- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Breaking LIVE News Updates: मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरू, राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE News Updates: देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE News Updates : देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. रात्री मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असताना...More
विरार : विरारच्या रमाबाई अपार्टमेंट मधील भीषण दुर्घटनेत १७ जण दगावले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. मात्र रमाबाई अपार्टमेंट अवघ्या १० ते १२ वर्षातच कोसळली. किती निकृष्ट दर्जाच बांधकाम झालं यावरून स्पष्ट होतं. याच विजय नगर परिसरात अशा अनेक अनधिकृत इमारती बांधण्यात आता ही येत आहेत. बिल्डर आपल्या कडील काम करणाऱ्याच्या नाव पुढे करत, पालिका त्या अनधिकृत बांधकाम नोटीस देते, एमआरटीपी पोलीस ठाण्यात दाखल केलं जात. त्या बिल्डराच्या नाममात्र कामगारांवर गुन्हा दाखल होतो. बिल्डर ते जेल मध्ये गेल्यावर त्याचा पगार चालू ठेवतो. आणि येथे इमारती बांधून बिल्डर मोकळा होतो. रहिवाशी लोन ने घर घेतो. आणि त्यातच गाडला जातो अशी शोकांतिका आहे. काही बिल्डर बांधकाम अर्धवट होताच काहींना राहायला देतो , बाहेर दिखाव्यासाठी कपडे लटकवतो, कलर मारतो आणि पालिका त्यांना लगेच घरपट्टी लावली जाते, महावितरण लगेच लाईट ही देते, त्यामुळे मोठं सिडिंकेट या ठिकाणी चालते, या संपूर्ण सिडिंकेटची माहीती मनसेचे विभागप्रमुख दिनेश आहिरे यांनी दिली आहे.
सरकारच्या उपसमितीकडे बीड जिल्ह्यातील आमदारांची नवी मागणी
ज्यांच्याकडे सातबारा आहे त्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरा
उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांकडे मांडला प्रस्ताव
आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, सुरेश धस यांनी केली मागणी
कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी आरक्षणाचा मिळतो लाभ
बीडच्या आमदारांनी केलेल्या मागणीवरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा तात्पुरती स्थगित
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तात्पुरती स्थगित करत असल्याची माहिती
मागील १८ दिवसापासून मंडल यात्रा राज्यभरात सुरू होती
ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांची एबीपी माझाला माहिती
एकीकडे मनोज जरांगे यांचं आंदोलन तेजीत असताना दुसरीकडे मंडल यात्रेमुळे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून पक्षाचा निर्णय
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी
वाल्मीक कराडच्या जामीन अर्जाचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला
विष्णू चाटेच्या दोष मुक्तीच्या अर्जाचा निर्णय देखील राखून ठेवला गेला
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची अनुपस्थिती
उर्वरित इतर आरोपींच्या वकिलांमार्फत दोष मुक्तीसाठी अर्ज दाखल केला
यावर 10 सप्टेंबर रोजी सुनावणी होईल
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महागाव व उमरखेड तालुक्यात अतिवृष्टीच्या फटका बसला आहे. जिल्ह्यातील 22 महसूल मंडळात 64 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास एक लाख हेक्टर शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, 3 हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. उमरखेड आणि महागाव या दोन तालुक्यात 80 हजार हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांचे नुकसान झाले आहे.
मागील काही दिवसापासून महाड एमआयडीसी परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ सुरू आहे. आता नव्याने या चोरट्यांनी महाड तालुक्यातील मौजे पिंपळदरी गावात डल्ला मारत एका बंद घरामध्ये घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे.महाड - पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या एका बंद घरामध्ये या चोरट्यांनी तब्बल एक लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात महाड एम आय डी सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
तुळजाभवानी देवीच्या पुजारी मंडळामध्ये अंतर्गत वाद सुरू झाला आहे. श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ बरखास्त करा अशी मागणी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे . गंगणे यांनी तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या कार्यकारिणीवर भ्रष्टाचाराच्या आरोप करत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील केली आहे. तर मंडळाची विद्यमान अध्यक्ष विपिन शिंदे यांनी सुपारी घेऊन आरोप केले जात असल्याचा पलटवार केला आहे. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या मनमानी कारभाराला विरोध केल्यामुळेच हे आरोप केले जात असल्याचा प्रतिहल्ला त्यांनी केला. पुजारी मंडळाच्या आजी-माध्य अध्यक्ष मध्ये रंगलेला हा वाद यामुळे वातावरण चांगले ढवळून निघाल आहे. माजी अध्यक्षांकडून करण्यात आलेल्या तक्रारीवर धर्मादाय आयुक्त काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.
Beed News : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड जवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सकाळी आठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने सहा जणांना चिरडले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातातील जखमी मयत हे पेंडगाव येथे दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र मृत व जखमींची नावे अद्याप समजू शकलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी गढी उड्डाणपुलाजवळ अशाच प्रकारे कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सह्याद्री अतिथीगृहावर दाखल
अमित शाहांसोबत भाजपच्या महाराष्ट्र व मुंबई अध्यक्षांची खलबते
मुंबईसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चेची शक्यता
सोशल मीडियावर पिस्तूल घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना जुनी सांगवी परिसरात घडली आहे,
या प्रकरणी सांगवी पोलिसांनी ओम उर्फ नन्या विनायक गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह आशिष वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओम गायकवाडच्या हातात पिस्तूल असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने तो व्हिडिओ स्वतःचा असल्याचे कबूल केले. व्हिडिओमधील पिस्तूल त्याचा मित्र आशिष वाघमारे याचे असून, पोलिसांनी पकडण्याच्या भीतीने त्याने ते पिस्तूल ओमकडे लपवण्यासाठी दिले होते. पोलिसांनी ओमने लपवून ठेवलेले ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. या प्रकरणी अधिक तपास सांगवी पोलीस तपास करत आहेत.
अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा परिसरात ऑटो रिक्षाचालकांनी अवघ्या काही मिनिटांत रस्त्या मधून जाणाऱ्या गटारावरील चार लोखंडी झाकणांची चोरी केल्याची घटना उजेडात आली आहे रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून जाताना रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने लोखंडी झाकण चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात घेत झाली आहे. वर्सोवा जयप्रकाश रोडवरील आराम नगर एक येथील बरिस्ता आणि हाकिम अलीमजवळील रस्त्यावरील झाकणे चोरीस गेली आहेत.
बीएमसीच्या निकृष्ट डिझाइनमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून नागरिकांनी अशा चोरांवर BNS अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या चोरीमुळे करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांचा नुकसान होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
आझाद मैदानात गेल्या अर्धा तासापासून पाऊस कोसळत आहे. यामुळे मैदानात चिखल झाला आहे. मराठा आंदोलकांची गैरसोय
मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. रात्री मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असताना शेकडो मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आसरा घेतला. तिकीट घर ते अगदी फलाटा पर्यंत शेकडो मराठ्यांनी रात्री झोपण्यासाठी आसरा घेतला. मुंबईच्या या महत्वाच्या स्थानकात रात्रभर एक मराठा लाख मराठा जयघोष गुंजत होता. इथे कायदा सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस ही तैनात होते.
डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पुन्हा एकदा कोल्हापुरात केली फसवणूक
कोल्हापूरच्या डॉक्टर पिता पुत्रांना जवळपास 48 लाखांना लुटलं
तुमच्या आधार कार्डचा वापर करून अतिरेक्यांना पैसे पाठवल्याचा केला बनाव
कारवाई मधून वाचवतो म्हणत तोतया पोलीस निरीक्षकांना केली फसवणूक
मुंबईच्या कुलाबा येथून कोल्हापूरच्या डॉक्टर पिता पुत्राची केली फसवणूक
राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
लातूर जिल्ह्यावर गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील ६० पैकी तब्बल ३६ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. अतिवृष्टी, वीज कोसळणे आणि पूर यामुळे जिल्ह्यात २७ जनावरे व ६०५ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असून, ११६ घरांचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे पुलांवरून पाणी वाहत असल्याने शुक्रवारी जिल्ह्यातील जवळपास ६५ मार्गांवर वाहतूक ठप्प राहिली. मांजरा, रेणा, तेरणा, तावरजा, तिरू या प्रमुख नद्यांसह असंख्य नाले-ओढ्यांना पूर आला आहे. लातूर-धाराशिव-बीड सीमेवरील मांजरा धरण ९८ टक्के भरले असून सहा दरवाजांतून विसर्ग सुरू आहे. मांजरा नदीवरच्या ११ बॅरेजेसचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
सर्व प्रकल्प तुडुंब भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी शेतीवर मोठे संकट ओढवले आहे. पिके पाण्यात बुडाल्याने काढणीला आलेली शेती वाया जाण्याची भीती आहे. शेतशिवारात पाणी साचल्यामुळे पिके पिवळी पडत असून कुजण्याचा धोका वाढला आहे.
एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पहाटेपासून भंडाऱ्यात हलक्या स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. कुठं हलक्या तर, कुठं मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसात आहेत. दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसानं झोडपून काढलं होतं. अधूनमधून पडणारा हा पाऊस भात पिकासाठी फायद्याचा ठरणारा आहे. या पावसाच्या हजेरीनं शेतकरी समाधानी आहेत.
ब्रेकिंग
मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विनोद तावडे यांच्याशी चर्चा
राज्यातील मराठा आरक्षणासह, बिहार निवडणूक आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा
मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबतही अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्याकडून घेतली माहिती
नागपूर -
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाला शासनाची मंजूरी...
पवनार ते सांगली दरम्यान जमिनीची आखणी व अधिग्रहणाला परिपत्रक काढून ही मंजुरी देण्यात आली.
उर्वरीत भागाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्या भागातील जमीन अधिग्रहणाची अधिसूचना काढण्यात येईल.
मध्य रात्री पासून आझाद मैदान परिसरात पाऊस पडत आहे. यामुळे मैदान परिसरात चिखल झाला आहे. तरी देखील मराठा आंदोलक मैदानात उपस्थित रहाण्यास सुरुवात झाली आहे. जो पर्यंत जरांगे पाटील यांचा आदेश येत नाही तो पर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE News Updates: मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरू, राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...