Maharashtra Live blog Updates : राज्यातील अन् देश-विदेशातील ताज्या घडामोडी; पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Live blog Updates : राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर, मुंबई-ठाण्यातही दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली...More
धुळे : राज्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती असताना, धुळे जिल्ह्यातील ५० पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पगारातून दोन लाख रुपये गोळा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी चेक सुपूर्त केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हा चेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिला.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे त्यामुळे कयाधू नदीला पूड आलेला आहे कयाधू नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावरून जात असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे कयाधू नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळते आहे कयाधू नदीचे पाणी पात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे तर स्वतः जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सुद्धा या ठिकाणच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे रस्त्यावरून पाणी जात असताना कोणीही जीव धोक्यात घालून या ठिकाणावरून प्रवास करू नये असा आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे
लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघा जणांना नगर तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात...
नगर - दौंड महामार्गवर लक्ष्मण हाके नाष्टासाठी थांबले असता त्यांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी केला होता हल्ला....
नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु..
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली माहिती
बीड : बीड जिल्ह्यातील पावसाची स्थिती लक्षात घेता उद्या होणारा ओबीसी महाएल्गार मेळावा रद्द
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झाले असून हीच बाब लक्षात घेता उद्याचा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती संयोजक सुभाष राऊत यांनी दिली
ओबीसींच्या न्याय हक्कासाठी उद्या मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बीडमध्ये महाएल्गार सभा आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं
मात्र मुसळधार पावसानं बीड जिल्ह्याला झोडपून काढल आहे
त्यामुळे उद्याचा मेळावा हा पुढे ढकलण्यात आला आहे
बीडच्या माजलगाव धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सिंदफना नदीपात्रात केला जात आहे.सांडव्या समोरील पुलावरून एक शेतकरी माजलगाव कडे येत होता.मात्र पुलावरून वाहत असलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे तो वाहून जात असल्याचे समजताच देवखेडा येथील तरुणांनी त्याला बाहेर काढत त्याचा जीव वाचवला.दैव बलवत्तर होते म्हणून त्याचा जीव वाचला.असे असले तरी जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी पाहता नदीपात्रात विसर्ग केला जात असताना प्रशासनाच्या आवाहनानंतरही नागरिकांकडून मात्र याबाबत कुठलीही दक्षता घेतली जात नसल्याचं दिसून आलंय.
मराठवाड्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा
रात्रीतून तब्बल 141 मंडळात अतिवृष्टी
लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्याला पावसाने झोडपले
बीड 20, लातूर, 38, धाराशिव 18, नांदेड 25, हिंगोली 19, परभणी 21.
भंडारा जिल्ह्यात मध्यरात्री पडलेल्या मुसळधार पावसानंतर वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीवर असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं धरणाचे नऊ दरवाजे अर्धा मीटरनं उघडले आहेत. या 9 दरवाजांमधून 42,582 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं पाऊस पडल्यास धरणाचे आणखी दरवाजे उघडण्यात येण्याची शक्यता धरण प्रशासनानं व्यक्त केली आहे.
धाराशिवच्या परांडा येथील सिना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे.आज सकाळी १० वाजल्यापासून ५० हजार क्युसेकवरून विसर्ग वाढवून ५५ हजार ४४० क्युसेक इतका करण्यात येणार आहे,अशी माहिती कार्यकारी अभियंता, सिना कोळेगाव प्रकल्प विभाग,परंडा यांनी दिली. यामुळे सिना नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतकरी व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी,असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता विसर्गात आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात असलेल्या पारडी येथील ओढ्याला आलेल्या पुरात सात म्हशी वाहून गेल्याची घटना घडली आहे स्थानिकांनी शोधाशोध करून सात पैकी चार मशीन परत मिळाले आहेत तर तीन म्हशी अजूनही बेपत्ता आहेत राजू रौतुलवाड यांच्या या म्हशी असल्याचे सांगण्यात येते रात्री झालेल्या पावसाने हा प्रकार घडला आहे तालुक्यात यापूर्वीही अनेकदा अतिवृष्टी झालेली आहे.
राज्यातील पंचनामे पूर्ण झाल्यावरच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव जाणार
राज्य सरकारकडून जलदगतीने पंचनामे करण्यास सुरुवात
एकूण नुकसान किती झालं यासंदर्भात आढावा झाल्यावरच प्रस्ताव केंद्राकडे
त्यानंतर केंद्राकडून पथक येत पाहाणी करुन मदत जाहीर करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती
केंद्राच्या मदतीला प्रक्रिया असल्याने राज्य सरकारकडून मदत आधीच पुरवण्यास सुरुवात केल्याची माहिती
एकूण ९ शासन निर्णयाद्वारे २ हजार २१५ कोटींची मदत वितरित करण्यास सुरूवात
राज्यातील पंचनामे पूर्ण झाल्यावरच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव जाणार
राज्य सरकारकडून जलदगतीने पंचनामे करण्यास सुरुवात
एकूण नुकसान किती झालं यासंदर्भात आढावा झाल्यावरच प्रस्ताव केंद्राकडे
त्यानंतर केंद्राकडून पथक येत पाहाणी करुन मदत जाहीर करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती
केंद्राच्या मदतीला प्रक्रिया असल्याने राज्य सरकारकडून मदत आधीच पुरवण्यास सुरुवात केल्याची माहिती
एकूण ९ शासन निर्णयाद्वारे २ हजार २१५ कोटींची मदत वितरित करण्यास सुरूवात
दहा दिवसात तिसऱ्यांदा सीना नदीला महापूर
माढा-वैराग रोडवरील पुलावर तीन फूट पाणी
वाहतुकीसाठी पूल पुन्हा बंद झाला आहे
पहिला महापूर १७ तारखेला आला होता, त्यांनतर २२ आणि आज पुन्हा २७ ला सीना नदीला पूर आला आहे
एका बाजूला नदीला महापूर तर दुसऱ्या बाजूला जोरदार पाऊस सुरू
तळकोकणात सध्या पावसाची संततधार सुरु आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्गात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग वाढला असून खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. जिल्ह्यात भात परिपक्व अवस्थेत असून मुसळधार पाऊस पडल्यास भात शेतीला फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांना वाटतं आहे,
Pune News: पुणे- बेंगलोर महामार्गावर खंबाटकी घाटातील दत्तमंदीराजवळ अवजड मालट्रक बंद पडल्याने घाटातील वाहतुक विस्कळीत झाली आहे . या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने वाहतुक संथ गतीने सुरु आहे . घाटात वाहनांच्या रांगा लागल्याने काही वाहनचालकांनी खांबाटकी बोगद्यातून सातारा बाजुला जाण्यास सुरुवात केल्याने दोन्ही मार्गावरील वाहतुक मंदावली आहे . 42 टन वजनाचा हा ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजुला काढण्याचे प्रयत्न पोलीस करीत आहेत .
पावसामुळे मोठा हाहाकार झालेला आहे आमच्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेला आहे
पुन्हा पाच ते सहा दिवस रेड अलर्ट सांगितला आहे
महाराष्ट्राला कोणती अडचण येऊ नये आता खूप पाऊस झालेला आहे
गेलेली पिक याबाबत आम्हाला मदत करायचे आहे त्या माध्यमातून आम्ही कामाला लागलेला आहोत
सोमेश्वर मंदिरामध्ये नूतनीकरण करत आहोत आणि बाबी मला करायचे आहेत
भाविकांना लागणाऱ्या सुख सुविधा मी देतो आहोत
परवा अमित शहा आपल्या राज्यात होतं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी भेटून त्यांना पत्र दिलं होतं त्याच वेळेस पंतप्रधानना भेटण्याचा ठरलं होतं
महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या वतीने जी परिस्थिती आहे ती सावरण्या करता सरकार कटिबद्ध आहे
केंद्र सरकारकडून मदत व्हावी यापेक्षा आहे
कर्जमाफी बाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले आम्ही योग्य तो निर्णय घेऊ
बीड: मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली. तीन दिवस पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे जनजीवन पूर्वरत होत असतानाचा मध्यरात्री पुन्हा जोरदार पावसाने धुमाकुळ घातला. अनेक सखल भागात पाणी शिरले असून बीडचे ग्रामीण पोलिस ठाणे देखील पाण्यात आहे. संपूर्ण पोलिस ठाणे पाण्याखाली गेल्याने सकाळपासून कामकाज बंद आहे. पोलिस ठाण्यात शिरलेले पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचे युद्धपातळीवर कार्य सुरू आहे.
Beed Rain : मध्यरात्री आणि सध्या संततधार सुरू असलेल्या पावसाने ग्रामीण भागासह बीड शहरात दानादान उडवून दिलीय. शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदी परिसरातील धांडे नगर, शिवतेज नगर, शंभूराजे नगर, भोसले नगर, सावता नगर यासह परिसरात कमरे इतकं पाणी साचले. त्यामुळे या ठिकाणच जनजीवन विस्कळीत झालं. या पाण्यातून वाट काढण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.. दरम्यान ही परिस्थिती पाहता प्रशासनाने आम्हाला बोट उपलब्ध करून द्यावी अन्यथा हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याची वेळ येईल अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिल्यात.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात
पश्चिम उपनगरात मागील दहा ते पंधरा मिनिटांपासून अंधेरी, जोगेश्वरी,गोरेगाव,मालाड कांदिवली,बोरिवली,दहिसर,विलेपार्ले सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे
पश्चिम उपनगर आज सकाळपासून ढगाळ वातावरण होता, मात्र दहा ते पंधरा मिनिटांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाला आहे
जर असंच जोरदार पाऊस काही वेळ सुरू राहिला तर पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात होणार आहे....
- नाशिक शहरात बिबट्यानंतर तरसाचा धुमाकुळ...
- म्हसरूळ बोरगड पुष्पक नगरच्या परिसरात काल दिसून आला तरस ...
- सकाळी होता मोराडे मळा परिसरात तर सायंकाळी प्रभात नगर, पाण्याची टाकी जवळ आला होता आढळून...
- रात्रीच्या वेळी पुष्पक नगरला शिरला होता सोसायटीत, नागरिकांमध्ये घबराट...
- तरस cctv मध्ये कैद, तरसाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाला पाचारण...
वाशिम : वर्धावरून संभाजीनगर इथं पुरवठा होणाऱ्या वीज वितरण करणाऱ्या 400kv उच्चदाब असलेल्या विद्युत वाहिनी तारेवर विज कोसळल्याची घटना घडली. वाशिमच्या चिवरा शेत शिवारात काल संध्याकाळच्या सुमारास हि घटना घडली. विद्युत तारा जिवंत वीजप्रवाहसह खाली कोसळल्यामुळे काही शेतीच नुकसान झालं असून परिसरातील गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सुदैवाने या अपघात वेळी शेतात मजूर वर्ग नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
Hingoli News : हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील दांडेगाव शिवारामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आलेला आहे तर पुराचे पाणी आजूबाजूच्या शेत शिवारामध्ये शिरलेलं आहे. हा ओढा गावाजवळ वाहत असल्यामुळे अर्ध्या गावाला या ओढ्याच्या पुराण वेळा मारलेला आहे. तर या ओढ्याच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतातील पिकांचा अतोनात नुकसान होत आहे. आता या भागात अनेक ठिकाणी शेतामध्ये गुडघ्याइतकं पाणी साचलेलं आहे.
Nanded News : गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस मध्यरात्री नांदेडमध्ये परतला आहे. शहरासह सर्वदूर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसतोय. ढगफुटी सदृश्य पावसाने नांदेड शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे पुन्हा सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झालाय. गोदावरी आणि आसना नदीचा पूर काल काहीसा ओसरला होता. मात्र, आता या पावसाने पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. आज नांदेडला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यामुळे रात्रीच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शाळा, कॉलेज अन् खाजगी क्लासेसला सुट्टी दिलीय. पावसाने खंड नाही दिला तर नांदेडची पूरस्थिती बिकट होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
Buldhana News : विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2025 मध्ये देशातील डिजिटल गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 1997 पासून सुरू झालेल्या या मालिकेतील ही 28 वी राष्ट्रीय परिषद ठरली.
या श्रेणीत देशभरातील तीन लाखांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये अव्वल ठरून बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र व सध्या सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे (भा. प्र. से.) यांना सुवर्ण पुरस्कार मिळाला. हा सन्मान केंद्रीय मंत्री श्री. जितेंद्रसिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण आणि विशाखापट्टणमचे खासदार श्री. मुथुकुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
Maharashtra News : धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पाण्याची आवक पाहता माजलगाव आणि मांजरा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा आता माजलगाव धरणातून सिंदफणा नदी पात्रात धरणाचे 11 दरवाजे उघडत 42000 क्यूसेकने विसर्ग केला जात आहे. तर केजमधील धनेगाव येथील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडत नदीपात्रात 27166 क्युसेकने विसर्ग केला जात आहे. यामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Mumbai News : मुंबईत हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज आता खरा ठरतोय. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात गेल्या तासाभरापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाचा फटका नागरिकांना बसताना दिसत आहे. शिवाजी पार्कमध्ये दररोज व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे अडथळा निर्माण झाला आहे. हवामान खात्याने वर्तवलेला इशारा आता प्रत्यक्षात खरा ठरताना दिसत आहे.
Solapur News : सोलापुरात मागील काही दिवसांपासून पूरपरिस्थिती आहे. अनेक गावांना सीना नदीच्या पाण्याने वेढा दिलाय. या पुराच्या पाण्यात अनेकांच्या घरात साप येत असल्याचे दिसून येत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ गावात साळींदर प्राणी आढळूबन आला. पाण्याच्या भीतीने साळींदर रस्त्यावर आला होता. त्याला वन्यजीवप्रेमींनी सुरक्षित रेस्क्यू केलं. दरम्यान शुक्रवारी सर्प दंशाने सोलापुरात एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. गावात पाण्याचा वेढा वाढल्याने नदीत असलेले साप तर वाहून येतायत मात्र विषारी साप देखील सुरक्षित जागा शोधण्याच्या प्रयत्नात लोकांच्या घरात घुसतायत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं आहे.
Mumbai News Updates : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये सोमवार, 29 सप्टेंबर रोजी (सप्तमी) ध्वनिवर्धकांच्या वापरास एक दिवसाची अतिरिक्त सवलत देण्यात आली आहे. साधारणपणे ध्वनिवर्धकांच्या वापरावर वेळेची बंधने लागू असतात. मात्र, नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सप्तमीच्या दिवशी सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना अडथळा येणार नाही. दरम्यान, असं असलं तरी संबंधितांनी ध्वनीप्रदूषणाबाबतचे नियम व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याआधी ही सूट 28 सप्टेंबरपर्यंत देखील आली होती. आता यात वाढ करत आणखी एक अतिरिक्त दिवसाची वाढ करण्यात आली आहे.
Maharashtra News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला तारखेनुसार आज शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपूर येथे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली होती. “संघटित हिंदू समाज” घडविण्याच्या उद्देशाने सुरु झालेला हा उपक्रम आज शतकपूर्तीच्या टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या शंभर वर्षांत संघाने समाजकार्य, शिक्षण, सेवा, संस्कृती जपणे तसेच राष्ट्राभिमान वाढविणे या विविध क्षेत्रांत काम केले आहे. संघाच्या विचारसरणीवर आधारित अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभिमुख संस्था देशभर उभ्या राहिल्या आहेत. शतकपूर्ती वर्षानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे सुरु आहे. नागपूरमध्ये देखील आज विशेष पथसंचालनाचे आयोजन करण्यात आले आहे.
Thane News : ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही सखल भागांत तर पाणी भरायलाही सुरुवात झाली आहे. वंदना डेपो परिसर जलमय झाला आहे. काही ठिकाणी पंपाच्या साहाह्याने पाणी निचरा करण्याचे काम सुरु आहे.
Beed News : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्य पिंजून काढणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बीडमध्ये होणाऱ्या महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवरून वगळण्यात आले. बीडमध्ये हे बॅनर लागल्यानंतर हाके यांनी आपल्या सोशल हँडलवर भावनिक पोस्ट देखील केली. 28 तारखेला बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाएल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं. मात्र, अलीकडच्या काळात ओबीसी आरक्षणावरुन रान पेटविणारे लक्ष्मण हाके यापासून काहीसे दूर आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी महाएल्गार मेळाव्याचे बॅनर लागलेत. या बॅनरवर लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे यांचा देखील फोटो नाही. दरम्यान या बॅनरमुळे सध्या चर्चा रंगू लागली आहे.
Nanded News : गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस मध्यरात्री नांदेडमध्ये परतला आहे. शहरासह सर्वदूर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसतोय. ढगफुटी सदृश्य पावसाने नांदेड शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे पुन्हा सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गोदावरी आणि आसना नदीचा पूर काल काहीसा ओसरला होता. मात्र, आता या पावसाने पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. आज नांदेडला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता, त्यामुळे रात्रीच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शाळा कॉलेज अन खाजगी क्लासेसला सुट्टी दिलीय. पावसाने खंड नाही दिला तर नांदेडची पूरस्थिती बिकट होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
Hingoli News : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रात्री नऊ वाजता हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा पाऊस बरसत असल्याने बळीराजा पुरता हैराण झालेला आहे. कारण अगोदर झालेल्या पावसाने शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यात पुन्हा हा पाऊस बरसतोय त्यामुळे नुकसान वाढण्याची शक्यता आहे.
Bhandara News : मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. विजांच्या प्रचंड गडगडाटासह सुमारे दोन तास कोसळलेल्या या मुसळधार पावसानं तुमसर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. तुमसर शहरातील प्रसिद्ध बावली मंदिरात या पावसाचं पाणी शिरलं. रात्रीच्या वेळी अनेकांनी मोटरपंप लावून शिरलेलं पावसाचं पाणी बाहेर काढल्याचही बघायला मिळालं. कापणीला आलेलं भातपीक ही मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी भुईसपाट झालंय. यामुळे शेतकरी आता आर्थिक विवंचनेत सापडलाय. लाखांदूर, लाखनी, मोहाडी या तालुक्यातही या अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय.
Dharashiv News Updates : धाराशिवमध्ये रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. तेरणा नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धाराशिवच्या संजीतपूरचा संपर्कही तुटला आहे. मुसळधार पावसामुळे आज शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापुराने हैराण असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोयाबीनचा चिखल आता काढणे कशी करणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
Parbhani News : परभणी जिल्ह्यात रात्रभर संततधार पाऊस सुरु आहे. अनेक भागांंत विजांच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस सुरु आहे. गंगाखेड पालम सोनपेठ पाथरी पूर्णा तालुक्यात पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे. सध्या गोदावरी, पूर्णा दुधना तिन्ही नद्यांची पाणी पातळी नियंत्रणात आहे. मात्र, उरली सुरळी पिकेही या पावसाने हातून जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अभूतपूर्व नुकसान यंदा पावसाने केले आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog Updates : राज्यातील अन् देश-विदेशातील ताज्या घडामोडी; पाहा एका क्लिकवर...