Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....

मुकेश चव्हाण Last Updated: 19 Jul 2025 05:06 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: हिंदीची सक्ती करून दाखवाच असं आव्हान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मीरारोडमधल्या सभेतून दिलं आहे. दुकानंच नाही तर शाळाही बंद करण्याचा इशारा देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला....More

नागपूर मध्ये पुष्पा स्टाईल गांजाच्या तस्करीचा प्रकार

नागपूर गांजा तस्करी 


नागपूर मध्ये पुष्पा स्टाईल गांजाच्या तस्करीचा प्रकार पुढे आला आहे..


ट्रकच्या फ्लोवरच्या खाली स्वतंत्र कप्पे करून १०६ किलो २८ लाख किमतीचा गांजा उडीसा राज्यातून नागपूर मध्ये आणला जात होता. 


पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर- हैदरबाद मार्गावर सापळा रचण्यात आला. 


चालक ताजमोहमद शेख व क्लीनर रामलखन गुप्ता याला ताब्यात घेतले. सुरवाती आरोपी पोलिसांना सहकार्य करत नव्हते. पोलिसांनी कसून चौकशी केली असता गांजा तस्करीचा नवीन फंडा बघून पोलिस देखील चरकारवून गेले. 


या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपीला अटक केली असून आरोपीचा आंतरजीय टोळीचा संबंध पुढे आल्याने या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे 


बाईट- संदीप बुवा, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा