Maharashtra Breaking News: कोकणाला आजपासून दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी; तर मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट

Maharashtra Breaking News: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....

मुकेश चव्हाण Last Updated: 24 Jul 2025 03:57 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाचा निधी वर्ग करण्याआधी फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. तर अंतिम मंजुरी देवेंद्र फडणवीसांनी देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. तर रायगडसह...More

एसटी बसच्या धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

बीड : अहिल्यानगर-अहमदपूर महामार्गावरील पाटोदा येथे भरधाव एसटी बसने दुचाकी स्वाराला धडक दिली. या घटनेत पती-पत्नी जागीच ठार झाले. बाळू वाईकर आणि लता वाईकर असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे दाम्पत्य पाटोदा तालुक्यातील भाटेवाडी गावचे रहिवासी आहेत. आठवडे बाजारासाठी पाटोदा येथे ते येत असताना ग्रामीण रुग्णालयासमोर एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात बस खाली आल्यानं या दाम्पत्याचा मृत्यू झाला.