Maharashtra Live blog: 300 कोटी घेऊन शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळून गेली? पुणे पोलिसांकडून शोधाशोध सुरु
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog: ६९ वर्षीय निवृत्त टाटा हॉस्पिटल कर्मचारी आणि बीडीडी चाळ येथील रहिवासी असलेले वृद्ध “डिजिटल अरेस्ट” घोटाळ्याचे बळी ठरले असून त्यांनी सायबर गुन्हेगारांवर विश्वास ठेवून तब्बल ७५.५ लाख...More
धनंजय मुंडे यांचं आव्हान मनोज जरांगे यांनी स्वीकारलं,
मनोज जरांगे यांची नार्कोटेस्ट करावी या मागणीसाठी जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी जरांगेंचं शिष्टमंडळ दाखल...
अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्यासह मनोज जरांगे यांचे सहकारी जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी दाखल झाले आहेत...
काल धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माझी आणि मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. यानंतर मनोज जारंगे यांनी धनंजय मुंडे यांच आव्हान स्वीकारत आपण नार्को टेस्ट साठी तयार असल्याच म्हटलं होतं. आज याच मागणीसाठी मनोज जरांगे यांचे सहकारी जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.
मनोज जरांगे यांनी आपण नार्को टेस्ट साठी तयार असल्याचे सांगत, आजच सर्वांची नार्को टेस्ट करावी , अशा स्वरूपाची मागणी या निवेदनात केल्याचं त्यांचे सहकारी पांडुरंग तारक यांनी म्हंटलय..
बाईट -- पांडुरंग तारख, मनोज जरांगे यांचे सहकारी..
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित केल्यानंतर राजकीय पक्षांतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावती जिल्हा काँग्रेसतर्फे आज आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या या मुलाखतींमध्ये जिल्ह्यातील शेकडो इच्छुकांनी उपस्थिती लावली. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नगरपरिषदा आणि नगरपालिकांमध्ये निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांची नावे निश्चित करून महाराष्ट्र प्रदेश समितीकडे पाठवण्यात येतील अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी यावेळी दिली.
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापलं आहे. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवारीसाठी दोन्ही राज्यांकडे जात आहेत पण अजूनही प्रमुख दोन आघाड्यांकडून उमेदवारांची घोषणा न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडी आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडी या दोन्ही गटांनी उमेदवारांचे पत्ते अजून उघडलेले नाहीत. आजी माजी नगरसेवक, आणि नवीन उमेदवार गोंधळलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. दोन दिवसावर अर्ज भरण्याची तारीख आली आहे मात्र उदयनराजे आणि शिवेंद्रराजे मनोमिलनाबाबत बोलत नसल्याने सर्वजण या दोघांच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत..
- राज्य अल्पसंख्यांक आयोग कॅबीनेट मंत्री नितेश राणे यांना नोटीस पाठवण्याच्या तयारीत
- “नितेश राणे वारंवार द्वेष पसरवण्याची भाषा करतात, त्यामुळे त्यांना नोटीस पाठवून विचारणा केली जाणार”
- “नितेश राणे यांना नोटीस पाठवून खुलासा मागणार”….
- राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं वक्तव्य
- मुख्यमंत्री, मोहन भागवत, गडकरी मोठे सनातनी त्यांनी कधीही अशे वक्तव्य केली नाही
- कुंभ मेळाव्यात मुस्लिमांना दुकान न देण्याचं नितेश राणे यांचं वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता
- नितेश राणे यांचं वक्तव्य व्यक्तिगत, भाजपचा त्याच्याशी काही संबंध नाही असे प्यारेखान म्हणाले.
अत्यंत जवळचा सहकारी जितेंद्र चव्हाण यांनी उदय सामंत यांची घेतलेली भेट आमदार भास्कर जाधव यांच्या जिव्हारी....
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत भास्कर जाधव यांच्याकडून जितेंद्र चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी.
एन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव यांना आणखी एक धक्का.
जितेंद्र चव्हाण उद्धव गटाचे चिपळूण चे उपतालुका प्रमुख.
रामपूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज जितेंद्र चव्हाण यांनी उदय सामंत यांची भेट घेतल्याची होती चर्चा.
अकोल्यामध्ये आज शरद पवार यांच्या शेतकरी संवाद मेळाव्यात शेतकऱ्यांनी फिरवली पाठ.... किसान ब्रिगेडने आयोजित केला आहे हा शेतकरी सवांद कार्यक्रम... वेध शेती समस्यांचा या विषयावर हा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.... शरद पवार यांचे व्यासपीठावर आगमन होऊन 30 मिनिट झाले आहे....मात्र, या शेतकरी संवाद मेळाव्यात मोजकेच शेतकरी असून सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्तेच जास्त दिसून येत आहे....
दरम्यान, शरद पवार अकोल्यातल्या कान्हेरी येथे थोड्या वेळातच शेतकऱ्यांशी सवांद साधणार आहे.. आता थोड्याळातचं शरद पवार अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.. मात्र, या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या फार कमी आहे.. बोटावर मोजण्यासारखी आहे.. शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या कान्हेरी येथील फार्म हाऊसवर शरद पवार शेतकऱ्यांशी हा सवांद कार्यक्रम आहे.. या ठिकाणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील उपस्थित आहे. त्यानंतर शरद पवारांची यांची पत्रकार परिषद होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बहुजन विकास आघाडीला भाजपचा धक्का
बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका भाजपच्या गळाला
बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका शकुंतला शेळके आज भाजपात प्रवेश करणार
भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविकांसोबत काही महत्त्वाचे पदाधिकारी प्रवेश करणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने ‘ऑल आऊट ऑपरेशन’ ही विशेष मोहीम राबवली. ही मोहीम सायंकाळी ७ ते रात्री ११ या चार तासांत संपूर्ण जिल्हाभर चालली. पोलिसांनी तब्बल २,४५८ वाहनांची तपासणी केली आणि विविध कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली. मोहीमे दरम्यान दारूबंदी कायद्यान्वये २०, जुगार कायद्यान्वये ३४, अंमली पदार्थ कायद्यान्वये २२, आणि शस्त्र कायद्यान्वये १ असा एकूण ७७ गुन्हे नोंदवण्यात आले. तसेच, ८२ तडीपार आरोपींची चौकशी, १३५ हॉटेल्स आणि लॉजेसची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ६७१ वाहनचालकांवर कारवाई करत पोलिसांनी तब्बल ५ लाख १० हजार ३५० रुपयांचा दंड वसूल केला.
नाशिक: बांगलादेशात कांद्याच्या दरांनी शंभरी पार केली असून होलसेल बाजारात कांदा तब्बल १०० रुपये किलोला विकला जात आहे..तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी १३ ते १७ रुपये प्रति किलो दर मिळत आहे..भारतातून कांद्याची आयात बंद असल्यामुळे बांगलादेशात दर वाढत आहेत.या पार्श्वभूमीवर लासलगाव बाजार समितीचे व्यापारी संचालक आणि कांदा निर्यातदार प्रवीण कदम यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की, बांगलादेश सरकारशी समन्वय साधून आयात बंदी तातडीने हटवावी..आयात खुली झाल्यास भारतीय शेतकऱ्यांना कांद्याला किमान दोन रुपये अधिक दर मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौऱ्याचा चौथा दिवस
शनिवार, ८ रोजी सकाळी १० वाजता परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील ताडबोरगाव
सकाळी ११.३० वाजता सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव
दुपारी २ वाजता जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पाटोदा आणि याच ठिकाणी 2:30 वाजता उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी संवाद साधणार आहे
सायंकाळी ४ वाजता घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगर-जालना लोकसभा पदाधिकाऱ्यांचा मेळावा
त्यानंतर सायंकाळी ७ वाजता मुंबईकडे प्रयाण करतील
सिंधुदुर्ग : तळकोकणात रात्री अनेक ठिकाणी हलक्या पावसाचा सरी कोसळल्या. त्यात आधीच लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ५२५ गावांमध्ये भातशेतीचे ४ हजार ३३८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १७ हजार १७२ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती कृषि विभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी पंचनामे केले आहेत तर काही ठिकाणी अजूनही पंचनामे सुरू आहेत. जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरुच असून या पावसामुळे भातपिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे,
आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून अजित पवारांना दणका देण्यासाठी पार्थ पवारांचे जमीन प्रकरण बाहेर काढले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही खेळी खेळली. असा कयास माध्यमांनी बांधलाय. प्रत्यक्षात असं अजिबात नसल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. रुटीनमध्ये हे प्रकरण समोर आलंय. महापालिका निवडणुकांशी या प्रकरणाचा अजिबात संबंध नाही.
नाशिक : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या काम काजावरून महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांचे परस्पर विरोधी दावे बघायला मिळत आहेत, महामंडळाचे पोर्टल एक महिन्यापासून बंद असल्याने तरुण बेरोजगार लाभार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा दावा अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे, तर अपग्रेडेशनचे काम हाती घेण्यात आले असून सर्व योजनांची कार्यवाही सुरळीतपणे सुरू असल्याचा प्रतिदावा एम डी विजयसिंह देशमुख यांच्याकडून करण्यात आलाय. लाभार्थ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी अपग्रेडेशनचे काम सुरू असल्याचे एम डी यांचे म्हणणे आहे तर कोणत्याही वेबसाईट किंवा पोर्टल अपडेट करण्यासाठी 1 महिणाचा कालावधी का असा सवाल नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केलाय.
नवी मुंबई- पनवेलमध्ये भाजपची आज रायगड जिल्हा कार्यकारीणीची बैठक.. रायगडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीत मतभेद असताना भाजपच्या भूमिकेकडे दोन्ही पक्षांचे असेल लक्ष असेल.. बैठकीत रायगड जिल्ह्यात एकट्याने की स्वबळावर लढायचे? यावर निर्णय होण्याची शक्यता.. संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलार प्रमुख नेत्यांसोबत संवाद साधणार आहेत. रायगड जिल्ह्यातील आमदार, खासदार व प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होईल
नागपुरात 24 नोव्हेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोस्टमास्टर शोभा मधाळे आणि प्रभारी पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी दिवशी या दोघी उपस्थित झाल्या.. या दोघी एकाच मंचावर उपस्थित झाल्यात. यावेळी दोन महिला अधिकाऱ्यांचा वाद उफाळून आला.. या दोघीमध्ये मंचावर शाब्दिक खडके उडालेत... कोपऱ्याने धक्का देत शेजारी बसण्याचा इशारा.. हाताला चिमटा काढला... यामध्ये मधाळे यांच्या वर्तुणुकीचा व्हिडिओ viral झाला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचला.... पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांची बदली धारवाड येथे झाली .. त्यामुळे नवी मुंबईच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी यांच्याकडे नागपूर पोस्ट मास्टर जनरल कार्यालयाचा प्रभाव सोपविण्यात आला आहे.. मात्र मधाळे यांनी कॅट मधून बदली विरुद्ध स्थगिती आणलेली असली तरी जोशी यांना मुक्त केलेले नाही तसेच रोजगार मेळाव्याच्या नोडल अधिकारी म्हणून कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी जोशी यांच्याकडेच होती.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदा घाटावर वस्त्रांतर गृह पडण्याचे काम सुरू होते. मात्र काम सुरू असतानाच प्राचीन दत्त मंदिराचा कळस तुटल्याने इतर मंदिरा ही धक्का बसण्याचा धोका लक्षात घेऊन पुरोहित संघाने जवळपास एक महिन्यापासून काम बंद पाडले होते, त्यामुळे अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिराला गर्डर, आणि वाळूच्या गोण्यांनी संरक्षण दिले जात आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदा घाटावर वस्त्रांतर गृह पडण्याचे काम सुरू होते. मात्र काम सुरू असतानाच प्राचीन दत्त मंदिराचा कळस तुटल्याने इतर मंदिरा ही धक्का बसण्याचा धोका लक्षात घेऊन पुरोहित संघाने जवळपास एक महिन्यापासून काम बंद पाडले होते, त्यामुळे अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिराला गर्डर, आणि वाळूच्या गोण्यांनी संरक्षण दिले जात आहे.
सीएसएमटी स्थानकात आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारी अडचणीत येणार.
आंदोलन सुरू असताना आंदोलन रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोटरमनला केल होत लॉबीमध्ये बंद.
लॉबीला बाहेरून बॅरिगेटिंग केल्याचेही समोर.
या आंदोलनाशी सबंध नसणाऱ्या आणि लोकल चालवणाऱ्या मोटरमन कर्मचाऱ्यांना बंद केल्यानेच लोकल खोळंबल्या.
लोकल खोळंबल्याने झालेल्या गर्दीनंतर सैंडहर्ट्स स्थानकात झालेल्या अपघातात दोन मुंबईकरांचा मृत्यू.
आंदोलनाच्या परवानगीपासून आंदोलन रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीची चौकशी होणार.
राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रत्यक्षित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीला आता सुरुवात झाली आहे. धुळे जिल्ह्यात देखील राजकीय पक्षांकडून तयारीला आता वेग देण्यात आला असून उमेदवार निवड आणि निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत धुळे जिल्ह्यात महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे महायुतीचे लक्ष लागून आहे त्यासोबतच महाविकास आघाडीने देखील महायुतीला पराभूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कंबर कसली आहे एकीकडे महाविकास आघाडीचा या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय झाला असून स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन महाविकास आघाडी या निवडणुकीला सामोरे जाणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले.
भंडारा शहरातून मध्यप्रदेशकडं जाणाऱ्या मुख्य महामार्गावर भंडारा ते तुमसर दरम्यान मोठमोठे जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांना अक्षरश: जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. भंडारा ते तुमसर महामार्गावर वरठी इथं भंडारा शहराचं रेल्वे स्थानक आहे आणि सोबतच सनफ्लॅग ही स्टील उत्पादक कंपनी आहे. त्यामुळं रेल्वे स्थानकावर जाणारे प्रवाशी आणि सनफ्लॅग कंपनीत जाणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात असल्यानं या महामार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. जीवघेणे खड्डे पडल्यानं या महामार्गावरून जात असताना वाहनधारकांना रस्ता अक्षरश: शोधावा लागतोय. या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांचे अनेक अपघात घडलेत, अनेकांना अपंगत्व आलं तर कित्येकांचा जीवही गेलाय. ज्याप्रमाणे खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली तशीच परिस्थिती या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांच्या शरीराचीही झाल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या महामार्गाची तातडीनं दुरुस्ती करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
दिशा स्पष्ट, निर्धार ठाम!, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोबतचा फोटोसह राणाजगजितसिंह पाटील यांची फेसबुक पोस्ट
पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात दिलजमाई?
जिल्हा नियोजन समितीचा निधी आणि रस्ते विकास निधीवरून सुरू होती धुसफूस
दोन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्त्यांसह मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक, बैठकीनंतरची फेसबुक पोस्ट चर्चेत
आगामी नगर परिषद निवडणूक एकत्र लढण्याचे संकेत
मुंबई महापालिकेच्या उमेदवार निवडीचा भाजपचा पॅटर्न ठरला. गुणवत्तेच्या आधारावर दिली जाणार उमेदवारी. वॉर्डमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला दिले जाणार प्राधान्य. माजी नगरसेवकांच्या कामाचे मोजमाप तयार केले जाणार. नगरसेवक असताना वॉर्डमध्ये पाडलेला प्रभाव आणि पक्षाने दिलेले विविध कार्यक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तीला मिळणार तिकीट. मुंबईच्या 227 वॉर्डमध्ये भाजपने निरीक्षक नेमल्याची माहिती. निरीक्षक पुढील 15 दिवसात प्रत्येक वॉर्डचा रिपोर्ट कार्ड तयार केला जाणार. या रिपोर्ट कार्डवर चांगली कामगिरी असलेल्या उमेदवारालाच मिळणार उमेदवारी. तरुण चेहऱ्यांकडे भाजपचे विशेष लक्ष
पुण्यातील बोपोडी भागातील जमीनीच्या संदर्भात नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामधे तहसीलदार सुर्यकांत येवले आणि दिग्वीजय पाटील यांच्यासह हेमंत गावंडे या बांधकाम व्यावसायिकांचा देखील समावेश आहे . गावंडे यांच्या व्हीजन प्रॉपर्टीज आणि अमेडीया कंपनीने राज्य सरकारची एग्रीकल्चर डीपार्टमेंटची साडेपाच हेक्टर जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हे तेच हेमंत गावंडे आहेत ज्यांनी एकनाथ खडसेंच्या भोसरी जमीन घोटाळ्यात व्हीसल ब्लोअरची भुमिका बजावली होती . ज्यामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. आता एकनाथ खडसे या हेमंत गावंडेंचा हिशोब चुकता करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या कामावरचा बहिष्कार कंत्रादार संघटनेचा काही दिवसाआधी मागे घेतला होता. मात्र, पाच दिवस लोटून गेले तरी जुने प्रलंबित देयक कंत्राटदारांना मिळाले नसल्याचे कंत्रादार संघटनेने राज्य सरकारला सोमवार पर्यंतची मुदत दिली आहे. सोमवारपर्यंत जुने देयक मिळाले नाही तर परत कामावर बहिष्कार टाकला जाईल असे कंत्राटदार संघटनेने सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांचे मागच्या हिवाळी अधिवेशनाचे 90 कोटी थकीत आहे. जुने थकीत असतांना नव्याने काम कसे करायचे हा प्रश्न कंत्रादार संघटने पुढे आहे.
नगरपंचायत , नगरपरिषद निवडणुकांचे पडघम वाजले आहेत...अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलीये...श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुक तिरंगी होण्याची शक्यता आहे...भाजप विरुद्ध मविआ विरुद्ध राष्ट्रवादी AP , शिवसेना शिंदे गट अशी लढत होण्याची शक्यता सध्या दिसत आहे... भाजपच्या वतीने आज कोअर कमिटी बैठक बोलावण्यात आलीये...श्रीगोंद्याचे भाजपचे विद्यमान आमदार हे भाजपचे विक्रमसिंह पाचपुते आहेत...भाजपमध्ये अनेकजण इच्छुक असल्याने सर्वांना संधी देण्यासाठी भाजपचा स्वतंत्र लढण्याचा मानस असल्याचे भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हंटलंय...सोबतच निवडणूक जरी पालिकेची असली तरी बैठक तालुक्यातील कार्यकर्त्यांची बोलावण्यात आले आहे, युतीबाबत जो काही निर्णय होईल तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही तोच निर्णय राहील असं आमदार पाचपुते यांनी म्हंटलय...दरम्यान सध्या श्रीगोंदा नगरपरिषदेसाठी भाजपकडून 100 अधिक इच्छुक उमेदवार आहेत... उद्याचा नगराध्यक्ष भाजपचाच व्हावा यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे असं पाचपुते म्हणाले
हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर सुरु असलेल्या पैशाच्या उधळपट्टीला घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी. नागपूरच्या रविभवन येथील कोणत्याही मंत्र्यांच्या बंगल्यावर 35 लाखाच्या वर निधी खर्च करायचा नसल्याचे फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना सक्त निर्देश . राज्य सरकार आर्थिक संकटात असतांना रविभवन येथील विधासभा अध्यक्षाच्या बंगल्यावर 1 कोटी 25 लाख, विधपरिषद सभापतींच्या बंगल्यावर 1 कोटी 10 लाख व कृषी मंत्री यांच्या बंगल्यावर 1 कोटी 10 लाखाचा निधी हा इंटेरिअर व डागडुजीवर खर्च करण्यात येत होता.
ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या त बैठकित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. यानंतर विधानसभा अध्यक्ष, विधानसभा सभापती व कृषी मंत्री यांच्या बंगल्यावर जो 1 कोटीच्या वर निधी खर्च करणार होते ते काम आता 35 लाखाच्या आता पूर्ण करावे लागणार आहे. इतर बंगल्यांवर नाममात्र खर्च केला जाणार आहे.
मुंबई महापालिका निवडणूक जस जशी जवळ येत आहे तसे तशी मंत्र्याचे आणि नेत्यांचे संपर्क मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दुबईचे सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि समाज सेवक बशीरभाई हजवानी यांची भेट घेण्याकरिता आज गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी भेट घेतली . एकीकडे ही भेट कौटुंबिक असल्याचे म्हणतानाच पक्षातील कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनी हजेरी लावून महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु असल्याचे दाखवून दिले आहे . राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आल्याने महायुती देखील शड्डू ठोकत मैदानात उतरत आहे यातच एका राज्याचे बजेट असलेल्या मुंबई महानगर पालिकेत कोणत्या पक्षाचा महापौर बसणार अशी उत्सुकता असतानाच अनेक नेते विविध राजकीय विधाने करताना पाहायला मिळत आहे. मात्र, योगेश कदम यांनी सर्व जागा ह्या महायुती लढणार असल्याचे सांगत महायुतीत सर्वकाही आलबेल आहे असे सांगितले आहे .
राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्यांना एकूण 13 कोटी 62लाखांचा निधी मिळाला आहे. यात छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक 3 कोटी 37 लाख, परभणीला 1 कोटी 22 लाख, बीडला 2कोटी 27 लाख, नांदेडला 2 कोटी 32 लाख, धाराशिवला 69लाख, जालन्याला 1 कोटी 30लाख, लातूरला 1 कोटी 27 लाख आणि हिंगोलीला 84 लाख निधी मिळाला आहे.
६९ वर्षीय निवृत्त टाटा हॉस्पिटल कर्मचारी आणि बीडीडी चाळ येथील रहिवासी असलेले वृद्ध “डिजिटल अरेस्ट” घोटाळ्याचे बळी ठरले असून त्यांनी सायबर गुन्हेगारांवर विश्वास ठेवून तब्बल ७५.५ लाख रुपये गमावले आहेत. दिल्ली पोलिस अधिकारी असल्याचे सांगत त्यांची या सायबर चोरट्यांनी फसवणूक केली. सेंट्रल रिजन सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, २२ ऑगस्ट रोजी पीडित व्यक्तीला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने स्वतःला दिल्ली पोलिसांचा अधिकारी म्हणून ओळख करून दिली आणि सांगितले की त्यांच्या बँक ऑफ बडोदा खात्याचा वापर २.८३ कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात झाला आहे. या प्रकरणात त्यांना अटक होणार असल्याचे सांगून “डिजिटल अरेस्ट” अंतर्गत ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यानंतर त्यांना एका पोलिस वर्दीतील व्यक्तीकडून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आला. त्या व्यक्तीने स्वतःचे नाव पोलीस निरीक्षक गोपेश कुमार असे सांगून बनावट कागदपत्रे दाखवली आणि “जामीन रकम” भरण्याची मागणी केली. घाबरलेल्या पीडित व्यक्तीने १८ लाख रुपयांचे म्युच्युअल फंड विकले आणि नंतर आपले बोरीवली येथील घर विकून एकूण ७५.५ लाख रुपये त्या फसवणूक्यांना हस्तांतरित केले. रक्कम परत न मिळाल्याने आणि कॉल्सना प्रतिसाद न मिळाल्याने, त्यांनी अखेर २७ ऑक्टोबर रोजी ही फसवणूक पोलिसांकडे नोंदवली.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog: 300 कोटी घेऊन शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळून गेली? पुणे पोलिसांकडून शोधाशोध सुरु