Maharashtra Live Blog Updates: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काल संध्याकाळी एकाच वेळी बीकेसीतल्या एकाच हॉटेलमध्ये असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. वांद्र्यामधील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते संध्याकाळी सहा-सात वाजल्यापासून...More
करून मुंडे बाईट पॉईंटर
धनंजय मुंडे तुम्ही सहा महिना गप्प बसलात डोळ्यावर चष्मा घातला
कारण आज लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे नाही आहे
जे तुम्ही घाण पसरवली आहे त्याचे उत्तर तुमच्याकडे नाही
डोळा समोर घेऊन जनता मध्ये जाण्याचे तुमची लायकी
तुम्ही सांगता जिल्हाच्या बदनामी करू नका जिल्हाची बदनामी तुमच्या कारणामुळे झाली आहे
लोकांच्या मर्डर लोकांवर अत्याचार करणे महादेव मुंडे मर्डर प्रकरणे संतोष देशमुख हत्या स्वतःची बायको च्या गाडीमध्ये रेप करणे जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये मारहाण करणे तुमचे कार्यकर्ते चुकीचे काम करत आहेत
या सर्व गोष्टीला तुम्ही पाठिंबा देता आज पण हे सर्व चालू आहे
म्हणतो आज लोहा आहे खरंच तू लोहा आहे लोह्याला कोणी संपू शकत नाही पण लोह्याला लागलेला जंक स्वतः संपून देतो...
भंडारा : नाना पटोले ऑन कृषिमंत्री कोकाटे
---------------------------------------------
भाजप प्रणित सरकार बेशरम, नालायक आणि बधिर
सरकारला पायउतार करण्यासाठी जनता आणि शेतकऱ्यांनी मोट बांधली पाहिजे
कृषी मंत्र्यांच्या सभागृहातील वर्तनावरून नाना पटोलेंचं भाजप सरकारवर ताशेरे
Anchor : कृषिमंत्री कोकाटे हे सभागृहात मोबाईलवर जंगली रमी ॲपवर गेम खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला. कृषिमंत्र्यांच्या अशा वर्तनावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपप्रणित राज्य सरकारवर चांगलेचं ताशेरे ओढले. जेव्हा जेव्हा सभागृहात शेतकऱ्यांचा मुदद्दा उपस्थित करण्यात आला, तेव्हा तेव्हा कृषिमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. आणि ज्या वेळेस उपस्थित झाले तर ते रमी खेळण्यात व्यस्त असल्याचं त्या व्हिडिओवरून दिसत आहेत. त्यामुळं भाजपचं सरकार बेशरम, नालायक असून ते बधिर झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नाना पाटोले यांनी केलाय. या सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी आता जनता आणि शेतकऱ्यांनीच मोट बांधली पाहिजे, असा रोष नाना पटोले यांनी व्यक्त केलाय.
Byte 1 : नाना पटोले
Byte मुद्दे
# बेशरम आणि नालायक सरकार आहे. बधिर झालेलं हे सरकार आहे.
# मोदींना शेतकऱ्यांचा बाप म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला.
# शेतकऱ्यांचा बाप मोदी होऊ शकत नाही, शेतकरी तुमचा बाप होऊ शकतो.
# कृषिमंत्र्यांच्या राजीनामा मागणार नाही, त्यात वेळ घालविण्यापेक्षा आता जनता आणि शेतकऱ्यांनीच मोट बांधली पाहिजे.
# या सरकारला पायउतार करण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे
बीड ब्रेक:
Anc:बीडच्या गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे प्रेम संबंधातून मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल पाऊण तास नातेवाईकांनी तलवाडा पोलीस ठाण्याबाहेर ठेवण्यात आला. यातील आरोपींना अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणात मुलीच्या वडिलांना भावाला आणि चुलत्याला अटक करण्यात आली आहे. मात्र इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
या आरोपींना लवकरच अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी तरुणाचा अंत्यविधी केला आहे. शिवम काशिनाथ चिकणे या 21 वर्षीय तरुणाचे गावातीलच एका मुली सोबत प्रेम संबंध होते यातून मुलीच्या कुटुंबीयांनी मारहाण केली आणि उपचारादरम्यान शिवम चा दुर्दैवी मृत्यू झाला. अखेर 24 तासानंतर शिवम वर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वसई : महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर हे आज वसईत तब्बल दहा मिनिटे लिफ्टमध्ये अडकले. वसई पश्चिमेतील कौल हेरिटेज सिटी येथील अपुलँड ग्रँड बॅन्क्वेट हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी दरेकर आले होते.
या शिबिरासाठी आलेल्या अनेक मान्यवरांमध्ये दरेकर यांच्यासोबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडीत आणि नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक हे देखील लिफ्टमध्ये होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लिफ्टची क्षमता केवळ १० जणांची असूनही त्यामध्ये १७ जण चढल्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन लिफ्ट अचानक बंद पडली. परिणामी लिफ्टमध्ये अडकलेले सर्वजण चिंताग्रस्त झाले.
घटनेनंतर कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. लोंखंडी रॉडच्या साहाय्याने लिफ्टचा दरवाजा उघडण्यात आला आणि लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
सुरक्षितपणे लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर प्रविण दरेकर आणि राजन नाईक यांनी पाणी पिऊन विश्रांती घेतली. या घटनेमुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, मात्र पुढे शिबिर सुरळीत पार पडले.
भंडारा : परिणय फुके स्टेटमेंट
---------------------------------------------
AI च्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून कोकाटेंची बदनामी
भाजप आमदार परीणय फुके यांनीही केली कोकटेंची पाठराखण
Anchor : कृषिमंत्री कोकाटे हे सभागृहात मोबाईलवर जंगली रमी ॲपवर गेम खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट करीत व्हायरल केला. यावर शिंदे शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाठराखन केल्यानंतर आता भाजपचे आमदार माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनीही हा व्हिडिओ AI च्या माध्यमातून तयार करून कोकाटेंची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा केलाय.
Byte 1 : परिणय फुके
Byte मुद्दे
# तो फेक व्हिडिओ आहे. कोकाटे जिथं बसतात तिथेचं मी त्यांच्या मागं बसतो. मी कधीही माणिकराव कोकाटे यांना असं कधीही गेम खेळताना बघितलेलं नाही.
# सभागृहाच्या आत कुणीही आपापले मोबाईल बघतात, आम्ही पण बघतो. काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आम्ही गुगलच्या माध्यमातून, चाट च्या माध्यमातून ते घेत असतो. मला असं वाटते की ते तेच घेत असावेत.
# मात्र, त्यांचा तसा व्हिडिओ घेऊन AI च्या माध्यमातून जंगली रमी चा व्हिडिओ टाकून मंत्री कोकाटे यांनी बदनाम करण्याचं काम रोहित पवारांच्या माध्यमातून होत असताना.
# हा AI च्या माध्यमातून तयार झालेला फेक व्हिडिओ असल्याचा दावा, माजी राज्यमंत्री तथा भाजपचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी केला आहे.
---------------------------------------------
संजय राऊत हे अमित शहा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी रोज भांडी धूनी करतात
आमदार परीणय फुकेंनी लगावला संजय राऊत यांना टोला
Anchor : अमित शहा यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना बदलणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. यावर भाजप आमदार परीणय फुके यांनी, संजय राऊत हे अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी धुनीभांडी करीत असेल म्हणूनचं त्यांना हे सर्व माहीत होत असेल असा टोला लगावला.
Byte 2 : परिणय फुके (0.18)
Byte मुद्दे
# संजय राऊत हे अमित शहा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी रोज भांडी धूनी करायला जातात.
# त्यांना इतक्या लवकर, इतक्या सगळ्या गोष्टी, इतक्या इंटरनल गोष्टी माहीत पडतात.
# संजय राऊतांनी भांडीकुंडी धुण्याचं काम सुरू ठेवावं... भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर खुश आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत पोलिसांचा हलगर्जीपणा ?
उद्योग मंत्री उदय सामंत यांना झेड सुरक्षा यंत्रणा असतानाही त्यांच्या सुरक्षेत मोठा हलगर्जी पणा उघड.
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मुंबई ते कोल्हापूर प्रवासात पोलिसांची सुरक्षा पायलट कार आणि एसपीयू कार नाही.
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर याआधी तीन वेळा जीवघेणा हल्ला झाला असतानाही सुरक्षा यंत्रणेत पोलिसांकडून मोठी चूक.
मी व्हिडिओ बघितलेला नाही, त्यामुळे मला काही माहीत नाही..अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओवर दिली... आ.रोहित पवार यांनी आज कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानभवनात जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत मंत्र्यांना काही कामे राहिलेले नाही सर्व कामे भाजप करतात अशी पोस्ट केली होती..त्यावर मंत्री भुजबळ यांनी प्रतिक्रिया न देता मला माहीत नाही, मी तो व्हिडिओ बघितलेला नाही असे उत्तर देत माध्यमांना प्रतिक्रिया द्यायचे टाळले..
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
आझाद मैदान पोलीस स्थानकातील पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात हा गुन्हा काल दाखल करण्यात आला आहे
आमदार रोहित पवार यांचा पोलिसांशी गैरवर्तन केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
गोवा राज्यातून होणाऱ्या अवैध मद्याच्या तस्करी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यात कारवाई
बनावट मद्य विकणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर कारवाई करत पाच आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागांनी केली अटक
31 लाख 56 हजार 495 रुपये किमतीची बनावट दारू करण्यात आली जप्त
अवैध आणि बनावट दारूचे 84 बॉक्स राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले जप्त
गोव्यातून पुण्यात आरोपी करत होते दारूची तस्करी
पाचही आरोपी पुण्यात ही बनावट दारू विक्रीसाठी अवैधरित्या आणत होते
Pune Crime : तरुणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न, विनयभंग करणार्या ज्योतिषाला अटक
तरुणीला एकांतात बोलावून मंत्र देण्याच्या ऐवजी विनयभंग करण्याचा प्रयत्न
पुण्यातील संतापजनक घटनेनंतर ज्योतिषाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणार्या एका भोंदू ज्योतिषाने हे कृत्य केलं आहे
पुण्यातील धनकवडी भागातील घटनेने संताप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 23 जुलै तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 जुलै रोजी पंढरपूर मध्ये येणार .. एका महिन्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा दुसऱ्यांदा पंढरपूर दौरा ..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 23 जुलै रोजी संत नामदेव महाराज 675 वा समाधी सोहळा कार्यक्रम साठी उपस्थिती लावणार ..
संत नामदेव पायरी जवळ समाधी दर्शन, संत नामदेव यांच्या वंशजाचे संत पूजन
संत नामदेव मंदिरास भेट असा कार्यक्रम आहे.
23 जुलै रोजी दुपारी वाजता ते दुपारी दोन वाजता असा कार्यक्रम आहे.
तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या वंशजकडून भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज पुरस्कार देण्यात येणार आहे ..
Beed News : बीडच्या परळी मध्ये राष्ट्रीयकृत बँकांकडूनच शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. येथील एका शेतकऱ्याने एसबीआय मधून पीक कर्ज घेतले होते मात्र ते पीक कर्ज थकीत झाल्याने बँकेने थेट त्या शेतकऱ्याच्या खात्यावरील सर्व व्यवहार होल्ड केले. शेतकरी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता हा सर्व प्रकारच्या लक्षात आलाय.
याबाबत शेतकऱ्याने बँक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी कर्ज थकीत राहिल्यामुळे खात्याची व्यवहार थांबवल्याचे सांगितले. यासाठी तुम्ही आता तालुका कृषी अधिकाराचे पत्र आणा नंतर आम्ही व्यवहार पूर्ववत करू असे सांगण्यात आले. यावर सदरील शेतकऱ्याने कृषी कार्यालय गाठले.मात्र कृषी कार्यालयाकडून पत्र देण्याचा अधिकार नसल्याचे शेतकऱ्याला सांगण्यात आलेय.परळी तालुक्यात आधीच पाऊस नसल्यामुळे शेतकरी संकटात असताना आता त्याच्या बचत खात्यावरील असलेले पैशासाठी देखील बँकांकडून अडवणूक केली गेल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे दिसून आले आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई होणार
जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीवर देखील मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यासाठी प्रताप सरनाईकांकडून पोलिसांना अल्टिमेटम
15 ऑगस्टला ड्रग्जबाबत बैठक त्यापूर्वी सर्व आरोपींना अटक करा, पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या सूचना
पालकमंत्री येतात म्हणून त्यांना दाखवण्यासाठीच आरोपींना अटक असेल तर ते चुकीचं , गेले काही दिवसात पालकमंत्र्यांच्या दौऱ्याच्या अगोदरच आरोपी होतात अटक
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अजूनही 14 आरोपी फरार, आरोपी देशा बाहेर गेले का ?, पालकमंत्र्यांचा सवाल
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात डाऊन लाईनवर ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर ही पहाटे दीड ते दोन वाजेपासून तुटल्याने संपूर्ण मध्य रेल्वेच्या रेल्वे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे अनेक प्रवासी गाड्या या ठप्प झाले असून युद्ध पातळीवर भुसावळ विभागातील रेल्वे प्रशासनाकडून तीन पथकांच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम सुरू आहे.
भंडारा : वाळूचं होतं असलेलं उत्खनन आणि त्याची वाहतूक यावर कारवाई करण्याकरिता गेलेल्या पोलिसांच्या पथकावर वाळू माफियानं ट्रॅक्टर चालवून त्यात एका पोलिसाला गंभीर जखमी केल्याची घटना भंडाऱ्याच्या खमारी बुटी इथं घडली. कायदा पोलीस स्टेशन हद्दीतील खमारी बुटी येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचं अवैधपणे उत्खनन करून त्याची वाहतूक करण्यात येत होती. यावर कारवाई करण्याकरिता कारदा पोलिसांचं एक पथक तिथे गेला असता ट्रॅक्टरसह चालकांनी सैरावैरा पडला. त्यातील एका ट्रॅक्टर चालताना कारवाईच्या भीतीपोटी थेट त्याचा ट्रॅक्टर पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर चालविला. यात अर्धा पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत असलेले त्र्यंबक गायधने (४४) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भंडाराच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या कारवाईत कर्दा पोलिसांनी १५ ट्रॅक्टर जप्त केले असून पुन्हा पोलिसावर प्राणघातक हल्ला करणे आणि वाळूची अवैध चोरी करणे असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Pune : येत्या गुरुवारपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी नॉनव्हेज प्रेमींनी आज पुण्यातल्या मटण आणि चिकन मार्केटमध्ये मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.. त्यात आज रविवारचा मुहूर्त साधत मटण खाण्यासाठी आजचा शेवटचा रविवार असल्याने पुणेकरांनी पहाटेपासून मोठी गर्दी या मटणाच्या दुकानाच्या बाहेर गेलेली पाहायला मिळत आहे.. पहाटे सहा पासून लोकांनी भली मोठी रांग पुण्यातील मटण दुकानांच्या बाहेर लावलेली आहे.. अवघ्या तीन दिवसात श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे त्यानंतर या नॉनव्हेज प्रेमींना मटार आणि चिकन खाता येणार नाही म्हणून आजच हे सगळे आपल्या आवडत्या नॉनव्हेज पदार्थावर ताव मारणार आहेत.. यासाठीच शहरातील सर्व दुकानांबाहेर मटण आणि चिकन खरेदीसाठी आता पुणेकरांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत... पुण्याच्या मटण मार्केट मधून आज जवळपास 5000 किलो मटणाची विक्री होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे
अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या शरिफुल इस्लामने केला जामिनासाठी अर्ज
सैफ अली खानवर हल्ल्याची कहाणी काल्पनिक जमीन अर्जात शरीफुलचा दावा
बांगलादेशी नागरिक असलेल्या मोहम्मद शरिफुलने सत्र न्यायालयात केला जामिनासाठी अर्ज
अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील राहत्या घरात घुसून चाकूचे जीवघेणा हल्ला केल्याचा शरीफुलवर आरोप
हल्ल्याप्रकरणी १९ जानेवारीला शरिफुलला झाली होती अटक तेव्हापासून आर्थर रोड कारागृहात कैद
आपण निर्दोष असून आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा हा काल्पनिक असल्याचा दावा जामिनाची मागणी करताना त्यांनी केला आहे
न्यायालयाने सरकारी पक्षाला २१ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचे दिले आदेश
वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने शरिफुलचा जमीन अर्ज फेटाळल्यानंतर शरिफुलची सत्र न्यायालयात धाव
गडचिरोली : राज्यात 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' या अभियानांतर्गत 10 कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 22 जुलै रोजी गडचिरोलीतील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी 1 कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट असून पहिल्या टप्प्यात 40 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य आहे. या मोहिमेत जिल्हा प्रशासनाच्या विविध 50 विभागातील 15 हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. या अभियानाची जय्यत तयारी आता पूर्ण झाली आहे.
- देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळी
- मध्यरात्रीच्या सुमारास वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत
- मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर घडली घटना
- ही घटना घडण्याच्या थोड्यावेळा अगोदर अस्वली ते पाडळी दरम्यान सुद्धा तुटली होती ओवर हेड वायर तिचे काम पूर्ण झाल्यावर नाशिक रोड जवळ तुटली बाहेर
- रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल ओरडवार बसवण्याची काम युद्ध पातळीवर सुरू
- मात्र या प्रकाराने मध्य रेल्वेची अप मार्गाची वाहतूक कोरमडली
- गाड्या पाच ते सहा तास उशिराने सुरू
मालेगाव : नाशिकच्या मालेगाव येथील हिंगलाज दुहेरी हत्याकांडातील मारेकरी सलमान मन्सूर शेख यास पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मेरठमधून अटक केली आहे.१७ नोव्हेंबर २०२२ साली मालेगावच्या हिंगलाजनगर भागात वृद्ध दाम्पत्याची हत्या करून आग लावून त्याने पुरावा नष्ट केला होता.सलमान याने मेरठमध्ये देखील एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याप्रकरणी अटकेत होता..त्यावेळी त्याने मालेगावात वृद्ध दाम्पत्याची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यास अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे..
दाट धुक्यामुळे धावपट्टीचे दृश्यमान कमी असल्याने इंडिगो कंपनीच्या दोन विमानांना नागपूर विमानतळावर लँडिंगच्या शेवटच्या क्षणाला गो-अराउन्डचा कॉल घ्यावा लागला.
काल सकाळी 7 वाजता नागपूर मध्ये धुक्यांची दाट चादर होती. त्यावेळी नागपूर विमानतळावर मुंबई - नागपूर व बंगरुळु - नागपूर हे विमाने लँड होणार होती. मात्र लॅन्डिडच्या शेवटच्या क्षणाला धावपट्टीचे दृश्यमान कमी असल्याने विमानाने परत अवकाशात झेपावली . अहमदाबाद विमान अपघाताची आठवण करत प्रवाशांनमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
मात्र दोन्ही विमानांनी 20 मिनिटे हवेत धीरट्या मारल्या, दृश्यमान नीट झाल्यानंतर दोन्ही विमानांनी सुखरूप लँडिंग केली व प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.
जम्मू-काश्मीरमधल्या पहलगाम हल्ल्याचा चीनकडून तीव्र निषेध...पण लष्कर ए तोयबाची संलग्न संघटना टीआरएफचा उल्लेख टाळला...दहशतवादाविरोधात सहकार्य वाढवण्याचं सर्व देशांना आवाहन...
देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे तीन तासच एकाच हॉटेलमध्ये, फडणवीसांच्या भेटीचा आदित्य ठाकरेंकडून इन्कार नाही, चाललंय ते चालू द्या म्हणत गेले निघून...बातम्या बघून आता एक व्यक्ती गावी जाईल, नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला..
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक, अजेंडा आणि विधेयकावर चर्चा होणार
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक