Maharashtra Live blog updates: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला; संभाव्य युतीसंदर्भात शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे बधूंमध्ये चर्चा

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

Advertisement

रोहित धामणस्कर Last Updated: 27 Nov 2025 11:54 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog updates: सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणात आरोपींवर आरोप निश्चित. मुंबईतील विशेष मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम) न्यायालयाने 2024 मध्ये अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या...More

मुलांना कोंडून ठेवलेल्या अंगणवाडीत हिंजवडी पोलीस पोहचले; सेविकेने घडला प्रकार सांगितला

हिंजवडीत वीस मुलांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याचा प्रकार घडला. एबीपी माझा ने हा धक्कादायक व्हिडीओ समोर आणला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य शिवनाथ जांभुळकर यांनी बैठकीला बोलावलं असा खुलासा अंगणवाडी सेविका सविता शिंदे यांनी केला. त्यामुळं जांभुळकर यांनी कोणत्या अधिकारात सेविका आणि मदतनीस यांना ग्रामपंचायतीत बैठकीला बोलावलं. याचा तपास ही पोलिसांकडून केला जातोय. वीस मुलांना अंगणवाडीत कोंडून ठेवणं ही बाब धक्कादायक असल्यानं कठोर कारवाई अपेक्षित आहे.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.