- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Blog Updates: जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू!
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरावालीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज रात्री मनोज जरांगे मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. सरकारकडूनही मनोज जरांगेंना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे....More
सर्वोच्च न्यायालयाकडून अरुण गवळी यांना जामीन मंजूर
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जामीन
अरुण गवळींना सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील प्रलंबित
17 वर्षे अरुण गवळी कारागृहात, वय 76 याचा विचार करून जामीन मंजूर
न्या एम एम सुंदरेश आणि न्या कोटेश्वर सिंग यांच्याकडून जामीन मंजूर
वय आणि अपीलवरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून जामीन
भंडारा : आज आलेल्या मुसळधार पावसानं एका घराची भिंत कोसळली. या घटनेत एक गाय आणि चार शेळ्यांचा (बकऱ्या) मृत्यू झाला. तर एका महिलेसह एक गाय गंभीर जखमी झाली. ही घटना भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील निलागोंदी या गावात घडली. गंभीर जखमी महिलेला तातडीनं साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं कोसळलेल्या भिंतीचा मलबा काढून मृत आणि जखमी जनावरांना त्यातून बाहेर काढून जखमी जनावरांवर उपचार करण्यात आले. वैशाली वंजारी (35) असं गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नावं आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी भक्तांना कोंडीत अडकून बाप्पाला निरोप द्यावा लागतो. मात्र, यंदा अशी अडचण येऊ नये यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी एक अनोखा डिजिटल उपक्रम राबवला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील १० प्रभाग कार्यालयांच्या हद्दीतील विसर्जन स्थळांची माहिती गुगल मॅप्सवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घरगुती गणेश भक्तांना आपल्या सोयीनुसार जवळचे नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळ निवडता येणार आहे. विशेष म्हणजे, एखाद्या विसर्जन स्थळी गर्दी असल्यास गुगल मॅपद्वारे दुसरे पर्यायी स्थळही निवडता येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन विसर्जन सोयीस्कर व सुरळीत होणार आहे. भक्तांना फक्त एका क्लिकवर आपल्या गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर होणार आहे.
गडचिरोली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा गडचिरोलीत आज निषेध करण्यात आला. ओबीसी महासंघ आणि भारतीय जनता पार्टी तर्फे इंदिरा गांधी चौकात निषेध आंदोलन तथा जोडे मारो आंदोलन आयोजित केले होते. यावेळी ओबीसी महासंघाच्या तसेच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीचा समाचार घेत तीव्र शब्दात निषेध केला. ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी करण्याचा एक प्रकारे प्रयत्न मनोज जरांगे करीत असून हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा देत मनोज जरांगे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
लातूर : जिल्ह्यात मागील सोळा तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यातील दहा पेक्षा अधिक मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. अरुंद आणि कमी उंचीच्या पुलांवरून पाणी वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोरगावचा संपर्क पूर्णपणे तुटला असून लेडी नदीचे पाणी पुलावरून जात आहे. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे तसेच शेतजमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे.
लोणावळा : मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. आज हा मराठा समाजाचा मोर्चा हळूहळू लोणावळ्यात दाखल होतोय. परिणामी शहरात होत असलेली गर्दी पाहता, मोठी कोंडी होऊ शकते. अशात हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा होऊ शकतो. हे पाहता सर्व शाळा आणि महाविद्यालयांना दुपारी दोन वाजता विद्यार्थ्यांना घरी सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
भंडारा : मागील दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज भंडारा जिल्ह्यात सर्वदूर विजांच्या गडगडाटासह मुसळधार हजेरी लावली. मागील दहा दिवसांपासून पाऊस गायब झाल्यानं जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाले होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, अशांचे भातपीक शेतात उभे आहेत. पण, ज्यांच्याकडं सिंचनाची व्यवस्था नाही, अशांच्या शेतातील भातपीक करपायला लागली होती. पावसानं पाठ दाखविल्यानं वातावरणात प्रचंड उखडा निर्माण झाल्यानं नागरिकही बेजार झाले होते. आता विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनासोबतचं पावसानंही हजेरी लावल्यानं सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
ठाणे : दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनाचा आजचा दिवस असून ठाणे महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात पूर्वतयारी विसर्जनाची केली आहे. ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारल्या असून अनेक कृत्रिम तलावे देखील उभारली आहेत तर या दोन्ही ठिकाणी खाडी किनारी फक्त 6 फुटांपर्यंतच्या मूर्ती स्वीकारल्या जाणार आहेत> इतकेच नव्हे तर मासूंदा तलाव या ठिकाणी देखील एक कृत्रिम तलाव उभारले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता ठाणे महानगरपालिकेने यंदाच्या वर्षी अनेक पावले उचलल्याचे दिसून येत आहे.
धुळे : ऐन गणेशोत्सवात धुळे शहरात पावसाने आज हजेरी लावली असून यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसामुळे गणेश मंडळांना देखील याचा काही प्रमाणात फटका बसणार असून पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांमधून देखील समाधान व्यक्त होत आहे. धुळे जिल्ह्यात पुढील 2 दिवसाचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज नाशिकच्या मनमाड येथून सकल मराठा समाज बांधव रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईतून मराठा आरक्षणाचा गुलाल घेऊनच परत येऊ. आरक्षण न दिल्यास मंत्रालयाला घेराव घालू, असा इशारा मराठा बांधवांनी दिला आहे.
नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार, नांदेड दक्षिण भागात जोरदार पाऊस
नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी गावात शिरलं पाणी
पाण्यात बुडणारी म्हैस ग्रामस्थांनी दिली सोडून
धो धो पावसात माणिकराव ठाकरे व खादर रवींद्र चव्हाण यांचा पाहणी दौरा सुरू
नाशिक : गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमीच्या निमित्ताने नाशिकच्या गोदावरी घाटावर हजारो महिला एकवटल्या. सात ऋषींची पूजा करून कुटुंबाचे रक्षण व्हावे यासाठी प्रत्येक महिला ऋषिपंचमीच्या दिनी उपासना करत असते. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या गोदावरी नदी किनारी जिल्हाभरासह इतर जिल्ह्यातून देखील हजारो महिलांनी गर्दी केली आहे.
लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर) येथील रेणा मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 8.15 च्या सुमारास प्रकल्पाचे दोन दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले. सध्या 629.22 क्यूसेक इतका विसर्ग रेणा नदी पात्रात सुरू आहे. काल रात्री प्रकल्प 87 % भरलेला होता. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरू शकतो, याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बीड : धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून सकाळी 10 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग दुपटीने वाढवण्यात आला आहे. मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे सहा वक्री दरवाजे 0.50 मीटरने उघडून मांजरा नदीपात्रात 10482.84 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. कालपासूनच या धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते आणि त्यातून 5241 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात होता. मात्र, रात्रभर धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे आता पाण्याचा विसर्ग दुपट्टीने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरील नागरिकांना खबरदारीचे आव्हान प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
गोंदिया : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. साधारणतः 1 तास बरसलेल्या या पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. तर या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी करपलेल्या धान पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
नाशिक : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज नाशिकच्या नांदगाव येथून सकल मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईतून मराठा आरक्षणाचा गुलाल घेऊनच परत येणार, अशी आशा मराठा बांधवांनी व्यक्त केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आता शिवनेरीवर दाखल झालेत. शिवनेरीवर दाखल होताच मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे, याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी साथ दिली पाहिजे, असं म्हणाले. तसेच आम्ही मुंबईला जाणारच, असंही मनोज जरांगे यांनी सांगितले.
बीड : जिल्ह्यातील आष्टी येथील देवस्थान इनाम जमीन बेकायदेशीर खालसा आणि हस्तांतर करून विक्री केल्याच्या गुन्ह्यात माजी राज्यमंत्री सुरेश धस, त्यांच्या पत्नी आणि भावाला गुन्ह्यातून वगळण्यात आलं. त्यामुळे आमदार सुरेश धस यांना हा दिलासा मानला जातोय. मात्र याचिकाकर्ते राम खाडे यांनी सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका दाखल करणार असून सुरेश धस यांना आधी अटक करा. नंतर या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना दिल्ली येथे सांगितले आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपळेश्वर देवस्थान, विठोबा देवस्थान इतर सात ठिकाणच्या जमिनी बेकायदेशीर खालसा केल्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करून धस आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. मात्र आता सुरेश धस आणि इतर दोघांना या गुन्ह्यातून वगळल्याचा अहवाल पोलिसांनी विशेष न्यायालयात दाखल केला आहे.
मुंबई : सेंट्रल रिझर्व्ह फोर्सची एक तुकडी आझाद मैदान परिसरात दाखल झाली आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रॅपीड ॲक्शन फोर्स दाखल झाली आहे. दंगलसदृश्य परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीची ही यंत्रणा आहे. दरम्यान, रॅपीड ॲक्शन फोर्सच्या एका तुकडीत जवळपास 120 जवान असतात. आझाद मैदान परिसरात एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
विरार : विरारच्या इमारत दुर्घटनेला जवळपास ३३ तास होऊन गेले तरीही अद्यापही तिथे बचाव कार्य सुरू आहे. NDRF ची टीम आणि वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशम दलाचे जवान अजूनही ढिगा-याखाली लोकांना शोधत आहे. या संपूर्ण घटनेमध्ये आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जखमी झाले आहेत. यात जोईल कुटुंबाची कहाणी वेगळीच आहे.
उत्कर्ष जोईल हिचा मंगळवारी पहिला वाढदिवस होता. या संपूर्ण कुटुंबांना मोठा थाटामाटात आपल्या लाडक्या उत्कर्षाचा वाढदिवस साजरा केला आणि फोटो देखील काढले हे तेच फोटो आहे. हे केक कापल्यानंतर चे फोटो आहे. केक कापला आणि अवघ्या पाचच मिनिटात ही दुर्घटना घडली आणि पत्त्याचा बंगला कोसळावा तशी ही बिल्डिंग कोसळली कुणी स्वप्नात देखील हा विचार केला नसेल की ज्या मुलीचा पहिल्या वाढदिवस मोठ्या दममोठ्या थाटामाटा साजरा केला तिच्यासोबतच असं काहीतरी होईल.
तर या दुर्घटनेत उत्कर्षासोबत तिची आई आरोहीचाही मृतदेह सापडला आहे तर वडील ओंकार जोईल यांचा अद्यापही तपास लागला नाही. वसई विरार शहरातली ही अनधिकृत बांधकाम आता लोकांच्या जीवावर येवू लागली हे काही आता नव्याने सांगायला नको पंधरा दिवसांपूर्वी एकाचा अनधिकृत गळ्यामध्ये काचेचा लगदा पडून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता परंतु पालिकेला आतातरी जाग येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
नाशिकमध्ये आज भरणार संत संमेलन
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आणि कुंभमेळा च्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय संत संमेलन चे आयोजन
बालाजी सोशल ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आले संमेलन
संमेलनाला विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय उच्चाधिकार समिती सदस्य जितेंद्रनंद सरस्वती यांच्यासह साधू महंत आणि vhp चे पदाधिकारी उपस्थित राहणार
मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये 9 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी.
उपोषण, मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, सभा घेण्यास बंदी, पाच पेक्षा जास्त लोकांना परवानगीशिवाय एकत्र येत येणार नाही.
अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांच्याकडून मनाई आदेश.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आंदोलनाची ही सरकारला धास्ती.
गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाचा निर्णय.
धार्मिक कार्यक्रमांना सरकारचा आदेश लागू नसणार.
नाशिकच्या गंगापूर धरणावरून येत्या महिन्यात सी-प्लेन सेवा सुरू होण्याची चिन्ह.
महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ने एअर पोर्ट अथोरिटी ऑफ इंडियाकडे, आणि नागरी हवाई मंत्रालयाकडे विमानसेवा सुरू करणयासाठी सादर केला प्रस्ताव.
‘उडाण’ योजनेअंतर्गत गंगापुर धरणातून विमान सेवा सुरू होणार.
नाशिक पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार.
सातार, नागपूर, पंढरपूर, अहमदाबाद, शिर्डी आदी शहरांशी टप्याटप्याने विमान जोडण्याचा प्रयत्न केला जाणार.
प्रस्ताव मंजुरीनंतर लवकरच उड्डाणांना सुरुवात.होणार.
विदर्भातील अष्टविनायकांत स्थान असलेलं व दाढी-मिशी ठेवणारा ज्येष्ठ गणपती म्हणून भंडारा शहरातील भृशुंड गणेशाचं जागृत देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे. वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरातील मेंढा परिसरात भृशुंड गणेश मंदिर आहे. गणेशोत्सवामध्ये या मंदिरात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातूनचं नव्हे तर, लगतच्या मध्यप्रदेश राज्यातूनही लाखो गणेशभक्त याच्या दर्शनासाठी येतात. मनोकामना पूर्ण करणारा भृशुंड गणेश मंदिर अशी ओळख आहे. हेमाडपंथी पद्धतीनं बांधलेल्या या मंदिरात श्रीगणेशाची आठ फूट उंच व चार फूट घेराव असलेली सुंदर, आकर्षक मूर्ती आहे. अखंड शिळेवर कोरलेली ही चतुर्भूज मूर्ती मूषकावर विराजमान आहे. उजवा पाय खाली सोडलेला असून डाव्या पायाची मांडी घातलेली आहे. चारही हातांमध्ये पाश, अंकुश, मोदक आणि वरदहस्त आहेत. शिरोभागी पंचमुखी शेषफणा, मुखमंडळाच्या जागी नाकपुड्या, डोळे, दाढी, मिशी व मुखापासून सोंड निघाली असून ती डाव्या हातावरील मोदकाकडं वळण घेतलेली आहे. कमरेपासून गुडघ्याच्या पातळीवर महावस्त्राचा पदर व मेखला स्पष्ट दिसतो. भृशुंड गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर अत्यंत प्रसन्न वाटत असून सर्व मनोकामना पूर्ण होत असल्याचं भाविक सांगतात.
दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी व दलित चळवळीचे नेते विजय वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून परभणी ते मुंबई लाँग मार्च काढणारे तथा दिवंगत विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आपल्या समर्थकांसह आशिष वाकोडे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधी हे लढाई लढत आहेत. त्यामुळेच आम्ही काँग्रेसमध्ये जात असल्याचे वाकोडे यांनी सांगितले आहे.
लातूर : जिल्ह्याच्या सीमेवर आणि नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या धडकनाळ, बोरगाव परिसरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. नऊ दिवसांपूर्वी लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे गाव-शिवार पाण्याखाली गेले होते. मात्र ते पाणी पूर्णपणे ओसरायच्या आतच पुन्हा तुफान पावसाने पूराचा कहर केला आहे.
काल जिल्हाभरात मुसळधार पावसाची संततधार झाली. मांजरा, रेना, तेरणा आणि तावरजा यांसारख्या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत होत्या. अनेक लहान नद्या-नाल्यांना प्रचंड पाणी आल्याने त्यांचे पाणी आजुबाजूच्या गावांमध्ये शिरले. लेंडी नदीच्या उपनद्यांना पाणी आले ते पाणी धडकनाळ, बोरगाव या गावाच्या शिवारात आले.परिसरातील शेतं आणि घरे पुन्हा पाण्यात बुडाली आहेत.
गेल्या पूरातच या भागातील पूल वाहून गेले होते. त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. परंतु नव्या पुराच्या जोरदार लाटेला ते तग धरू शकले नाहीत आणि पुन्हा मोडून पडले आहेत. वाहतूक आणि संपर्क पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. गावात अजूनही पाणी शिरलेले असून नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. पूर्वीच्या पुरातून शेतकरी आणि ग्रामस्थ सावरलेले नाहीत, त्यात पुन्हा नव्या पुरामुळे झालेल्या नुकसानीने हतबलता वाढली आहे. प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच, पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज नाशिकमध्ये आढावा बैठक
आज रात्री मनोज जरांगे पाटील पोहचणार आझाद मैदानात
जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी उद्या सकाळी मराठा बांधव मुबंई ला निघणार आहे
आंदोलनाच्या पुर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बोलविण्यात आली बैठक
दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी व दलित चळवळीचे नेते विजय वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून परभणी ते मुंबई लाँग मार्च काढणारे तथा दिवंगत विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे आज काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत.आपल्या समर्थकांसह आशिष वाकोडे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत.संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधी हे लढाई लढत आहेत त्यामुळेच आम्ही काँग्रेस मध्ये जात असल्याचे वाकोडे यांनी सांगितले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उद्या आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत. जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर आंदोलक आझाद मैदान येथे दाखल होण्यास सुरूवात. आंदोलनावेळी कुठेही कायदा व सुव्यवस्थेचे उल्लघंन होणार नाही याचं हमीपत्र जरांगे पाटील यांनी त्यांच्या स्वाक्षरीने पोलिसांकडे दिले आहे.
विरार : विरारच्या इमारत दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा एकीकडे 15 वर पोहोचत असताना वसई विरार महापालिकेने या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर विरार पोलीस ठाण्यात अखेर सदोष मनुष्यवधाचा आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. नितल गोपीनाथ साने या बांधकाम व्यवसायीकाला विरार पोलिसांनी अटक ही केली आहे. सोबत जागा मालकावरही देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दोघांनी चार मजली अनाधिकृत इमारत सन २००८ ते २००९ मध्ये बांधली होती. या इमारतीमध्ये 54 फ्लॅट आणि चार गाळे होते. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम 52, 53 आणि 54 नुसार गुन्हा दाखल केला असून BNS कलम 105 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मुंबईच्या आझाद मैदानात हळूहळू आंदोलन येण्यास सुरुवात.
मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत येणार.
आझाद मैदानात जमलेल्या आंदोलकाकडून घोषणाबाजी
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे आता शिवनेरीवर दाखल झालेत... रात्री दोन वाजता मनोज जरांगेंचं पारनेरमध्येही जंगी स्वागत करण्यात आलं...हजारो मराठा बांधवासह मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत. ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.. दरम्यान मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या हालचालीत वेग... त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बोलावली तातडीची बैठक...
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तातडीने ही नियोजन बैठक बोलावली असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी माहिती.
जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले असताना सरकारच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत, ओबीसी अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार असा सरकारने आम्हाला लेखी दिले आहे, मात्र ओबीसी समाजात भितीचे वातावरण आहे. ओबीसी समाजाची ती भीती दूर करण्यासाठी व सरकार दबावात आले तर आपण काय भूमिका घ्यायची हे आजच्या बैठकीत ठरणार असल्याचे बबनराव तायवाडे म्हणाले
या संदर्भात बबनराव तायवाडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी
बाईट- बबनराव तायवाडे tictak
रात्रभर प्रवास करुन मनोज जरांगे थोड्याच वेळात शिवनेरीला दाखल होणार आहेत..
शिवनेरीला येत असताना ठिक ठिकाणी जरांगेंचं स्वागत झालं..
रात्री 2 वाजता जरांगे अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये पोहचले तिथही जरांगेंचे स्वागत करण्यात आलं
गणेशोत्सवाच्या आदल्या रात्री इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनं सारा वसई विरार परिसर हादरला. विरार पूर्वच्या विजयनगर परिसरातल्या या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा काही भाग कोसळला. या दुर्घटनाग्रस्त इमारतीचं नाव रमाबाई अपार्टमेंट असं आहे. या इमारत दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पात पाण्याचा येवा वाढला आहे... त्यामुळे आज रात्री अकरा वाजता मांजरा प्रकल्पाचे चार दरवाजे ०.२५ मीटरने उघडून लातूर शहरातून वाहणाऱ्या मांजरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे... सद्यस्थितीत मांजरा प्रकल्पाचे सहा दरवाजे ०.२५ मीटरने उघडून मांजरा नदी पात्रात ५२४१.४२ क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे... पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मांजरा नदी काठावरील गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
ॠषिपंचमीनिमित्त ३५ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून दरवर्षी अथर्वशीर्ष पठण
मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षी गणेशोत्सवात ॠषिपंचमीनिमित्त ३५ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण
पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३५ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू!