Maharashtra Live blog: राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडणार? अजित पवारांचे संकेत, म्हणाले..

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

Advertisement

रोहित धामणस्कर Last Updated: 23 Nov 2025 03:08 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog: सुनील तटकरे यांच्या भाजप पक्ष प्रवेश आणि पार्थ पवारांचा घात सुनील तटकरेंनी केला या आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दळवींवर हल्लाबोल केलाय....More

वऱ्हाळ तलावाच्या प्रदूषणाबाबत खा.बाळ्या मामा यांनी व्यक्त केली नाराजी

भिवंडी: शहरात पाणी पुरवठा करणारा व एकमेव प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळख असलेल्या वऱ्हाळ तलाव परिसरातील अस्वच्छता तसेच पाण्यात निर्माल्य टाकल्याने होत असलेल्या जल प्रदूषणामुळे खा बाळ्या मामा यांनी तलावाच्या प्रदूषणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वऱ्हाळ तलावाच्या दुरावस्थेमुळे व जल प्रदूषणामुळे स्थानिक दुर्गंधी मुळे त्रस्त झाले आहेत.या तलावाच्या स्वच्छतेसाठींपलिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक युवक यांनी पुढाकार घेत हर संडे दो घंटे हा उपक्रम सुरू केला.ज्यामध्ये शेकडो युवक युवती यांनी तलावातील घाण काढण्यास सुरवात केली.


या माध्यमातून शेकडो किलो कचरा काढण्यात आला आहे. सहा रविवारी हा उपक्रम सुरू ठेवल्याने रविवारी सातव्या उपक्रमावेळी खा बाळ्या मामा यांनी कामतघर स्व.गोपीनाथ काटेकर क्रीडांगण येथे भेट देऊन युवकांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. तलावाच्या स्वच्छतेची व संरक्षणाची जबाबदारी ही पालिका प्रशासनाची आहे. पण त्याकडे अनेक वेळा तक्रारी करून ही दुर्लक्ष केले गेले आहे. पण आता या तलावाच्या पुनरुत्थान व सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी केंद्र सरकारकडून ५६ कोटी रुपये मंजूर होत आहेत. त्यासाठी मी स्वतः एक वर्ष पाठपुरावा केला आहे. यासोबत आयुक्तांची भेट घेऊन पालिका प्रशासन या तलावासाठी नक्की काय उपाययोजना करीत आहे याची माहिती घेणार आहे अशी प्रतिक्रिया खा सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.