- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Blog Updates: बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे आज मतदान
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान आज होणार आहे. या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे, पहिल्या...More
सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार
माझा पार्थवर विश्वास तो चुकीची गोष्ट करणार नाही
जी माहिती तुमच्याच चॅनेलवरून आल्या
मुख्यमंत्री म्हणाले मी चौकशी करणार
तहसीलदारांचे निलंबन झालं
हे बनाना रिपब्लिक
सरकार म्हणत आमची जमीन विकता येत नाही
तहसीलदार म्हणतात मी सही केली नाही
नोंदणी झाली की नाही
नेमकं काय
सरकार कोण चालवतं?
आम्ही लोकशाही वर विश्वास ठेवतो
सुप्रिया सुळे
माझ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होत्या
त्यांची पहिली टर्म चांगली होती
अच्छे को अच्छा बोलना चाहिए
पण आता मुख्यमंत्र्यांना झालय काय
इतकं गोंधळ का
मी पार्थ शी सकाळीच बोलले
त्याचं म्हणणं आहे आत्या मी काहीच चुकीच केलेलं नाही
माझी लीगल टीम सर्व बाजू तपासत आहेत
माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण केलं पाहिजे
सर्वांनी प्रक्रिया पाळली पाहिजे
V/O -- आज विठ्ठल मंदिरात महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाली.
श्री.हरिदास, नामदास महाराज, पुजारी व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा महाद्वार काल्याचा उत्सव श्री. विठ्ठल सभामंडपात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
श्री विठ्ठल सभामंडपात पाच प्रदिक्षणा घालून, दहिहंडी फोडण्यात आली व त्यानंतर नामदेव पायरीवरून काला महाद्वाराकडे प्रस्थान झाला. यावेळी मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखाधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते.
आता दिनांक 09 नोव्हेंबर रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा संपन्न होणार असून यानंतर सध्या सुरू असलेले देवाचे 24 तास दर्शन बंद होणार आहे.
मनोज जरांगे महाराष्ट्राचे डॉन, डॉन ला कोणी धमकी देऊ शकता का?
मला वेगळच प्रकरण असल्याचा संशय..
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची टीका..
वाळू माफिया, मटका माफिया, दारू माफिया,जमीन माफिया यांच्या गराड्यात असणाऱ्याला कोण धमकी देईल?
मला संशय त्यांच्यातीलच कोणी असू शकतं, त्यांचे व्यवहारातील काही बिनसले असेल,त्यामुळे जरांगेचा आणि त्यांचा व्यवहार बिनसला असेल म्हणून त्यांच्याच लोकांनी धमकी दिली असेल..
जरांगे ने पेरलं ते उगवणार आहे.. जरांगे नीचे आती केलं त्याची माती व्हायला सुरुवात होईल..
झुंडशाही महाराष्ट्रात जरांगेमुळे झाली आणि ती आता पलटणार आहे ,त्यामुळे जरांगे कडून त्यांचे स्वप्न पूर्ण झाली नाहीत की ते जरांगेंना ब्लॅकमेल करणार, जरांगे ना धमक्या देणारे काही काळानंतर त्यांचेच लोक त्याला हानतील यात नवल वाटायला नको.
पोलिस प्रशासनाने जरांगेंच्या भोवती असलेल्या पाच-पन्नास लोकांचा गराडा आहे त्यां लोकांचेच मोबाईल सी डी आर तपासणी केली पाहिजे.
ऍंकर : पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्यांच्या गटाने एकत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादीत शाब्दिक लढाईला सुरुवात झालीये. पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा की भाजपचा बालेकिल्ला, यावरून दोन्ही बाजूंचे समर्थक एकमेकांत भिडलेत. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची तयारी दर्शवल्यानं पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीचं चित्र बदलू लागलंय. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये नेमकी कशी चुरस सुरुये, हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.
परभणी: आगामी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने परभणीच्या पाथरीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पाथरीमधील काँग्रेस, शिवसेना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आदींनी आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्ष प्रवेश पार पडला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत काँग्रेससह शिवसेना आणि भाजपला ही फटका बसण्याची शक्यता आहे.
- फरार निलेश घायवळ प्रकरणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी
- सुरुवातीला पासपोर्ट संदर्भात सुनावणी पार पडली
- कोर्टाने पासपोर्ट अथॉरिटीजला नोटीस काढत 17 तारखेपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले
- पुढील सुनावणी 17 तारखेला पार पडणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज पुणे दौरा
राज ठाकरे घेणार पुणे शहरातील शाखा अध्यक्ष यांची बैठक
पुणे शहरातील मनसे चे सर्व नेते पदाधिकारी उपस्थित
येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे करणार मार्गदर्शन
भंडारा : जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हा महामंत्री मयूर बिसेन त्यांचा काल वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त त्यांनी काल हातात तलवार घेऊन म्यान बाहेर काढून ती हवेत उंचावली. विश्व हिंदू परिषदच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मयूर बिसेन यांनी ही तलवार उचावल्याचा प्रकार समोर आला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर आता प्रचंड व्हायरल होत आहे. सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाचं वाढदिवसानिमित्त अशी तलवार उंचावणे कितपत योग्य आहे? आगामी नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं या माध्यमातून दहशत पसरविण्याचा प्रयत्न तर, भाजपचे पदाधिकारी करीत नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी पोलिस काही कारवाई करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सोलापूर विमानतळावर मुंबईहून आलेल्या विमानाच्या लँडिंगदरम्यान पतंगाचा मांजा पंखात अडकण्याची धक्कादायक घटना घडली. पायलटच्या तत्परतेमुळे ३४ प्रवाशांचा जीव वाचला. या प्रकरणी नायलॉन मांजा विकणाऱ्या बिलाल इब्राहिम शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पतंग उडवणाऱ्या अल्पवयीन मुलाला आणि त्यांच्या पालकांना पोलिसांनी समज दिली. या घटनेनंतर एअरलाईन्स कंपनीने विमानतळ प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली असून, सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, सोलापूर विमानतळ परिसरात सुरक्षेचे प्रश्न पुन्हा उघड झाले आहेत. आज सकाळी दोन अल्पवयीन मुले सुरक्षा भिंतीवरून उडी मारून विमानतळात शिरल्याचा प्रकारही घडला असून, सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेऊन समज दिली.
माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर?
प्रभाकर देशमुख मुंबईत वरळी डोम येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी पोहचले
प्रभाकर देशमुख सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेतृत्व
मागील काही दिवसांपासून देशमुख यांच्याकडून अजित पवारांसोबत जाण्याबाबत चाचपणी सुरू होती
शरद पवारांसोबत चर्चा करूनच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याची कार्यकर्त्यांसोबत देशमुख यांची खाजगीत चर्चा- सूत्र
ONGC कंपनीचे सहा हजार कर्मचारी आजपासून संपावर
कर्मचारी तीन मागणी सोबत बेमुदत आजपासून आमरण उपोषणावर बसले आहेत
ओएनजीसी कंपनी मध्ये समुद्रात काम करणारे कर्मचाऱ्यांसाठी बिसलरी कंपनीचे पाणी आणि मागील तीन वर्षापासून पीपी किट बंद केल्यामुळे कर्मचारी आक्रमक
ONGC कंपनीकडून समुद्रात काम करणारे कर्मचाऱ्यांसाठी बिसलरी चे पाणी पहिला द्यायचं मात्र आता त्याऐवजी समुद्राचं पाणी देण्यात येणार आहे त्यामध्ये प्रक्रिया करणारी यंत्रणा ही खूप जुनी आहे, अशुद्ध पाणी पासून कामगारांच्या स्वास्थ्य खेळायचं कारस्थान मॅनेजमेंट करत आहे त्यामुळे जवळपास 6 हजार कर्मचारी आज पासून संपामध्ये उतरले आहे
ONGC ही भारत सरकारची सर्वाधिक नफा देणारी महारत्न कंपनी असून तिच्या एकूण नफ्यात मुंबई ऑफशोरचा 75% वाटा आहे. मात्र व्यवस्थापनातील प्रायव्हेटायझेशन धोरणे आणि मनमानी कारभारामुळे कामगारांच्या भविष्यावर गंभीर परिणाम झाल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. याच विरोधात मुंबई समुद्रातील ONGC ऑफशोरचे सुमारे 6,000 कामगार आज सकाळ पासून बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. कामगारांनी ही लढाई अस्तित्वाची असल्याचे सांगत शासन आणि व्यवस्थापनाकडून तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. यामुळे देशातील महत्त्वाच्या ऊर्जा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भंडारा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपनं काल राज्यातील निवडणूक प्रभारी घोषित केलेत. भंडारा जिल्ह्यात होत असलेल्या चार नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपनं निवडणूक प्रभारी म्हणून आमदार परिणय फुके यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. भंडाऱ्याचे शिंदेसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यातील राजकीय द्वंद मागील काही महिन्यांपासून वाढलेला बघायला मिळत आहे. अशात आता भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या चार पालिका निवडसुकीसाठी भाजपानं परिणय फुके यांच्यावर भंडारा जिल्ह्याची जबाबदारी सोपविल्याने शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना रोखण्यासाठी भाजपनेही ही खेळी खेळल्याची चर्चा होत आहे. मागील काही दिवसांपासून भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भाजपनं स्वबळावर लढवावी, अशी मागणी परिणय फुकेंच्या माध्यमातून वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात परिणय फुकेंनी भंडारा आणि पवनी नगरपालिकेत कोट्यवधी रुपयांची नियमबाह्य मंजूर केलेल्या कामावरून ताशेरे ओढून ती रद्द केले होते. तर, यावर आमदार भोंडेकर यांनी बाहेर जिल्ह्यातील एक नेता भंडारा जिल्ह्यातील विकास कामात ढवळाढवळ करीत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवू, असं प्रत्युत्तर दिलं आहे. अशात आता भाजपकडून परिणय फुकेंवर भंडाऱ्याची जबाबदारी सोपविल्यानं येथील राजकारण आता तापण्याचं चिन्ह आहे.
भाजपची नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार राहुल ढिकले यांच्यावर
महापालिका निवडणुक प्रमुख पदी राहुल ढिकले याच्यावर पक्षाने सोपवली जबाबदारी
निवडणूक प्रभारी पदी गिरीश महाजन यांची नियुक्ती
आमदार राहुल ढिकले नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार
शहरात देवयानी फरांदे आणि सीमा हिरे या दोन्ही वरीष्ठ आमदार असताना तरुण आमदारांवर पक्षाने जबाबदारी सोपविल्यानं राजकीय वर्तुळात चर्चना उधाण
स्क्रब टायफस आजाराचा अमरावती जिल्ह्यात उद्रेक...
आतापर्यंत एकूण 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले...
जगतपूर मध्ये एकाचा स्क्रब टायफसने झाला होता मृत्यू....
पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या गावामध्ये उपायोजना सुरु..
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत स्क्रब तायफस संशयीताचे 79 रुग्णाचे रक्तजल नमुने तपासले त्यात 9 रुग्ण आढळले...
घराच्या भोवती असणाऱ्या लहान-मोठी खुरटी झाडेझूडपी काढून टाकावी, तसेच घराजवळ पालापाचोळा कचरा साचू देऊ नका आणि कीटकनाशक औषधांचा वापर करा - आरोग्य विभागाचे आवाहन...
पवईतील किडनॅपिंग प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत १५ ते १६ जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात एन्काऊंटर करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वाघमारे यांचाही समावेश आहे. गुन्हे शाखेने आरोपी रोहित आर्या आणि वाघमारे यांचे कपडे तसेच गुन्ह्यात वापरलेली वाघमारे यांची पिस्तूल न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवली आहे. वाघमारे यांनी आपल्या जबाबात त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला असून, त्यांनी घटनास्थळी सिन रिक्रिएशन करून दाखवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नोंदवलेल्या जबाबांमध्ये आर्याच्या स्टुडिओतील स्टाफ, पोलिस रोहित आहेर, काही पालक आणि उपस्थित मुलांचे जबाब समाविष्ट आहेत. तथापि, अभिनेते गिरीश ओक आणि उर्मिला कोठारे यांचे जबाब अद्याप नोंदवण्यात आलेले नाहीत.
स्क्रब टायफस आजाराचा अमरावती जिल्ह्यात उद्रेक...
आतापर्यंत एकूण 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले...
जगतपूर मध्ये एकाचा स्क्रब टायफसने झाला होता मृत्यू....
पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या गावामध्ये उपायोजना सुरु..
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत स्क्रब तायफस संशयीताचे 79 रुग्णाचे रक्तजल नमुने तपासले त्यात 9 रुग्ण आढळले...
घराच्या भोवती असणाऱ्या लहान-मोठी खुरटी झाडेझूडपी काढून टाकावी, तसेच घराजवळ पालापाचोळा कचरा साचू देऊ नका आणि कीटकनाशक औषधांचा वापर करा - आरोग्य विभागाचे आवाहन...
सध्या भंडारा जिल्ह्यातील शेतीचा हंगाम शिगेला पोहोचलेला आहे. भात पिकाची कापणी आणि मळणी आता जोमात सुरू असून शेतशिवारात शेतकरी आणि शेतमजूर बघायला मिळत आहे. अशात आता जंगलातील हिंस्त्रप्राणी शेतशिवार आणि गावाच्या दिशेनं पोहोचत असून अनेकदा यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी झाल्याच्याही घटना समोर येत आहे. अशात आता जंगलव्याप्त तालुका म्हणून ओळख असलेल्या लाखांदूर तालुक्यातील चिकना, तावशी, जैतपूर, गोदामेंढी गावात बिबट्या रात्रीला मुक्तसंचार करीत असल्याचे धक्कादायक दृश्य गावातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. गावात मध्यरात्रीला बिबट फिरत असल्याचं दृश्य सीसीटीव्हीत दिसल्यानं आता ग्रामस्थ आणि शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. वन विभागानं हिस्त्र प्राण्यांचा तातडीनं बंदोबस्त लावावा, अशी मागणी आता ग्रामस्थ करीत आहे.
उद्धव ठाकरे यांनी घेतली काल धाराशिव बीड लातूर मधील पदाधिकाऱ्यांची बैठक
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणं उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतलं...
नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत धाराशिव बीड आणि लातूर जिल्ह्यात जिथे शक्य असेल तिथे महाविकास आघाडीमध्ये लढा, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या सूचना
धाराशिव मध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद बघता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढवली गेली पाहिजे, स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांचा सूर, तर पदाधिकाऱ्यांच्या मताशी उद्धव ठाकरे सकारात्मक
आघाडी आणि स्वबळाचा निर्णय लवकरात लवकर घेऊन निवडणूक जोमाने लढा, उद्धव ठाकरे यांनी केलं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
रायगडमधील निसर्ग आणि वन्यजीव प्रेमीं करता आनंदाची बातमी आहे. महाड शहारा पासून केवळ दोन किलो मिटर अंतरावर असलेल्या चोचिंद गाव परिसरातील मुख्य रस्त्यावर दोन कोल्ह्यांच दर्शन झाल आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात कोल्हे दिसत मात्र आता वाढत्या शहरी करणामुळे कोल्ह्यांच दर्शन दुर्मिळ झाल होत.त्यात कोल्हे दिसल्याने या परिसरात कोल्ह्यांची प्रजात जिवंत असल्याचं समोर आलंय.
अकोल्यात 'जेजे मॉल'ला भीषण आग लागली आहे. अकोला शहरातल्या कपडा बाजारातील या 'जेजे मॉल' ही आग लागली...आगीचं रौद्ररुप पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळालं. आग प्रचंड होती. काही वेळातच संपूर्ण परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळाले. आज पहाटेच्या सुमारास ही भीषण आग लागली होती. आधी धूर, मग काही क्षणातचं आगीचं रौद्ररुप या ठिकाणी दिसून आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळे मॉलला आग लागली असल्याचा अंदाज घटनस्थळी व्यक्त करण्यात येतोय.. आगीची माहिती मिळताच अकोला अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, तब्बलं दोन ते अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंये. मात्र, तोपर्यत जेजे मॉलला पूर्णता आगीच्या आटोक्यात आलं होतं, त्यामुळं 50 ते 60 लाखांवर मोठे नुकसान झाल्यचे अणुमान लावले जात आहे.
शेतशिवारात जुगार अड्डा भरवून तिथं पैशाच्या हारजितचा खेळ सुरू होता. या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत 4 लाख 11 हजार रुपयांच्या मुद्देमालासह 6 जुगार खेळणाऱ्यांना अटक केली. ही कारवाई भंडाऱ्याच्या अड्याळ पोलिसांनी वाकेश्वर या गावातील शेतशिवारात रात्री उशिरा केली. या कारवाईत 20 हजार रुपये रोख आणि 5 दुचाकी, चार मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत. जुगार खेळणाऱ्या विरुद्ध मुंबई जुगार बंदी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली.
गोरेगाव तहसील कार्यालयांतर्गत पडीक जमिनीच्या अकृषक परवानगीसाठी १५ हजार लाचेची मागणी केल्या प्रकरणात ग्राम महसूल अधिकारी अरविंद कुमार डहाट यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया यांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार ३६ वर्षे, रा. गोरेगाव यांनी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, गट क्र. १००४/४ मधील ३०५.५० चौ.मी. जागेच्या अकृषक विकास परवानगीसाठी मौका चौकशी करून अहवाल तहसील कार्यालयात पाठविण्यासाठी आरोपीने १५ हजार लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १४ हजार देण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली.
नागपूर जिल्ह्याचा पारशिवनी तालुक्यातील भागीमहारी तलावात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
- अविनाश आनंद (२२, नागपूर) आणि संकल्प मालवे (१९, चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.
- सहा मित्रांसह फिरायला गेले असताना पोहण्यासाठी पाण्यात उतरले.
- अविनाश आनंद हा पाण्यात उतरला. तो गटांगळ्या खात होता.. त्याला वाचविण्यासाठी संकल्प मालवे यानेही तलावात उडी घेतली..
- मात्र दोघांनाही पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते बुडाले.
- अविनाश आनंद हा प्रियदर्शिनी महाविद्यालयात बी.ई. तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. संकल्प मालवे हा सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीचा विद्यार्थी होता.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर धाराशिवमध्ये भाकरी फिरवली. जिल्हाध्यक्षपदी डॉ. प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं देण्यात आले. नवीन अध्यक्षाच्या नियुक्तीपूर्वीच माजी अध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राजीनामा दिला.
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील शंकरपूर परिसरात पुन्हा एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू... शंकरपूर च्या 2 किलोमीटर परिसरात गेल्या दीड महिन्यात 3 शेतकऱ्यांचा वाघाच्या हल्ल्यात झालाय मृत्यू, काल दुपारी ईश्वर भरडे (वय 52) हा शेतकरी शंकरपूर-आंबोली रोडवरील ठाणा रिठ येथील आपल्या शेतात पिकाची पाहणी साठी गेला होता मात्र संध्याकाळी परत न आल्याने गावकऱ्यांनी वनविभागाच्या मदतीने त्यांचा घेतला शोध, शेतातच छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला त्यांचा मृतदेह, भरडे यांच्या मृत्यूनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव, शंकरपूर-भिसी रस्त्यावरील आंबोली गावाजवळ रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टर वर मृतदेह ठेवत गावकऱ्यांनी रात्री केला रास्ता रोको, अखेर प्रशासनाने मृतकाच्या वारसाला वनविभागात नौकरी आणि वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचं आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी चिमूर येथे शव विच्छेदनासाठी मृतदेह नेला.
राज्यातील पाचवी आणि आठवी इयत्तांसह चौथी आणि सातवी या इयत्तांसाठीही यंदा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार चौथी आणि सातवीच्या परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमानुसार परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. 2016-17 पासून ही परीक्षा पाचवी आणि आठवी या वर्गासाठी लागू करण्यात आली. तेव्हापासून परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षण विभागाने पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा लागू करण्याचा निर्णय घेतला.
बिहार विधानसभेसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान
तेजस्वी यादवांच्या राघोपूर, उपमुख्यमंत्र्यांच्या तारापूरचा समावेश
गायिका मैथिली ठाकूरांच्या अलीनगर मतदारसंघाचाही समावेश
१८ जिल्ह्यांतील १२१ जागांसाठी आज मतदान होणार
उर्वरित १२२ जागांसाठी ११ नोव्हेंबरला मतदान होणार
१४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार
नवी मुंबई-
खारघर सेक्टर ३६ मधील अधिराज टॅावरमध्ये आग
५१ व्या मजल्यावर आग .
घरात अचानक आग लागल्याने घराचे मोठे नुकसान.
घरातील सदस्य कोणीही जखमी नाही.
खारघर अग्निशमन विभागाकडून आग विझविण्यात आली आहे.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाही .
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे आज मतदान