Maharashtra Breaking News: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाच्या सरी; पुढील तीन तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Breaking News: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....

मुकेश चव्हाण Last Updated: 25 Jul 2025 03:45 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. मात्र माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय चर्चेत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार...More

रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला, ढालकाठी धबधबा प्रवाहित

रायगड: येथे पावसाचा जोर वाढला असून आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर राहण्याच्या हालचाली सुरू करत आहे. दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने चांगलीच बॅटिंग सुरू केली असून या पावसात महाड तालुक्यातील ढालकाठी धबधबा देखील चांगलाच प्रवाहित झालाय. पावसाळ्यात या धबधब्यावर मोठी गर्दी होत असते मात्र मागील आठवडाभर कमी झालेला पावसामुळे या धबधब्याच्या प्रवाह कमी झाला होता. मात्र, आज सुरू झालेल्या पावसामुळे हा धबधबा पुन्हा फेसाळलेल्या स्वरूपात कोसळताना पहायला मिळतोय.