Maharashtra Live: रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; रेड अलर्ट जारी, सहा तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर.

रोहित धामणस्कर Last Updated: 15 Jul 2025 05:59 PM

पार्श्वभूमी

Raigad Rain: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनंतर रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्ह्यातील माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर...More

रायगड दिवसभरातील पावसाचा आढावा

रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात 98.01 mm पावसाची नोंद करण्यात आली आहे.या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रोहा, नागोठणे, पाली,म्हसळा,महाड मधील भागाला बसला. काही भागांमध्ये पावसाचे पाणी घरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाल होत तर मुंबई गोवा महामार्गासहित इतर राज्य मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक ठप्प पडली होती. सहा तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली होती.जिल्ह्यातील प्रामुख्याने पूरपरिस्थिती निर्माण करणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या सुध्दा धोका पातळीपर्यंत पोहचल्या आहेत त्यामुळे आता जरी पावसाचा जोर कमी झाला असला तरी येत्या काही तासात पुन्हा हा जोर वाढला तर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.