Maharashtra Live Blog Updates: कबुतरखान्यावरील कारवाईनंतर जैन समाज अन् गुजराती वर्ग नाराज, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

मुकेश चव्हाण Last Updated: 05 Aug 2025 04:42 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: कोल्हापुरातील 'महादेवी हत्तीण' प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. वनमंत्री गणेश नाईक, मंत्री चंद्रकांत पाटलांसह कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. मुंबई...More

स्पा सेंटरवर नावाखाली शिवसेनेचा पदाधिकारी चालवायचा कुंटनखाना

Slug :- स्पा सेंटरवर नावाखाली शिवसेनेचा पदाधिकारी चालवायचा कुंटनखाना , 
 भाग्यनगर पोलीस ठाण्यात पाच जनावर गुन्हा दाखल , चार महिलांची सुटका


अँकर : नादेडमधील कॅनल रोडवरील रेड ओक स्पा टू सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली येथे अश्लील प्रकार सुरू असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यावरून छापा टाकला असता असता स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले आहे. विशेष  म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेचा दक्षिण युवा सेना जिल्हाध्यक्ष अमोद साबळे हा पदाधिकारी स्पा सेंटरचा मालक होता ... स्पा सेंटरच्या नावाखाली शिवसनेचा पदाधिकारी कुटंनखाना चालवायचा ..
याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भाग्यनगर पोलिसांनी स्पा सेंटर मध्ये काम करणाऱ्या नागसेन गायकवाड, संतोष इंगळे, रोहन गायकवाड यांना अटक केली असून स्पा सेंटरचा मालक सेनेचा पदाधिकारी अमोदसिंग साबळे, मॅनेजर मनोज जांगिड हे दोघे फरार आहेत. स्पा सेंटर मधून पोलिसांनी चार महिलांची सुटका केली आहे. पोलिसांनी 16 हजार 560 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.  याबाबत भाग्यनगर पोलीस दोन आरोपीचा शोध सुरु केला असून पुढील तपास सुरू आहे. ..



बाईट - सुनील तांबे पोलीस निरीक्षक