Maharashtra Live Blog Updates: कल्याणमध्ये पुन्हा मराठी-अमराठी वाद; मनसेकडून हॉटेल चालकाला चोप
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: 11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा काढण्यात येणार आहे. निवडणुकीत मतांची चोरी झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपांवर इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत झालं आहे. महाराष्ट्रात...More
येरवड्यातील गणेश नगर परिसरात मध्यरात्री हातात धारदार कोयते घेऊन आणि चेहऱ्यावर रुमाल बांधून आलेल्या टोळक्यांनी दहशत पसरवली. औद्योगिक शाळा, लॉकअप ग्रुप परिसर, दुर्गा माता मंदिर परिसरात टोळक्यांची गर्दी झाली होती. काही दिवसांपूर्वीच लक्ष्मी नगरमध्ये दोन गटांमध्ये गँगवार झाल्याने वातावरण आधीच तणावपूर्ण होते. या नव्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे.
सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ता शरणु हांडे अपहरण-मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अमित सुरवसे, सुनील पूजारी, दीपक मेश्राम आणि अभिषेक माने यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली असून या प्रकरणातील पुढील सुनावणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे.
कल्याण पूर्वेतील दुर्गा माता मंदिर परिसरात मराठी-अमराठी वाद पुन्हा एकदा उफाळून आला. एका इडली हॉटेल चालकाने मराठी माणसांविषयी अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित हॉटेल चालकाला हॉटेलसमोरच चोप दिला. गोंधळानंतर हॉटेल चालकाने माफी मागितली. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
अलिबाग : येथे हिंदीनंतर आता गुजराती पाट्यांकडे मनसेने मोर्चा वळवलाय. महाराष्ट्रात मराठी पाट्यांना दुय्यम स्थान देऊन काहीजण गुजराती पाट्या लावताना दिसतायेत. त्यामुळे अलिबागची मनसे चांगलीच आक्रमक झालीय. महाराष्ट्रात मराठी पाट्याच लावाव्यात असा आग्रह करीत त्यांनी तात्काळ गुजराती पाट्या हटवा अन्यथा काळे फासू असा गर्भित इशारा अलिबागमधील काही गुजराती व्यावसायिकांना दिलाय. या पाट्या काढून मराठी करण्यासाठी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय.
कराड : गेल्या आठ ते दहा दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारी अचानक कराड शहरात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे लोकांची चांगली तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन तासापासून हा पाऊस सुरू आहे.
नाशिक : पुण्यातील रेव्हपार्टी प्रकरणातील आरोपी आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात भाजपकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे खेवलकर यांचे आदर्श पती ड्रग्सचा दलाल बलात्काराचा गुन्हेगार प्रांजल खेवलकर याचा धिक्कार असो, अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांकडून प्रांजल खेवलकर यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
मनसे आणि ठाकरेंची शिवसेना नाशिकमधे काढणार सरकार विरोधात मोर्चा
मोर्चा काढण्याआधी दोन्ही पक्षाचे नेते जिल्हयात संयुक्त दौरा करणार
शेतकरी प्रश्न, गुन्हेगारी, रस्त्यावरील खड्डे, हनी ट्रॅप यासह विविध मुद्यावर काढणार मोर्चा
मोर्चासाठी दोन्ही पक्ष्याच्या वरिष्ठ नेत्याना निमंत्रण देणार
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालय समोर राज्यातील थकीत ठेकेदारांच्या बिला संदर्भात सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे यांनी आमरण उपोषण सुरू करण्यात केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलथापालथ करण्यासाठी विकास दाखवला जातो. हा विकास करणाऱ्या राज्यातील बारा हजार छोट्या मोठ्या ठेकेदारांची सुमारे 89 हजार कोटी रुपयांची बिल थकवली आहेत. त्याचा पहिला बळी ठेकेदार हर्षद पाटील याचा झाला. उर्वरित ठेकेदारांचा जीव वाचवण्यासाठी प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात आल्याचे उबाळे यांनी म्हटले आहे. या उपोषणाला राज्यभरातून बिल्डर असोसिएशन, कॉन्ट्रॅक्टरने पाठिंबा दिला आहे.
तुळजापुरात मराठा कार्यकर्त्यांचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घातल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटलांना मुंबईला जाण्याची वेळ येऊ देऊ नका? असे निवेदन यावेळी बावनकुळेंना देण्यात आले आहे. सरकार मराठ्यांचा अंत पाहत आहे का? असे सवाल देखील यावेळी विचारण्यात आला. तर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. मराठा समाजासोबत सरकार उभं आहे. मराठा आरक्षणासाठी सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळापासून सुरू झाली. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची आरक्षणावर कायम चर्चा होते, असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे.
वाशिम : जिल्ह्यात आज सकाळ पासून बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावाजवळून वाहणाऱ्या लेंडी नाल्याला पूर आल्यामुळे अकोल्याच्या पिंजरला जोडणारा मार्ग बंद झाला होता ....तर दुसरीकडे रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर आल्याने मेहकर ते रिसोड मार्गावरील पुलावर पाणी आल्याने हा मार्ग देखील बंद पडलाय
इव्हेंट करण्यास विरोध नाही, रॅपिडो कंपनीला तुम्ही पकडता, परवानगी नसताना महाराष्ट्रात काम करत होती. मीडिया कव्हरेज होतं तुम्ही फेमस होता. दोन, तीन महिन्यानंतर त्याच कंपनीला तुमच्या एका इव्हेंटला मोठी स्पॉन्सरशिप द्यायला लावली जाते. तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाचा वापर करून कंपनीला धमकावलं, धमकावल्यानंतर त्या कंपनीशी वाटाघाटी केली. त्यानंतर काही कोटींची स्पॉन्सरशिप घेतली, असा गंभीर आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर रोहित पवार यांनी केला.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा जनता दरबार
दादर माहिममध्ये ठाकरेंना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न
पालकमंत्री आशिष शेलार यांचा दादरमधील जी उत्तरच्या कार्यालयात जनता दरबार
मुंबईत भाजपकडून प्रत्येक प्रभागात घेतले जात आहेत जनता दरबार
आगामी पालिका निवडणुकीआधी भाजपकडून नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्यावर भर
भंडारा : खरीप हंगाम सुरू असल्यानं शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांवर झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकरांनं हल्ला केला. यात तीन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील पालोरा ते केसलवाडा या राज्य मार्गावर घडली. करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिघांनाही पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. वन विभागानं याची दखल घेत जखमींना तातडीनं आर्थिक मोबदला द्यावा आणि नागरीवस्ती शेजारी आलेल्या रानडुकरांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
पुणे : ५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास हडपसर येथे दोन दुचाकीवर टोळक्याने हातात कोयते, तलवारी, लोखंडी रॉड घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यांनी दुकानांच्या शटरवर, वाहनांवर बेधुंदपणे वार करत तोडफोड केली आणि परिसरात भीतीचं वातावरण तयार केलं. फरार आरोपींना हडपसर पोलिसांनी अहिल्यानगर येथून जेरबंद केले, गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी साडेसतरानळी परिसरात त्यांची धिंड काढून मस्ती जिरवली. जेथे दहशत तेथेच धिंड पुणे पोलिसांचा हा नवा पॅटर्न राज्यभर चर्चेत आला आहे.
नागपुरातील यशोधरानगर पोलिस स्टेशन हद्दीत राजीव गांधीनगर पुलाजवळ कुख्यात गुंडांची हत्या करण्यात आली आहे. समीर शेख ऊर्फ येडा शमशेर खान असे मृत गुंडाचे नाव आहे. कुऱ्हाड आणि बेसबॉलच्या बॅटने वार करत हत्या करण्यात आली असून वर्चस्वाच्या लढाईतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत इसम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर असून, त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, असे 31 गुन्हे दाखल आहेत. गांजातस्करीच्या गुन्ह्यांतदेखील तो सहभागी होता. यशोधरानगर भागात गुन्हेगारांसोबत असलेल्या स्पर्धेतून आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
नाशिक : मनमाड-नांदगाव दरम्यान मालगाडीचा एक डबा घसरल्याची घटना घडली. नांदगाव आणि मनमाड येथील तांत्रिक पथकाने युद्धपातळीवर काम केले आणि डबा उचलण्यात यश आले. गाडी घटनास्थळावरून नांदगाव रेल्वे स्थानकाकडे रवाना झाली आहे. डबा घसरण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम वरिष्ठ रेल्वे अधिकारी करत आहेत. सध्या रेल्वे वाहतूक सुरळीत झाली असून राजधानी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.
पुण्यात विकृतीचा कळस; नराधमाने केला कुत्र्यावर अत्याचार
पुण्यातील टिंगरेनगर परिसरात एकाने रस्त्यावरील कुत्र्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर
नराधमावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
होनाप्पा होस्मानी असे नराधमावर नाव
याबाबत २७ वर्षीय तरुणीने तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
३ ऑगस्टला दुपारी तीनच्या सुमारास तरुणीच्या घराच्या समोर ही घटना घडली. तरुणीच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये, सार्वजनिक रस्त्यावर, गल्लीमध्ये आरोपीने एका फिरस्त्या श्वानाला वारंवार मारहाण केली. तसेच त्या श्वानावर अत्याचार करून छळ केल्याचं तरुणीने फिर्यादीत म्हटलंय.
याबाबत आरोपीविरुद्ध प्राणी क्रूरता अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल केला आहे.
द्यप्राशन करून आईला नेहमी त्रास देणाऱ्या मोठ्या भावाची हत्या करण्यात आली. यासाठी लहान भावानं त्याच्या मित्राची मदत घेतल्याचा प्रकार भंडाऱ्याच्या तुमसर इथं उघडकीस आला. रोशन वासनिक (३५) असं मृत तरुणाचं नावं आहे. तर, या हत्याप्रकरणी तुमसर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत अटक केलेल्यांमध्ये लहान भाऊ राकेश वासनिक (३१) आणि त्याचा मित्र किरण मारबते (२८) या दोघांचा समावेश आहे. ही घटना तुमसर शहरातील आंबेडकर वार्डातील आंबाटोली इथं घडली.
छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड तालुक्यातील बोरगावबाजार येथे बकऱ्या चारण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा 6 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता खंडोबा महाराज मंदिरापासून अपहरण झाल्याचा गुन्हा सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी दाखल केला आहे. अपहरण झालेल्या मुलांचे नाव शेख अरबाज शेख अय्युब वय 16 वर्ष ,शेख अमान शेख गुलाब वय 15 अशी आहे ही दोन्ही बोरगाव बाजार येथील रहिवासी आहेत .बुधवारी सकाळी हे दोघे स्वतःच्या घरच्या बकऱ्या आणि काही जनावरे घेऊन गावातील तलावाजवळ असलेल्या खंडोबा महाराज मंदिराजवळ गेले होते.
पडळकर यांच्या कार्यकर्त्याच्या अपहरण प्रकरणात जखमी शरणु हांडे याच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा नोंद
जखमी शरणु हांडे याचा भाऊ विष्णू शिवराया हांडे याची पोलिसात फिर्याद
आरोपी अमित सुरवसेसह 4 अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा नोंद
भारतीय न्याय संहिता 140 (1), 189 (2), 189 (4), 191 (2), 191 (3), 190 आणि शस्त्र अधिनियम कलम 4, 25 अनुसार गुन्हा नोंद
सिद्धिविनायक मंदिरात १२ ऑगस्ट रोजी दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे
मात्र, मंदिरात कॅमेरा आणि लॅपटॉप घेऊन जाण्याची परवानगी मंदिर गाभारा परिसरात वैद्यकीय पथक तैनात केले जाईल
तसेच दोन रु्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये एक कार्डियक रुणवाहिका समाविष्ट आहे
सुरक्षेच्या कारणास्तव फायर इंजिन आणि अग्निशामक वाहनही तैनात करण्यात येणार आहेत
परराज्यातून आलेल्या कार चालकाला ब्लॅकमेल करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या पाच वाहतूक पोलिसांच गुन्हेगारी स्वरूपाच वर्तन उघड झाल्यानंतर बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे व या प्रकरणातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. अभय टेकाळे,गजानन भंडारी, विठ्ठल काळुसे,विजय आंधळे व संदीप किरके अस या पाच वाहतूक पोलिसांचे नाव असून त्यांच्यावर अशोभनीय वर्तन,बेशिस्त व बेजबाबदारपणा करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे बुलढाणा पोलीस दलाची मात्र मोठी नाचक्की झाल्याचं बघायला मिळत आहे.
हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे
हिंगोली शहरासह ग्रामीण भागात शुद्ध हा पाऊस पडला आहे
शेतातील पिकांना दिलासा मिळाला आहे
आता पाऊस थांबला आहे
हिंगोली शहराच्या मधोमध असलेले जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून या सुशोभीकरणासाठी शासनाच्या वतीने करोडो रुपयांचं कंत्राट देण्यात आला आहे आता या तलावाच्या सुशोभीकरणासाठी संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाल असून पीचिंच काम जवळ अंतिम टप्प्यात आला आहे असे असताना पीचिंगच काम निकृष्ट दर्जाच होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे अनेक ठिकाणी तलावाची पिचिंग ढासळली आहे तर काही ठिकाणी ही पिचिंग पूर्ण पाने उखडली आहे त्यामुळे तलाव फुटण्याचा धोका वाढू शकतो परिणामी या तलावाच्या सुशोभीकरणासाठी खर्च केलेले करोडो रुपये पाण्यात जाणार आहेत त्यामुळे अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राट दरावर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.
शेतीतील AI तंत्रज्ञानासाठी नरेंद्र मोदी यांच्याकडून 13000 कोटींची तरतूद
धाराशिवमध्ये विठ्ठल साई साखर कारखान्याकडून आयोजित तंत्रज्ञान मार्गदर्शन मेळाव्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
रात्री अकरा वाजेपर्यंत हजारो शेतकऱ्यांची AI तंत्रज्ञान मार्गदर्शन शिबिराला हजेरी
नरेंद्र मोदींनी केलेल्या विकसित देशाच्या संकल्पासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचं , शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञान स्वीकारावर बावनकुळे यांच आवाहन
विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याकडून मराठवाड्यातील पहिला AI तंत्रज्ञान मार्गदर्शन मेळावा
वाशिम जिल्ह्यात तब्बल दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात सर्व दूर जोरदार पावसाची हजेरी गेल्या एका तासापासून जोरदार पावसाची हजेरी पिकांना मिळतंय नवसंजीवनी शेतकऱ्यांची चिंता झाली दूर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तुळजापूर मंदिर विकास आराखडा सादर करण्यात आला
मात्र तुळजापूर विकास आराखडा पूर्ण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री व्हावे लागले
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तुळजापूर येथे विकास आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित जाहीर कार्यक्रमात वक्तव्य
काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये 21 वर्षांपूर्वी राणाजगजीतसिंह पाटील यांनी राज्यमंत्री असताना मंत्रालयात सादर केला होता विकास आराखडा
तुळजाभवानी देवस्थानाच्या 1865 कोटींच्या विकासा आराखड्याला राज्य सरकारने नुकतीच दिली मंजुरी
तुळजापूर मंदिर विकास आराखड्याला मंजुरी दिल्यामुळे तुळजापुरात नागरी सत्काराचे करण्यात आलं होतं आयोजन
चालत्या दुचाकीवर वीज कोसळ्याने आई व मुलाचा जागीच मृत्यू...
ही घटना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील वग शिवात घडली...
शेतातून काम आटपून धम्मशील मेश्राम वय २५ व त्याची आई सुनीता मेश्राम वय 45 मेश्राम शेतातून परत येत असतांना ही घटना घडली..
घटनेनंतर वग गावात शोककळा पसरली..
अभूतपूर्व वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौकात अजित पवारांकडून पाहणी करण्यात आली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असती. याचं चौकातून चाकण एमआयडीसी मध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. या एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात. यातील चाकण-शिक्रापूर मार्गावरून अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर येणारी अवजड वाहतूक जेएनपीटीकडे जाते. त्यामुळं या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकार समोर आहे.
:बीड शहरात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील एका रुग्णालयात आल्यानंतर लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली आदळल्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला होता. याबाबत आता चौकशी सुरू करण्यात आली असून रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे रुग्णालयाने नूतनीकरण न करताच विनापरवाना लिफ्ट सुरू ठेवल्याचे विद्युत विभागाच्या निदर्शनास आले आहे.
कबुतरखान्यांवरील बंदी कायम, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय..नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचं केलं स्पष्ट..तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पालिका आणि सरकारने निर्णय घेण्याचे निर्देश...
दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट. राहुल गांधींच्या घरी झालेल्या बैठकीच्या वेळी दोघींची भेट झाल्याची माहिती.
महाराष्ट्रात तब्बल ४० लाख संशयित मतदार, पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा गंभीर आरोप...तर शपथपत्र सादर करा म्हणत निवडणूक आयोगाकडून आज भेटीचं निमंत्रण.
११ ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा...निवडणुकीत मतांची चोरी झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपांवर इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत...
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: कल्याणमध्ये पुन्हा मराठी-अमराठी वाद; मनसेकडून हॉटेल चालकाला चोप