- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Updates: मद्यातून महसुल वाढीसाठी राज्य सरकारतर्फे समिती गठीत, लाडकी बहीणसह इतर योजनांमुळे राज्याच्या तिजोरीत मोठया प्रमाणावर खडखडाट
Maharashtra live blog updates in Marathi:महाराष्ट्र, देश-विदेशातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra live blog updates in Marathi: राज्यात सध्या थंडीचा कडाका पुन्हा वाढताना दिसतोय. तर दुसरीकडे बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन वातावरण तापलंय. भाजपच्या सुरेश धस यांनी...More
Dombivli Crime: डोंबिवलीत गुंडांच्या टोळीची दहशत
जागेच्या वादातून रात्री 10 ते 12 जणाच्या टोळी कडून तोडफोड आणि दगडफेक....
घटना सीसीटिव्हीत कैद..परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण
Prakash Solanke: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोलंके सध्या उपचारासाठी मुंबई मधील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल आहेत
पाठीच्या मणक्याचा त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल होत
त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे
गेल्या ५ दिवसांपासून प्रकाश सोळंके हे ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल आहेत
Maharashtra: मद्यातून राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य सरकारने केली समिती गठीत
लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांमुळे राज्याच्या तिजोरीत मोठया प्रमाणावर खडखडाट झालाय
यासाठी महसुलात वाढ करण्यासाठी राज्य सरकारचे वेगवेगळे प्रयत्न
गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती गठीत
इतर राज्यातील मद्य निर्मिती धोरण,परवाने, उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास समिती करणार
त्यानंतर ही समिती दोन महिन्यांत राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार
Pune: हॉर्न वाजवल्यामुळे, आधी वाद आणि नंतर फायटर ने वार
पुण्यातील मुंढवा भागात एका परिवाराला मारहाण
ट्रॅफिक मध्ये असताना हॉर्न का वाजवला म्हणून २ जणांनी मारहाण करत केली गाडीची तोडफोड
पोलिसांनी तात्काळ केली २ जणांना याप्रकरणी अटक
भुसावळ गोळीबार अपडेट
Bhusawal: भुसावळ शहरात तरुणावर गोळीबार करून तरुणाची हत्या
भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात असलेल्या अमरदीप टॉकीज जवळील चहाच्या दुकानात तीन ते चार अज्ञातांनी तरुणावर केला होता गोळीबार
गोळीबाराच्या घटनेत तहरीन शेख हा तरुण ठार
घटनास्थळी पोलिसांना फायर करण्यात आलेल्या जवळपास पाच गोळ्या आढळल्याची पोलिसांची माहिती
गोळीबार करणाऱ्या अज्ञातांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असल्याची अप्पर पोलीस अधीक्षक अशोक रावते यांची माहिती
Pandharpur: पुत्रदा एकादशीनिमित्त विठ्ठल भक्ताकडून विठ्ठल रुक्मिणीला सहा लाखांचे दागिने अर्पण
आज पुत्रदा एकादशी निमित्त नांदेड येथील भावीकाने विठ्ठलाला सहा लाखाचे दागिने अर्पण केले.
आज पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झालेले आहेत.
आजच्या एकादशीचे औचित्य साधून नांदेड येथील विठ्ठल भक्त सुमीत मोरगे यांनी विठ्ठलाला सोन्याचा गोफ, रूक्मिणीला मंगळसूत्र ,
चांदीचे जोडवी व रुक्मिणी करंडा असे एकूण सहा लाख रुपयांचे दागिने विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण केले आहेत.
Sangli: मंत्री नितेश राणे सांगली जिल्हा दौऱ्यावर
सांगली मधील मटण आणि फिश मार्केटचे नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन
या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील देखील उपस्थित
मंत्री नितेश राणे यांच्या भाषणास सुरुवात
Thane: ठाण्यातील उपवन तलाव परिसरात आज पासून संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि संस्कृती कला महोत्सवाचे आयोजन...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि संस्कृती कला महोत्सव संघाच्या वतीने ११ व्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सव २०२५ चे उद्घाटनाला उपस्थिती...
सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात..
Buldhana: तहसील कार्यालयात घुसून तहसिलदारांची गाडी फोडली.
नांदुरा येथील धक्कादायक प्रकार.
रेती माफीयांची मुजोरी सुरूच...!
Chiplun: सरकारी वकील चिपळूण मध्ये लाचलुचपतच्या सापळ्यात जेरबंद......
रत्नागिरी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग यांची कारवाई
ॲड. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी वर्ग 1, खेड
यांनी केस मिटवण्यासाठी 5,00,000/- रुपये लाच मागितली होती.
यामध्ये एक लाख पन्नास हजार लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले
हि कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव पर्यवेक्षण अधिकारी- अविनाश पाटील,
यांच्या मार्गदर्शनाखाली कऱण्यात आली अधिक तपास सुरु आहे
Nandurbar - नवापूर शहरात एका घराला भीषण आग, आगीत पूर्ण घर जळून खाक
- शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यानंतर असल्याच्या प्राथमिक.....
- आगीत संसार उपयुक्त वस्तू आणि मौल्यवान वस्तूंच्या मोठ्या नुकसान.....
- घराला आग लागल्याने कुटुंबांना रस्त्यावर येण्याची वेळ आली.....
- आग विझवण्यासाठी नवापूर अग्निशमन दलातील बंब घटनास्थळी दाखल.....
- शर्तीच्या प्रयत्न केल्यानंतर आग विझवण्यात परिसरातील नागरिक आणि अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना यश.....
Buldhana: बुलढाण्यात रेती माफियांची मुजोरी सुरूच...!
पकडलेल्या अवैध धावत्या ट्रकमधून तलाठी व कोतवालास ढकलले.
तलाठी व कोतवाल गंभीर जखमी.
अवैध रेतीचा ट्रक घेऊन रेती माफिया फरार.
रेती माफीयाची मुजोरी केमेरात कैद.
Buldhana: बुलढाणा शहरात बिबट्या ...!
म्हाडा कॉलिनी मध्ये जखमी अवस्थेत बिबट..
वन विभाग अद्याप पर्यंत पोहोचला नाही.
Pune: पुण्यातील मुळशी तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या निवे सारोळे गावाच्या परिसरामध्ये बिबटयाची दहशत
गेल्या आठवड्याभरात शेळ्या, बकऱ्या, कोंबड्यांसह बिबट्याकडून अनेक पाळीव प्राणी फस्त
निवे सारोळे येथील टाटा धरणाच्या ऑफिस बाहेरील cctv मध्ये बिबट्याचा वावर कैद
परिसरातल्या गावातील नागरीक भीतीच्या छायेत
स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी सूचना दिल्यानंतर,वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याला पकडण्यासाठी उपायोजना सुरू.
Nashik - वेग मर्यादा तोडणाऱ्यासाठी बस चालकांवर आता राहणार सीसीटीव्हीची नजर
- लहान मोठ्या वाहनांचा तसेच पादचाऱ्यांचा विचार न करता बेफाम वेगाने सिटीलींकच्या बस धावत असल्याचा तक्रारी प्राप्त
- बेशिस्त चालकांवर कारवाईसाठी सिटी लिंक व्यवस्थापन घेणार पोलिसांची मदत
- शहरातील 48 सिग्नल वरील सीसीटीव्ही फुटेज तपासून सिटीलींक बस चालकांवर करणार कारवाई
- बस चालक वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालवत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्याने सिटी लिंक प्रशासनाचा कारवाईचा बडगा
Nagpur - नागपुरात बार संचालकावर गुन्हेगाराने काढला देशी कट्टा,
मात्र वेळीच देशी कट्टा बार संचालकाने हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला
- नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील भारसिंगी येथील शारदा बार मधील बुधवारी रात्रीची घटना
- भारसिंगी येथे पंकज जैस्वाल यांचा बार आहे
- बुधवारी रात्री दोन आरोपी बार मध्ये आल्यावर पंकज जैस्वाल आणि बार मॅनेजर यांच्यात वाद झाला
- या वादात आरोपी हेमराज बाभूळकर याने देशी कट्टा बार संचालकावर रोखून धरला
Railway: तांत्रिक कारणांमुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या उंबरगाव वलसाड या ठिकाणी थांबवण्यात आले आहेत,,,
डहाणू ते मुंबई लोकल सेवा सुरू असून लांब पल्ल्याच्या गाड्या ठप्प असल्याची माहिती
Chiplun: चिपळूण मध्ये सरकारी वकिलाला अँटी करप्शन ब्युरो ने घेतले ताब्यात....
रत्नागिरी अँटी करप्शन ब्युरो ची कारवाई.
कारवाईचे कारण अस्पष्ट.....
थोड्याच वेळात अँटी करप्शन ब्युरो कडून येईल अधिकृत माहिती.
रात्री उशिरा कारवाई झाल्याची माहिती
Palghar: वाडा मनोर महामार्गावरील पाली पुलाजवळ टेम्पो आणि बाईक मध्ये भीषण अपघात
अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
स्नेहा झीरवा असं अपघातात मृत झालेल्या वीस वर्षीय तरुणीचे नाव असून बाईक वरील दोघेजण आणि टेम्पो चालक असे तीन जण गंभीर जखमी
अपघातात बाईकचा अक्षरशः चक्काचूर झाला असून टेम्पो ही पलटी होऊन मोठ नुकसान झाला आहे.
टेम्पो वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो बाईकवर धडकल्याने पहाटेच्या सुमारास घडला अपघात.
Delhi: उत्तरेतील धुक्याचा रेल्वे आणि विमान वाहतुकीवर परिणाम
घनदाट धुक्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या 26 ट्रेन उशिराने
दिल्ली एअरपोर्टने एडवायझरी जारी केली असून, लोकांना विमानाच्या वेळा पाहून घरातून बाहेर पडण्याची सूचना दिली आहे.
रात्री 12 पासून आतापर्यंत 165 विमानांवर परिणाम झाला आहे, त्यात 130 उड्डाणे आणि 35 विमाने उशिराने आहेत.
दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी घनदाट ते अत्यंत घनदाट कोहळ्यामुळे हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Nashik - नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईल आढळून आल्यानं खळबळ
सर्कल दोन मधील बॅरेक क्रमांक आठ जवळ शौचालयच्या मागे जमिनीत पुरून ठेवला होता मोबाईल
मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा भेदून मोबाईल कारागृहात आल्यानं सुरक्षा व्यवस्थावर प्रश्नचिन्ह
अज्ञाताने शौचालयच्या मागे तंबाखुच्या पिशवीत गुंडाळून जमिनीत पुरून ठेवला होता मोबाईल
कारागृहात कडक सुरक्षा व्यवस्था असताना मोबाईल, तंबाखू, कारागृहाच्या आत कसे जातात हा प्रश्न
High Court: "पासपोर्ट जप्तीचा अधिकार पोलीस आणि न्यायालयाला नाही,हा अधिकार केवळ पासपोर्ट अधिकाऱ्यांनाच"
- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा एका प्रकरणात अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय
- फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम 102 अंतर्गत पोलिसांना आणि कलम 104 अंतर्गत फौजदारी न्यायालयाला गुन्ह्याशी संबंधित वस्तू जप्त करण्याचा अधिकार आहे
- परंतु पासपोर्ट जप्ती करिता पासपोर्ट कायदा लागू होतो,हा विशेष कायदा आहे
- त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे
जागतिक तापमानवाढीबाबत मोठी बातमी
1850 नंतर 2024 हे जागतिक स्तरावर नोंदवलेले सर्वात उष्ण वर्ष
२०२४ हे जागतिक सरासरी तापमान १५.१० अंश सेल्सिअस
२०२३ च्या ०.१२ अंश सेल्सिअसने अधिक तापमानाची २०२४ मध्ये नोंद
२०२४ हे पूर्व-औद्योगिक पातळीच्या अंदाजापेक्षा १.६० अंश सेल्सिअसने जास्त, ज्यामुळे ते १.५ अंश सेल्सिअस मर्यादा ओलांडणारे पहिले कॅलेंडर वर्ष बनल्याची नोंद
गेल्या १० वर्षांमध्ये (२०१५-२०२४) १० सर्वात उष्ण वर्ष जगाने अनुभवली
Aditya Thackeray: आदित्य ठाकरे आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार
दुपारी दोन वाजता आदित्य ठाकरे हे मुंबई महापालिका कार्यालयात जाऊन भूषण गगराणी यांची भेट घेणार आहेत
मुंबईतील विविध प्रश्नांवर आणि रखडलेल्या कामांवर मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आज मुंबई महापालिका आयुक्तांची आदित्य ठाकरे भेट घेत आहेत
Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हे यांचा राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना जोरदार टोला
विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाट अद्याप सरळ व्हायला तयार नाही तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही
राज्यात मित्र पक्षांच्या आशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस
पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणांत होतो त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा.. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत- कोल्हे
लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे- कोल्हे
Mumbai: छत्रपती घराण्याच्या खाजगी जमिनी आणि इतर मालमत्तांना कायमची सूट
उदयनराजे भोसले यांच्या लिनियन वारसांना कायमची सूट देण्याचा निर्णय
श्रीमंत भोसले कुटुंबियांचा उदरनिर्वाह त्यांच्या दर्जानुसार व्हावा म्हणून दिली सूट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या मालमत्तांना सूट देण्याचा निर्णय
द बॉम्बे सरंजाम, जहागिर आणि इतर इनाम नियमातून सूट
महसूल आणि वन विभागाचा मोठा निर्णय
Bandra Crime: वांद्रेच्या खेरवाडीतील धक्कादायक घटना
पोटच्या १० वर्षाच्या मुलाला आईनेच गळा आवळून ठार मारल्याची घटना
अभिलाषा औटी ३६ असे या महिलेेचे नाव आहे
अभिलाषा या वांद्रे पूर्व येथील वाय काॅलनीत आल्या कुटुंबासोबत राहतात
अभिलाषा यांना 'सिझोफेनिया' नावाचा आजार आहे
यात प्रामुख्याने एखादी व्यक्ती अतिआक्रमक किंवा अति प्रेमळ वागते
गुरूवारी अभिलाषा आणि त्यांचा १० वर्षाचा मुलगा सर्वेश सायंकाळी ७ वा घरी एकटी असताना
काही कारणांवरून अभिलाषा यांचा पारा चढला
यावेळी राग अनावर झालेल्या अभिलाषा यांनी सर्वेशला घराच्या बेडरूममध्ये नेहून
दरवाजाला आतून कडी लावत, वायरीने गळा आवळला
या घटनेत सर्वेशचा जागीच मृत्यू झाला.
Central Railway: मध्य रेल्वेचा शुक्रवार आणि रविवारी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
दिनांक १०.०१.२०२५ आणि १२.०१.२०२५ (शुक्रवार आणि रविवार) रोजी दिवसा कर्जत स्थानकावर पोर्टल उतरवण्यासाठी
विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (दुसरा आणि तिसरा)
मध्य रेल्वे कर्जत यार्ड सुधारणा संदर्भात कर्जत स्थानकावरील पोर्टल अनलोडिंगचे काम पूर्ण करण्यासाठी
विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे.
Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात थंडीची लाट पुन्हा वाढला गारठा......
सकाळच्या सुमारास थंडीचा तडाखा......
पहाटेच्या सुमारास थंडीपासून वाचण्यासाठी नागरिकांना घ्यावा लागत आहे शेकोटीचा आधार.....
शहरी भागात तापमानाचा पारा 10 अंश खाली तर सातपुडा पर्वत रांगेत तापमान 8° अंश सेल्सिअस .....
वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी उबदार कपडे वापरून काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन.....
Dharashiv: धाराशिवमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच तक्रार वॉर
जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या तक्रारीनंतर उपजिल्हाधिकारी संजयकुमार ढव्हळे निलंबित
तर उपजिल्हाधिकारी संजयकुमार ढव्हळे यांची जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या विरोधात निवडणुकीत जाणीवपूर्वक दूजाभाव केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार , विभागीय आयुक्तांकडून चौकशी सुरू
Nagpur: कार रिवर्स घेतांना झालेल्या अपघातात 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू...
नागपूरच्या सुरादेवी येथील घटना..
मृतकचे आईवडील वीटभट्टीवर काम करतात...
मुलगी साधना उईके बाजूला खेळात असतांना सुरादेवी येथील राजेश हुरकू हे आपली कार रिव्हर्स घेत होते त्या दरम्यान हि घटना घडली ...
उपचारासाठी चिमुकलीला रुग्णलयात नेत असतांना तिने रस्त्यातच जीव सोडला..
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...
मजुरी करून राहणाऱ्या शेतकऱ्याचे पत्र्याचे शेडचे घर जळून खाक
जीवनावश्यक वस्तू, दहा क्विंटल सोयाबीन जळून खाक
शेतकऱ्याचा संसार उघड्यावर; विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागल्याची माहिती
Pune: पुणे मेट्रो आता रात्री 11वाजेपर्यंत धावणार
पुणे मेट्रोने जानेवारी 2025 च्या अखेरीस प्रभावीपणे रात्री 11 वाजेपर्यंत कामकाजाची वेळ वाढविण्याची घोषणा केली आहे.
प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे
आणि रेल्वे स्थानक, विमानतळ, येथून येणार्या प्रवाशांसह रात्री उशिरापर्यंतच्या प्रवाशांना सामावून घेण्याचे उद्दिष्ट आहे.
या अंतर्गत वनाझ-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट कॉरिडॉरवरील शेवटच्या गाड्या ज्या सध्या रात्री 10 वाजता सुटतात; त्या आता रात्री 11 वाजेपर्यंत चालतील.रात्री 10 वाजल्यानंतर दोन्ही मार्गांवर सहा अतिरिक्त ट्रिप सुरू केल्या जाणार आहेत.
Pune: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पुण्यात महसूल विभागाचा आढावा घेणार
विभागीय आयुक्त कार्यालय, शेती विकास महामंडळ, नोंदणी महानिरीक्षक-मुद्रांक, जमाबंदी आयुक्त यांचे सादरीकरण होणार
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज पुण्यात महसूल विभागांतर्गत विविध विभागांचा आढावा घेणार आहेत.
महसूल मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बावनकुळे हे पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर येत आहेत.
Torres Scam: भाजी व्यापारी प्रदीप वैश्यच्या सतर्कतेमुळे टोरेस कंपनीचा भांडाफोड झाला.
अन्यथा पैसे आणि त्या दोघी पशार झाल्या असत्या
टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणात ज्या प्रदीप वैश्यचे 14 कोटी अडकलेत.
त्यानेच या गुन्ह्यांला वाचा फोडल्याचे तपासात समोर आले आहे.
प्रदीपचा याच टोरेस कंपनीच्या समोरील गल्लीच भाजीचा व्यवसाय आहे. होलसेल दरात तो भाजी विकतो
Pune: कारागृहातून मोकाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर रॅली काढणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक
आरोपींची पुणे पोलिसांनी काढली धिंड
येरवडा कारागृहातून सुटताच आरोपीने मोक्काच्या गुन्ह्यातून बाहेर सुटताच गुन्हेगाराची चारचाकी आणि दुचाकीवरून रॅली काढली होती
या प्रकरणाने खळबळ माजली असून, प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
या रॅली काढणाऱ्या गुन्हेगारासह त्याच्या तब्बल ५० साथीदारांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalna: जालना येथे आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने महा जनआक्रोश मोर्चा..
भाजप आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्यासह
स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख
भाऊ धनंजय देशमुख देखील या मोर्चाच उपस्थित राहणार आहेत.
Kolhapur: कोल्हापूरच्या वारे वसाहतीत कोयते नाचवत दहशत
किरकोळ वादातून तिघांचे कृत्य, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
हल्लेखोरांमध्ये एका सराईताचा देखील समावेश
लहान मुलांना दुकानातून हटकल्यामुळे दिली धमकी
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: मद्यातून महसुल वाढीसाठी राज्य सरकारतर्फे समिती गठीत, लाडकी बहीणसह इतर योजनांमुळे राज्याच्या तिजोरीत मोठया प्रमाणावर खडखडाट