Nagpur Violence : सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Maharashtra Live blog Updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि घटनांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात नेमकं काय सुरु आहे, जाणून घ्या एका क्लिकवर.
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog Updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्य केले होते. यावरुन वाद निर्माण झाला आहे....More
सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
एका व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्या प्रकरणात खोक्या चकलांबा पोलिसांच्या ताब्यात होता
दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज त्याला शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले होते
यादरम्यान शिरूर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
त्यामुळे खोक्याचा पुढील 14 दिवसांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे
उल्हासनगर : येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने एकमेकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सासरच्यांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला आहे. वैभव देवधर आणि प्राची हे पती-पत्नी असून कौटुंबिक वादामुळे ते विभक्त राहतात. त्यांच्यातले वाद मिटवण्यासाठी कुटुंबीयांनी उल्हासनगरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या शाखेत एकमेकांना बोलावलं होतं. मात्र यावेळी पती-पत्नीत वाद होऊन शिवसेनेच्या शाखेबाहेरच हाणामारी झाली. यावेळी प्राचीच्या भावाने बहिणीच्या पतीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले, या घटनेत प्राचीचा पती वैभव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे की रिक्षा या गाण्यातून टीका करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरामुळे नवा वाद आता निर्माण झाला आहे. कुणाल कामराने त्याच्या गाण्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं म्हटले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या पोस्टरवर लाथा मारत जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील शिवसैनिकांनी केली.
उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची विधानभवनात भेट
यावेळी छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केलं
उद्धव ठाकरे - तुम्ही जय महाराष्ट्र चुकीच्या जागेवर उभं राहून बोलताय
उद्धव ठाकरे यांचं छगन भुजबळ यांना उद्देशून वक्तव्य
नागपूर हिंसाचार प्रकरणात राज्यसरकारच्या बेधडक कारवाई सुरुवात
नागपूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून ऍक्शन मोड मध्ये ..
फहीम खान व युसुफ शेख या दोन आरोपीच्या घरावर अतिक्रमणाची कारवाई केली गेली तर शाहीन अमीन या आरोपीचे दोन दुकाने सिल करण्यात आली ..
संजय बाग कॉलनीतील फहीम खानचे घर नागपूर महानगर पालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केले
त्यानंतर नागपूर हिंसाचारात आरोपी युसुफ शेख यांचे नागपूरच्या महाल भागातील जोहरीपूर येथे घर त्यावर पालिकेचा हातोडा पडला आहे
युसूफ शेख घरात खाली पार्किंग मध्ये एक रुम अनधिकृत आहे सोबतच अधिकृत नकाशा व्यतिरिक्त पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील बालकनी चे बांधकाम करण्यात आले होते ते नागपूर महानगर पालिकेच्या पथकाने तोडले आहे
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या FIR मध्ये युसूफ शेख चे नाव हे 48 नंबर आहे तर फहीम खान मुख्य आरोपी पैकी एक आहे
लातूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरील बांधकाम सुरू असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये आज एक मृतदेह आढळून आला... डोक्यात जबर मार लागल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पथक तिथे दाखल झाले. अक्षय राम तेलंगे हा भूरट्या चोऱ्या करणारा व्यक्ती येथे कायमच झोपण्यासाठी येत होता. त्याच्या डोक्यात कोणीतरी दगड घालून खून केल्याचे समोर आले आहे. शिवाजी नगर पोलिस पुढील तपास करत आहेत.
- नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकात मद्यपीकडून पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू
- जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना झाला मृत्यू
- अंगावर पेट्रोल टाकून हॅपी होली म्हणून दिले होते पेटवून
- स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत यांचा झाला मृत्यू
- बस स्थानकात मद्यपिला हटकल्यानं राग आल्याने अंगावर टाकले होते पेट्रोल
विधानसभा उपाध्यक्ष पद निवडणूक कार्यक्रम जाहीर
मंगळवार पर्यंत अर्ज दाखल करता येईल.
२६ तारखेस उपाध्यक्ष निवड होईल
लातूर : महापालिकेकडे गेल्या वर्षीची आणि यंदाची चालू बाकी मिळून सुमारे 2 कोटी 36 लाख रुपये इतकी अकृषी कराची थकबाकी आहे. नोटीसा देऊनही महापालिकेने अद्याप कराच्या रकमेचा भरणा न केल्यामुळे लातूरच्या तहसील कार्यालयाने आज सकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे सील केले. शहरातील अशोक हॉटेल चौकातील यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलातील जवळपास 32 गाळे आणि संकुलातील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या मार्गावरील प्रवेशद्वाराचे मुख्य गेट सील केले.
लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरील बांधकाम सुरू असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये आज एक मृतदेह आढळून आला... डोक्यात जबर मार लागल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पथक तिथे दाखल.. तपासात समोर आलेले माहिती अशी की अक्षय राम तेलंगे हा भूरट्या चोऱ्या करणारा व्यक्ती येथे कायमच झोपण्यासाठी येत होता..त्याच्या डोक्यात कोणीतरी दगड घालून खून केल्याचे सकाळी समोर आले आहे.शिवाजी नगर पोलिस पुढील तपास करत आहेत.भुरट्या चोरी करणारा अक्षय राम तेलंगे ह्याचा खून झाला आहे..त्यामागची कारणे काय आहेत याचा तपास सुरू आहे
सातारा - साताऱ्यातील माण तालुक्यातील गोंदवले बु. येथील योगेश पवार याचा प्रेयसी रोशनी माने हिने आई पार्वती माने आणि साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे उघड झाले आहे. योगेश आणि रोशनीचे प्रेमसंबंध होते, आणि योगेशने तिला लाखो रुपये उसने दिले होते. पैसे परत मागितल्याने रोशनीने १८ मार्च रोजी योगेशला नरवणे येथे बोलावून धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून फडतरी येथील कॅनॉलमध्ये फेकला.योगेशच्या भावाने तक्रार दिल्यानंतर पोलिस तपासात या प्रकरणाचा छडा लागला आहे.रोशनी, तिची आई पार्वती आणि दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी
कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटक टाळण्यासाठी कोरटकरची मुंबई उच्च न्यायालयात धाव
कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठासमोर सुनावणी होणार आहे
कोरटकरनं इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज आणि ताराराणी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कोल्हापूरसह नागपूरमध्येही कोरटकरविरोधात गुन्हा, तसेच परभणीतही तक्रार दाखल
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये पोलिसांची मोठी कारवाई ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या आणखी दोन मुख्य आरोपींना केली अटक
302 सह विविध प्रकारचे सोळा गुन्हे असलेला सुलतान उर्फ टिपू शेख राहणार पुणे आणि जीवन साळुंखे याला सोलापूर मधून ड्रग्ज प्रकरणी धाराशिव पोलिसांनी केली अटक
सुलतान उर्फ टिपू शेख आणि ,जीवन साळुंखे दोघेजण ड्रग्ज सप्लाय करत असल्याची पोलिसांची माहिती
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये 18 आरोपी पैकी आतापर्यंत 12 आरोपींना केली अटक
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल सायंकाळी गणेश कला सभागृहात सहकार विभागाच्या कार्यक्रमाला जाताना अलका चौकामधून गाड्यांचा ताफा गेला त्यावेळी वाहतूक पोलिसांनी ॲम्बुलन्सला थांबून ठेवले. यावर आता शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्षांनी ट्विट करत टीका केली आहे. प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शहराध्यक्ष ट्विट करत माणुसकीचे कर्दनकाळ... महायुती सरकार ! असे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस याच्या तफ्याचा थाट पूर्ण करण्यासाठी पुण्यातील अलका चौकात रुग्णवाहिकेला अडवण्यात आलं. असली अमानुष कृत्ये केली नाहीत, तर स्वतःला "अनाथांचा नाथ" म्हणवून घेण्यासाठी जाहिरातीत कोट्यावधी खर्च करावे लागणार नाहीत. असे ते म्हणाले.
गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी गावासाठी गावकऱ्यांच्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाने आनंदाची बस फेरी सुरू केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याची ही ओळख पुसण्यासाठी अनेक विकास कामे सुरू केली आहेत. त्यातच मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी गावासाठी बस फेरी नव्हती. त्यामुळे गावकऱ्यांनी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. पालकमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार बस फेरी सुरू करण्यात आल्याने या गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून ही बस त्यांच्यासाठी आनंदाची बस ठरली आहे. मुरूमगावसाठी 3, पेंढरीकरीता 8 तर रांगीकरीता बसच्या 6 फेऱ्या धावणार आहेत.
गडचिरोली : रविवारी सायंकाळी गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या मका पिकाची नासाडी झाली आहे. गडचिरोली शहरासह धानोरा, आरमोरी, चामोर्शी या तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बराच काळ वीज पुरवठा बंद होता.
मध्य रेल्वेने चार दिवसांचा विशेष ब्लॉक घेतला असून अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्यायेत. त्यामुळ प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणारेय. 23 ते 26 मार्च असा चार दिवसांचा हा विशेष ब्लॉक असणारेय. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मार्गाचे विस्तारीकरण केले जात आहेय. भुसावळ विभागातील म्हसावद स्थानक येथे अप लूप लाईन विस्तारीकरणाचे काम सुरूये. अप लूप लाईनचा 714 मीटर वरून 756 मीटरपर्यंत विस्तार केल्या जाणार् आहेय. यासोबतच गतीवाढीकरीता यार्ड पुनर्रचनेचं काम हाती घेण्यात आलंय. यासाठी नॉन इ़टरलॉकिंग कार्य तसेच इतर काही गोष्टींसाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय. याचा काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणारेये.. पुढील 26 मार्चपर्यत काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द राहणार आहे.. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन रेल्वे विभागाने केले. हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारेय.
या गाड्या राहतील रद्द..
# मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणारी 11113 क्रमांकाची देवळाली ते भुसावळ मेमू गाडी...
# 11114 क्रमांकाची भुसावळ ते देवळाली मेमू गाडी...
# 01212 क्रमांकाची नाशिक ते बडनेरा मेमू गाडी..
# 01211 बडनेरा ते नाशिक मेमू या क्रमांकांच्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द असणार..
कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध मुंबईच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३(१)(ब), ३५३(२) आणि ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिवसेना आमदार मर्जी पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Nagpur : नागपूरच्या संचारबंदी असलेल्या सर्व भागातून संचारबंदी काल दुपारी तीन वाजल्यापासून पूर्णपणे उठवली आहे. त्यामुळे महाल, शिवाजी चौक, चिटणीस पार्क चौक, भालदारपुरा, हंसापुरी या सर्व भागांमध्ये आता सामान्य लोकांचे जीवन पूर्ववत होताना दिसून येत आहे... लहान मुलं हसत खेळत शाळेत जात आहेत, छोटे व्यवसायिक आपला व्यवसाय सुरू करताना दिसत आहेत, ज्येष्ठ नागरिक व महिला सकाळच्या मॉर्निंग वॉकसह घरगुती साहित्य घेताना दिसून येत आहेत... ऑटो चालकांची लगबग दिसून येत आहे.. मात्र कारण नसताना कुठलाही दोष नसताना हिंसेमुळे आम्ही बरंच काही गमावलं अशी भावना प्रत्येकानी व्यक्त केली आहे... विशेष बाब म्हणजे वर्षानुवर्षे या भागात राहणाऱ्यांचा स्पष्ट म्हणणं आहे की हिंसेच्या वेळेला दिसून येणारे चेहरे स्थानिक नव्हते, ते बाहेरचे होते..
Accident : सोलापूरहून-नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला पहाटे दरम्यान भीषण अपघात झाला आहे. हा अपघात यवतमाळच्या हिवरी गावाजवळ घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रॉंग साईटने येणाऱ्या बेलोरा वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भंडारा हा तसा भात उत्पादक जिल्हा....मात्र, पारंपरिक भातपिक उत्पादक शेतकरी आता नगदी पीक म्हणून बागायती शेतीकडं वळलेत. मात्र, सध्या हे बागायची शेतकरी आर्थिक संकटात अडकले आहेत. बागायती शेतीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र, बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्यानं त्याचे दर कोलमडलेत. एका कॅरेटमध्ये २५ ते ३० किलो टोमॅटो भरल्या जातात. मात्र, या कॅरेटला भंडारा जिल्ह्यात केवळ २० ते २५ रुपये दर मिळत आहेत. एक कॅरेट टोमॅटो लागवड ते बाजारात विक्रीपर्यंत सुमारे ९० रुपयांचा खर्च शेतकऱ्याला येतो. या एक कॅरेट टोमॅटोला केवळ २५ रुपयेपर्यंत दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना ६५ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. धानाला ज्याप्रमाणे राज्य सरकार हमीभाव देतो, त्याप्रमाणे बागायती शेतीच्या मालालाही तशाच प्रकारे हमीभाव दिल्यास शेतकऱ्याची आर्थिक स्थिती उंचावेल, अशी अपेक्षा आता शेतकरी बाळगत आहेत.
मुंबईत गोमांस तस्करीचा डाव पोलिसांनी हाणून पाडला
नागपाडा येथे गोमांस घेऊन जाणारे वाहन पोलिसांच्या ताब्यात
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विश्व हिंदू परिषदेच्या पाठपुराव्यानंतर गोमांस तस्करीबाबत गुन्हा दाखल
तसेच गोमांस आणलेल्या जे जे मार्ग परिसरातील दुकान मालकावरही गुन्हा दाखल
मात्र, गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत समाज कंटकांकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न
पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन्ही घटकांमधील तणाव निवळला
गोमांस तस्करीचे विधिमंडळ अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता
Nagpur : काही लोक पिसाळलेले आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, स्टंटबाजी करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा वातावरण बिघडवण्यासाठी असे प्रयत्न केले जात आहे. यामागे काही राजकीय लोकांचा हात आहे असा आमचा आरोप आहे. या सर्व लोकांवर कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्राचा वातावरण बिघडणाऱ्या प्रत्येकाला बेड्या घातल्या पाहिजे. अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि आमदार आशिष जयस्वाल यांनी केली आहे.
आम्हाला वाटतंय की हे सुपारी घेऊन करण्यात आलेले कृत्य आहे. यामागे कोण आहे हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्र जनतेला माहिती आहे. स्वतः विश्वासघात करणारे लोक एका नेत्याला अशा पद्धतीने बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. याचा मी धिक्कार करतो. असेही आमदार आशिष जयस्वाल म्हणाले.
नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी छत्रपतीला शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सोबत प्रशांत कोरटकर याला पळून जाण्यास , आश्रय देण्यात मदत करणाऱ्यांना सह आरोपी करण्याची देखील मागणी मुधोजी राजे भोसले यांनी केली आहे.
गोमातेची कत्तल करून तिच्या मांसाची विक्री करणाऱ्या कत्तलखाण्यावर भंडाऱ्याच्या तुमसर पोलिसांनी छापा घातला. या कारवाईत दीड क्विंटल गौमांसासह कत्तलखाना चालक इरफान हसन अली सय्यद अली (४५) याला अटक करण्यात आली आहे. हा कत्तलखाना आरोपीच्या येरली मार्गावरील दत्तात्रय वॉर्डातील त्याच्या स्वतःच्या घरात सुरू होता. या प्रकरणी तुमसर पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे.
कुणाल कामरा प्रकरणात खार येथील स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी कुणाल सरमळकर राहुल कनाल सह शिवसेना कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. कुणाल कामरा प्रकरणात कुणाल सरमळकर आणि राहुल कानाल यांना खार पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे. एकनाथ शिंदे संदर्भात बदनामीकारक गाणं गायल्यानंतर कुणाल कामाराच्या विरोधात खार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याआधी कुणाल कामरा जिथे शो करत होता त्या स्टुडिओची तोडफोड शिवसैनिकांनी केल्यानंतर या सगळ्यांमध्ये खार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागपूरचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांनी केली आहे. हिंसाचारात अनेक निर्दोष लोकांची पोलीसांनी आरोपी म्हणून अटक केली आहे. त्याची सत्यता तपासली जावी यासाठी न्यायालयीन चौकशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केली जात आहे.
नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी फहीम खान यांच्या घरावर बुलडोजर चालणार असल्याची माहिती पुढे येत आहे. फहीम खान याने नागपूरच्या टेकानाका परिसरात घर बांधतांना काही भागात अतिक्रमण केले. आता नागपूर महानगर पालिकेने त्याच्या कुटुंबाला नोटीस बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात व्हिडिओ बनवून व्हायरल करणारा कुणाल कामरा विरोधात मध्यरात्री अंधेरी पूर्वेत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. कुणाल कामराकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर टीका केलेल्या एक व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आला होता.
पक्षामध्ये काही नवीन रचना, काही नवी पदं, काही खालपर्यंत पोहचण्यासाठी सगळे जण एकमेकांसह कामाला लागतील त्यामुळ ही रचना केली आहे. बरेच दिवस हे सुरू होत आकार देण्याचा प्रयत्न सुरू होता. पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना भेटले पाहिजे. तुम्ही पक्ष म्हणून एकत्र येतात आणि मित्र परिवार वेगळा, असे राज ठाकरे यांनी मनसेच्या बैठकीत सांगितले.
अनेक विषय आहेत औरंगजेब कबरीत राहतो की बाहेर येतो, जातीयवादाचा विषय आहेत. इतर महाराष्ट्राचे प्रश्न पक्षाचे धोरर्ण भूमिका, महाराष्ट्र आणि मुंबईचे मत अनेक विषय आहे मी तिथे बोलणार आहे, आपण सर्वांनी याव मी अशी अपेक्षा व्यक्त करतो.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Nagpur Violence : सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी