका. बच्चू कडूंचं अवाहन
नागपूरमध्ये आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय मोर्चा उभा ठाकला आहे! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी दिलेला आवाज आज नागपूरच्या रस्त्यांवर घुमतोय. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत प्रहार संघटना आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. "शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेपर्यंत मोर्चा थांबणार नाही" असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.
नागपूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक, टायर पेटवुन रोड रोखले..
दोन तासांपासून शेतकऱ्यांनी नागपूर-मुबंई समृद्धी महामार्ग रोखला.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमध्ये बेमुदत आंदोलन सुरू आहे.
मात्र, सरकारने याची अद्याप दखल घेतली नाही. आज संतापलेल्या शेतकऱ्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर दोन तासांपासून वाहनांची वाहतूक पूर्णपणे रोखली आहे.
हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा निर्णायक लढा असल्याचे सांगत, स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारला इशारा दिला आहे.
"सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि सरसकट कर्जमाफीवर ठोस भूमिका घेतली नाही, तर राज्यभरातील शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक घडवून आणू. असा इशारा सरकारला दिला आहे.
या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पोलिस प्रशासन सतर्क आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे होणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
गॅंगस्टर अबू सलेमच्या नावाने सायबर फसवणूक
जेष्ठ नागरिकाला अबू सालेमच्या नावाने धमकावून उकळलेले ७१ लाख रुपये
अबू सालेमने खात्यात पैसे पाठवल्याचा बनाव करून जेष्ठ नागरिकाला दमदाटी
तसेच मुंबई पोलिसांचा मोस्ट वाँटेड, इन्वेस्टमेंट स्टॉक फ्रॉड आणि इतर गुन्ह्यांमध्ये संशयित आरोपी असल्याचा धाक दाखवून ७१ लाखांची सायबर फसवणूक
पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील खासगी निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढविला
मुख्यमंत्र्यांच्या घराकडे येणाऱ्यांची होतेय कसून चौकशी
शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चा नागपूरच्या सीमेवर धडकला असून हैदराबाद जबलपूर महामार्ग बंद पडला आहे. शेतकरी नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सर्व शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा पोहोचेल अशी चेतावणी राज्य सरकारला दिली होती. या पार्श्वभूमीवर कालपासून नागपुरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय रामगिरी बंगला आणि त्याचं धरमपेठ येथील खासगी निवासस्थान परिसरातही बॅरिकेटिंग लावून निवासस्थान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील खासगी निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढविला
मुख्यमंत्र्यांच्या घराकडे येणाऱ्यांची होतेय कसून चौकशी
शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चा नागपूरच्या सीमेवर धडकला असून हैदराबाद जबलपूर महामार्ग बंद पडला आहे. शेतकरी नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सर्व शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा पोहोचेल अशी चेतावणी राज्य सरकारला दिली होती. या पार्श्वभूमीवर कालपासून नागपुरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय रामगिरी बंगला आणि त्याचं धरमपेठ येथील खासगी निवासस्थान परिसरातही बॅरिकेटिंग लावून निवासस्थान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.
निलेश घायवळ प्रकरणी मोठी अपडेट
निलेश घायवळ हा लंडन मध्येच
यु के हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना उत्तर
६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निलेश घायवळ याचा व्हिसा
निलेश घायवळ हा त्याचा मुलगा लंडन मध्ये शिकत असल्याने तो लंडन मध्ये असल्याची यु के हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती
यु के हाय कमिशन ने निलेश घायवळ बाबत तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांना कळवले असल्याची देखील माहिती
मुंबई: यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला तब्बल ३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे. त्या खालोखाल धुळे व नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो. चांगले उत्पन्न आणल्याबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
या वर्षी १८ आक्टोबर ते २७ आक्टोबर या दिवाळीच्या १० दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी ३० कोटी याप्रमाणे तब्बल ३०१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे दिवाळी सुटीच्या परतीच्या दिवशी २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळवुन या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे.
एसटीच्या ३१ विभागात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने आणले असून (₹२० कोटी ४७ लाख) त्यानंतर धुळे (₹१५कोटी ६० लाख) आणि नाशिक (₹१५ कोटी ४१ लाख ) विभागाचा क्रमांक लागतो. मागील वर्षीच्या दिवाळी हंगामाच्या पेक्षा यंदा महामंडळाने तब्बल ३७ कोटी रुपये उत्पन्न जास्त आणले आहे.
हैदराबाद व चंद्रपूर वरून नागपूर कडे येणाऱ्या मार्गावर आंदोलन सुरू असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक बंद आहे... परिणामी हैदराबाद, चंद्रपूर, हिंगणघाट कडून येणारी वाहन गिरड - उमरेड मार्गे नागपूरात प्रवेश करत आहे. असा लांबचा प्रवास करीत असताना अनेक वाहनांचे पेट्रोल डिझेल संपत आहे... नागपूर उमरेड महामार्गावरील 5 ते 6 पेट्रोल पंप सध्या कोरडे झाले असून या पंपावर पेट्रोल आणि डिझेल संपल्यामुळे अनेक वाहन चालकांना मानसिक त्रास सोसावा लागत आहे.. यावेळी एका कारचालकाच्या चार चाकी पेट्रोल संपल्यामुळे गाडी पेट्रोल पंप वरच बंद पडली आणि त्याने मित्राला फोन करून मदती ची मागणी केली आहे
Bacchu Kadu Farmer Protest : चर्चेची आमची तयारी आहे. आम्ही काय फक्त आंदोलन करायला आलेलो नाही असे मत नागपुरात महाएल्गार मोर्चा घेऊन आलेले बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये (Nagpur) शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) अधिक तीव्र झाले असून, महामार्ग रोखल्यानंतर आता 'रेल रोको'चा (Rail Roko) इशारा देण्यात आला आहे. 'सरकारला शेतकऱ्यांना रस्त्यावर गोळ्या घालून मारायचं असेल तर आम्ही गोळ्याही खायला तयार आहोत,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. आम्ही चर्चेची दारे बंद केलेली नाहीत, पण सरकारनेच ती बंद केली आहेत, असेही ते म्हणाले.
सोलापूरमध्ये भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या गळाला दोन माजी आमदार
राजन पाटील आणि यशवंत माने या दोन माजी आमदारांचा भाजपात प्रवेश होणार
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज जम्बो पक्षप्रवेश
लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील ही भाजपात प्रवेश करणार
माजी आमदार बबनदादा शिंदेंचे पुत्रही भाजपच्या वाटेवर
दरम्यान, माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या नेत्यांचा विरोध
अशात, हा पक्षप्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा
अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुबंई च्या जसलोक रुग्णालयात उपचार सुरू
भुजबळ यांना गेल्या काही दिवसापासून थकवा जाणवत असल्यानं चेकअप साठी केले होते दाखल
एंजिओग्राफी करण्याचा डॉक्टरानी दिला सल्ला
आज एंजिओग्राफी, केली जाण्याची शक्यता
काल दिवसभर कामकाजात व्यस्त होते भुजबळ सकाळी मंत्रिमंडळ बैठक आणि त्यानंतर कुंभमेळा मंत्री समितीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानतर भुजबळ रुग्णालयात दाखल झालेत
चर्चेची आमची तयारी आहे.. आम्ही काय फक्त आंदोलन करायला आलेलो नाही असे मत नागपुरात महाएल्गार मोर्चा घेऊन आलेले बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे...
जशी एका पोराची आपल्या मायबापाकडून अपेक्षा असते तशीच आमची ही सरकारकडून अपेक्षा आहे फक्त होणाऱ्या चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे शेतकरी हिताचा निर्णय झाला पाहिजे असंही बच्चू कडू म्हणाले...
दरम्यान, आमच्यापर्यंत सरकारकडून चर्चेचा कुठलाही निरोप आलेला नाही, निरोप आला तर आम्ही चर्चा करू.. आम्ही फक्त आंदोलन करण्यासाठी नाही, तर मार्ग काढायला इथे आलो आहोत असेही बच्चू कडू म्हणाले.
सरकारचा विशिष्ट मंत्री किंवा विशिष्ट व्यक्तीच चर्चेसाठी यावं अशी आमची अट नाही.. कोणताही प्रतिनिधी चर्चेसाठी आलं तर आम्हाला चालतंय, फक्त शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय करा.. चर्चेनंतर निर्णय मात्र झाला पाहिजे, नाहीतर आम्हीही आंदोलन थांबवणार नाही असेही बच्चू कडू म्हणाले
सोनम वांगचुक यांची राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत लोधपुर कारागृहात 26 सप्टेंबर 2025 पासून रवानगी करण्यात आलेली आहे. यापूर्वी 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची अपेक्षा होती. ती पुढे ढकलण्यात आली. त्यांच्या पत्नी गीतांजलि अंगमो यांनी याचिका दिली असून कोर्टाने या प्रकरणात केंद्र सरकार आणि लद्दाख प्रशासनाला नोटिसही जारी केले आहे.
बीड: बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. माजी मंत्री बदामराव पंडित यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला. मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत पंडितांचा पक्षप्रवेश झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडच्या गेवराई मतदार संघातील ही मोठी घडामोड आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या विरोधात मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून बदामराव पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांना बळ देण्यात येतंय. पंकजा मुंडेंच्या आदेशाने लक्ष्मण पवार आणि बदामराव पंडित एकत्र काम करणार असल्याचं पंडित यांनी म्हटलं. तर यावेळी बदामराव पंडित यांनी पुतणे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर जोरदार टीका केली. जन्मल्यापासून आम्ही कट्टर विरोधक विजयसिंह पंडित अपघाताने आमदार झाले असून पैसे वाटून आमदार झाले. गेवराईची जनता मलाच आमदार मानते. विजयसिंह पंडित कोणत्याही कामात नसतात. त्यांचे बंधूच सर्व काम पाहतात असं म्हणत बदामराव पंडित यांनी विजयसिंह पंडित यांना लक्ष केले. तर यावेळी भविष्यात भाजपाची राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही. त्यामुळे भाजपाकडून गेवराई विधानसभेची निवडणूक मीच लढवणार असा दावा बदामराव पंडित यांनी केला.
लातूर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः जोरदार बॅटिंग केली आहे. मागील पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम होतं. अधूनमधून हलक्या सरी येत होत्या. पण काल दिवसभरात आणि रात्री पावसानं तुफान हजेरी लावली. अहमदपूर, देवणी, रेणापूर आणि लातूर ग्रामीण परिसरात दिवसभरात अनेकदा पाऊस झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास पावसानं जोर पकडला आणि रात्रभर मुसळधार पाऊस सुरूच राहिला. या मुसळधार पावसाने जिल्ह्याचं संपूर्ण चित्रच बदललं आहे. छोटे मोठे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत, शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. ज्यांनी शेतात सोयाबीन सुकवून ठेवले होते, त्यांचे सोयाबीन पाण्यात वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी तयार बनीम वाहून गेल्याचं चित्र दिसतंय. पावसाने मिळालेलं पीक डोळ्यांसमोर वाहून जाताना पाहून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि त्यांना कर्जमुक्त करावा या मागणीला घेऊन प्रहार नेते बच्चू कडू यांनी त्यांच्या हजारो समर्थक आणि शेतकऱ्यांसह काल नागपुरात धडक दिली आहे. हैदराबाद - जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग कालपासून त्यांनी बंद पडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनकर्ते धडकतील अशी चेतावणी बच्चू कडू यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त वाढविण्यात आला असून एकंदरीतच परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे.
शेतकरी आंदोलनात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मध्यस्थी करणार
बच्चू कडूंकडून आलेल्या विधानानंतर सरकारकडून बावनकुळे संवाद साधणार
दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांच्या मागण्यासंदर्भात बैठक लावण्यात आली होती
मात्र, बच्चू कडूंनी बैठकीस उपस्थित राहण्यास नकार दिला अशात बैठक रद्द करण्यात आली होती
त्यामुळे आज सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बहुतेक ठिकाणी मकाचा चारा काढता आला नाही तर काही ठिकाणी काढून ठेवलेला चारा सुरक्षितस्थळी हलविता न आल्याने चारा शेतात भिजून सडू लागला आहे..त्यामुळे भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.आधीच अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पिके वाया गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून ,आता चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने पशुधन कसे जगवावे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मोथा' चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसून येत असून समुद्रही खवळला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने देवगड बंदरात शेकडो नौकां सुरक्षित ठिकाणी दाखल झाल्या आहेत. समुद्रातील मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रात सध्या खवलेले असून याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्यामुळे मच्छिमारांनी आपल्या बोटी देवगड बंदरात सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत.
हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या रवी भवन येथील बंगल्यावर १ कोटी ४ लाख रुपयांची उधळपट्टी
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या ९ नंबरच्या बंगल्याचे डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत आहे
दरम्यान, बंगल्यावर १ कोटी रुपयांहून अधिक खर्च होत असल्याने उलटसुलट चर्चांना उधाण
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर १०० कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव प्रस्तावित
विधानभवन, रवी भवन, देवगिरी, रामगिरी, राजभवन तसेच १५० हून अधिक गाळ्यांची देखभाल दुरुस्ती व रंगरंगोटी काम या माध्यमातून करण्यात येणार
धाराशिव शहरातील रस्ते कामांसाठी 117 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला म्हणून शहरात भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे अभिनंदनाचे बॅनर लागले. मात्र त्यानंतर लागलीच उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या खात्याकडून या कामाच्या कार्यारंभ आदेशाला स्थगिती देण्यात आली. रस्ते कामाच्या स्थगितीसाठी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दोनवेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे लेखी तक्रार करण्यात आली. पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यातला हा सुप्त संघर्ष असला तरी या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा शिवसेना भाजपमधील धुसफूस समोर आली आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे लेखी तक्रारीत आक्षेप नेमके काय?
निविदा कामामध्ये अपारदर्शकता, विलंब आणि मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली करण्यात आली
रस्ते कामाच्या टेंडरमध्ये Bid व्हॅलिडीटी आणि Bid कॅपॅसिटीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी काही निवडक निविदा 15 टक्के वाढीव दराने काढल्याचा आरोप
राजकीय हस्तक्षेप आणि खोट्या कागदपत्राच्या आधारावर निविदाधारकाने निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याचा आरोप
पालकमंत्री म्हणून फेरनिविदेच्या सूचना दिल्या, फेरनिविदा झाल्यानंतर सरकारचे आणि नगरपरिषदेचे पैसे वाचले असते, मात्र जाणीवपूर्व त्याकडे दुर्लक्ष केल्याच सरनाईक यांची तक्रार
धाराशिव नगरपरिषदेच्या तात्कालीन मुख्याधिकारी वसुधा फड यांनी ठेकेदाराचे हित पाहून निविदा प्रक्रिया राबवल्याचा आरोप
तात्कालीन मुख्याधिकारी धाराशिव नगरपरिषद यांनी केलेला विलंब, हलगर्जीपणा आणि अपारदर्शकता त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली
त्यामुळे रस्ते कामांची फेरनिविदा न राबवता त्याच ठेकेदाराला पुन्हा कार्यारंभ आदेश देणे योग्य ठरणार नाही अशी तक्रार यांनी केली होती
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने कामाला स्थगिती दिली
रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या इमारत आणि जमिनीच्या लिलाव प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारावरून आता ठेवीदार आणि भागभांडवलदार संतप्त झाले आहेत. सहकार विभागाने लिलाव रद्द करण्याचे आदेश दिले असतानाही, जिल्हा उपनिबंधकांनी अद्याप स्थगिती न दिल्यामुळे संताप उसळला आहे. बँकेची चार कोटींची मालमत्ता अवघ्या एक कोटी दहा हजार रुपयांत विकली गेल्याचा आरोप होत आहे. या व्यवहारामागे राजकीय आश्रय असल्याचा संशय व्यक्त केला जात असून ठेवीदारांनी आता या संदर्भात १५ दिवसांत कारवाई न झाल्यास १९ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या उपोषणाला रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाने सुद्धा पाठिंबा दिला आहे.
पारोळा - तालुक्यातील कडजी गावाजवळ कंटेनरला बसने मागून धडक दिल्याने त्यात चालक वाहकासह नऊ प्रवासी जखमी झाले. ही घटना आज २८ रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. बस क्र.एमएच २०,२५७९ ही नाशिकहून मालेगाव धुळे बायपास जळगावचा दिशेने जात असताना राष्ट्रीय महामार्ग ५३ वर कडजी गावाजवळ वळणावर समोर चालत असलेल्या कंटेनरने अचानक ब्रेक मारल्याने व रिप-रिप पावसामुळे कंटेनर ची गती लक्षात न आल्याने बस ची कंटेनरला मागून जोरदार धडक दिली.
त्यात बस चालक विनोद विक्रम सैंदाणे (४६) जळगाव,वाहक राहुल दिगंबर पाटील (३८) जळगाव यांचेसह बस मधील शेख मोहम्मद इलियास (३२) एरंडोल,शाहिस्ता इलियाज शेख (२२)एरंडोल,श्रावण मुरलीधर माळी (४५) पारोळा,शेख असिफ शेख नजीब(३३) कासोदा,शेख हारून रशीद शेख मुनीर(६०) जळगाव,रितेश देवेंद्र भामरे (२८) मेहरगाव ता. जि.धुळे,रूपाली मोतीलाल पाटील (२८) नगाव ता.अमळनेर हे प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार,वसिम शेख यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले.जखमींवर डॉ.गिरीश जोशी,डॉ.महेश पवार,डॉ.सचिन करोडपती, डॉ.चेतन करोडपती,डॉ.पुरुषोत्तम पाटील,डॉ. मिलिंद श्रॉफ, आदींनी उपचार केला.यातील दोन जखमींना जळगाव तर एकाला धुळे येथे हलविल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.दरम्यान अपघातामुळे घटनास्थळी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.पोलीस निरीक्षक अशोक पवार,पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन,पोउपनिरी विजय भोंबे, अभिजीत पाटील,प्रवीण पाटील,संतोष महाजन,भूषण पाटील,आकाश पाटील यांनी वाहतूक सुरळीत केली.
दहावी अर्ज भरण्यास १० नोव्हेंबरपर्यंत मुदत
फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील दहावी परीक्षेसाठी २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.
नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज ‘युडायस प्लस’वरून शाळांमार्फत, तर पुनर्परीक्षार्थी, खासगी व इतर विद्यार्थ्यांचे अर्ज www.mahahsscboard.in वरून भरायचे आहेत.
परीक्षा शुल्क ‘आरटीजीएस/एनईएफटी’द्वारे १४ नोव्हेंबरपर्यंत भरावे लागेल
प्रिलिस्ट व चलन १७ नोव्हेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक.
मुंबईत आज गोरेगाव नेस्को येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमात बदल
पश्चिम द्रूतगती मार्गावरून आज दुपारी २ ते रात्री ८ पर्यंत पश्चिम द्रूतगती मार्गावरून अवजड वाहनांना बंदी
या नियमातून फक्त आपत्कालीन सेवा पुरवणार्या रुग्णवहिका, अग्निशमन दल, पोलिस वाहने, वाहतूक पोलिसांनी परवानगी दिलेली वाहनांना वगळण्यात आलं आहे
या वेळी दरदिवशी प्रमाणे वाहतूक कोंडी होणार यांची याची काळजीही पोलिसांकडून घेण्यात आली आहे
नागपूर - वर्धा आणि जबलपूर - हैदराबाद महामार्ग बच्चू कडू यांच्यासोबत दाखल झालेल्या आंदोलकांनी रोखून धरल्याने दोन्ही रस्त्यांवर दोन्ही बाजूला अनेक किमी पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.. त्यामुळे खाजगी वाहनांनी किंवा एसटी बसेसने प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांची मोठी अडचण झाली आहे.. तसेच धान्य, दूध, भाजीपाला, व इतर अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणारे अनेक ट्रक्स ही महामार्गावर थांबून आहे.
राज्य सरकारच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने राज्यात खाजगी तत्वावर दस्त नोंदणी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रस्तावित केला आहे आणि या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे परिसरात 60 खाजगी दस्त नोंदणी कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरूही झाली आहे. खाजगी व्यक्ती किंवा एजन्सीद्वारे हे खाजगी दस्त नोंदणी कार्यालय चालवले जाणार आहेत. यामुळे नागरिकांचा दस्त नोंदणीसाठी लागणारा वेळ वाचून जलद गतीने नागरिकांची कामे होतील असा उद्देश आहे. यासाठी प्रत्येक दस्त नोंदणीला सहा हजार रुपये सेवाशुल्क म्हणूनही अतिरिक्त लागणार आहे. हे सर्व खाजगी कार्यालय शासकीय अधिकाऱ्याच्या नियंत्रणात कार्यरत असणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला राज्यातील दस्त लेखक व मुद्रांक विक्रेत्यांनी आक्षेप घेत यावर अनेक प्रश्न निर्माण केले आहे. खाजगी दस्त नोंदणी कार्यालय सुरू केल्यास सामान्य व गरिबांना याचा 6000 रुपयाचा अतिरिक्त भुर्दंड ही पडेल व खाजगी कार्यालयात नोंदणी केलेल्या दस्तांची गोपनीयता व सुरक्षितता धोक्यात येईल असा आक्षेप घेत या सरकारच्या निर्णयाला आता राज्यभरातून विरोध होताना दिसत आहे.
मागील पाच दिवसांपासून लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज अहमदपूर आणि देवणी परिसरात दुपारी जोरदार पाऊस झाला, तर रात्री लातूर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री नऊच्या सुमारास पावसाची तुफान बॅटिंग सुरू झाली आणि काही वेळातच सर्वत्र पाणी साचले. ढगाळ वातावरण... त्यातच जाणवणारे क डक ऊन आणि रात्री पावसाच्या सरी अशा अनिश्चित वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले असून हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.
धाराशिव शहरातील रस्त्याचे काम न सुरू करण्याबाबत नगरपरिषदेकडून ठेकेदाराला पत्र
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर नगरपरिषदेकडून ठेकेदाराला तात्काळ पत्र
धाराशिव शहरातील रस्ते कामाच्या 117 कोटीच्या कार्यारंभ आदेशाला नगरविकास विभागाने दिली स्थगिती
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीनंतर नगर विकास विभागाची कारवाई
धाराशिव मधील रस्ते कामावरून शिवसेना भाजपामध्ये धूसफूस
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी कामाला कार्यारंभ आदेश मिळाल्याबाबत पत्रकार परिषद घेत होती माहिती
शहरातील रस्त्यांसाठी निधी मंजूर करून आणल्याचे श्रेय घेत भाजपकडून शहरात बॅनरबाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाकडून कार्यारंभ आदेशाला स्थगिती, आता नगरपरिषदेकडून संबंधित ठेकेदाराला पत्र देऊन काम सुरू न करण्याच्या सूचना
मुंबईतील पवई तलावात सोमनाथ दीक्षित नावाचा एका व्यक्तीचा बुडून दुर्दैवी मृत्यू. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव. मृतदेह तलावातून बाहेर काढला असून राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत केले घोषित.
आमची चर्चेची तयारी आहे. चर्चेचे दार आम्ही बंद नाही केले, ते सरकारने बंद केले आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहू त्यानंतर रेल्वे रोखून दाखवू, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कालची रात्र जामठा स्टेडियम जवळ महामार्गावरच झोपून काढली आहे अजूनही बच्चू कडू यांच्यासोबत शेकडो आंदोलन महामार्गावर बसून आहेत. त्यामुळे नागपूर वर्धा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. शिवाय जामठा येथून जाणाऱ्या जबलपूर हैदराबाद महामार्गावर ही आंदोलन बसल्याने काही अंशी त्या ठिकाणची वाहतूकही ठप्प झाली आहे. लोकांची कोंडी होत असली तरी शेतकऱ्यांच्या आयुष्याची कोंडी झाली आहे त्याचं काय असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. चर्चेसाठी कृषिमंत्री महसूल मंत्री किंवा मुख्यमंत्री कोणी यावं अशी आमची अपेक्षा नाही. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे कर्जमाफी मिळावी, ही अपेक्षा असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
परभणी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावलीय.संध्याकाळ झाल्यानंतर रिमझिम पाऊस सुरू झाला होता मात्र याच पावसाचा जोर नंतर वाढला जवळपास एक तास जोरदार पाऊस झालाय यामुळे काढणीला आलेल्या कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच शेतकरी रब्बीच्या पेरणीची तयारी करतोय. त्यातही या पावसामुळे मोठ्या अडचणी येत आहेत.त्यामुळे पाऊस केव्हा थांबणार, असा प्रश्न शेतकरी वर्गासह सर्वसामान्य परभणीकरांना पडलाय.
शिरोळ तालुक्यात उसाच्या दराचे आंदोलन पेटले
साखर कारखान्याकडे जाणाऱ्या उसाची ट्रॉली पेटवण्याचा प्रयत्न
अज्ञात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अडवून ट्रॉलीचे चाक पेटवले
सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच आता शिवसेना शिंदे गटाला देखील भाजपकडून दे धक्का
मोहोळचे शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश शिरसागर उद्या भाजपात प्रवेश करणार
मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नागनाथ क्षीरसागर उद्या माजी आमदार राजन पाटलांसोबतच भाजपमध्ये प्रवेश करणार
भाजपने मोहोळ तालुक्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला राजकीय धक्का दिलाय.
उद्या मुंबई येथील प्रदेश भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा महायुतीतील मित्र पक्षांना आणखी एक धक्का
बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच. महामार्ग अजून ही रोखून धरले आहे. कालची रात्र बच्चू कडू आणि आंदोलकांनी जामठा येथे महामार्गावर काढली आहे.. कालच्या तुलनेत गर्दी कमी झाली असली तरी शेकडो ट्रॅक्टर आणि वाहनांसह आंदोलन महामार्ग रोखून बसले आहे.. आज 12 वाजेपर्यंतचे अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिले आहे.. त्यानंतर रेल्वे रोकोचा इशारा दिला आहे.बच्चू कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी , वामनराव चटप , मंत्री महादेव जानकर नागपूर येथे आंदोलनस्थळी शेत-यांच्यासोबत रात्रभर रस्त्यावरच झोपले.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog: बच्चू कडू नागपुरात आंदोलन करण्यावर ठाम; सरकारची विनंतीही धुडकावली