- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog: कल्याणमध्ये शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर हल्ला
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog: कल्याणमधील धक्कादायक घटना. शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला. कार्यालयासमोर भांडण सोडवुन जखमी इसमाला रुग्णालयात नेत असताना अज्ञात इसमांकडून हल्ला. हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह...More
Daund Accident News: दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील मेलझर केमिकल प्रा. लि. कंपनीत बांधकाम सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. यात सुरक्षा भिंत कोसळून दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे. ही घटना 16 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. जयकुमार रामचंद्र मुंडफणे आणि अक्षय भानुदास मोरे असे गुन्हा दाखल असल्यांची नावे आहेत.
नवी दिल्ली : खासदारांच्या इमारतीत लागली आग
ब्रह्मपुत्र या इमारतीला आज दुपारी आग लागली होती
नवी दिल्ली महापालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच हस्तक्षेप करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे
सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
कांद्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या घसरणीप्रश्नी नाशिकच्या येवला दौऱ्यावर आलेल्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची कांदा व्यापाऱ्यांनी भेट घेऊन कैफियत मांडली.नाफेड व एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करू नये त्यामुळे व्यापाऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही.त्यामुळे व्यापार करणे अवघड होऊन बसले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्यालाही चांगला दर मिळत नाही.नाफेडने खरेदी केलेले कांदे रेशन दुकानात विक्री करण्याची मागणी करणारे निवेदन यावेळी व्यापाऱ्यांनी भुजबळांना दिली.याप्रश्नी नाफेड व संबंधितांशी बोलून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन भुजबळ यांनी दिले.
सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने दिवाळीचे फटाके सध्या फुटत आहेत ते पुढेही असेच फुटत राहतील अशी संकेत पालकमंत्री विजयकुमार गोरे यांनी दिले .. आज सांगोला येथे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या कार्यालयात पालकमंत्री गोरे यांचा जंगी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना गोरे यांनी हे संकेत दिले. दोनच दिवसापूर्वी जिल्ह्यातले चार माजी आमदार पालकमंत्री गोरे यांच्या माध्यमातून भाजप प्रवेशाच्या तयारीत असताना आता पूर्वश्रमीचे शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि सध्या उभाठा मध्ये असणारे माजी आमदार दीपक साळुंखे हे देखील भाजपाच्या गळाला लागले आहे . त्यामुळे आज सांगोल्यात एका कार्यक्रमाला आले असतात गोरे यांनी साळुंखे यांच्या कार्यालयाला भेट दिली. दीपक साळुंखे हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत साळुंखे यांनी ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. या तिरंगी लढतीत साळुंखे यांना 50 हजार एवढी मते मिळाली होती. आता साळुंखे हेही भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत असल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुरू केलेले ऑपरेशन लोटस अजून किती पक्ष मोकळे करणार हे पुढे कळेल.
नागपूर मधील दोनशे बोगस मतदार याद्यांची नावे समोर आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली या चौकशीनंतर मोठा खुलासा समोर आलाय यावर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. बोगस मतदार यादींची चौकशी होईल अस ते म्हणालेत शिवाय यामध्ये खर काय आणि खोट काय यानुसार दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अस म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाय याबाबत आमचे विरोधक फेक नरेटीव्ह सेट करत असल्याचा आरोप देखील त्यांनी विरोधकांवर केलाय. माणगाव तालुक्यातील इंदापूर शहरात गेल इंडिया कंपनीच्या सी एस आर निधीतून इंदापूर शिक्षण विभाग प्रसारक मंडळाच्या सुनील तटकरे नवजीवन विद्या मंदिर या नवीन इमारतीच्या नामकरण सोहळ्याला आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला
बोरिवली (पूर्व), मुंबई संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी ई-बग्गी सेवेचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.पर्यटकांना उद्यानात स्वच्छ, शांत आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे.या हरित उपक्रमाला नागरिकांच्या सहभागातून अधिक बळ मिळेल, असे उद्यान प्रशासनाने आवाहन केले आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे, बोरिवली पश्चिमचे आमदार संजय उपाध्याय आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आज नॅशनल पार्क मध्ये दहा बग्गी आणण्यात आल्या असून या सर्व बर्थडे चालवण्यासाठी आदिवासी महिलांना संधी देण्यात आली आहे लवकरच इथे 50 पेक्षा अधिक बंदी आणून पर्यटकांना सेवा देण्याबरोबरच स्थानिक आदिवासींना अधिकाधिक रोजगार देण्याचा प्रयत्न सरकार करील असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केले.
शिंदे यांची शिवसेना आणि भाजपने ठाणे महापालिकेत वेगवेगळ्या लढून दाखवावं माझं चॅलेंज आहे - अविनाश जाधव
आम्ही जर विरोधक म्हणून एकत्र आलो तर नक्की संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे 75 पार जाऊ- अविनाश जाधव
मनसे आणि शिवसैनिक एकत्र येऊन काम करत आहेत आणि आम्ही मोठ्या सुद्धा काढला आणि त्या मोर्चातल्या मागण्या सुद्धा पूर्ण झाल्या
आमचा डीएनए एक आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये मनोमिललन झाला आहे
युती करायची आघाडी करायची याचा निर्णय किंवा आदेश राज ठाकरे देतील
महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराची राजधानी ठाणे आहे आणि बदलायचं असेल यासाठी आम्हाला सगळ्याला विरोधकांना एकत्र यावच लागेल
विधानसभेची मत आम्हाला लोकसभेची पडलेली मतं जर एकत्र तुम्ही बघितली तर नक्कीच आमची ताकद जास्त आहे आणि संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे नक्कीच आम्ही 75 पार जाऊ
ठाण्यातले विरोधक म्हणून आम्ही नक्कीच 75 पार जागा करू
ऑन भाजप शिंदे शिवसेना
मला बघायचे यांच्यात हिंमत किती आहे एकट एकट लढायचे... यांना आपल्या जागा वाढून घ्यायचे आहेत यासाठी ते स्वबळाचा नारा देतात
फक्त हवा मारताय यांच्यात हिंमत नाही स्वबळावर लढायची
हे जर वेगवेगळे लढले तर तुम्ही जे बोलाल ते मी करायला तयार आहे
यांनी वेगवेगळ्या लढून दाखवावं मी चॅलेंज देतो हे फक्त जागा वाढवण्यासाठी करत आहेत
शिंदे यांची शिवसेना आणि भाजपने ठाणे महापालिकेत वेगवेगळ्या लढून दाखवावं माझं चॅलेंज आहे - अविनाश जाधव
आम्ही जर विरोधक म्हणून एकत्र आलो तर नक्की संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे 75 पार जाऊ- अविनाश जाधव
मनसे आणि शिवसैनिक एकत्र येऊन काम करत आहेत आणि आम्ही मोठ्या सुद्धा काढला आणि त्या मोर्चातल्या मागण्या सुद्धा पूर्ण झाल्या
आमचा डीएनए एक आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये मनोमिललन झाला आहे
युती करायची आघाडी करायची याचा निर्णय किंवा आदेश राज ठाकरे देतील
महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराची राजधानी ठाणे आहे आणि बदलायचं असेल यासाठी आम्हाला सगळ्याला विरोधकांना एकत्र यावच लागेल
विधानसभेची मत आम्हाला लोकसभेची पडलेली मतं जर एकत्र तुम्ही बघितली तर नक्कीच आमची ताकद जास्त आहे आणि संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे नक्कीच आम्ही 75 पार जाऊ
ठाण्यातले विरोधक म्हणून आम्ही नक्कीच 75 पार जागा करू
ऑन भाजप शिंदे शिवसेना
मला बघायचे यांच्यात हिंमत किती आहे एकट एकट लढायचे... यांना आपल्या जागा वाढून घ्यायचे आहेत यासाठी ते स्वबळाचा नारा देतात
फक्त हवा मारताय यांच्यात हिंमत नाही स्वबळावर लढायची
हे जर वेगवेगळे लढले तर तुम्ही जे बोलाल ते मी करायला तयार आहे
यांनी वेगवेगळ्या लढून दाखवावं मी चॅलेंज देतो हे फक्त जागा वाढवण्यासाठी करत आहेत
अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला...
यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला अपघात...
चांदशैली घाटात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती.
10 पेक्षा अधिक भाविक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती...
मुर्तांचा आकडा वाढण्याची शक्यता...
मदत कार्य सुरू जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याची कार्यवाही सुरू
पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल
छगन भुजबळ यांनी महादेव मुंडे प्रकरणात लक्ष द्यायला पाहिजे होते कारण ते देखील ओबीसी आहेत.ओबीसींचा महाएल्गार मेळावा घेता मग मुंडे प्रकरणात काय लक्ष घालत नाहीत असा थेट सवाल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना विचारला आहे.महादेव मुंडे यांचा अत्याचारी खून होऊन देखील या प्रकरणात आरोपी अद्याप निष्पन्न नसताना भुजबळ साहेब या प्रकरणात का लक्ष घालत नाहीत. वांगदरी येथे ओबीसी समाजाच्या युवकाने आत्महत्या केल्यानंतर भुजबळ साहेब भेटीसाठी आले मात्र त्यांना महादेव मुंडे कुटुंबीयांचे अश्रू दिसले नाहीत. ओबीसी म्हणून नाहीतर माणुसकीच्या नात्याने देखील ओबीसी नेत्यांनी मुंडे प्रकरणात लक्ष घातले नसल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या आहेत.
नांदेडच्या अर्धापुर तालुक्यातील चेनापूर तांडा इथे पाण्यातून 70 ते 80 जणांना विषबाधा झाली, त्यानंतर आता आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले असून संपूर्ण गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येतेय. विहिरीचे पाणी प्यायल्याने ही विषबाधा झाल्याचा अंदाज असल्याने पाण्याचे स्त्रोत देखील तपासण्यात येत आहेत. विषबाधा ग्रस्त सर्व नागरिकांची प्रकृती आता स्थिर असल्याने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
निलेश गायवळ चा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती
जामीन रद्द करण्यासाठी, पुणे पोलिसांची न्यायालयात याचिका
पुणे पोलिसांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
गायवळ याने जामिनात असलेल्या अटी शर्तीचे पालन न केल्यामुळे जामीन रद्द करावा अशी पोलिसांची मागणी
गायवळ याने पोलिस ठाण्यात हजेरी चुकवल्यामुळे तसेच पासपोर्ट जमा न केल्यामुळे त्याचा जामीन रद्द करावा असे पोलिसांनी याचिकेत म्हटलं आहे
लोकनाट्य कला केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
धाराशिव — उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील लोकनाट्य कला केंद्रांवर प्रशासनाचा कारवाईचा धडाका
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कालिका आणि गौरी लोकनाट्य कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत.
आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील चार लोकनाट्य कला केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून तुळजाई, पिंजरा, साई, आणि कालिका या केंद्रांचे परवाने रद्द झाले आहेत.
सोलापूर-धुळे महामार्गालगत असलेल्या या केंद्रांनी प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
वाढती गुन्हेगारी आणि नियमभंगाविरोधात प्रशासनाचा कडक संदेश — धाराशिव जिल्ह्यात सुरू आहे कारवाईचा सिलसिला.
लोकनाट्य कला केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
धाराशिव — उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील लोकनाट्य कला केंद्रांवर प्रशासनाचा कारवाईचा धडाका
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कालिका आणि गौरी लोकनाट्य कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत.
आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील चार लोकनाट्य कला केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून तुळजाई, पिंजरा, साई, आणि कालिका या केंद्रांचे परवाने रद्द झाले आहेत.
सोलापूर-धुळे महामार्गालगत असलेल्या या केंद्रांनी प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
वाढती गुन्हेगारी आणि नियमभंगाविरोधात प्रशासनाचा कडक संदेश — धाराशिव जिल्ह्यात सुरू आहे कारवाईचा सिलसिला.
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात अंमली पदार्थांचे सेवन करून रील काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेचे कडे भेदून मातीच्या चिलीम मध्ये कोणतातरी पदार्थ त्याचे सेवन करण्याचा व्हिडीओ चित्रित करून व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
मागील वर्षीचा व्हिडीओ असल्याचे ही पोलीस तपासात निष्पन्न
5 ते 6 कैद्यां विरोधात गुन्हा दाखल
मात्र मागील वर्षभरात कारागृह प्रशासना कडून काहीच कारवाई का करण्यात आली नाही याबाबत प्रश्न उपस्थित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नोंदणी स्थळी गोंधळ प्रकरणी गुन्हा दाखल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य नोंदणी अभियानाला विरोध करून बॅनर काढण्यासाठी दिली होती धमकी
महाविद्यालयाच्या गेटवर बराच वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नोंदणी अभियान आणि बॅनर हटवण्याच्या मागणीवरून झाला होता गोंधळ
गोंधळ आणि धमकी प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाहूळ सह अनोळखीवर गुन्हा दाखल
सामाजिक सलोखा बिघडवणारे कृत्य केल्याचा ठेवण्यात आला ठपका
- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटलांना खुलं आव्हान
जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा
जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो
मी अनगर गावात गेल्यावर माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला पण 'अपने गली मे कुत्ता भी शेर होता है'
मोहोळचे माजी आमदार राजन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चानंतर जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे ओपन चॅलेंज
राजन पाटील हे अजित पवार गटाचे माजी आमदार तसेच राज्यमंत्री दर्जा असलेले सहकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
माझं राजन पाटलांना आव्हान आहे की माझ्याविरोधात लढा.
माझा बाप कुठला आमदार, खासदार, मंत्री नाही किंवा माझ्याकडे कारखाना, भरपूर पैसा नाही पण आमच्यात हिंमत आहे
पर्मनंट आमदार म्हणून तुम्ही म्हणवता मग हिम्मत असेल तर माझ्याविरोधात लढून दाखव
जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो
मोहोळ तालुक्याला स्वातंत्र्य देण्यासाठी, दहशतमुक्त करण्यासाठी आम्ही लढत होतो. आम्हाला शहीद होण्याची भीती नाही
पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून विवाह संकेतस्थळावरील महिलाची फसवणूक करणार्यास अटक
वैभव नरकर असे या आरोपीचे असून तो मूळचा रत्नागिरीचा आहे
नरकर हा स्वत:ला पोलिस उपनिरीक्षक म्हणून भासवत एका विवाह संकेतस्थळावरून महिलांना फसवले, एका महिलेसोबत बलात्कार केला आणि अनेकांकडून आर्थिक फसवणूक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, नरकर याने सोशल मिडियावर आणि विवाह संकेतस्थळांवर स्वतःचे पोलीस गणवेषातील फोटो वापरून बनावट प्रोफाईल तयार केली.
चेंबूर येथील ३३ वर्षीय महिलेला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि कोर्ट मॅरेजच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिच्याकडून एक स्कूटर, ₹२.५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह ₹३०,००० रोख उकळले.
नरकरने याआधी सोलापूरच्या एका महिलेलाही अशाच प्रकारे फसवले होते. “Jeevansathi.com” वरून त्या महिलेशी ओळख करून घेतली आणि लग्नासाठी घरी येण्याचे सांगितले. काही दिवसांनी त्याने आपल्या नातलगाचा अपघात झाल्याचे सांगून ₹६३,००० मागितले. पैसे घेतल्यानंतर संबंधित महिलेला तो आधीच विवाहित असल्याचे समजले.
तर नरकरने स्वत:ला मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्याचा सहायक असल्याचे भासवून १०० हून अधिक बेरोजगार युवकांना पोलिस किंवा सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले.
काहींना तर पोलिस गणवेष शिवून घेण्यास सांगितले. अनेक पीडितांनी लाज आणि सामाजिक अपमानाच्या भीतीने तक्रार दाखल केलेली नाही.
नरकर याला रत्नागिरी पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून अटक केली होती. जामिनावर सुटल्यावर त्याने पुन्हा फसवणूक सुरू केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो ‘सराईत फसवणूक करणारा’ असून, भावनिक आणि सामाजिक विश्वास संपादन करून लोकांची आर्थिक, मानसिक आणि लैंगिक पातळीवर फसवणूक करतो.
सोलापुरात मध्यरात्री घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य चोरट्यांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे. मेरबानसिंग दुधानी (वय 34, रा. कर्नाटक) आणि हरेश रामत्री (वय 32, रा. बदलापूर, ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. आठ दिवसांपूर्वी अवंती नगर भागात दोन घरांचे दरवाजे तोडून चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना कर्नाटकातून अटक केली. अटक आरोपींपैकी मेरबानसिंग हा यापूर्वी सात वर्ष तुरुंगात होता आणि तीन महिन्यांपूर्वीच सुटला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून एक अल्टो कार, दोन दुचाकी, सोन्याची अंगठी आणि चोरीसाठी वापरलेली हत्यारे असा एकूण 1 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार वैष्णव यांनी मंत्री नितेश राणे यांची लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे. त्यानुसार ओरोस आणि कणकवली रेल्वे स्थानकांवर चार लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग स्थानकावर एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस आणि एर्नाकुलम – अजमेर मरुसागर एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. तर कणकवली स्थानकावर, हिसार – कोयंबतूर एक्सप्रेस आणि गांधीधाम – नागरकोइल एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला आहे
नागपुरात स्कूल बसच्या धडकेत चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात काल ही घटना घडली.. पार्थ कांडलकर असे मृत मुलाचे नावे आहे.. पार्थ ची मोठी बहीण शाळेत जात असताना तिची स्कूल बस आल्यामुळे ती आईसह घराबाहेर पडली.. पाठीमागून कुटुंबीयांना न कळतच चार वर्षांचा पार्थ ही घराबाहेर पडला.. घराजवळच स्कूल बसची धडक पार्थला बसली...जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
नागपूर महापालिकेतील वार्ड क्रमांक 23 आणि वार्ड क्रमांक 26 च्या रचनेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दोन्ही वॉर्डांच्या रचने विरोधात खंडपीठात याचिका दाखल केली आहे.. यासंदर्भात न्यायालयाने नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह राज्य निवडणूक आयुक्त व नागपूर महापालिका आयुक्त यांना नोटीस बजावत 13 नोव्हेंबर पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
यंदा परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुराने शेतीपीक पार उध्वस्त झालेले आहेत त्यात जे काही हाथी लागतय ते पाडून घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत..मात्र अद्याप शासनाकडून हमी भावाने सोयाबीन खरेदी सुरू झाली नाही ज्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून सोयाबीनला अत्यंत कमी भाव दिला जातोय ज्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांने भर दिवाळीत काढलेले सोयाबीन पेटवून दिले आहे.परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील जवळा रुमना गावातील शेतकरी नाथराव कदम यांनी ५ एकर काढलेले सोयाबीन पेटवून देत सरकारचा निषेध केलाय..नुकसानीमुळे सोयाबीन काढणीचा खर्च ही परवडत नाहित त्यात भाव नाही आणि सरकारने घोषित केलेली मदत ही मिळाली नाही त्यामुळे आम्ही अजून कर्ज करू म्हणत या शेतकऱ्यांना चक्क सोयाबीन पेटवून दिले आहे आणि सरकारचा निषेध केला आहे.
अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत म्हणून 23 जिल्ह्यातील 33 लक्ष 65 हजार 544 शेतकऱ्यांना 3 हजार 258 कोटी रुपये वितरित करण्या बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री श्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. मागील 2 दिवसात शेतकऱ्यांसाठी निर्गमित केलेल्या शासन निर्णयांमधून 5364 कोटी निधी वितरित करण्याबाबत निर्णय घेतला असल्याचे मंत्री श्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले आहे.
घायवळ बंधूंचा अजुन एक कारनामा समोर
तब्बल ४५ लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी नीलेश घायवळ, सचिन घायवळ आणि त्यांच्या टोळीतील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल
खंडणी, कटकारस्थान आणि बनावट दस्तऐवज तयार करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल
अॅडजंक्ट कंपनीकडून ही खंडणी केली होती वसूल
दोघांनी आपल्या नातेवाईकाच्या नावाने बनावट दुग्धव्यवसाय कंपनीची नोंदणी करून त्या खात्यातून खंडणीची रक्कम स्वीकारल्याच समोर
ही कंपनी प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट
सदर टोळीने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमक्या आणि दबाव टाकून रक्कम देण्यास भाग पाडल्याचेही समोर आले आहे.
भंडारा शहरात भटक्या कुत्र्यांची मोठी संख्या आहे. अशातीलचं एका पिसाळलेल्या कुत्र्यांनं भंडारा शहरातील चांदणी चौक, राम मंदिर परिसर आणि आंबेडकर वार्डातील 9 बालकांसह 20 जणांना चावा घेतल्यानं भंडारा शहरात कुत्र्यांच्या दहशतीचं वातावरण पसरलं आहे. जखमींमध्ये तरुण-तरुणीसह वृद्धांचाही समावेश असून त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध वार्डात उपचार करण्यात येत आहे. नगरपालिका प्रशासनानं भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा, अशी मागणी भंडारा शहरवासीयांनी केली आहे.
- नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापुर तांडा येथे 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा
- गावकऱ्यांनी विहिरीतील पाणी पिल्याने विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती
- काल सकाळपासूनच गावातील काही लोकांना जाणवत होता जुलाब आणि उलट्यांचा त्रास
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांच्यासह आरोग्य पथकाच्या वतीने रुग्णांवर उपचार सुरू
- गावातील विषबाधा झालेल्या सर्व सगळ्या लोकांची प्रकृती स्थिर
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांची माहिती
- आज दिवसभर आरोग्य विभागाच्या पथकाच्या वतीने केले जाणार सर्वेक्षण
- पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले जाणार प्रयोगशाळेत.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेची नोव्हेंबर मधील नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येते.भाविकांनी अधिकृत संकेतस्थळावरून आपली नोंदणी करावी, असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,कर्नाटक,तेलंगणा आणि इतर राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक कुलाचार व कुलधर्मासाठी तुळजापूरला येतात.श्री तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी पूजा असून,तिच्या नोंदणीसाठी मंदीर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी अस आवाहन करण्यात आले आहे. २० ऑक्टोबर २०२५ सकाळी १० वाजता ते २५ ऑक्टोबर सकाळी १० वाजेपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे.सर्व भाविक भक्त,महंत,पुजारी,सेवेकरी आणि नागरिकांनी सिंहासन पूजेच्या नोंदणीची माहिती लक्षात घेऊन वेळेत नोंदणी करावी,असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने केले आहे.
आज पहाटे दोनच्या सुमारास महाड शहरातील जुना पोस्ट परिसरात असलेल्या भदेसर साडी सेंटरला अचानक आग लागल्याची घटना घडली. नगरपरिषदेच्या अग्निशमन बंब व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धावले. ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. मात्र, दिवाळीमध्ये करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने अथवा शॉर्ट सर्किटमुळे ही लागली असावी, अशी शक्यता परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनने पन्हाळगडावर दीपोत्सवाच्या तेजोमय प्रकाशात ‘एक सांज पन्हाळगडावर’ उपक्रम अत्यंत उत्साहात व ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला.या दीपोत्सवाचा शुभारंभ युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते शिव मंदिराचे पूजन करून व पहिला दिवा शिवरायांच्या चरणी अर्पण करून करण्यात आला.शिवमंदिर व महाराणी ताराराणी साहेबांचा राजवाडा परिसरात हजारो दिव्यांच्या साक्षीने ऐतिहासिक वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमादरम्यान वीरभद्र मर्दानी आखाडा, कोल्हापूर यांनी शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. तलवारींचा झंकार, ढोल-ताशांच्या गजरात शिवभक्त मंत्रमुग्ध झाले.यानंतर सज्जा कोटी परिसरात सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन हजारो दिव्यांनी गड प्रकाशमय केला. त्या तेजोमय प्रकाशात इतिहास अभ्यासक व संशोधक मा. श्री. इंद्रजित सावंत यांनी “महाराणी ताराबाई साहेबांचा दिल्लीपती औरंगजेबाशी लढा” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान सादर केले. अत्युच्च उत्साहात आणि शिवमय वातावरणात “दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी” लावून हा दीपोत्सव संपन्न झाला. हा उपक्रम यंदा १३व्या वर्षी कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनच्या वतीने यशस्वीरित्या पार पडला.
सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील कारने घेतला अचानक पेट
आगीचे कारण अस्पष्ट, तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्यानी घटनास्थळी हजर होऊन आग विझवली
कारमध्ये आग लागल्यानंतर कोणी नसल्याने जीवितहानी टळली ; मात्र कारचे झाले आर्थिक नुकसान
बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीला 31 हजार रुपये बोनस जाहीर. बेस्ट कर्मचाऱ्यांना सुद्धा मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बोनस दिलं जावं ही मागणी करण्यात येते आणि त्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना सुद्धा दिवाळीला 31 हजार रुपये बोनस हे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
भरधाव आलेल्या ट्रेलरने ट्रॅक्टरला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनं महामार्गावर उलटल्यानं झालेल्या अपघातात दोन व्यक्ती गंभीर जखमी झालेत. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा उड्डाण पुलावर मध्यरात्री घडली. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ प्रभावित झाली होती. दीपक उके (34) आणि अंकुश ढेंगे (32) असं गंभीर जखमीचं नावं आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेंनं दोघांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून कारधा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दिवाळीचा सण फटाके आणि आकाश कंदील शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. हिंगोलीच्या बाजारपेठे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आकाश कंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. रंगीबेरंगी लहान मोठ्या आकाराचे वेगवेगळ्या नक्षीचे आकाश कंदील हिंगोलीच्या बाजार विक्रीसाठी दाखल झाले आहेत आणि हेच आकाशकंदील खरेदी करण्यासाठी आता हिंगोली कर गर्दी करू लागले आहेत. आकाश कंदीलाचे भाव गत वर्षीच्या तुलनेत स्थिर असून एक मराठा लाख मराठा च्या आकाश कंदीलाची विशेष मागणी पाहायला मिळत आहेत दिवाळी हा सण दिव्यांचा उजेडाचा सण असतो त्यामुळे आकाश कंदीलाच या सणामध्ये खूप मोठे महत्त्व असतं दरम्यान या रंगीबिरंगी आकाश कंदीलाने हिंगोलीची बाजारपेठ उजळून निघाली आहे
- राज्य शासनाच्या पॅनल बोर्डावरील संस्थेद्वारे जाहिरात दिली होती.
- काही तक्रारी आल्यामुळे भरतीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.
- भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे.
- ही भरती आता शासनाच्या दोन नामांकित संस्था IBS (आयबीएस) आणि TATA (टाटा) यांच्यामार्फत पारदर्शकपणे केली जाणार आहे.
- बँकेला शासनाकडून निधी मिळाल्यामुळे आरक्षणानुसार जागा भरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दीपावलीच्या निमित्ताने पणती, सजावटीचे सामान विकण्यासाठी रस्त्यावर व्यवसाय करतात. अशा फेरीवाल्यांना प्रशासनाच्या कठोर कारवाईचा सामना करावा लागतो. याविषयी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांनी सुनावणी घेऊन महाराष्ट्रासह ३८ मुख्य सचिवांना नोटीस जारी केली आहे
कल्याणमधील धक्कादायक घटना. शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला. कार्यालयासमोर भांडण सोडवुन जखमी इसमाला रुग्णालयात नेत असताना अज्ञात इसमांकडून हल्ला. हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट ,ओंकार सपाट दोघे जखमी. कल्याण महात्मा फुले पोलिसांचा तपास सुरु
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog: कल्याणमध्ये शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर हल्ला