- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog: 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर, 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog: पोलिस कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या रोहित आर्या (Rohit Arya) प्रकरणात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने चौकशीचे निर्देश दिले आहेत. आयोगाने या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती...More
- निलम गोर्हेंकडून महिलांच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा उल्लेख
- मी दरवर्षी १ पुस्तक लिहिले, महिला धोरण, स्त्री सशक्तीकरण यावर आधारीत
- दारू विरोधात महिलानी आंदोलन केली त्या ३२ हजार महिलांवरील गुन्हे मागे घेण्यात आले शिवशाही सरकारमध्ये
- दाही दिशा म्हणजे दहा दिशांनी येणारी संकटांचा सामना करण्यासाठी शक्ती दे
- महिलाना येणार्या अडचणी यावर मी मुंबई सकाळमध्ये सदर लिहित होते
- तो सर्व कालावधी, लेख यावर आधारीत हे पुस्तक आहे
- टक्केवारी फक्त कामात नसते तर भाषणातही असते. त्यामुळे तुम्ही सविस्त बोला
- सामंतावर मी जबाबदारी सोपवली होती. तुम्ही साहेबांना सोबत आणायचं आणि वेळेत तुम्हीही यायचं
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
राज्याच्या राजकारणात मराठवाड्याचं मोठं योगदान असून मराठवाड्यातील (Marathwada) नेतेमंडळी मराठवाड्याच्या विकासासाठी नेहमी आग्रही असते. त्यामुळेच, मुख्यमंत्री कोणीही असो, मराठवाड्याच्या विकासासाकडे, आमदार, खासदारांकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे (Election) सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असते. लोकसभा निवडणुकीत 8 खासदार आणि विधानसभेला 48 आमदार सभागृहात पाठवणाऱ्या मराठवाड्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. येथे 48 नगरपरिषदा आणि 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांचाही बिगुल वाजणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जय पवार बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त केली जातीये. जय पवारांच्या संभाव्य राजकारण प्रवेशाचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार स्वागत केलंय. जय पवार हे निश्चितच राजकारणातील एका नव्या युगाचा आणि एका नव्या पर्वाचा प्रारंभ असणार असल्याचं मिटकरी म्हणालेत. पवार घराण्यातील दुसऱ्या पिढीतील रोहित पवार आणि यूगेंद्र पवार यांच्या पलीकडचं नेतृत्व जय पवार यांचं असेल, असं आमदार मिटकरी म्हणालेत.
गोव्यातील बांबोळी येथे मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. भरधाव टँकरने कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की भरधाव टँकर डिव्हायडर फोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कारवर आदळला यात कारचे तुकडे - तुकडे झाले आहेत. मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास बांबोळी येथे हा अपघात झाला. पणजीच्या दिशेने जाणारा टँकर अतिशय वेगात होता यावेळी विरुद्ध बाजुला मडगावच्या दिशेने कार जात होती. टँकरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर डिव्हायडर फोडून कारवर जाऊन धडकला. यात कारचा चक्काचूर झाला आहे. यात कार मध्ये असलेल्या वर्ल्ड सेपक टकर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र सिंग दहिया आणि सेपक टकराचे सल्लागार, समर्थक आणि वरिष्ठ खेळाडू अंकित कुमार बालियान यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की डिव्हायडर फोडून आलेला टँकर कारवर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जाऊन पलटी झाला. तर कारचा यात चक्काचूर झाला आहे. कारचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले आहेत.
मतदार यादीविरोधात दाखल करण्यात आलेल्या चारही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या
मतदार यादीच्या ड्राफ्टवर आक्षेप घेण्यास मिळालेला कमी अवधी, ऑनलाइन अर्ज करून देखील यादीत नाव नसणे आणि मतदार यादीतील नाव ट्रान्सफर करण्याची मागणी करणाऱ्या चारही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या
मतदार यादीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी पार पडली
तर आरक्षण आणि सीमांकन संदर्भातील याचिकांवर गुरूवारी होणार सुनावणी
मतदार यादी, सीमांकन आणि आरक्षणाच्या संदर्भात एकूण ४२ याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू
सगळ्या २८ याचिकांवर एकत्रित सुनावणी
मतदार यादी, सीमांकन आणि प्रभाग आरक्षणाच्या मुद्द्यावर याचिका दाखल करण्यात आल्या आहेत
मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू
नागपूर खंडपीठातून तसेच औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या मुंबई उच्च न्यायालयात वर्ग
पुण्यातील सर्व बिबटे गुजरातच्या वनतारा मध्ये पाठवायचे, तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याचा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांच्या बैठकीत झालाय. पण शेतकऱ्यांना या निर्णयावर विश्वास नाही, बाराशे बिबट्यांपैकी किती बिबटे पाठवणार? फक्त शंभर? उर्वरित बिबट्यांचे काय? इथले बिबटे वनतारामध्ये पाठवले, याचा पुरावा कोण देणार? त्यामुळं आम्हाला या आश्वासनावर विश्वास नाही.
Pune : आधी गाड्या नंतर सी सी टिव्ही सुद्धा फोडला! पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच
हातात हत्यार घेऊन सोसायटी मध्ये प्रवेश करत टोळक्याचा धुमाकुळ
तोडफोडीत पार्किंग मध्ये असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान
पुण्यातील धायरी भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
दहशतीसाठी टोळक्याकडून सी सी टिव्ही कॅमेरा पण फोडले
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता घडला. पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या एका सोसायटी मध्ये रात्री १ वाजण्याच्या दरम्यान ३ ते ४ तरुणांनी हातात शस्त्र घेऊन प्रवेश केला. सुरवातीला, पार्किंग मध्ये असलेल्या सी सी टिव्ही फोडण्याच्या यातील एकाने प्रवेश केला. या नंतर ही टोळी थेट सोसायटी चे जिने चढून वरील काही मजल्यांवर गेली. खाली आल्यावर पुन्हा एकदा या टोळक्याने पाहणी केली आणि पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर हातातील शस्त्राने त्याची तोडफोड केली. कारवाईच्या भीतीने आणि दहशत निर्माण व्हावी म्हणून यातील एकाने तर थेट सी सी टिव्ही वर शस्त्र मारले आणि त्याचे सुद्धा नुकसान केले
या तोडफोडीत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांकडून या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे
Pune : आधी गाड्या नंतर सी सी टिव्ही सुद्धा फोडला! पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच
हातात हत्यार घेऊन सोसायटी मध्ये प्रवेश करत टोळक्याचा धुमाकुळ
तोडफोडीत पार्किंग मध्ये असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान
पुण्यातील धायरी भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
दहशतीसाठी टोळक्याकडून सी सी टिव्ही कॅमेरा पण फोडले
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता घडला. पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या एका सोसायटी मध्ये रात्री १ वाजण्याच्या दरम्यान ३ ते ४ तरुणांनी हातात शस्त्र घेऊन प्रवेश केला. सुरवातीला, पार्किंग मध्ये असलेल्या सी सी टिव्ही फोडण्याच्या यातील एकाने प्रवेश केला. या नंतर ही टोळी थेट सोसायटी चे जिने चढून वरील काही मजल्यांवर गेली. खाली आल्यावर पुन्हा एकदा या टोळक्याने पाहणी केली आणि पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर हातातील शस्त्राने त्याची तोडफोड केली. कारवाईच्या भीतीने आणि दहशत निर्माण व्हावी म्हणून यातील एकाने तर थेट सी सी टिव्ही वर शस्त्र मारले आणि त्याचे सुद्धा नुकसान केले
या तोडफोडीत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांकडून या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे
केंद्रातला आणि राज्यातलं भारतीय जनता पार्टीचे सरकार हे शेतकऱ्याचं सरकार आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा 32 हजार कोटींचा पॅकेज महाराष्ट्रासाठी जाहीर केलं. काँग्रेसच्या तुलनेत आतापर्यंतचा भाजपने दिलेलं महाराष्ट्राचं हे सर्वात मोठं पॅकेज आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना भाजपावर बोलण्याचा अधिकार नाही. भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार हे पूरग्रस्त भागांचा दौरा करताना गाडीवर बसून फवारे उडवतात आणि केवळ राजकीय स्टंटबाजी करण्याकरिता असे विधान करतात. मीडियामध्ये येण्यासाठी असं वक्तव्य करणं आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना धमकावून हा चुकीचा प्रकार असल्याची टीका भाजपा नेते भंडारा - गोंदियाचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर केली. खासदार प्रशांत पडोळे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी अन्यथा मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना उडवून टाकू, असा धमकीवजा इशारा दिला होता.
भिवंडी : ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने ग्रामीण भागातील शेतीला मोठा फटका बसला आहे. भात शेतीनंतर आता फुलशेतीलाही या पावसाचा तडाखा बसला असून, विशेषत: झेंडूच्या फुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दसरा - दिवाळीच्या सणानिमित्ताने फुलांचा हंगाम जोमात असतो, पण यंदा अवकाळी पावसाने या हंगामावरच विरजण ओतले आहे. पावसामुळे झेंडूच्या फुलांवर पाणी साचल्याने ती काळपट पडली असून काही फुले कुजून गेली आहेत. तसेच सततच्या दमट वातावरणामुळे झेंडूच्या फुलांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फुलांचा दर्जा पूर्णपणे घसरला असून बाजारात या फुलांना भाव मिळेनासा झाला आहे. व्यापाऱ्यांकडून या फुलांची खरेदी केली जात नाही त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अनेक शेतकरी फुलं विकण्याऐवजी शेतातच टाकून देण्याच्या स्थितीत आले आहेत.
भिवंडी तालुक्यातील गणेश पाटील हे दोन एकरांवर झेंडूची लागवड करतात. भात शेतीसोबत हा त्यांचा जोडधंदा आहे. दरवर्षी या पिकातून त्यांना सुमारे लाख ते दीड लाख रुपयांचा नफा मिळत असे. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले. “फुलं बहरायला हवी होती, पण पाऊस आला आणि काही तासांत सगळं संपलं. आता ना भाव आहे, ना उत्पादन.
रासायनिक पाणी नदी पात्रात सोडून पाणी दूषित केल्या प्रकरणी लोटे MIDC मधील पाच कंपन्यांवर खेड पोलिसात गुन्हा दाखल.
कोतवाली ग्रामपंचायतीचा लोटे MIDC मधील कंपन्यांना दणका.
अनेक महिन्यांपासून सूचना देऊनही नदी पात्रता दूषित पाणी सोडल्यावरून कोतवाली गावातील आक्रमक झालेल्या ग्रामस्थांची थेट पोलिस स्टेशन मध्ये धाव.
नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपन्यांवर संबंधित खाते कडक कारवाई करेल : मंत्री योगेश कदम.
दूषित पाणी सोडल्या प्रकरणी लोटे येथील पुष्कर केमिकल, योजना ऑरगॅनिक कंपनी, श्रेष्ठा ऑरगॅनिक यांच्यासह आणखी दोन कंपन्यांचा समावेश.
पुन्हा दूषित पाणी सोडल्यास तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा.
- नाशिकच्या शरणपूर रोड परिसरात रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना...
- हवेत गोळीबार करत धारदार शस्त्राने घरांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती...
- गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न... गोळीबार का केला पोलिसांकडून तपास सुरू...
- रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून पोलिसांनी एका संशयित आरोपीस घेतले ताब्यात...
- हातात धारदार शस्त्र घेऊन पळत असताना पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात,विकी गुंजाळ अस अटक केलेल्या संशयताचे नाव...
- सरकारवाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करत तपास सुरू...
महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या आवाहनानुसार भिवंडी वकील संघटनेने वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. अलीकडेच शेवगाव येथील वकील रविंद्र सकट यांच्यावर साक्षीदाराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर वकिलांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. भिवंडी वकील संघटनेचे अध्यक्ष किरण चन्ने यांनी सांगितले की, “वकीलांवर सतत हल्ले होत असूनही राज्य शासनाने अद्याप ‘वकील संरक्षण कायदा’ (Advocate Protection Act) लागू केलेला नाही. हा कायदा तातडीने पारित करण्यात यावा.” महाराष्ट्र शासनाने पुढील तीन महिन्यांत वकील संरक्षण कायदा पारित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ३ नोव्हेंबर रोजीचे न्यायालयीन कामकाज बहिष्कार आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र, भिवंडीतील वकीलांनी लाल फित लावून कामकाजात सहभागी होत या हल्ल्यांचा निषेध नोंदवला. वकीलांवरील हल्ल्यांप्रकरणी संबंधित पोलिसांनी तातडीने दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही भिवंडी वकील संघटनेने केली आहे.
फलटणच्या डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्त
नागपूर मध्ये मार्डच्या डॉक्टरांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे ..
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चे 760 आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे 510 डॉक्टर संपावर आहे.
त्यामुळे वैद्यकीय सेवेवर ताण जाणवत आहे.
सरकारला बिबट्या जगवायचा आहे की माणूस जगवायचा आहे? असा खडा सवाल पुण्यातील संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. आजवर 56 लोकांचे जीव गेलेत, त्यामुळं बिबट्या ठार करावा लागेल. कायद्यात बसत नसेल तर कायद्यात बदल करा. सरकार स्वतःसाठी नियम बदलतो, याकडे आक्रमक ग्रामस्थांनी बोट दाखवलं.
जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आधार खरेदी केंद्रावर भंडारा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी त्यांच्या धानाची विक्री केली. मात्र, ज्या भीम ॲप पोर्टलवर शेतकऱ्यांच्या धान खरेदी संदर्भात नोंदणी योग्य पद्धतीनं न झाल्यानं भंडारा जिल्ह्यातील सुमारे 4 हजार 500 तर गोंदिया जिल्ह्यातील 2 हजार 200 धान उत्पादक शेतकरी मागील पाच महिन्यांपासून बोनसपासून वंचित आहेत. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सुमारे 15 कोटी रुपये तर, राज्यातील अन्य धान उत्पादक जिल्ह्याचा विचार केल्यास हा आकडा मोठा आहे. चुकीच्या पद्धतीमुळे शासनाकडे शेतकऱ्यांची ही बोनस रक्कम थकीत आहे. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांसह राज्यातील धान उत्पादक 10 जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे. जिल्हा पणन अधिकारी आणि धान खरेदी केंद्र चालकांच्या टोलवाटोलवीमुळे भंडारा जिल्ह्यातीलचं नव्हे तर, राज्यातील धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोनस अद्यापही मिळालेला नाही.
वरळीतील कोस्टल रोडवरील गार्डरेल्सचे नुकसान केल्याबद्दल वाहनचालकाला ₹2.65 लाखांचा दंड
मुंबईच्या वरळी येथे कोस्टल रोडवर तीन आठवड्यांपूर्वी घडलेल्या अपघातात एक कार रस्त्याच्या रेलिंगला धडकून समुद्रात कोसळल्याच्या घटनेनंतर, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने आता संबंधित वाहनचालकाला ₹2.65 लाखांचा दंड भरावा, असा नोटीस पाठवली आहे.
पालिकेने इशारा दिला आहे की, जर हा दंड भरला नाही तर ती रक्कम मालमत्ता करामधून वसूल करण्यात येईल.
ही घटना 7 ऑक्टोबर रोजी घडली होती. फ्रशोगर दरायुष बत्तीवाला (वय 29) हा चालक महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने वाचवण्यात आला होता,
जेव्हा त्याची कार कोस्टल रोडवरून समुद्रात पडली होती. स्थानिक मच्छीमार आणि पोलिसांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी चुंबकीय यंत्राद्वारे कार समुद्रातून बाहेर काढण्यात आले.
या घटनेनंतर BMC ने बत्तीवाला यांच्या ताडदेव येथील निवासस्थानी पत्र पाठवून कोस्टल रोडवरील संरक्षक गार्डरेल्सचे नुकसान भरपाई स्वरूपात दंड आकारण्याचा आदेश दिला आहे.
महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले, “कोस्टल रोडवर आतापर्यंत सात ते आठ किरकोळ घटना घडल्या आहेत, ज्यात वाहनांनी गार्डरेल्सला धडक देऊन किरकोळ नुकसान केले आहे.
मात्र या प्रकरणात नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने इतर वाहनचालकांना धडा मिळावा म्हणून नुकसानभरपाई वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.”
मुंबईच्या कोस्टल रोडवर बोगद्यामध्ये वेगमर्यादा 60 किमी प्रतितास असून, उर्वरित मार्गावर 80 किमी प्रतितास अशी मर्यादा आहे.
तथापि, अनेक वाहनचालक या मर्यादांचे उल्लंघन करतात. 19 जुलैपासून कार्यान्वित झालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सप्टेंबरपर्यंत 8,000 हून अधिक वेगमर्यादा उल्लंघनाच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
कोस्टल रोड 24 तास खुला झाल्यापासून बहुतेक उल्लंघन रात्रीच्या वेळी, वाहतूक कमी असताना होत आहेत.
कोस्टल रोडवरील बहुतांश अपघात हे ओव्हरस्पीडिंग आणि स्टंट ड्रायव्हिंगमुळे होत आहेत.”
1992 साली जे जे रुग्णालयात शूटआऊट झाल्याच प्रकरण.
32 वर्षानंतर अटक केलेल्या आरोपीकडून तो मी न्हवेच असे सांगण्याचा प्रयत्न.
त्रिभुवन रामपती सिंह असे 62 वर्षीय अटक आरोपीचे नाव, त्यावेळी श्रीकांत प्रधान नावाने होता वावरत.
डीएनए चाचणीची मागणी करताच कोर्टासमोरच आरोपीकडून डीएनए चाचणीस नकार.
आरोपी उत्तरप्रदेशच्या एका तुरुंगात होता ज्याचा ताबा मुंबई पोलिसानी घेतला आहे.
मी चुकीचा व्यक्ती असल्याचे सांगत तो आरोपी न्हवेच हे सांगण्याचा आरोपीकडून प्रयत्न.
शूटआऊटवेळी आरोपीच्या अंगावर असलेल्या जखमांच्या आणि प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या डॉक्टरांच्या जबाबामुळे आरोपीला कोर्टाने जामीन नाकारला.
दिवाळीच्या सुट्टीत झालेल्या भाविकांच्या गर्दीने तुळजाभवानी मंदिर संस्थानाला भरघोसपणे दान प्राप्त झाले आहे. १९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत मंदिर संस्थानाला जवळपास ३ कोटी २ लाख रुपयांचे उत्पन्न विविध माध्यमातून प्राप्त झाले. यात सर्वात मोठा वाटा देणगी दर्शनाचा आहे. देणगी दर्शनापोटी एक कोटी 46 लाख 68 हजार रुपये मिळाले. यंदा दिवाळीच्या सुट्या सलग जुळून आल्याने तुळजापूरात देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. देशभरातून भाविक दर्शनासाठी तुळजापुरात दाखल झाले. या काळात भाविकांकडून देणगी मंदिर संस्थानाला मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाली. देवीच्या दर्शनासाठी साडेतीन कोटीहून अधिक भाविकांनी हजेरी लावली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान
दाखल करण्यात आलेल्या तब्बल २८ याचिकांवर उद्या तातडीची सुनावणी
सगळ्या २८ याचिकांवर एकत्रित सुनावणी
मतदार यादी, सीमांकन आणि प्रभाग आरक्षणाच्या मुद्द्यावर याचिका दाखल करण्यात आल्या आहेत
मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी
नागपूर खंडपीठातून तसेच औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या मुंबई उच्च न्यायालयात वर्ग
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील कैलास पान गव्हाणे या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, नाशिक जिल्ह्यात सुरू असणाऱ्या पावसामुळे द्राक्ष बागांना फटका बसला असून द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कर्जबाजारी शेतकरी कैलास पानगव्हाणे यांच्या दीड एकर क्षेत्रापैकी 1 एकर मध्ये द्राक्ष बाग आहे. मात्र, पावसामुळे द्राक्ष बाग संकटांत आली आहे. या बागेची पहाणी करण्यासाठी करण्यासाठी पानगव्हाणे शेतात गेले होते, तिथेच त्यांनी विषारी औषधांचे सेवन करून जीवन यात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत, या आत्महत्या च्या निमित्ताने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा समोर आल्या आहेत, नाशिक जिल्ह्यातील जवळपास 55 हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत त्यापैकी 60 ते 70 टक्के बागांना अतिवृष्टी चा फटका बसला असून बळीराजा अडचणीत आला।असून द्राक्षचे उत्पादन घटनार आहे, , त्यामुळे सरकारच्या मदतीकडे शेतकरी चे लक्ष लागले आहे
मुंबईत डिजिटल अरेस्टच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे जनजागृती
पोलिसांकडील आकडेवारीनुसार ३ दिवसात १ व्यक्तीला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवण्यात येत असल्याची माहिती
या वर्षाच्या ८ महिन्यांत १२८ गुन्हे नोंद झाले आहेत. १०१ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे.
डिजिटल अरेस्टचे हे प्रमाण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून डिजिटल अरेस्टबाबत ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे
या राबवण्यात येणार्या विशेष मोहीमेंतर्गत या उपक्रमात ९८ अधिकारी व अंमलदारांनी एकूण ८४७ ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेत, मराठी व इंग्रजी माहितीपत्रक वाटप केले असून ‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याचे स्पष्ट करत आहेत
मुंबईच्या पवई पोलिसांनी अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य करून तिचे अश्लील फोटो सार्वजनिक करून बदनामी करणाऱ्या तरुणास अटक केली आहे
अक्षय रामकिसन जाधव २५ असे या तरुणाचे नाव असून तो डिलिव्हरी बाॅयचे काम करतो
आॅगस्ट २०२१ मध्ये अक्षयने १७ वर्षीय मुलीला जबरदस्ती मिठी मारून तिच्यासोबत जबरदस्ती गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला
या गैरकृत्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले होते. तसेच याबाबत कुठेही सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली
त्यानंतर सोशल मिडिया किंवा प्रत्यक्षात अक्षयने मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला त्रास देत होता
दरम्यान १ आॅक्टोंबर रोजी अक्षयने मुलीच्या नावे बनावट अकाऊन्ट इन्स्टाग्रामवर खाते उघडून मुलीसोबतचे अश्लील फोटो सार्वजनिक केले
या घटननंतर मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पवई पोलिसांनी अक्षय विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे
याप्रकरणी पवई पोलिस अधिक तपास करत आहेत
मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने सोमवारी अंधेरी (पश्चिम) येथील २८ वर्षीय तरुणाला बेकायदेशीररीत्या हायड्रोपोनिक गांजा (Hydroponic Weed) तस्करी केल्याप्रकरणी अटक केली. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ₹१.१४ कोटी इतकी असून तो माल बँकॉकहून आणल्याचे समोर आले आहे.
एजन्सीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अर्फत शेख हा सोमवारी पहाटे बँकॉकहून मुंबई विमानतळावर आला होता. त्याच्या ट्रॉली बॅगेची तपासणी केली असता काही कपडे, दोन शॅम्पूच्या बाटल्या, दोन डबे आणि काही चॉकलेटचे पाकिटे आढळली.
तथापि, स्नॅकच्या डब्यांमध्ये आणि शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये तपास केल्यावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांना २८ पॅकेट्स आढळले, ज्यामध्ये एकूण १,१४४ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा होता.
कोल्हापुरातील कळंबा कारागृहात सापडलं जिवंत काडतूस
चार क्रमांकाच्या स्वच्छतागृहाची अधिकाऱ्यांनी झडती घेतली असता सापडलं पितळी जिवंत काढतूस
मोका प्रकरणी अटक असलेल्या सुरेश दयाळू आणि अमीर असीर खान या दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी केली अटक
अटक केलेले दोघेही संशयीत पुण्यातील आंदेकर टोळीशी संबंधित
या बंदीजणांकडून कळंबा कारागृहात पिस्तूल लपवून ठेवले का ? याची अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू
कारागृहात काढतुस लपवून ठेवण्याचा नेमका उद्देश काय याचा तपास सुरू
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या वतीने चांदिवली विधानसभेतून मुंबई मनपा निवडणुकीसाठी पदाधिकारी मार्गदर्शन बैठकींना सुरुवात करण्यात आली. आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात मंत्री उदय सामंत यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी मोठ्या संख्येने चांदिवली, पवई, कुर्ला , साकीनाका विभागातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. युतीचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत, जिथे शिवसेना लढेल तिथे शंभर टक्के रिझल्ट असेल, असे वातावरण मुंबईत आहे अशी प्रतिक्रिया या वेळी उदय सामंत यांनी दिली.
पोलिस कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या रोहित आर्या (Rohit Arya) प्रकरणात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने चौकशीचे निर्देश दिले आहेत. आयोगाने या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या तपासासाठी पोलिस महानिरीक्षक विश्वास पांढरे व आयोगाचे निबंधक, न्यायाधीश विजय केदार यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी सर्व पुरावे गोळा करून सविस्तर अहवाल सादर करावा. तसेच या प्रकरणाची चौकशी करताना सरकारने आवश्यक ती माहिती व पुरावे या तपास पथकाला द्यावेत, असेही आयोगाने म्हटले आहे.
मुंबईच्या पोलिस आयुक्तांना व न्यायदंडाधिकाऱ्यांना या प्रकरणी आठ आठवबंधांत अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाचे अध्यक्ष निवृत न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी दिले. पुढील सुनावणी आयोगाचे अध्यक्ष बदर व सदस्य संजयकुमार यांच्या खंडपीठासमोर ८ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.
गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबईचे पोलिस आयुक्त, मुंबईचे न्यायदंडाधिकारी यांना या प्रकरणातील सर्व संबंधित कागदपत्रे आठ आठवळ्यांत सादर करण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत. पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यूचे अंतिम कारण प्रमाणपत्र, बैलिस्टिक अहवाल आणि दंडाधिकारी चौकशीचा अहवाल यांचा यात समावेश आहे. पोलिस आयुक्तांना मृतकाची पत्नी अंजली आर्या यांना या कार्यवाहीची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित इतर कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यास ती आयुक्तांनी आयोगास कळवावी, असेही आयोगाने नमूद केले आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog: 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर, 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल