Maharashtra Live Blog Updates: अजितदादा सर्वांना पुरून उरतात म्हणून त्यांच्यावर आरोप केले : नरहरी झिरवाळ

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 07 Nov 2025 03:41 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: पुण्याच्या मुंढवा भागातील वादग्रस्त जमिन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांचे (Parth Pawar Pune Land Scam) मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात...More

अजितदादा सर्वांना पुरून उरतात म्हणून त्यांच्यावर आरोप केले : नरहरी झिरवाळ

परभणी: इतके दिवस सर्व सुरळीत असताना ऐन निवडणुकीच्या काळात अजितदादांवर आरोप करण्यात आले आहेत. कारण अजितदादा सर्वांना पुरून उरतात. त्यामुळे त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. येणाऱ्या काळातही अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या परिवारातील अजून काय काय गोष्टी काढल्या जातील. मात्र कार्यकर्त्यांनी या गोष्टीकडे लक्ष न देता स्थानिक मुद्द्यावरिल या सर्व निवडणुका जिंकाव्यात, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी परभणीत केले आहे. परभणीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत बोलताना झिरवाळ बोलले आहेत.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.