Live Blog Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती नाही, पुढील सुनावणी 21 जानेवारीला
Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Live Blog Updates: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, जिल्हा परिषद आणि...More
अजित पवारांचा महिला उमेदवाराला थेट मंचावर प्रश्न, लव्ह मॅरेज झालंय का?
अजित पवारांनी मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले यांना लव्ह मॅरेज झालंय का? असा प्रश्न विचारला. सासर आणि माहेर एकाच गावात आहे, म्हणून हा प्रश्न विचारल्याच दादा म्हणाले.
आता परत बातमी व्हायची अजित दादांनी प्रलोभन दाखवलं?
मंचरच्या पाण्यासाठी 135 कोटींचा निधी मंजूर करायला किती वेळ लागेल, असं अजित पवार म्हणाले. तितक्यात मागून एक चिठ्ठी आली, त्यात 135 नव्हे तर 136 कोटी असा उल्लेख होता. अरे बोललो की मी हे, अच्छा मी 1 कोटी कमी बोललो व्हय. अरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं की 136 तर 136 कोटी निधी मंजूर करायला किती वेळ लागेल तेंव्हा. आता बातमी होईल की मी प्रलोभन दाखवलं.