- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog: नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: प्रचार जोरात आहे अतिशय चांगलं वातावरण आहे. जिथे जिथे जातो तिथे तिथे चांगला अनुभव मिळतो. लोक कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये आम्हाला देतील. महायुती जवळपास 70 टक्क्यांपेक्षा...More
भाजप खासदार अनिल बोंडे यांना पुन्हा धमकीचा फोन...
अज्ञात व्यक्तीने अनिल बोंडे यांना फोन करून केली शिवीगाळ..
शिवीगाळ केल्याप्रकरणी राजापेठ पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे...
राजापेठ पोलिसांनी शिवीगाळ देणाऱ्याला वरुड मधून घेतले ताब्यात..
अनिल बोंडे यांनी माझं काम केलं नाही म्हणून मि त्यांना बोललो.. फक्त माझा आवाज मोठ होता मि शिवीगाळ दिली नसल्याच फोन करणाऱ्या व्यक्तिच म्हननं असल्याची माहिती..
पोलिस तपास करत असून काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष...
यापूर्वी देखील अनिल बोंडे यांना हैदराबाद येथून आला होता धमकीचा मेल....
शौर्य पाटील विद्यार्थी आत्महत्येनंतरचा आजचा सहावा दिवस
अद्याप कोणालाही अटक नाही
आज सेंट कोलंबस शाळेसमोर शौर्य पाटील च्या वडिलांच्या उपस्थितीत निदर्शनं
त्याचबरोबर आज शौर्य पाटील च्या वडिलांचा दिल्ली सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीसमोर जबाब नोंदवला जाणार
दिल्ली सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी गुरूवारी पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे
या समितीला आपला अहवाल तीन दिवसात सादर करायचा आहे
त्यामुळे हा अहवाल आज सादर होऊ शकतो
- वृक्ष तोड जनसुनावणी सुरू होताच मनपा अधिकारी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये बाचाबाची...
- मनपाच्या अधिकाऱ्यांकडून प्रास्ताविक होत असताना सुनावणी करता सक्षम अधिकारी किंवा मनपा आयुक्त उपस्थित राहणार नसतील तर सुनावणी नको अशी भूमिका....
- वृक्ष प्राधिकरण अधिकारी असतानाही वृक्ष प्रेमी आक्रमण ... वृक्ष प्रेमींमध्येच दोन गट...
- निर्णय घेणारे अधिकारी असेल तर सुनावणी घ्यावी, मनपा अधिकाऱ्यांकडून शांतता राखण्या
अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले पाटील यांची निवड...
घुले पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड...
माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील हे अजित पवार यांचे खंदे समर्थक...
आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झाले होते अध्यक्ष पद...
दीड महिन्यानंतर होणार आहे जिल्हा बँकेची निवडणूक...
नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरातील भीषण आग..
अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल , आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच..
झिंगाबाई टाकळी परिसरातील बगदादी भागात मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला लागली आग... आगीत डेकोरेशनचे सर्व साहित्य जळून खाक..
बगदादी भागात असे दहा डेकोरेशन गोडाऊन, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नागरी वस्तीतून व्यावसायिक डेकोरेशन मंडप गोडाऊन बाजूला हटवण्याची स्थानिकांची मागणी..
पुण्यात गाडी तोडफोड करणाऱ्या कोयता टोळीतील आरोपींना पोलिसांनी नागरिकासमोरच दिला चोप
चोप देत काढली धिंड
गुडघ्यावर लावले चालायला
ज्या ठिकाणी या आरोपींनी गाड्याची तोडफोड केली त्याच ठिकाणी आरोपींना पोलिसांनी दिली शिक्षा
काल फुरसुंगी परिसरात २० ते २५ गाड्यांची या आरोपींनी केली होती तोडफोड
गाड्या तोडफोड व टोळक्यांचा हा धुमाकुळ सीसीटीव्ही मध्ये झाला होता कैद
फुरसुंगी आदर्शनगर परिसरात कोयता टोळीने चार चाकी,रिक्षाची केली होती तोडफोड
कोयता टोळीने घोषणाबाजी करत केली होती वाहनांची तोडफोड.
अधिक तपास पोलीस करत आहेत
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख याचा राजीनामा पक्षाने नामंजूर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी चर्चेनंतर सलील देशमुख यांचा राजीनामा नामंजूर केला.
काटोल नगर परिषद मध्ये अनिल देशमुख यांनी शेकापचे राहुल देशमुख यांच्यासोबत आघाडी केली होती. त्याला सलील देशमुख यांचा विरोध होता त्यामुळे सलील देशमुख यांनी राजीनामा दिला होता.
सलील देशमुख यांचा राजीनामा नामंजूर केला असला तरी सलील देशमुख यांची नाराजी कायम असल्याचे दिसत आहे.
मंचर नगरपंचायतीत आम्हाला एकहाती सत्ता दिली, की मग इथं विकास निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही. असं राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणत, एका अर्थानं प्रलोभन दाखवलंय.
मंचर नगरपंचायत निवडणुकीत अजित पावरांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीच्या उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत वळसे पाटील बोलत होते. नगरपंचायतीचा नगराध्यक्ष आणि सतरा नगरसेवक भरघोस मतांनी निवडून द्या. मग मंचरमध्ये विकास निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही. असं वळसे म्हणालेत.
पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्य बिबट्या आढळ्याचा कॉल पोलिसांना आला होता. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या महिलांनी पोलिसांना कॉल केला होता मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता आणि माहिती घेतली असता तिथे वानर असल्याचं पोलिसांनी संगितल आहे. पुण्यातील औंध परिसरात काल पहाटे बिबट्या cctvमध्ये कैद झालं होता. त्यानंतर या भागात भीतीचं वातावरण होतं. पहाटे फिरायला आलेल्या महिलांनी थेट बिबट्या असल्याचा कॉल केला आणि पोलिसांनी अख्ख गणेशखिंडजवळील पॉलिटेक्निक छानून काढलं. मात्र वानर असल्याच कळलं.
मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे आज भारतीय नौदलात माहे-क्लास अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (ASW-SWC) मधील पहिले जहाज INS (MAHE) माहे हे कमिशनिंगसाठी सज्ज झाले आहे. कमिशनिंग समारंभासाठी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी असतील.
INS MAHE आकर्षक, वेगवान आणि भारतीय अशी असणार आहे. ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीसह, या युद्धनौकेचे डिझाइन आणि बांधकाम भारताच्या वाढत्या कौशल्याचे प्रदर्शन करणार आहे. या जहाजाचे नाव ऐतिहासिक किनारी शहर माहे या नावावरून ठेवण्यात आले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या कामावर बहिष्कार टाकणाऱ्या कंत्राटदारांचा बहिष्कार मागे..
काल पासून रविभवन, आमदार निवास, विधिमंडळ येथील कंत्राटदारांनी परत कामाला सुरवात केली आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा मैसकर यांच्या आश्वासनांनंतर कंत्राटदारांनी बहिष्कार मागे घेतला.
आज कंत्राटदारांना 23 कोटीचे थकीत वर्ग केले जाणार असल्याचे आश्वासन राज्यसरकार कडून मिळाल्याने हा बहिष्कार मागे कंत्राटदार संघटनेकडून सांगण्यात आले.
- नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडं तोडण्या प्रकरणी आज होणार जनसुनावणी
- आत्तापर्यंत झाडे तोडण्याबाबत 900 हुन अधिक हरकती झाल्या आहेत प्राप्त
- याच हरकतींवर आज होणार आहे सुनावणी
- तपोवन परिसरात साधूग्राम उभारणीसाठी केली जाणार आहे वृक्ष तोड.
- झाड तोडायला पर्यावरण प्रेमी आणि काही नागरिकांचा आहे विरोध
1800 झाडी तोडली जाणार असल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप
- कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी काही झाडं तोडणे आवश्यक प्रशासनाची भूमिका
- आजच्या सुनावणी काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष
नगरपालिका निवडणुका घोषित झाली आणि त्यानंतर उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठीनं उमेदवारी डावलल्यानं नाराज झालेल्या अनेकांनी राजीनामाअस्त्र उगारलं आहे. निवडणुकीची रणधुमाळी ऐन शिगेला पोहोचलेली असतानाचं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सदस्य आणि मुस्लिम समाजाचे नेते आबित सिद्दिकी यांची त्यांच्या घरी भेट घेतली. आबिद सिद्दिकी यांच्या प्रकृतीची विचारणा करण्याकरिता ही भेट घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी, या भेटीमागं मोठी राजकीय उलथापालत होण्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मौजे मुंगसरे गावातील दत्तू अर्जुन म्हैसधुणे यांच्या शेतात बिबट्याचे अंदाजे 4 ते 5 महिने वय असणारे पिल्लू रविवारी मृत अवस्थेत आढळून आल्यान खळबळ उडाली असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ पंचनामा आणि परिसरात तपासणी केल्यानंतर मृत बिबट्यास ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासणी नंतर बिबट्याचा मृत्यू हा मोठ्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात झाला असावा असा अंदाज वन्यजीव पशुवैद्यक यांनी व्यक्त केला आहे.. मृत बिबट्याचे शवविच्छेदन व पुढील कार्यवाही आज केली जाणार असल्याने बिबटयाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. मोठ्या बिबट्याच्या हल्ल्यात हा बिबटया ठार झाला असेल तर मोठा बिबट्या शोधण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे.
मागील काही दिवसांपासून भंडाऱ्यात भाजप आणि शिंदेसेनेचा राजकीय वाद उफाळून आला आहे. अशात आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पवनी, साकोली, तुमसर आणि त्यानंतर सायंकाळी भंडाऱ्यात त्यांचा हा प्रचार धडाका राहणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भंडाऱ्यात सायंकाळी होणारी सभा ही, शिंदेसेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या घरासमोरील किसान चौकात भाजपनं आयोजित केली आहे. यामुळं या सभेतून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय निशाणा साधतात ही भंडारावासीयांना उत्सुकता लागली आहे. यासोबतच बावनकुळे हे तुमसर येथील भाजपचे बंडखोर उमेदवार आशिष कुकडे आणि माजी खासदार मधुकर कुकडे यांची ही भेट घेणार असल्याची माहिती आहे.
अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांना आमदार संग्राम जगताप यांनी 51 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे, यावर किरण काळे यांनी प्रतिक्रिया दिली असून आपल्याला ज्या वक्तव्यांमुळे नोटीस पाठवण्यात आली त्या वक्तव्यावर आपण आजही ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे...आ. जगताप यांना नोटीस देण्यासाठी निष्कलंक वकील सुद्धा मिळाला नाही असं सांगत ज्या वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे तो वकीलच स्वतः गुन्हेगार असल्याचं म्हटलं आहे... मी केलेल्या वक्तव्यांबद्दल मी जेलमध्ये जाण्यासही तयार असल्याचं सांगत काळे यांनी जगताप यांना शहरातील राष्ट्रसंत आनंद ऋषी महाराज यांच्या समाधीसमोर यावं आपण त्यांना याबाबत सर्व पुरावे देऊ असं म्हटलं आहे...मागील काही दिवसांपासून किरण काळे यांनी आ. संग्राम जगताप यांच्या कथित कार्यालयाच्या जागेवरून त्यांच्यावर गंभीर आरोप केले असून जैन समाजाच्या मंगुबाई व्होरा यांनी धार्मिक कार्यासाठी दिलेली जागेवर संग्राम जगताप यांनी आपले राजकीय कार्यालय थाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे यावरून चांगलेच राजकारण तापले आहे.
वाशिमच्या सावरगाव जवळ एका अज्ञात वाहनाने बिबट्याचा मृत्यू ...अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर घटना ... वाशिम जिल्हा सावरगाव जवळ भैरवनाथ टेकडी जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे नेमकं कोणत्या वाहनाने धडक दिली हे मात्र कळू शकले नसलं तरी.. मात्र.. वन वनविभाग आणि पोलीस विभाग अध्यापिक घटनास्थळी पोहोचत नसल्याची माहिती आहे नागरिकांनी बिबट्या बघण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
हुडहुडी भरणाऱ्या हिवाळ्याच्या थंडीत आता नगरपालिका निवडणुकीचं राजकारण तापू लागला आहे. भंडारा जिल्ह्यातही तापमानाचा किमान पारा 10 अंशाच्या घरात पोहोचला असताना निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे. अगदी सकाळपासून उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. तर, दुपारनंतर कार्यकर्त्यांच्या समवेत डोअर टू डोअर पिंजून काढत आहेत. चहाची टपरी असो की, सकाळी मिळणारा गरमागरम पोहा इथंही उमेदवार मतदारांना गाठत असल्याचं चित्र आहे. तर, कोणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना तर, कुठं योग साधना करणाऱ्यांना गाठून प्रचार करताना बघायला मिळत आहे. भंडारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्री बोरकर याही अगदी पहाटेपासून घराबाहेर पडून त्यांची उमेदवारी अन्य उमेदवारांच्या तुलनेत कशी सक्षम आहे....हे सांगताना बघायला मिळत आहेत.
बीड नगरपालिका निवडणुकीत क्षीरसागर विरुद्ध पंडित हा संघर्ष निर्माण झालाय. आमदार विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब गुंजाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेतून भाजपा नेते योगेश क्षीरसागर यांच्यावर जहरी टीका केली आहे. कार्यकर्त्यांची निवडणूक आली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही पळकुटेपणा केला. ही माझी निवडणूक नाही मात्र माझी निवडणूक ज्यावेळी येईल त्यावेळी तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही.. अशा चिल्या पिल्याने माझ्यावर आरोप करू नये.. असं म्हणत आमदार विजयसिंह पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे.
ड्रग्स मुक्त नागपूर" या उद्दिष्टासाठी नागपूर पोलीस आणि नागपूरकरांची संयुक्तरीत्या ड्रग्स (अमली पदार्था) विरोधात जोरदार लढाई सुरू आहे.. "ऑपरेशन थंडर" अंतर्गत गेल्या 18 महिन्यात नागपूर पोलिसांनी खबऱ्यांच्या नेटवर्क मधून मिळालेली गोपनीय माहिती तसेच जनतेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर तब्बल 11 कोटी 34 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली आहे
लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. नगरपंचायत निवडणुकीत पक्षाचे 16 पैकी तब्बल 11 उमेदवार निवडणुकीतून माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र पक्षातीलच अडथळ्यांमुळे हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
2016 मध्ये नगरपंचायतीची स्थापना झाली होती. 2017 निवडणुका झाल्या होत्या.पहिल्या निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता मिळवली. तीन वर्ष प्रशासकाचा काळ.. आताच्या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळते. भाजप ...शिवसेनेचे दोन्ही गट ..काँग्रेस.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे मैदानात आहेत. मात्र शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अकरा लोकांनी माघार घेतल्याने निवडणुकीमध्ये आता वेगळीच चुरस पाहायला मिळते..
माघार घेतलेले उमेदवार आणि प्रभाग :
ललिता बंजारा – नगराध्यक्ष
अनुसया कोल्हे – प्र. 03
महेश व्यवहारे – प्र. 05
गोविंद सुरवसे – प्र. 06
रेखा शिंदे – प्र. 08
रेहानबी कुरेशी – प्र. 10
छाया आकनगीरे – प्र. 11
राजन हाके – प्र. 12
धोंडीराम चव्हाण – प्र. 13
शांताबाई चव्हाण – प्र. 14
बाबाराव ठावरे – प्र. 17
लातूर ग्रामीणचे माजी आमदार काँग्रेस पक्षाचे नेते धीरज देशमुख यांनी भाजपाला आव्हान देण्यासाठी शिवसेनेला कमजोर केलंय असे राजकीय क्षेत्रात बोललं जात आहे. शिवसेनेच्या 11 उमेदवारांना स्थानिक पातळीवर आपल्या बाजूने वळवण्यासाठी माघार घ्यायला लावणे ही खेळी काँग्रेसचीच आहे असा विरोधक आरोप करतायेत. या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या निवडणूक रणधुमाळीत मोठे राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे. रेनापुरच्या चौरंगी लढतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या माघारीमुळे फायदा कोणाला तोटा कोणाला याची गणितं आता घातली जात आहेत.
भाजप शिवसेनेत धाराशिवमध्येही तणाव पाहायला मिळत आहेत. युती फीस्कटल्यानंतर आता शिवसेना आक्रमक पवित्र्यात आली आहे. आम्हाला अंधारात ठेवायचं आणि यूती तोडायची हे भाजपचे प्लॅनिंग होतं. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना आपण काहीही करू शकतो. आपलीच ताकद जास्त असल्याचं वाटतं. मात्र ही निवडणूक कोणाची ताकद किती आहे दाखवण्याचे आहे. शिवसेना ताकद दाखवणार असा आव्हान जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिले. निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांची शिवसेनेची बैठक घेत त्यांनी निवडणूक रणनीती आखली. लाडक्या बहिणी योजनेचे जनक एकनाथ शिंदे आहेत. त्यामूळे लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहेत एकनाथ शिंदे यांचा मोठा चेहरा आमच्याकडे त्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष पदाला कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय वरिष्ठ घेणार असल्यास ते म्हणाले.
प्रचार जोरात आहे अतिशय चांगलं वातावरण आहे. जिथे जिथे जातो तिथे तिथे चांगला अनुभव मिळतो. लोक कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये आम्हाला देतील. महायुती जवळपास 70% हून अधिक जागांवर जिंकेल. काही ठिकाणी महायुती एकत्र आहे. तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगवेगळे निवडणूक लढत आहेत. जिथं महायुती म्हणून निवडणूक लढली जाते तिथे महायुती जिंकणारच. मात्र जिथे मैत्रीपूर्ण लढत म्हणून लढली जातीय तिथे देखील महायुतीच जिंकणार आहे. सध्या संपूर्ण राज्यात महायुतीसाठी वातावरण पोषक आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
मी मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्या विरोधात नेहमी आरोप प्रत्यारोप होत आहेत. सर्वसामान्य माणूस शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला त्यांना पसंतच नाही. त्यांना अजून हजम होत नाही त्यांची पोटदुखी, जळजळ, मळमळ अजूनही जात नाही. कोल्हापूरमध्ये सुद्धा या निवडणुकीत आम्ही जिंकणार आणि महायुतीचाच बोलबाला होणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog: नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा