Maharashtra Live Blog Updates: राष्ट्रवादीतील गटबाजीनंतर धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके एकाच व्यासपीठावर
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीचे सर्व घटकपक्ष बैठकीला हजर असतील. राहुल गांधींच्या निवासस्थानी होणाऱ्या...More
अहिल्यानगर : जिल्ह्यात गेल्या दिवसापासून ओढ दिलेल्या पावसाने आज जोरदार हजेरी लावलीय. राहाता तालुक्यासह संगमनेर, अकोले तालुक्यातील अनेक गावात आज पावसाचे जोरदार आगमन झाल्याने खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे.
हिंगोली : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येणाऱ्या ऑटोला आरटीओ अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात दंड ठोठावल्याने हे ऑटो चालक आमदार बांगर यांच्याकडे गेले आणि संबंधित आरटीओ अधिकाऱ्याची तक्रार केली. यानंतर आक्रमक झालेल्या आमदार बांगर यांनी आरटीओ अधिकार्याला फोन करत चक्क आरटीओ अधिकाऱ्याची लाज काढली आहे. अशा पद्धतीने दंड ठोकणार असाल तर मी आरटीओ ऑफिसला कुलूप लावून टाकेल, असा सज्जड दम आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे.
देशभरात ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेवरून झालेल्या मोठ्या वादानंतर केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. मात्र काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींची जातनिहाय आकडेवारी घोषित करण्याला विरोध केलाय. त्यांच्या मते सरकारने ओबीसींची जनगणना करावी. मात्र, त्याची जातनिहाय आकडेवारी घोषित करू नये. ओबीसी हा फक्त एक प्रवर्ग म्हणून समजण्यात यावा. वडेट्टीवार यांच्या मते अशाप्रकारे जातनिहाय आकडेवारी घोषित केल्याने ओबीसींमध्ये फाटाफूट होईल आणि ओबीसीमधील अंतर्गत संघर्ष समोर येईल. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेली अनेक वर्ष हीच भूमिका जनगणनेबाबत घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मते ओबीसींची जनगणना करण्यात यावी. मात्र, यामध्ये जातनिहाय जनगणना करण्यात येऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
गडचिरोली : गेल्या दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी गडचिरोली शहरासह परिसरात दमदार हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. त्यातच भात पिकाची लागवड सुरू असल्याने शेतीलाही पाण्याची गरज निर्माण झाली होती. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असताना गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
बीड : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी समोर आली होती. आज बीड मध्ये ऊसतोड मजुरांच्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये व्यासपीठावर हे नेते एकत्र होते. मात्र यावेळी अजित पवारांच्या उजव्या बाजूला धनंजय मुंडे तर डाव्या बाजूला प्रकाश सोळंके बसलेले दिसून आलेय. आज सोळंके यांच्या मतदार संघात असलेल्या वडवणीतील मुंडे मुंडे पिता पुत्रांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे. मात्र, या प्रवेश सोहळ्याला धनंजय मुंडे यांना डावलले गेले. त्यानंतर हे दोघेही आज एकाच व्यासपीठावर दिसून आलेय.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडेंचा अवमान झाला. शहरातील नव्यानं सादर झालेला विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यासाठी बनसोडे पालिकेत आले होते. मात्र पालिकेचे आयुक्त शेखर सिंह हजर नव्हते, ते विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीला होते. परंतु इतर अतिरिक्त आयुक्तांनी उपसभापती पदाचा प्रोटोकॉल राखायला हवा होता. तसं न घडल्यानं बनसोडे चांगलेच संतापले. त्यामुळं बनसोडेंवर पालिकेच्या पायऱ्यांवर बसून आयुक्तांचा निषेध करण्याची वेळ आली. मी या प्रकरणाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार आहे. आयुक्त राजकारण करत असल्याचा आरोप ही यावेळी करण्यात आला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार गट अशी थेट लढत होणार आहे. यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस विरुद्ध अजित पवार आमने-सामने उभे टाकणार आहेत.
गडचिरोली : राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते. त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना होताच शिंदे गटातील दोन जिल्हाप्रमुखांमध्ये श्रेय वादावरून तुफान राडा झाला आणि ते एकमेकांवर भिडल्याचा प्रकार गडचिरोलीच्या सर्किट हाऊस मध्ये बघायला मिळाला. शिवसेना गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणून संदीप ठाकूर तर अहेरी जिल्हाप्रमुख म्हणून राकेश बेलसरे सध्या कार्यरत आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सर्किट हाऊस मध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. त्यामुळे जिल्हाभरातील बहुसंख्या शिवसेना पदाधिकारी येथे उपस्थित होते. मात्र मंत्री भुसे चंद्रपूरकडे रवाना होताच दोन पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेय वादावरून हमरीतुमरी झाली आणि एकमेकांवर भिडले. त्यामुळे शिंदे सेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
सेवानिवृत्त शिक्षिकेचा राहत्या घरी खून. चिपळूण मध्ये खळबळ.
63 वर्षीय वर्षा जोशी या निवृत्त शिक्षिकेची हत्या.
शहरातील रावतळे परिसरातील घरात वृद्ध शिक्षिकेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला. महिलेच्या अंगावर अनेक जखमा.
चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल.
घरातील CCTV कॅमेराची हार्ड डिस्क देखील गायब असल्याने पोलिसांसमोर आव्हान.
उत्तराखंडसाठी मंत्री गिरीश महाजन रवाना
महाराष्ट्रातील शेकडो जण अडकले आहेत
रेस्क्यू ॲापरेशनसाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन रवाना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन मंत्री मदत कार्यासाठी रवाना झाल्याची माहिती
उत्तराखंडसाठी मंत्री गिरीश महाजन रवाना
महाराष्ट्रातील शेकडो जण अडकले आहेत
रेस्क्यू ॲापरेशनसाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन रवाना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन मंत्री मदत कार्यासाठी रवाना झाल्याची माहिती
नागपूर - पुणे वंदे भारत एक्सप्रेस आता लवकरच सुरू होणार..
रेल्वे मंत्रालयाने या गाडीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे..
मात्र, रेल्वे केव्हापासून सुरू होणार याची तारीख अद्याप स्पष्ट केलेली नाही..
गाडी क्र.26102 अजनी (नागपूर) येथून दररोज सकाळी साडेनऊ वाजता सुटेल.. रात्री साडे नऊ वाजता पुण्यात पोहचेल...
तर गाडी क्र.26101 पुणे वरून सायंकाळी साडे सहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता अजनी (नागपूर) स्टेशन वर पोहचेल..
गाडी क्र.26101 पुणे अजनी (नागपूर) एक्सप्रेस आठवड्यात सोमवार सोडून ईतर सहा दिवस चालेल
या प्रमाणेच गाडी क्र.26102 अजनी (नागपूर) पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यात मंगळावर सोडून इतर सहा दिवस चालेल...
- शेतात साचलेल्या पाण्यात बसून युवा शेतकऱ्याची कृषिमंत्री दत्तात्रय भरणेना आर्त हाक
- आम्हाला पंचनामा, नुकसान भरपाई नको तर हमीभाव द्या
- सोलापूर जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान
- मुसळधार पावसामुळे 2 एकरावरील टोमॅटो पिकाच्या बागेत पाणीच पाणी झाल्याने शेतकरी हतबल
- अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक केवळ एकमेकांवर टीका करतातर शेतकऱ्याचा प्रश्न कोणीही मांडत नाही, शेतकऱ्याचा आरोप
- कोणी रम्मी खेळली, कोणी मारामारी केली कोणाचा बारच आहे यावरच नेते मंडळी बोलले मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडले
- त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की पिकाला हमीभाव द्या
- माझ्या शेतात 10 ते 12 लाखाचे टोमॅटो पीक पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे
- मोहोळ तालुक्यातील शेतकरी लखन माने यांची मागणी
बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार दोन दिवसीय बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. अजित पवार सकाळी पावणे सहा वाजल्यापासूनच विकास कामांचा आढावा घेत आहे. अजित पवारांचा ताफा जिल्हाधिकारी कचेरीकडे येत असताना अचानक जिल्हा रुग्णालयाकडे वळाला. त्यामुळे ताफ्यातील अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. अजित पवारांनी थेट जिल्हा रुग्णालयास सरप्राईज व्हिजिट देत रुग्णालयाची पाहणी केली. मंत्री महोदयांच्या सरप्राईज व्हिजिट मुळे रुग्णालय प्रशासनाची मोठी धांदल उडाली होती.
बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार दोन दिवसीय बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. अजित पवार सकाळी पावणे सहा वाजल्यापासूनच विकास कामांचा आढावा घेत आहे. अजित पवारांचा ताफा जिल्हाधिकारी कचेरीकडे येत असताना अचानक जिल्हा रुग्णालयाकडे वळाला. त्यामुळे ताफ्यातील अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. अजित पवारांनी थेट जिल्हा रुग्णालयास सरप्राईज व्हिजिट देत रुग्णालयाची पाहणी केली. मंत्री महोदयांच्या सरप्राईज व्हिजिट मुळे रुग्णालय प्रशासनाची मोठी धांदल उडाली होती.
भरधाव ट्रकने 6 मुलांना चिरडले
4 जणांचा मृत्यू, दोघांना नागपूरला हलवले
गडचिरोली- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली येथील घटना
सहाही मुलं रस्त्यावर व्यायाम करत असताना अज्ञात ट्रकची जोरदार धडक
दोन मुलांचा जागीच मृत्यू तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात मृत्यू
काटली गावात शोककळा, संतप्त गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न
गडचिरोली पोलीस घटनास्थळी
Pune : पुणे विमानतळावर पुणे भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकला उड्डाण केले रद्द
विमानतळांवर वारंवार कुत्रे बिबट्या,पक्षी, येण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवासाच्या सुरक्षेतेवर प्रश्न
पुणे विमानतळवरून भुवनेश्वरला उडदाण्याच्या तयारीत असलेलं 1098 हे विमान रद्द करावा लागला आहे
पक्षी धडकल्यामुळे विमानाच्या एका बाजूचे पाच ब्लेडने कमी झाल्या पायलटला वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे विमान उड्डाण रद्द करण्यात आले
रात्री दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात बैठक - सूत्र
रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
काल एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात झालेल्या भेटीत पालकमंत्री पदावरून झाली होती चर्चा
त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी बसून प्रश्न सोडवण्याच्या अमित शाह यांनी केल्या सूचना
त्यानंतर सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक
15 ऑगस्ट आधी रायगडच्या पालकमंत्री पदा बाबतचा निर्णय घेतल जाणार असल्याची सूत्रांची माहिती
15 ऑगस्ट ला नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते रायगड मध्ये होणार झेंडावंदन
बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरांमुळे आता शेतकऱ्यांची उत्पादन खर्चही निघण्याची आशा मावळत चालली आहे. लातूर जिल्ह्यातील घनसरगाव येथील दोन शेतकऱ्यांनी आपल्या सात एकर कोथिंबिरीच्या पिकावर नांगर फिरवला आहे... पिक काढणीस तयार... पण बाजारात भाव नाही... काढणी करण्याचा एवढा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे..
या दोन्ही शेतकऱ्यांनी एकरी सुमारे 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च करून कोथिंबीर लावली होती. पिक काढणीस तयार झाले होते, मात्र सध्या बाजारात कोथिंबीरला अवघा ३ रुपये किलो भाव मिळत असल्यामुळे त्यांनी मोठा निर्णय घेतला.अशा भावात कोथिंबीर विकल्यास मजुरीही भरता येत नाही. त्यामुळे पीक मोडण्याशिवाय पर्याय नव्हता," अशी खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.
दौंड तालुक्यातील यवत मधील जमावबंदी उठवली
जिल्हाधिकारी यांनी 100 टक्के जमावबंदी उठवली
आज यवत पोलीस ठाण्यात शांतता बैठकीचे आयोजन
1 ऑगस्ट रोजी केली होती जमाबंदी
काल आणि परवा या जमावबंदी दिली होती शिथिलता
आजपासून जिल्हाधिकारी यांनी पूर्ण जमावबंदी उठवली
कबुतरखान्यांसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत मुंबईतील कबुतराखाने बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार तसेच घेतला होता ज्याला पक्षी प्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होत
मात्र उच्च न्यायालयाने देखील बंदी कायम ठेवत पक्ष्यांना खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते
अन्नाअभावी कबुतरांचा मृत्यू होत असल्याने जैन समजातील असंतोष निर्माण होऊन त्याची परिणीती आंदोलनात झाली
काल दादरच्या कबुदतरखाना येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच राज्य सरकारच्या बदललेल्या भूमिकेनंतर आजच्या सुनावणीला महत्त्व
मागील काही दिवसाच्या विश्रांती नंतर आज पहाटेपासून पुन्हा मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात.
मुंबईसह पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून अधून मधून मुसळधार पाऊस सुरू आहे.
पश्चिम उपनगरात ढगाळ वातावरण असून मागील अर्धा तासापासून अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगाव,मालाड,कांदिवली,बोरिवली,दहिसर विलेपार्ले,सांताक्रुझ,वांद्रे या सर्व परिसरात पाऊस सुरू आहे.
अमरावती : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र त्या आश्वासनाची अद्यापही पूर्तता न झाल्यामुळे आता शेतकरी आक्रमक झालेले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा या गावांमध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी आपल्या घराच्या भिंतीवर शेतकऱ्यांचा सातबारा "कोरा कोरा कोरा करा अन्यथा खुर्ची सोडा. अशाप्रकारे संदेश लिहून सरकारच्या विरोधात अनोखं आंदोलन सुरू केले आहे... यानंतरही शेतकऱ्यांच्या प्रत्येक सणाला वेगवेगळ्या स्वरूपात सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या गावातील शेतकऱ्यांनी दिला आहे...
आजारपण, वृद्धावस्था आणि एकटेपणाला कंटाळून नागपुरात वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन केल्याचे समोर आले आहे...
या घटनेत 80 वर्षीय गंगाधर हरणे यांचा मृत्यू झाला आहे.. तर त्यांची पत्नी निर्मला हरणे (70 वर्ष) ह्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे..
नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ नगर परिसरात काल ही घटना घडली..
हरणे दांपत्यांचा मुलगा नोकरी निमित्ताने नागपूर बाहेर राहतो.. तर मुलगी विवाह झाल्यानंतर सासरी राहते.. त्यामुळे नागपुरातील घरात हरणे दांपत्य एकटेच राहत होते..
घटनेनंतर घरी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये वृद्धावस्था, आजारपण आणि एकटेपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे..
उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर आहेत आज सकाळी सहा पासूनच ते कामाला लागल्याचे दिसून आले.सकाळी 6 वा.कामाला सुरुवात केली. अजित पवार बीड मधल्या प्राचीन असलेल्या कंकालेश्वर शिव मंदिरात पोहोचले.या ठिकाणी त्यांनी अधिक संपूर्ण मंदिराची पाहणी केली.
- अजित पवार यांच्या बीड दौऱ्याला पहाटे 5:45 वाजता सुरुवात
- बीड येथील चंपावती क्रीडा संकुलाची केली पाहणी
- अधिकाऱ्यांना केल्या सूचना.
- कंकालेश्वर मंदिराकडे पुरातत्त्व विभागाच्या कामाच्या पाहणी संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना
उत्तराखंडमधील पुरामध्ये मृतांचा आकडा पाचवर, जळगाव, संभाजीनगर, पुणे, नाशिक, मालेगावसह महाराष्ट्रातील विविध भागातले ५० हून अधिक पर्यटक नॉट रिचेबल, तर एकूण १०० जण बेपत्ता
ठाकरे बंधूंच्या संभाव्या युतीच्या नव्या ट्रेलरची चर्चा...मुंबईतील बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीत सेना आणि मनसेची युती जाहीर...राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण...
बालेकिल्ल्यात पंकजा मुंडेंना अजित पवारांचा धक्का...वडवणीतील राजाभाऊ आणि बाबरी मुंडे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार...
शिंदेंनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर काल दिल्लीतच मुक्कामी...महायुतीतील अडचणी सोडवण्याचं मोदी-शाहांना साकडं...महापालिका निवडणुकांबाबतची चर्चा झाल्याची माहिती....
उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौैऱ्याचा आज दुसरा दिवस...इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक आणि राहुल गांधींच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी...तर सकाळी ११ वाजता ठाकरेंची महत्वाची पत्रकार परिषद...
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: राष्ट्रवादीतील गटबाजीनंतर धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके एकाच व्यासपीठावर