Maharashtra Live blog: साताऱ्यामध्ये आयुष्य संपवलेल्या महिला डॉक्टरवर बीडमध्ये रात्री उशीरा अंत्यसंस्कार

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

Advertisement

रोहित धामणस्कर Last Updated: 25 Oct 2025 01:41 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog: मिरारोड येथील काशिगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डाचकूल पाडा येथे दोन गटात झालेल्या वादानंतर काल सायंकाळी एआयएमआयएम चे नेते वारीस पठाण यांनी डीसीपी राहूल चव्हाण यांची भेट घेवून,...More

मुंबई शहरात रात्रीच्या वेळी घरपोडी करणाऱ्या आरोपी विरुद्ध आरे पोलिसांची मोठी कारवाई

गोरेगाव पूर्वेत रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार पिता-पुत्र यांना आरे पोलिसांकडून 12 तासाच्या आत अटक


अटक आरोपी पिता-पुत्र कडून चोरीला गेलेल्या शंभर टक्के मालमत्ता हस्तगत


काही दिवस पूर्वी गोरेगाव पूर्वेत आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रॉयल पाम्स मध्ये असलेल्या बंगल्याच्या हॉलची काच तोडून या आरोपीकडून 36 लाख रुपयाची मालमत्ता चोरी केली होती



याप्रकरणी आरे पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करून परिसरात असलेल्या 35 सीसीटीव्ही कॅमेरा चेक करून दोन आरोपींना अटक केली आहे


अटक दोन्ही आरोपी हे पिता पुत्र असून त्यांचे नाव नियामतुल्ला आयुब खान वय 38 वर्ष, शाहिद नियामतुल्ला खान वय 19 वर्ष आहे.


अटक आरोपीकडून चोरीला गेलेल्या शंभर टक्के मालमत्ता आरे पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे, 


तसेच हे सराईत आरोपी असून मुंबई शहरात आणखी किती ठिकाणी चोरी केली आहे यामध्ये अजून कोण साथीदार आहेत का या संदर्भात अधिक तपास आरे पोलीस करत आहे....

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.