Maharashtra Live blog: तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका, अन् साधूंच्या नावाखाली संधिसाधूपणा करू नका : राज ठाकरे

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

Advertisement

रोहित धामणस्कर Last Updated: 29 Nov 2025 10:53 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog updates: इथे येऊन कोण म्हणते तिजोरी आमच्याकडे आहे तर कोण म्हणते चावी आमच्याकडे आहे .. पण बँकच आमच्याकडे आहे मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार अशी फटकेबाजी...More

Beed : बीड नगरपालिका निवडणुकीसाठी 45 संवेदनशील मतदान केंद्रे निश्चित

बीड : येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिका क्षेत्रांमध्ये एकूण ४५ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने पोलिस प्रशासनाने पाहणी करून या केंद्रांची माहिती घेतली आहे.


बीड जिल्हा पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे अंबाजोगाई नगरपालिका क्षेत्रात असून त्यांची संख्या १७ आहे. त्या खालोखाल माजलगावमध्ये ११ आणि परळीतही ११ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित झाली आहेत. बीड शहर पालिकेसाठी सहा केंद्रे संवेदनशील आहेत.


विशेष म्हणजे, धारूर आणि गेवराई नगरपालिका क्षेत्रांमध्ये शांततापूर्ण वातावरणामुळे एकही मतदान केंद्र संवेदनशील नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


या सर्व ४५ संवेदनशील केंद्रांवर निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, प्रशासनाने याची संपूर्ण तयारी केली आहे.


सहा नगरपालिकेसाठी ४३४ मतदान केंद्र


जिल्ह्यात ४३४ मतदान केंद्रे आहेत. यात बीड १७९, परळी ८८, अंबाजोगाई ६९, माजलगाव ४५, गेवराई ३१ आणि धारूरमधील २२ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.