- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog: ठाणे महानगरपालिका निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती नवी मुंबईची यादी; पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा घोळ समोर
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog: हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये संतोष बांगर यांच्यावर भाजपबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा जोरदार टीका करू लागले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते विनायक...More
बुलढाण्याच्या मलकापूर मध्ये अजित पवारा ंची आयोजित करण्यात आली आहे. मात्र अपेक्षित गर्दी न जमल्यामुळे चक्क शासकीय आशा व अंगणवाडी सेविकांना पाचरण करण्यात आलय. दादांच्या या प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात मलकापूर तालुक्यातील अंगणवाडी व आशा सेवेकाना व्हाट्सअप मेसेज करून सभेला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे मात्र चक्क शासकीय सेवेत असलेल्या अंगणवाडी व आशा वर्कर बोलावण्याची वेळ आयोजकांना आली.
बीड: नगरपालिका निवडणुकीसाठी आज अपक्ष उमेदवारांना नगरपालिकेमध्ये चिन्ह वाटप केले जातेय. मात्र अपक्ष उमेदवारांमध्ये चिन्हाबाबत आजही पेच कायम आहे. सूची सादर करून काही कागदपत्र निवडणूक विभागाला सादर करायचे आहेत. त्यामुळे या कागदपत्रांची पूर्तता करून मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवायचं कसं? हा प्रश्न अपक्ष उमेदवारांना पडला आहे. अपक्ष उमेदवारांना प्रचार करण्यासाठी केवळ चार दिवस शिल्लक असल्याने निवडणूक विभागाने अपक्ष उमेदवारांवर अन्याय केला अशा प्रतिक्रिया बीड नगरपालिकेमध्ये आलेल्या उमेदवारांनी व्यक्त केल्या आहेत.
बडनेरा येथे ऋषी राजू खापेकर (वय 27 वर्ष) हत्या प्रकरण
खासदार अनिल बोंडे पोलीस ठाण्यात येऊन अधिकाऱ्यांवर संतापले
12 ही मुस्लिम आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही - अनिल बोंडे
बडनेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी खासदार बोंडे यांनी केली..
काल रात्री 12.30 वाजता बडेनरा मधील सावता मैदान याठिकाणी 12 जणांनी मिळून हत्या केली..
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील आरोपी आणि मृतक हे रेल्वे गाडीमध्ये चणे फुटाणे विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्यामध्ये त्यावरून वादविवाद होत होते. म्हणून यातील आरोपी यांनी मृतकास चाकू आणि लाकडी काठीने मारून गंभीर जखमी करून जीवानीशी ठार मारले आहे. याप्रकरणी बडनेरा पोलीसांनी शेख तोफिक शेख शकूर (वय 21) सह तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे..
ठाणे महानगरपालिका निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरती नवी मुंबईची यादी
पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा घोळ समोर आला आहे
मनसे नेते अविनाश जाधव यांनी मतदाराची यादी दाखवून निवडणूक आयोगाची आणि ठाणे महानगरपालिकेची पोलखोल केली आहे...
ठाणे महानगरपालिका वेब साईट मध्ये घोळ....
ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांचा फोटो असलेल्या यादीमध्ये मात्र नवी मुंबई प्रभाग असलेले पत्ते आढळून आले यादीमध्ये...
हीच यादी आम्ही डिलीट केली नाही तर आम्ही नागरिकांना डिस्प्ले म्हणून रस्त्यावर दाखवू....
मतदार यादी ठाणे महानगरपालिकेच्या ऑनलाईन वेबसाईटवर उपलब्ध
निवडणूक आयोगाचा कारभार असत्य बाहेर येण्यासाठी आम्ही सत्याचा मोर्चा काढला....
ठाणे महानगरपालिका च्या आयुक्तांना भेटून त्यांना पुन्हा एकदा या प्रारूप मतदार यादीच्या घोळ संदर्भात जाब विचारणार..
मुंबई गोवा महामार्गावरच्या हातखंबा येथे पुन्हा एकदा टँकरचा अपघात
केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी
मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प
पोलिसांच्या नाकावर टिच्चून बर्थडे करणाऱ्या कुख्यात गुंडाला अटक
पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड समीर शेख याला अटक
अटक करत पोलिसांनी गुन्हेगाराची काढली धिंड
पोलिसांनी सूचना देऊन देखील अनेक लोकांना जमा करत वाढदिवस साजरा करणे आरोपीला भोवलं
पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत या कथित भाईने केलं होतं मोठं बर्थडे सेलिब्रेशन
पुण्यातील येरवडा परिसरात असणाऱ्या लक्ष्मी नगरमध्ये या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने महिलांना धमक्या देणे, धारदार शस्त्राने वाहनांची तोडफोड करणे आणि परिसरात दहशत पसरवण्यासाठी केले होते अनेक नागरिकांवर हल्ले
याच दहशत वाजवणाऱ्या आरोपीची पोलिसांनी अटक करत धिंड काढली आहे
समीर शेख हा एका हत्ये प्रकरणातील देखील आरोपी आहे
मागील आठवड्यात समीर शेख यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांना एकत्रित करत केला होता वाढदिवस साजरा
बनावट जन्मदाखल्यांचे प्रकरण, अमरावतीत 962 लोकांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता..
अमरावती महापालिका क्षेत्रात जन्म दाखल्यांसाठी तब्बल 962 अर्जदारांनी वेगवेगळ्या तारखांचे पुरावे दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस...
अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांची गाडगेनगर पोलिसात तक्रार....
तहसीलदार विजय लोखंडे कडून 962 लाभार्थ्यांची यादी पोलिसांना देण्यात आली..
या सर्वांवर आता गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे..
शालार्थ ID'साठी घेतली शिक्षण उपनिरीक्षकाने १ लाखाची लाच
पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयात रंगेहात पकडले
शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे याला विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये स्वतःच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून 1 लाख रुपयाची लाच पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आल.
राज्यात शालार्थ आयडी घोटाळा गाजत असताना पुण्यात ' शालार्थ आयडी' साठी तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना शिक्षण उप निरीक्षकाला लाचलुचपत विभागाने रंग हात पकडले.
रावसाहेब मिरगणे असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
राज्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केलेली असताना अजूनही पैसे घेऊन शालार्थ आयडी दिला जात असल्याने शिक्षण विभाग अधिकच बदनाम होत आहे.
पैशासाठी आईनेच अल्पवयीन मुलीला विविध पुरूषांसोबत शरीरसंबध ठेवण्यास भाग पाडल्याची धककादायक माहिती समोरआली आहे
एप्रिल पासून हे सर्व कृत्य करण्यास अल्पवयीन मुलीला आईने भाग पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे
या प्रकरणी पिडीत मुलीची आई आणि तिचा उमाकांत नावाचा मित्र याच्यावर पोलिसांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
घाटकोपरच्या नारायण नगरमधील ही धक्कादायक घटना असून या प्रकारामुळे मानसिक तणावाखाली गेलेल्या मुलीच्या शिक्षिकेला ही माहिती कळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला
शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे
डिगडोह नगर परिषद मध्ये भाजपचे नगरपरिषद उमेदवार अनिल शर्मा यांच्यासह कार्यकर्त्यांकडून पोलिस शिपायाला मारहाण
नागपूर जिल्ह्यातील डिगडोह देवी परिसरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस शिपाई वृषभ भातुलकर यांना भाजप नगरपरिषद उमेदवार अनिल शर्मा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक मारहाण, जीवघेणी धमकी , प्रयत्न व शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
घटना २४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री घडली. पोलिस शिपाई भातुलकर ड्युटीवरून घरी परतल्यानंतर सोसायटीत BJP कार्यकर्त्यांच्या घरी DJ मोठ्या आवाजात सुरू असल्याचे दिसले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी साउंड बंद करण्यासाठी सोसायटी सचिव अभयकुमार दास यांनी दडपशाही केली होती. या भेदभावाबद्दल त्यांनी सचिवाला विचारणा केली एवढ्यावरून त्यांना खाली बोलावून घेण्यात आले.
भातुलकर खाली पोहचताच “यही है ओ!” असे म्हणत भाजपचे अध्यक्ष व नगर परिषद उमेदवार अनिल शर्मा यांनी त्यांच्या कॉलरला पकडून थापडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी अभयकुमार दास, शरद शर्मा, साजन शर्मा, अजय पाठक व दहा ते बारा BJP कार्यकर्त्यांनीही एकट्या पोलिस शिपायावर तुटून पडल्याचे पुढे आले.
जळगावच्या सेंट्रल बँक कॉलनी परिसरात संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या मालवाहू वाहनावर रामानंद नगर पोलिसांनी छापेमारी करत मोठी कार्रवाई केली. रामानंद नगर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सेंट्रल बँक कॉलनीत संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या मालवाहू वाहन तपासले असता त्यामधून प्रतिबंधित पानमसाला, जर्दा आणि सुगंधी तंबाखूचे पोते व बॉक्स, असा सुमारे २४ लाख २० हजार रुपयांचा साठा आढळला. तसेच सहा लाखांचे वाहन मिळून एकूण ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालक किरण भास्कर नांदरे याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर अपघात
शिवशाही बस आणि सी एन जी गॅस भरण्यासाठी निघालेल्या ट्रकची समोरासमोर धडक
धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने बस आणि ट्रॅक एकमेकांवर धडकले
अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती
माणगाव जवळील कलमजे परिसरात अपघात
अपघातात बस आणि सी एन जी ट्रकचे मोठे नुकसान
महाविकासआघाडीने आम्हाला फुल्ल टॉस दिलाय, त्यावर सिक्स मारायचा की बोल्ड व्हायचं हे आमच्या लोकांनी ठरवावं....उदय सामंत यांचा चिपळूण मधील पदाधिकाऱ्यांना सल्ला. महाविकास आघाडीने शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचा केलेला अवमान आम्हाला निवडणुकीत फायद्याचा ठरेल, असे उदय सामंत यांनी म्हटले.
आमच्याकडे चढाओढ नाही....महाविकास आघाडीमध्ये जे झालं आहे ते चढाओढीतून झालय. राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचा गैरसमज मी दूर करेन... नगरपरिषदेच्या निवडणुकीत युती बाबत आमच्याकडून मागेपुढे झालं असेल, ती चूक आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुधारू. आमदार शेखर निकम आम्हाला पाठिंबा देतील याचा मला पूर्ण विश्वास..
महाराष्ट्रात दखल घेणे एवढा मोठा झालो याचा मला आनंद.... माझ्या मर्यादा मला माहित आहेत, एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला कुठेही डाग लागेल असे का माझ्याकडून होणार नाही. शिवसेनेच्या सचिव विनायक राऊत यांनी राजू देवळेकर हा उमेदवार जाहीर केलाय आणि पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी रमेश कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे शहरवासीयांच्या मनात संभ्रम आहे तो संभ्रम आमचा उमेदवार दूर करेल.
कात्रज बोगदा ते चांदणी चौक ताशी ३० किमीची अंमलबजावणी सुरू
पुण्यातील नवले पुलावर अपघात थांबण्यासाठी कात्रज बोगदा ते चांदणी चौक ३० च्या स्पीडची अंबालाबजावणी काल करण्यात आली यात पहिल्याच दिवशी १५० वाहन चालकांवर नियम मोडल्याने कारवाई करण्यात आली आहे. इ चलन पाठवून ही कारवाई करण्यात आली आहे. १३ नोव्हेंबरला झालेल्या अपघातात ७ जणांचा नाहक बळी गेला होता त्यानंतर वेगवेगळ्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे इथून पुढे कारवाया सुरु राहणार असल्याचं पुणे वाहतूक शाखेन सांगितल आहे.
येत्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि याच अनुषंगाने महानगरपालिकेचे आरक्षण पडले आहे प्रारुप मतदान याद्या ही जाहीर झाल्या आहेत परभणी महानगरपालिकेमधील प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ पाहायला मिळतोय . एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात गेलेले आहेत दुसऱ्या प्रभागातले मतदार तिसऱ्या प्रभागात गेले आहेत.एक दोन मतदारांचा हा विषय नाही तर हजारो मतदार इकडचे तिकडे झाले आहेत भावी इच्छुक नगरसेवक या याद्या घेवून आपल्या प्रभागातील दुसऱ्या प्रभागात गेलेले मतदान काढून आक्षेप दाखल करण्यात व्यस्त आहेत आक्षेप दाखल करण्याचा कालावधी ही वाढवून देण्याची मागणी केली जात आहे.एकूणच या प्रारूप मतदार यादीतील घोळामुळे भावी उमेदवार आणि मतदारही संभ्रमात सापडले आहेत.
खेडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का.... ठाकरे गटाकडून नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवाराचा शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा. प्रभाग क्रमांक पाच (ब ) मधील ठाकरे गटाच्या सुनीता खालकर यांचा योगेश कदमांना पाठिंबा. अर्ज दाखल केला, पण योगेश कदम यांच्या कामामुळे प्रभावित झाल्याने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे सुनीता खालकर यांच्याकडून जाहीर. खेड नगर परिषद निवडणुकीत आधीच बॅक फुटवर असलेल्या ठाकरे गटाचा उमेदवार फुटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ. रामदास कदम यांचे भाऊ अण्णा कदम यांची भेट घेऊन सुनिता खालकर यांनी आपली भूमिका केली जाहीर.
कराड-पाटण राज्यमार्गावर विजयनगर गावच्या हद्दीत मद्यपी युवतीने रस्त्यावर धिंगाना घातला. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. या घटनेने रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या सर्व प्रकारचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड-पाटण राज्यमार्गावर वाहनांची वर्दळ असताना मंगळवारी रात्री एका मद्यपी युवतीने विजयनगर येथील एमएससीबी चौकात धिंगाना घालण्यास सुरूवात केली. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या अडवत त्या वाहनांच्या बोनेटवर बसून रस्त्यावरच अर्वाच्च भाषेत आरडा ओरडा सुरू होता. काही वाहनांवर दगडफेक केल्याचेही तेथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांकडून समजले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी कराड शहर ठाण्याचे पोलीस रवाना झाले आहेत.
मुंबईच्या मतदारयादीत दुबारच नव्हे तर १०३ वेळा नाव असलेला मतदार
एकाच व्यक्तीचे नाव दोनदा नाही तीनदा नाही तर १०३ वेळा यादीत असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आलीये
मुंबईत तब्बल ४ लाख ३३ हजार व्यक्तींची नावे मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेलीयेत
४ लाख ३३ हजार व्यक्तींची नावे वारंवार नोंदवली गेल्यानं अश्या डुप्लीकेट मतदारांची संख्या सुमारे ११ लाखांवर
मात्र, डुप्लीकेट मतदाराचे नाव किती वेळा वारंवार नोंदवले गेलेय याची माहिती प्रशासनाकडे नाही
दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी पालिका प्रशासन विशेष मोहिम हाती घेणार
२३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत दुबार मतदार हटवण्यासाठीची मोहिम चालवली जाणार
२४ वॉर्डमधील निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त ही विशेष मोहिम राबवतील
राज्यात सध्या नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुकीचा धुराळा उडालेला पहायला मिळतोय...शेवगावमध्ये भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पदयात्रा काढून करण्यात आला.. या प्रचारफेरीत नागरिकांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला...यावेळी बोलताना आ. राजळे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली...ज्यांनी 40-40 वर्ष नगरपरिषदेवर सत्ता केली त्यांच्याकडून शहराचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत...ग्रामपंचायत असल्यापासून ते सत्तेवर होते मात्र त्यांना साधं ग्रामपंचायत कार्यालय उभारता आलं नव्हतं, त्यावेळेच्या ग्रामपंचायतीचे आणि आताच्या नगरपरिषदेचे भूखंड नेमके कुठे आहेत हे शोधव लागत असे म्हणत आमदार राजळे यांनी नाव न घेता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या लांडे यांच्यावर टीका केली
मुस्लिम मतांच्या विभाजनासाठी नळदुर्गमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप स्वतंत्र लढत आहेत, ते आतून एकच आहेत. फक्त काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी ते वेगळं लढत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. काँग्रेसच्या टीकेनंतर भाजप आक्रमक झाली. मुस्लिम मतांची काँग्रेस गुत्तेदार आहे का?, काँग्रेसच सर्वाधिक जातीवादी पक्ष आहे. नळदुर्ग मध्ये सर्वाधिक मुस्लिम मत ही भाजपलाच मिळतील, मुस्लिम मतदार भाजपसोबत असल्याचा पलटवार भाजप कडून करण्यात आला. त्यामुळे मुस्लिम मतावरून नळदुर्गचा राजकीय आखाडा तापायला सुरुवात झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या कॉपर चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने एका आंतरराज्यीय कॉपर चोर टोळीला गजाआड केले आहे... या टोळीने गुगल मॅपवर महावितरण सब स्टेशनचे लोकेशन शोधून परिसराची पाहणी करून पहाटेच्या वेळी कॉपर चोरी केल्याचे उघड झाले आहे... स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना जेरबंद केले आहे... यामध्ये बबलू खान, समीम खान, शकील खान, कासीम खान आणि शाहरुख खान यांचा समावेश आहे... आरोपींचे अहिल्यानगर, नाशिक ग्रामीण आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कॉपर चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत...जेरबंद केलेल्या आरोपींकडून 1,40,000/- रुपये किमतीचे कॉपर पोलसह एकूण 4,40,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे... पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाणे करत आहे.
नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाडीखाना चौकात काल मध्यरात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली. अमन मेश्राम (पंचवीस वर्ष) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.. प्राथमिक माहितीनुसार प्रेम प्रकरणाच्या वादातून ही हत्या झाली आहे.. काल रात्री साडेअकरा ते बारा वाजताच्या दरम्यान अमन मेश्राम गाडीखाना चौकात असताना काही मारेकऱ्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.. लोकांनी गंभीर जखमी अवस्थेत अमनला रुग्णालयात नेले. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता.. आरोपी घटनास्थळीच त्यांची दुचाकी सोडून पळून गेले होते.. रात्री उशिरा याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे
कळमेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचार करणाऱ्या आरिफ शेख या व्यक्तीचे अपहरण करत गंभीर मारहाण करणाऱ्या काँग्रेसच्या माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी अखेर अटक करण्यात आली आहे... त्याच्यासोबत आशु ग्वालबंशी, राजू सोनारे यांनाही अटक करण्यात आली आहे.. तर याच प्रकरणी आशिष ग्वालबंशी, अनिकेत उईके आणि रोशन यादव यांना आधीच अटक करण्यात आली होती...
छत्रपती संभाजीनगर शहरातील किलेअर्क येथील समाज कल्याण विभागाच्या एक हजार मुलांच्या वसतिगृहात युनिट क्रमांक एकच्या भोजनात काल सायंकाळी पाल आढळली. यानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ, उलटीचा त्रास होऊ लागला. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल सायंकाळी साडेसातला जेवण करताना गवारीच्या शेंगांच्या भाजीमध्ये पाल आढळली. मुलांनी एकच आरडाओरडा केला काहीजणांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने आम्हाला मेस चालकाने घाटीत दाखल केले. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या समोर आंदोलन सुरू केले. ते ठिय्या आंदोलन रात्री साडेअकरापर्यंत सुरू होते. समाज कल्याण सहायक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी आंदोलकांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी असुविधांचा पाढा वाचला. मेस चालक योगिराज गोरशेटे यांनी चूक मान्य करीत माफी मागितली; तसेच पुन्हा असा प्रकार होणार नाही, अशी ग्वाही दिली. मात्र, त्यानंतरही विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहिले.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सर्वात दुसरी मोठी नगरपरिषद म्हणजे चिखली चिखली नगर परिषदेची स्थापना 1930 साली झाली.. गेल्या दहा वर्षापासून चिखली नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. 26 सदस्य संख्या असलेल्या या नगर परिषदेत मोठे बाजारपेठ असल्याने कर रुपी मोठा निधी जमा होतो . मात्र अद्यापही चिखली शहरातील अंतर्गत रस्ते व पिण्याच्या पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत आहे सध्या नगर परिषदेच्या निवडणुकांची धामधूम आहे. यंदा चिखली नगर परिषदेसाठी भाजपा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारास सरळ सरळ लढत होत आहे.
*चिखली नगर परिषद*
स्थापना - 1930.
लोकसंख्या - 57889.
यापूर्वी भाजपाची सत्ता होती.
एकूण सदस्य संख्या - 26
काँग्रेस - 09
शिवसेना - 01
भाजप - 13
राष्ट्रवादी - 2
अपक्ष - 1
शेवटची निवडणूक 2017 साली झाली होती.नगराध्यक्ष थेट जनतेतून भाजपा चा निवडून आल्या होत्या.
राज्यातील राजकारणाने अनेक मर्यादा ओलांडलेल्या आहेत. अशात लोणावळ्यात मात्र एक सकारात्मक चित्र पहायला मिळतंय. फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिलीये, त्यामुळं आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य उजळलंय. पण राजकारणाचा गंध ही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान असणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून जगताप कुटुंबाचं उदरनिर्वाह फळ विक्रीच्या व्यवसायावर अवलंबून आहे.
दहिसर येथील एका भोजनालयाला नोटीस न देण्यासाठी तसेच यापुढे भोजनावर कारवाई न करण्यासाठी वीस हजाराची लाचेची रक्कम घेताना मनपाच्या स्वच्छता निरीक्षकास सोमवारी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. दिलीप सरवदे यांनी तीस हजाराची लाचेची मागणी केली होती, त्याचा पहिला हप्ता घेताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यातील तक्रारदार उत्तर मुंबईत राहत असून दहिसर परिसरात त्यांच एक भोजनालय आहे. 10 नोव्हेंबरला तिथे दिलीप सरवदे आले होते. त्यांनी भोजनालयाची तपासणी करुन त्यांच्याकडे फुड लायसन्सची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराकडे फुड लायसन्स नसल्याने त्यांना नोटीस बजावून त्यांच्या भोजनालयातील सर्व सामानावर जप्तीची कारवाई केली होती.
20 नोव्हेंबरला सामान सोडविण्यासाठी तक्रारदार दहिसर येथील महानगरपालिकेच्या आर/उत्तर वॉर्डमध्ये गेले होते. त्यांनी स्वच्छता निरीक्षक दिलीप सरवदे यांची भेट घेऊन जप्त केलेले सामान परत करण्याची विनंती केली होती. यावेळी दिलीप सरवदे यांनी त्यांना नोटीस न देण्यासाठी तसेच यापुढे त्यांच्या भोजनालयात कारवाई न करण्यासाठी वार्षिक तीस हजाराच्या लाचेची मागणी केली होती. मात्र लाचेची रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना वीस हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
21 नोव्हेंबरला या तक्रारीची संबंधित अधिकाऱ्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी दिलीप सरवदे यांनी नोटीस न देण्यासाठी तसेच भोजनालयावर यापुढे कारवाई न करण्यासाठी तीस हजाराची मागणी करुन वीस हजार घेण्याचे ठरले. सोमवारी तक्रारदार वीस हजाराचा हप्ता घेऊन दिलीप सरवदे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याकडून वीस हजाराची लाचेची रक्कम घेताना त्यांना या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. दिलीप सरवदे विरूद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक कायदा 7 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये येतायेत. अकोटमधील प्रचारसभेत ते अकोला जिल्ह्यातील पाच नगरपालिका आणि एका नगररंचायतीसाठी प्रचार करणारायेत. अकोट, तेल्हारा आणि हिवरखेड नगरपालिकांसाठी राष्ट्रवादी उमेदवारांना या सभेचा मोठा फायदा होण्याच्या उद्देशाने अजित पवार अकोटात योतायेत. अकोटमधील बस स्थानकासमोरील नेहरू मैदानावर सकाळी 10 वाजता त्यांची जाहीर सभा होणारेय. जिल्ह्यातील पक्षाचे सर्वच उमेदवार या सभेला उपस्थित असणारायेत. अकोटमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रूजम्मा यांच्या पत्नी गाजीयाबानो बद्रूजम्मा या पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेयेत. या सभेला अजित पवार यांच्या समवेत पक्षाचे आमदार आणि स्टार प्रचारक अमोल मिटकरीही उपस्थित असणारायेत. अकोटची सभा आटोपून अजित पवार बुलडाणा जिल्ह्यातील खामगावला पक्षाच्या सभेसाठी जाणारायेत. अकोटमधील सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केलीये.
हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये संतोष बांगर यांच्यावर भाजपबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा जोरदार टीका करू लागले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते विनायक भिसे यांची बहीण अर्चना भिसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यांच्याच प्रचारासाठी हिंगोली शहरांमध्ये जागोजागी आता कॉर्नर सभा होऊ लागल्या आहेत. अशाच एका सभेमध्ये विनायक भिसे यांनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली आहे अशा पद्धतीने दादागिरी करणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान देणार आहात का? मटक्याला द्याल लीड तर हिंगोलीचा होईल बीड, अशा शेलक्या या शब्दांमध्ये विनायक भिसे यांनी संतोष बांगर यांच्यावर टीका केली आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog: ठाणे महानगरपालिका निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती नवी मुंबईची यादी; पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा घोळ समोर