- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Blog Updates: बीडमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक, पंडित-हाके समर्थक आमनेसामने
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: 29 ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज (25 ऑगस्ट) अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद आहे. आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचं, असा...More
नाशिक : १४ आणि १५ सप्टेंबरला नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी प्रमुख नेत्यांचं मार्गदर्शन, तर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चामधून "ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या" अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.
जळगाव : शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून जळगाव शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत हरतालिका व गणेशोत्सवाच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची तसेच व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली आहे. जळगाव शहरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली असून हरतालिका गणेश चतुर्थी यासह गणेशोत्सव काळात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
एस टी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला
उद्या होणार एस टी कर्मचाऱ्यांचा पगार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवासाठी या महिन्यात लवकर केला जाणार होता
त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील एस टी कर्मचारी पगाराची फाईल मागच्या आठवड्यात वित्त विभागाकडे पाठवली होती आणि लवकर निधी देण्याचे मागणी केली होती
त्या मागणीला आले यश
उद्याच एस टी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नेहमी ७ ते १० तारखेपर्यंत पगार होतो
मात्र या महिन्यात खास बाप्पासाठी परिवहन मंत्रांनी लवकर पगार करण्याचे दिले आदेश
ठाणे : शहरातील पहिली मेट्रो ट्रायल रन लवकरच सुरू होणार आहे. एमएमआरडीए सप्टेंबर महिन्यात मेट्रो लाईन ४ आणि ४-अच्या १०.५ किमीच्या पहिल्या टप्प्यावर ट्रायल रन घेणार आहे. आज काही मेट्रो डबे कॅडबरी ते गायमुख या मार्गिकेवरील स्थानकांवर पोहोचवण्यात आले असून, काही डबे आज रात्री ट्रॅकवर ठेवले जाणार आहेत. हा मार्ग उन्नत (elevated) असल्याने डबे क्रेनच्या मदतीने ट्रॅकवर चढवले जात आहेत. ट्रायल रनसाठी १० स्थानके सज्ज – कॅडबरी, माजीवाडा, कपूरबावडी, मानपाडा, टिकुजी-नी-वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासरवाडावली, गोवानिवाडा आणि गायमुख. सध्या मेट्रो स्टेशनचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ठाणेकरांना लवकरच मेट्रो प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
महाड : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आज महाड शहरातील खड्ड्यांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. हातात कोंबड्या घेऊन खड्ड्यात बसून कार्यकर्त्यांनी अनोखा निषेध नोंदविला. महाड नगरपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या महाड शहरातील खड्ड्यांचा प्रशासनाला ऐन गणेशोत्सव काळात पडलेला विसर दाखवून देण्यासाठी शहरातील खड्ड्यांमध्ये ठिकठिकाणी चिखलात बसून महाड नगरपरिषद प्रशासन विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली.
मुंबई : महायुतीचे प्रमुख नेते राजभवनावर दाखल झाले आहेत. एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा राजभवन येथे सन्मान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील थोड्याच वेळात राजभवन येथे दाखल होणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व महायुतीचे इतरही आमदार राजभावनावर दाखल झाले आहेत. सत्कारानंतर राजभवनावर आमदार व नेत्यांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
जगदगुरु संत नरेंद्राचार्य महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा
मंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
संत नरेंद्राचार्य महाराज यांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार देण्याची मागणी
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, यासह अनेक मागण्यांसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत धडकणार आहे. दरम्यान या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचा पवित्र घेतला आहे. जरांगे राजकारणासाठी सरकारला ब्लॅकमेल करत आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. जर जरांगेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली नाही, तर माननीय उच्च न्यायालयात आपण धाव घेणार, असा इशाराही गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय.
बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात अनेक आमदार-खासदारांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणारे धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष धसे यांच्याविरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार भरत नवनाथ खेडकर यांना 2016 मध्ये शेततलावाच्या दुरुस्तीचे टेंडर मिळवून देतो, तसेच पार्टनरशिपमध्ये काम करू या.. असे सांगून संशयितांनी तब्बल साडेतेरा लाख रुपयांची रक्कम घेतली. मात्र, आजतागायत ना टेंडर मिळवून दिले, ना पैसे परत केले. त्यामुळे अखेर खेडकर यांनी पोलिसांकडे धाव घेत गुन्हा दाखल केला. धनंजय धसे हे सध्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून दिल्ली येथे काम पाहत असल्याची माहिती पुढे आली आहे. खासदारांच्या पी.ए.वरच गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात खासदार बजरंग सोनवणे यांच्या कार्यालयाला विचारले असता, “धनंजय धसे हे आमच्याकडे ऑन रेकॉर्ड कुठलेही स्वीय सहाय्यक म्हणून काम करत नाहीत”, असे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र, धसे हे दिल्ली आणि मुंबईतील कामकाज पाहतात, अशी माहिती कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे.
रस्त्यावरील खड्यातून मार्ग काढताना दुचाकी स्वार महिलेचा अपघात
खड्डे वाचावीत असणाऱ्या पाहिलेला चारचाकी ने दिली धडक
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताची घटना cctv मध्ये चित्रित
नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरात घडली अपघाताची घटना
गणेशोत्सवापूर्वी नाशिक शहरातील खड्डे बुजवण्याचं आश्वासन महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले होते मात्र अद्यापही नाशिक शहरातील खड्डे बुजवले नसल्याने अपघात होत आहेत
निलंगा तालुक्यातील लामजना–लातूर रोडवर भीषण अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू झाला. सरवडी गावचे सोमनाथ दयानंद हिप्परगे (२२), अभिजीत शाहूराज इंगळे (२३) व डिंगबर दत्ता इंगळे (२७) हे तिघे मोटरसायकलवरून लातुरवरून आपल्या गावाकडे जात होते. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास करजगाव पाटी येथे समोरून आलेल्या कारने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे सरवडी परिसरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिक : नाशिक शहरातील विविध भागांमध्ये बिबट्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळत आहे. नाशिक रोड देवळाली पाथर्डी फाटा या परिसरानंतर आता म्हसरूळ आडगाव लिंक रोड परिसरात देखील बिबट्याचा वावर वाढला आहे. आडगाव येथील संदीप नवले या शेतकऱ्याच्या घराबाहेर काल रात्री बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. बिबट्याने दबक्या पावलाने श्वानाचा फडशा पडला संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाली आहे. अगदी शहराला लागून असलेल्या परिसरात बिबट्याचा वापर पाहायला मिळत होता मात्र आता शहराच्या मध्यवर्तीय भागात देखील बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भेटीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पश्चिम उपनगरात आज पहाटे पासून अधून मधून मुसळधार पाऊस सुरू आहे
या जोरदार पावसामुळे पश्चिम रेल्वेवर लोकल ट्रेन उशिराने धावत आहे
पश्चिम रेल्वेवर लोकल ट्रेन दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे
ट्रेन उशिराने धावत असल्यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे
विरार कडून अंधेरी ला येणारा मार्गावर दहा ते पंधरा मिनटं उशिराने लोकल ट्रेन सुरू आहे
ट्रेन उशिराने धावत असल्यामुळे अंधेरी रेल्वे स्टेशनवर नेहमी पेक्षा जास्त प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे....
धावत्या कारचे टायर फुटले; महामार्गावर तासभर थरार
महामार्गावर थरारक घटना घडली. सुसाट धावणाऱ्या कारचे टायर फुटूनही चालकाने कार न थांबवता डिक्सवरच महामार्गावर धोकादायक वेगाने पळवली. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तब्बल एक तास पोलिसांनी कारचा पाठलाग केला आणि अखेर चालकाला ताब्यात घेतले. या घटनेबाबत चापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ख्रिश्चन समाजाने राज्यभर माझ्या विरोधात मोर्चे काढून माझी आमदारकी गेली पाहिजे अशी मागणी केली. मला याबाबतीत मुंबई हायकोर्टाची नोटीस देखील आलीय. पण तुम्ही गाव गाड्यातील गरीब लोकांना सेवाभाव दाखवून धर्मातरणाच्या बाबतीत ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत त्याला आम्ही विरोध करत राहू. भले माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे. मला याच्याशी काही देणेघेणे नाही असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठणकावून सांगितलेय सांगलीत बाळासाहेब गलगले फौंडेशनच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांना 'धर्मरक्षक' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात बोलताना पडळकर यांनी हे विधान केलंय. आजही समाजात मुघल प्रवृत्तीची लोक आहेत आणि त्यांना आपण ठेचून काढायचे आहे. एकीकडे सर्वधर्म समभाव म्हणायचे मग हिंदूचे जबरदस्तीने धर्मातरण का केले जातेय असा माझा प्रश्न आहे. . पण हिंदूच्या वर जर कुठे अन्याय होत असेल तर त्याबाबत मी नेहमी आक्रमक भूमिका घेणार असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठणकावून सांगितलेय.
कोकणात येणाऱ्या लाखो गणेश भक्तांच्या सेवेसाठी मुंबई गोवा महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई गोवा महामार्गावर जागोजागी स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉल मधून आरोग्यसेवा,मोफत नाश्ता, आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची सुविधा ठेवण्यात आली आहे. माणगाव,इंदापूर, लोणेरे या भागात या स्टॉल मध्ये शासकीय कर्मचारी गणेशभक्तांना या सुविधा पुरविणार असून गणेशभक्तांना वाहतूक कोंडीच्या समस्या नंतर काहीसा या स्टॉल च्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. गणेशभक्तांना रस्त्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा काटेकोरपणे काळजी घेतली जात आहे.
ठाण्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिला हप्त्यात मेट्रोची होणार ट्रायल रन...
५ ते ९ सप्टेंबर दरम्यान होणार पहिला ट्रायल रन...
ठाण्यातील आनंद नगर परिसरात मेट्रो लाईन क्रमांक ४ ची ट्रायल रन होणार असून याकरिता मेट्रो ट्रेनची बोगी आणण्यात आली आहे.
रात्रीपासूनच क्रेनच्या साह्याने ही बोगी मेट्रो लाईनवर चढवण्याचे काम सुरू आहे..
मेट्रो लाईन -४ मेट्रो रेल्वे स्टेशनच काम युद्धपातळीवर सुरू...
डीजे मुळे त्रास होतो.“डीजेऐवजी बाहेरगावचे भारी बॅण्ड पथक, ढोल पथकावर भर लावा. ऐकायला, पाहायला छान वाटते. पैशांसाठी व्यासपीठावर नेते आहेत, त्यांनी नाही दिले तर शेवटी मी आहेच. माझी बॅग उघडीच आहे. आपण व्हिडीओची चिंता करत नाही,” असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावरून केलेल्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. शिरसाट यांच्या या विधानामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही आनंदाची प्रतिक्रिया उमटली. सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्यासाठी ते नेहमीच तयार असल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला.
डीजे मुळे त्रास होतो.“डीजेऐवजी बाहेरगावचे भारी बॅण्ड पथक, ढोल पथकावर भर लावा. ऐकायला, पाहायला छान वाटते. पैशांसाठी व्यासपीठावर नेते आहेत, त्यांनी नाही दिले तर शेवटी मी आहेच. माझी बॅग उघडीच आहे. आपण व्हिडीओची चिंता करत नाही,” असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावरून केलेल्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. शिरसाट यांच्या या विधानामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही आनंदाची प्रतिक्रिया उमटली. सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्यासाठी ते नेहमीच तयार असल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला.
राज्यात गणेशोत्सवात पाऊसधारा
कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस
पुढील काही दिवस पावसाचा जोर पुन्हा वाढणार
मुंबईत आज सर्वत्र पावसाची शक्यता, दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस
उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज
विदर्भात देखील उद्यापासून काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेश मंडळ मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा ठरल्याने आगमन सोहळ्यालाच कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावर गणेश मंडळाच्या मिरवणुकीत डिजे साऊंड सिस्टिमचा वापर आणि एलईडीचा वापर करण्यात आला. या प्रकरणात गणेश मंडळाच्या अध्यक्षासह ट्रॅक्टर चालक-मालक असा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड शहरात तब्बल रात्री पाच ते सहा तास महामार्गावर ट्रॅफिक जाम झाले होते. कराड शहर वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवून सुद्धा गणपती सणाला जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आपला कोल्हापूर दौरा रद्द करून कराडमध्येच मुक्काम केला.
- नंदुरबार जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाला सुरुवात.....
- सकाळपासूनच सुरू असलेल्या दमदार पावसामुळे विद्यार्थी आणि नोकरदार वर्गांना कामावर जाण्यासाठी मोठ्या अडचणी
- सलग पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना फायदा तर पावसाची तूट भरून निघण्यास मदत.
- आज सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात ...
- जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर धरणांच्या पाणी पातळीत वाढ....
- जिल्ह्यातील अनेक भागात 65 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद
अंमली पदार्थाचे सेवन करणार्या तरुणाकडून कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावर हल्ला केल्याच घटना समोर
देवनार गोवंडी इथल्या बाळासाहेब ठाकरे उद्यानात शनिवारी घडला धक्कादायक प्रकार
टोळक्यांनी केलेल्या चाकू हल्यात देवनार पोलिस ठाण्याचे योगेश सुर्यवंशी हे गंभीर जखमी झाले आहेत
जखमी सुर्यंवशी यांना खुराणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे
योगेश यांच्या डोक्यावर, कानाच्या मागे, डाव्याबाजूच्या बरगडीवर आरोपींनी चाकूने हल्ले केले आहेत
तर योगेश यांच्यासोबत असलेले पोलिस शिपाई भालेराव यांनाही या टोळक्यांनी मारहाण केली आहे
कर्मचार्यांना झालेल्या मारहाणची माहिती देवनार पोलिसांन मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
या प्रकरणी ६ जणांविरोधात देवनार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली आहे
साहेबे आलम सावंत उर्फ डॅनी, जिशान कादर खान, शोएब जावेद खान, जिदान अक्रम खान, समसुदोहा सावंत, अफान खान अशी या आरोपींची नावे असून या सर्व आरोपींचे वय १९ वर्ष आहे
अंमली पदार्थाचे सेवन करणार्या तरुणाकडून कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावर हल्ला केल्याच घटना समोर
देवनार गोवंडी इथल्या बाळासाहेब ठाकरे उद्यानात शनिवारी घडला धक्कादायक प्रकार
टोळक्यांनी केलेल्या चाकू हल्यात देवनार पोलिस ठाण्याचे योगेश सुर्यवंशी हे गंभीर जखमी झाले आहेत
जखमी सुर्यंवशी यांना खुराणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे
योगेश यांच्या डोक्यावर, कानाच्या मागे, डाव्याबाजूच्या बरगडीवर आरोपींनी चाकूने हल्ले केले आहेत
तर योगेश यांच्यासोबत असलेले पोलिस शिपाई भालेराव यांनाही या टोळक्यांनी मारहाण केली आहे
कर्मचार्यांना झालेल्या मारहाणची माहिती देवनार पोलिसांन मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
या प्रकरणी ६ जणांविरोधात देवनार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली आहे
साहेबे आलम सावंत उर्फ डॅनी, जिशान कादर खान, शोएब जावेद खान, जिदान अक्रम खान, समसुदोहा सावंत, अफान खान अशी या आरोपींची नावे असून या सर्व आरोपींचे वय १९ वर्ष आहे
जयसिंगपूर मधील झोपडपट्टी धारकांचे 50 वर्षांचे स्वप्न साकार
राजीव गांधी परिसरातील झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड चे वाटप
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप
जयसिंगपुरातील 1500 झोपडपट्टी धारकांना हक्काच्या घरासाठी प्रॉपर्टी कार्ड
वनतारातील सर्व हत्ती परत करा , अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी
न्या पंकज मित्तल आणि न्या प्रसन्न वराळे यांच्यासमोर होणार सुनावणी
गेल्यावेळी वनताराला प्रतिवादी केलेलं नसल्यामुळे ; त्यांना प्रतिवादी करून घेण्याच्या सुचना न्यायालयाने केल्या होत्या
कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांना पुन्हा एकदा धक्का
आज दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील आणि राजेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज होणार पक्षप्रवेश
मुंबईसह पश्चिम उपनगरात मागील काही दिवसांची विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात
पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून अधून मधून जोरदार पाऊस सुरू आहे
पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली दहिसर विलेपार्ले सांताक्रुझ वांद्रे या सर्व परिसरात मागील दहा ते पंधरा मिनिटांपासून जोरदार पाऊस सुरू आहे
जर असंच जोरदार पाऊस काही वेळ सुरू राहिला तर पश्चिम उपनगर जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात होणार आहे....
अमरावती शहरातील राजकमल चौक, जयस्तंभ चौक ते रेल्वे स्टेशन असा जोडणारा उडानपूल आजपासून बंद
उडानपुल हा पूर्णतः नादुरुस्त झाल्याने सर्व प्रकारच्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांसाठी आजपासून बंद
अमरावती शहरातील राजकमल चौक, जयस्तंभ चौक ते रेल्वे स्टेशन असा जोडणारा उडान पूल हा पूर्णतः नादुरुस्त झाला आहे.. हा पूल केव्हाही कोसळू शकतो त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे..
सर्व प्रकारच्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजले पासून तात्काळ प्रभावाने पूर्णतः बंद करण्यात येत आहे असं सांगितले मात्र अजून बंद केले नाही आज केव्हाही पूल रहदारी साठी बंद होऊ शकतो...
प्रोटोकॉल सोडून सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावल्याने अजितदादा नाराज
अजित दादांचा अचानक कराडमध्ये मुक्काम
सकाळी 6 वाजता कोल्हापूरकडे रवाना
अजित दादा जाताना सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी बोलावल्याने नाराज
सातारा: उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराड येथील सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडे रवाना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल रात्री उशिरा कराड येथील राष्ट्रीय महामार्गावरील ट्राफिकचा सामना करावा लागला होता यामुळे त्यांनी कराडमध्येच शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करण्याचे पसंद केले दरम्यान आज सकाळी सहा वाजता ते पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत
नवी मुंबई महापालिका प्रभाग रचनेवरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात वादाची चिन्हे
प्रभाग रचनेत मोठा घोळ घालत भाजपा नगरसेवकांना टार्गेट केल्याचा होतोय आरोप
गणेश नाईक यांनी रात्री घेतलेल्या माजी नगरसेवक बैठकीत अनेक नगरसेवकांनी प्रभाग रचनेवरून नाराजी व्यक्त केल्याची चर्चा
प्रभाग रचनेवर शिवसेना शिंदे गटाचा वरचष्मा असल्याचा भाजपा माजी नगरसेवकांचा बैठकीत दावा
चुकीच्या प्रभाग रचनेवरून वनमंत्री गणेश नाईक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याची शक्यता
२९ ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद...आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचं, जरांगेंचा निर्धार
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: बीडमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक, पंडित-हाके समर्थक आमनेसामने