Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी, एका क्लिकवर

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 20 Nov 2025 04:30 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंच्या राजकीय युतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे पडलंय. मुंबईत अखेर शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याची सूत्रांची...More

वाघाच्या हल्ल्यात दोन वृद्ध महिला ठार

वाघाच्या हल्ल्यात दोन वृद्ध महिला ठार


गडचिरोली : सरपण गोळा करण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या दोन महिलांना वेगवेगळ्या दिवशी वाघाने ठार केल्याची घटना आरमोरी तालुक्यातील देऊळगाव बुट्टी येथे उघडकीस आली आहे. मुक्ताबाई नेवारे आणि अनुसया जिंदर वाघ अशी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. मुक्ताबाई नेवारे या बुधवारी सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गेल्या असता वाघाने त्यांना ठार केले. तर अनुसया जिंदर वाघ या १२ नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. अशातच गडचिरोली- आरमोरी राष्ट्रीय महामार्गालगतच्या कांडेश्वर पहाडीलगत मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला, तर परिसरातच मुक्ताबाई नेवारे या सुद्धा मृतावस्थेत आढळल्या. वन विभागाने या घटनेचा पंचनामा केला.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.