Maharashtra News Live: भर रस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्याला एक दिवसाची पोलीस कोठडी
Maharashtra News Live Updates: राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. आज राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर होणार आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Budget 2025: राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आज अर्थमंत्री अजित पवार राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात नेमकं काय असणार,...More
- दि. 11, 12,13 मार्चला विदर्भातील अकोल्यासह काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा
- 12, 13 मार्चला चंद्रपूर जिल्ह्यात देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा
- सध्या विदर्भातील सर्वच जिल्ह्याचा पारा 37 डिग्रीच्या पार
- पुढच्या दोन तीन दिवसात चंद्रपूर, अकोल्याचे तापमान 40 अंश पार जाण्याची शक्यता
- यंदा सामान्य पेक्षा 3 ते 4 डिग्री ने पारा वाढणार, साधारण 36 डिग्री पर्यंत मार्च महिन्यात विदर्भातील तापमान असते.
- हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
एमएमआरडीएवर गंभीर आरोप करणाऱ्या कंपनीनं हायकोर्टातील याचिका मागे घेतली
हायकोर्टाच्या निर्देशांनुसार म्हणणं एकून घेण्यासाठी समितीची स्थापना
त्यामुळे एकिकडे पुन्हा चर्चा सुरू असताना याचिका प्रलंबित ठेवणं योग्य नसल्याचं कंपनीकडून स्पष्टीकरण
मुंबई मेट्रोच्या सल्लागार सेवेसाठी नेमलेल्या 'सिस्त्रा' या फ्रेंच कंपनीनं एमएमआरडीएटच्या वरिष्ठांवर केले होते भ्रष्टाचाराचे आरोप
नोटीस न देताच या कंपनीचं कंत्राट अचानक रद्द केल्याच्या निर्णयाला कंपनीनं दिलं होतं हायकोर्टात आव्हान
हायकोर्टानं कंपनीची याचिका मान्य करत कंत्राट रद्द करण्याचे एमएमआरडीएचे आदेश रद्द केले होते
तसेच कंपनीचं म्हणणं पुन्हा सविस्तर ऐकून घेण्याचेही दिले होते एमएमआरडडीएला निर्देश
बुलढाणा : मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथील गजानन राऊत यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायत ऑपरेटर प्रदीप ठाकूर याने पैशाची मागणी केल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती, प्रदीप ठाकूर यांची वरिष्ठांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे, याचा राग मनात धरून प्रदीप ठाकूर यांनी गावातील वकिलाच्या मदतीने गजानन राऊत यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची सतत धमकी देत वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याने गजानन राऊत यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला, त्यामुळे दिवाणी न्यायालयासमोर गजानन राऊत यांनी अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत गजानन राऊत यांना तात्काळ रुग्णालयात उपचार दाखल केले आहे...
गौरव आहुजा याला एक दिवसाची पोलिस कोठडी
भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी
पुणे सत्र न्यायालयाने सुनावली गौरव आहुजा याला एक दिवसाची पोलिस कोठडी
प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीनाविरोधात राज्य सरकारची हायकोर्टात याचिका सादर
उद्या, मंगळवारी तातडीची सुनावणी
कोरटकरला कुठलाही अंतरिम दिलासा न देता प्रकरणावर अंतिम सुनावणीची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचं प्रकरण
प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचा कॉल करून धमकी दिली होती
ज्यात त्यानं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते
प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर आणि नागपूरमध्ये गुन्हे दाखल आहेत
कोल्हापुरातल्या प्रकरणात त्याला जामीन मिळाला असला तरी नागपूरच्या प्रकरणात तो फरार आहे
गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी अतिदुर्गम छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात रविवारी नव्या पोलीस मदत केंद्राची स्थापना केली. यावेळी एक हजार पोलीस जवानांच्या उपस्थितीत 24 तासात मदत केंद्राची उभारणी करताना मिडदपल्ली ते कवंडे या रस्त्यावर नक्षलवाद्यांची अनेक स्मारक आढळून आली. हे स्मारक गडचिरोली पोलीस दलांनी उद्ध्वस्त केली आहेत. पोलिसांनी स्मारके उद्ध्वस्त केल्याने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
रायगडमधील कोलाडजवळ असणाऱ्या भंगार गोडाऊनला भीषण आग
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती
आगीत भंगार गोडाऊन मधील सर्व सामान जळून खाक
मुंबई गोवा महामार्गावरील असणाऱ्या कोलाड परिसरातील घटना
आगीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात धुराचे चित्र
आगीत लाखो रूपयांचे भंगार व्यावसायिकाचे नुकसान
- पुण्यात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला घरात घुसून गुंडांकडून मारहाण.
- पुण्यातील चंदन नगर परिसरातील फॉरेस्ट पार्क मधील धक्कादायक प्रकार.
- घरासमोरील चेंबरचे झाकण तोडल्याच्या संशयावरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याकडून मारहाण..
- गोरखनाथ एकनाथ शिर्के असे मारहाण झालेल्या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकांचे नाव.
- फॉरेस्ट पार्क परिसरातील झाकण तुटल्याच्या संशयावरून राजू शंकर देवकर आणि गोविंद कॅनल या दोघांसह येरवडा परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या टोळक्या कडून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकांच्या कुटुंबांना बेदम मारहाण.
- देवकर यांनी येरवडा परिसरातील काही गुंडांना बोलवून पोलीस निवृत उपनिरीक्षकांना किरकोळ कारणावरून मारहाण केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
- या प्रकरणी दहा ते बारा जनावर विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सातारा : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून महिलांचे गहाळ झालेले मोबाईलचा छडा लावण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे एकूण 4 लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 20 मोबाईल महिलांना परत देण्यात आले आहेत. महिला दिनाचे औचित्य साधून पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे सातारा शहरातील महिलांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक केले आहे
ठाण्यात मराठी माणसाची परप्रांतियांकडून पिळवणूक
शंकर सोनावले असे पीडित मराठी व्यक्तीचे नाव
सोनाराकडून घेतलेले कर्ज फेडले असतानाही जबरदस्ती त्यांचे घर दुसऱ्या परप्रांतियांना विकले असून त्यांच्या अनुपस्थितीत घरातील सर्व सामान बाहेर फेकत केला कब्जा
पोलिस स्टेशन आम्ही मॅनेज केलं आहे काय करायचं ते करा असे परप्रांतीय धमकावत असल्याचा शंकर सोनावले यांचा आरोप
ठाण्यात मराठी माणसांना न्याय मिळणार की नाही असा देखील सवाल उपस्थित
अविनाश जाधव आम्हाला नक्कीच न्याय देतील...
मुंबईतील शिवसेना शिंदे गटाचे कांदिवली विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित याने कांदिवलीतील एका मराठी कुटुंबीयांच्या दुकानाचा गाळा हडप केला होता. दुकानाचे पैसे मागितल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कांदिवली विभाग प्रमुखाला अखेर काल कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. यानंतर आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे, माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि वैभव भराडकर यांच्या माध्यमातून दत्तात्रय पैइ वृद्ध नागरिकाला त्याच्या दुकानाची चावी पुन्हा मिळाली आहे. यामुळे मागील आठ वर्षापासून लालसिंग राजपुरोहित याच्या त्रासापासून मराठी कुटुंबाची सुटका झाली आहे.
नागपाडा बिस्मिल्ला स्पेस या निर्माणाधीन इमारतीत टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याप्रकरणी दोघांना अटक
नागपाडा येथे इमारतीच्या तळघरातील पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याप्रकरणी सर जे.जे. मार्ग पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला होता
याप्रकरणी दोन सुपरवाझरला पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे.
कामगाराना कोणतेही सुरक्षा उपकरण न देऊन निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात ठेवण्यात आला आहे.
अब्दुल दालिम शेख(३५) व अनिमश विश्वास(३३) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
दोघेही पर्यवेक्षक असून ते नागपाडा परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी स्वतः याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सर. जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात दोघांवर भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नंदुरबार : शहरातील नेहरू चौकातून मोर्चाला सुरुवात
मोर्चात मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी....
अक्कलकुवा येथील जामिया संस्थेची चौकशीची मागणी
जामिया मदरशात बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाई झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
शहरातील मुख्य रस्त्यावरून हिंदू जन आक्रोश मोर्चा नेहरू चौकात होणार समाप्त
मोर्चाचा पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पुण्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाचा कारभार गेल्यापासून आपले पुणे शहर हिंसेची राजधानी दहशतीचे माहेरघर झाले आहे.
पोर्शे कार अपघात,कोयता गँग, दिवसाढवळ्या गोळीबार, चेन चोरी, बलात्कार, विनयभंग, अपघात, खून अशा गुन्ह्यांनी पुणे शहर सतत चर्चेत आहे. लहान लहान मुलांकडे पिस्तूल, कोयता असे हत्यार आढळून येत आहेत.
छोट्या मोठ्या कारणांवरून शहरात खून होत आहेत,अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे.
या परिस्थितीवर पोलीस प्रशासनाचे तथा गृहमंत्र्यांचे काहीही नियंत्रण राहिले नाही.
याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार..
रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन
नाशिक : कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क रद्द करा, या मागणीसाठी लालसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. बाजार समितीतील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले आहेत. लालसगाव बाजार समितीतील पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांचे ' शोले स्टाईल ' आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. या आंदोलनात कांदा उत्पादक संघटना, प्रहार शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत.
शिरूर मध्ये मारहाण झालेल्या ढाकणे पिता पुत्रा सह इतर दोघांविरोधात ॲट्रॉसिटी, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
शिरूर पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल
बीडच्या शिरूर येथील बावी गावात मारहाण झालेल्या ढाकणे पिता पुत्रासह इतर दोघांविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि पोस्को अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरणाची शिकार करताना आडवे आले म्हणून ढाकणे पिता पुत्राला मारहाण झाली होती.. या प्रकरणात त्यांनी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या विरोधात तक्रार देत त्याला अटक करण्याची मागणी केली होती.. आता ढाकणे पिता-पुत्रासह इतर दोघां विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. आमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अशी भीती पिता पुत्राने यापूर्वी व्यक्त केली होती..
त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हानपुडे पाटील हे करत आहेत..
- नाशिक शहर शिधापत्रिकाधारकांच्या ई-केवायसीमध्ये आघाडीवर...
- नाशिक शहरात आतापर्यंत 3 लाख 41 हजार 406 कार्डधारकांनी प्रक्रिया पूर्ण...
- नाशिक जिल्ह्यात १३ लाख २९ हजार शिधापत्रिकाधारक...
- शिधापत्रिकाधारक कुटुंबातील ३८ लाख ३५ हजार २८८ सदस्यांची ई-केवायसी करण्याचे जिल्हा पुरवठा विभागापुढे लक्ष...
- शासनाने नेटवर्कच्या समस्येवर तोडगा काढत 'केवायसी'साठी मोबाइल अॅप केले विकसित...
- आतापर्यंत जिल्ह्यात नाशिक शहरातील पुरवठा विभाग आघाडीवर,79.2 टक्के ई-केवायसी पूर्ण..
बीड: महिलेवर अत्याचार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तडकाफडकी निलंबन केले. तर पाटोदा न्यायालयाने अत्याचार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महिला दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन पाटोदा पोलीस ठाण्यातील उद्धव गडकर याने 25 वर्षीय महिलेवर अत्याचार केला होता. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून गडकर याच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उद्धव गडकरी याला पाटोदा न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी गडकर याच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.
बीड: महिलेवर अत्याचार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तडकाफडकी निलंबन केले. तर पाटोदा न्यायालयाने अत्याचार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महिला दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन पाटोदा पोलीस ठाण्यातील उद्धव गडकर याने 25 वर्षीय महिलेवर अत्याचार केला होता. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून गडकर याच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उद्धव गडकरी याला पाटोदा न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी गडकर याच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.
सातारा : कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंतगड किल्ल्यावर गेल्या आठ दिवसात दुसऱ्यांदा वणवा लावण्याचा प्रकार घडला असून यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह पर्यावरण प्रेमी, शासकीय अधिकाऱ्यांनी लावलेली शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. त्यासोबत या झाडांना पाणी घालण्यासाठी ठिबक सिंचन करण्यात आले होते, हे ठिबक सिंचनचे साहित्य, पाईप यांचेही नुकसान झाले आहे. यामुळे झाडांचे नुकसान होण्या सोबत आर्थिक नुकसानही झाले आहे. ऐतिहासिक वसंतगड किल्ल्यावर वणवा लावण्याचे प्रमाण वाढत असून वणवा लावणाऱ्यांवर वनविभागाने कडक कारवाई करावी, गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे.
Washim News: वाशिम जिल्ह्यात एका पोल्ट्री फार्म मध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची घटना काही दिवसा पूर्वीसमोर आली होती. त्या घटनेनंतर मांस खाद्य प्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर काल बर्ड फ्लूची झालेल्या कारंजा तालुक्यातील जीरापुरे येथील पोल्ट्री फार्मला पशुसंवर्धन विभागाच्या केंद्रीय पथकाने भेट देत येथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी बर्ड फ्लू संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेत, त्यानंतर काय उपाययोजना करायच्या या संदर्भात वाशिम जिल्हा संवर्धन विभागाला सूचना दिल्या.
जीरापुरे येथील एका पोल्ट्री फार्म मध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची बाब 28 फेब्रुवारीला समोर आली होती. यात ६८३१ कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तातडीने बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवत संसर्ग वाढू नये यासाठी संशयित क्षेत्रात निर्जंतुकीकरण मोहीम राबवत जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या तीन विशेष पथकांनी २६० पक्ष्यांसह पशुखाद्य, ताडपत्री, कुक्कट खताची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली होती.
Pandharpur: फाल्गुन महिन्यातील फाल्गुन शुद्ध म्हणजेच आमलकी एकादशीनिमित्त आज पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणामार्ग, चौफळा, महाद्वार, पश्चिमद्वारसह परिसर विठू नामाने दुमदुमून गेला आहे. विठुरायाच्या दर्शन रांगेत ही भाविकांची मोठी गर्दी आहे . आज विठ्ठल दर्शनासाठी किमान सात ते आठ तासांचा कालावधी लागतो आहे तर मुखदर्शनासाठी तीन तासांचा कालावधी लागतो आहे.
सातारा: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची 85 हून अधिक बातम्यातून एकतर्फी बदनामी करणारे "लय भारी" यूट्यूब चैनलचे पत्रकार तुषार खरात यांना मुंबईतून अटक केल्यानंतर रात्री उशिरा वडूज येथील रुग्णालयात केली वैद्यकीय चाचणी.
आज वडूज येथील न्यायालयासमोर करणार हजर..
न्यायालयाने आदेश देऊन देखील मंत्री गोरे यांच्या बदनामीच्या एकतर्फी बातम्या दाखवून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तुषार खरात यांच्यावर कारवाई
तुषार खरात यांच्यावर वडूज, दहिवडी, म्हसवड, तळबीड, सोलापूर येथील पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल. यामध्ये ॲट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी, बदनामी करणे या गुन्ह्यांचा समावेश
Bhandara: सध्या रब्बी हंगाम सुरू असून भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी भातपिकाचं उत्पादन घेतल्या जातं. उन्हाळ्याच्या झळा बसायला सुरुवात झालेली असून जिल्ह्यातील अनेक नदीनाले कोरडे पडले असून तलावांचीही तीचं स्थिती सध्या बघायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांकडं सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरी कृषी पंपाच्या माध्यमातून भातपीक आणि बागायती शेती जागविण्याचा प्रयत्न करीत आहे. तर अनेक ठिकाणी आता भूगर्भातील जलसाठा कमी झाल्यानं पाहिजे त्या प्रमाणात शेतीला सिंचन व्यवस्था करण्यात शेतकरी अपयशी ठरतं आहे. तुमसर तालुक्यात चांदपूर, बावणथडी आणि बघेडा हे मोठे जलाशय असतानाही या तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांचं उन्हाळी पीक वाचविण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी लावून धरावी लागली आहे. येत्या दिवसात या जलाशयातून पाणी सोडलं नाही, तर उन्हाळी पिक करपून जाण्याच्या भीती शेतकऱ्यांना आहे.
आदिम समाजासाठी काम करणाऱ्या सूर झलकारी कातकरी महासंघाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करत संघटना शिवसेनेत विलीन केली . शिवसेना शिंदे गटाचे पालघर चे आमदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत डहाणू च्या कासा येथे हा पक्ष प्रवेश पार पडला . यावेळी सूर झलकारी कातकरी महासंघाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे प्रेरित होऊन संघटना शिवसेनेत विलीन करत असल्याच महासंघाचे अध्यक्ष यांनी सांगितलं. तर या संघटनेच्या विलीनीकरणामुळे शिवसेनेला पालघर सह आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आपली स्वतःची ताकद निर्माण करण्यात मोठी मदत होईल असा विश्वास आमदार गावित यांनी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून येवला शहर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे..मोटरसायकल चोरीच्या घटना ताज्या असतानाच स्वातंत्र्य सैनिक कॉलनी मधील नितीन बाळकृष्ण जोशी यांच्या बंद घराचे कडी कोयंडा तोडून कपाटांमधील पंचवीस हजार रुपये रोख व दोन तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे
हिंगोलीच्या खैरी घुमट येथे कानिफनाथ महाराज यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेत मराठवाडा आणि विदर्भातील भाविक दर्शनासाठी दाखल झाले असून शिखरी काठ्याचा नेत्रदीप रिंगण सोहळा पार पडला आहे मोठ्या प्रमाणात मराठवाडा आणि विदर्भातून भाविक भक्त यात्रेत येत आसतात मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडलत आसते नवसाला पावणारा देव म्हणून कानिफनाथ महाराजांची ओळख आहे म्हणूनच नवस फेडण्यासाठी या ठिकाणी भाविक आपापल्या शिखरी काठ्या घेऊन दाखल झाले आहेत.
अकोला शहरातील अशोका वाटिका चौकात मध्यरात्रीनंतर दोन कारमध्ये भिषण अपघात घडलाय. शहरातील नवीन आळशी प्लॉट भागातून जिल्हाधिकारी कार्यालय चौकाकडे भरधाव येत असलेल्या कारने एका कारला जोरदार धडक दिलीय. त्यानंतर अनियंत्रित कार थेट चौकातील सिग्नलच्या खांबाला धडक देत डिव्हायडरवर चढलीय. यात दोन्ही कारमधील तीनजण गंभीर जखमी झालेय. त्यांच्यावर अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरूयेत. भरधाव वेगाने आलेली कार ही नवीन आळशी भागातील वोरा नामक व्यक्तीची असल्याची प्राथमिक माहिती मिळतीये. गाडीचा वेग अनियंत्रित का झालाय?. गाडी चालकाने मद्यसेवन केले होतेय काय?, याचा शोध पोलीस घेतायेत. या अपघातात दोन्ही कारचं मोठं नुकसान झालंय.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे आज राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प मांडणार आहे. दुपारी दोन वाजता अजित पवार अर्थसंकल्प विधिमंंडळात सादर करतील. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे मालाड- कांदिवली आणि चारकोपचे विभागप्रमुख लालसिंह राजपुरोहित यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय पक्षाचे मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या पदाधिकाऱ्याने केलेल्या चुकीच्या वर्तनासाठी त्याला जबाबदार धरून त्याला पक्षातून निलंबित
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra News Live: भर रस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्याला एक दिवसाची पोलीस कोठडी