- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी दर्शन रांगेतील पहिले मानाचा वारकरी दांपत्य उपमुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेमध्ये सहभागी झाले होते. नांदेडच्या हिमायतनगरमधील...More
मुंबई पुढील ५ दिवस पावसाळी वातावरण
मुंबईत पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने राज्यात काही ठिकाणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस
मराठवाड्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
कोंढवा गणेश काळे हत्या प्रकरण
गँगस्टर बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल
कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
टोळी युद्धातूनच गणेश काळे याची हत्या
गुन्ह्यातील आरोपी बंडू आंदेकर,कृष्णा आंदेकर,आमिर खान ,मयूर वाघमारे ,स्वराज वाडेकर ,अमन शेख ,अरबाज पटेल
इतर दोन अल्पवयीन आरोपींची गुन्ह्यात नावे
आज या हत्या प्रकरणातील आरोपींना दुपारी कोंढवा पोलीस कोर्टात हजर करणार
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची घोषणा दुपारी ३ वाजता होणार
शनिवारी रात्री अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या गटाच्या पार पडलेल्या बैठकीत अजित पवारांना अध्यक्षपद आणि वरिष्ठ उपाध्यक्ष पद मुरलीधर मोहोळ यांना देण्याच निश्चित
संपूर्ण कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार सर्वानुमते अजित पवारांना देण्यात आले
आज अजित पवार आपल्या कार्यकारणीच्या सदस्यांची दुपारी ३ वाजता घोषणा करणार यासोबतच ४ उपाध्यक्ष देखील नेमणार
दुपारी १२ वाजता मंत्री दत्तमामा भरणे यांच्या निवासस्थानी सर्व सदस्य एकत्र येणार आणि त्यानंतर सर्वसाधारण सभेसाठी एकत्रित येणार
शुक्रवारी रात्री खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याच निश्चित
भाजपने काढलेल्या कालच्या मूक मोर्चावरही डी बी मार्ग पोलिस ठाण्यात दाखल
बेकायदेशीर जमाव जमवणे आणि पोलिसांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्ह दाखल
अनधिकृत मोर्चा काढल्याबद्दल आयोजकांवर गुन्हा दाखल
प्रतिबंधात्मक आदेशांमुळे मोठ्या प्रमाणात जमाव किंवा मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी दिली नव्हती.
तरीदेखील या मोर्चात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांपासून इतर आमदारही सहभागी झाले होते
पोलिसांच्या माहितीनुसार, आयोजकांनी मोर्चासाठी आवश्यक ती परवानगी घेतली नव्हती.
पोलिसांनी आयोजकांवर बेकायदेशीर जमाव जमवणे आणि शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणातील प्रमुख आयोजक आणि समन्वयकांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसापासून पाऊस कोसळत आहे तर रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली.. त्याचा फटका जिल्हतातील शेतकऱ्यांना बसलाय.. सोयाबीन पिकांच्या गंज्या सर्व पाण्याखाली गेल्या असून कापूस भिजलाय, तर तूर, मका, सर्व पिके पाण्याखाली गेल्या आहेत सर्वात जास्त फटका मोताळा तालुक्या तील शेतकऱ्यांना बसलाय.. आव्हा गाव शिवारातील शेत्या पाण्याखाली गेल्या असून तलावाचे स्वरूप आले आहे.. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने पून्हा हिसकाऊन घेतल्याचे चित्र आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा उध्वस्त झाला आहे.. कापूस,मका,सोयाबीन,तुर पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे. सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे...
पुण्यातील कोरेगाव पार्क रस्त्यावर भीषण अपघात
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पहाटेच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ भीषण अपघात झाला आहे
अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे ऋतिक भंडारे आणि यश भंडारे असे नावे आहेत
तर गाडीतला तिसरा युवक गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
अपघात कसा झाला, गाडीचा वेग किती होता, तसेच मद्यप्राशनाचा संबंध आहे का, याची तपासणी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनाची तांत्रिक तपासणी केली जात आहे.
कोल्हापुरातील कॉम्रेड उदय नारकर यांना जीवे मारण्याचे धमकी
अज्ञात इसमांनी फोनवरून दिली धमकी, राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
दौलत साखर कारखान्याच्या संबंधित आंदोलन केल्याने धमकी आल्याचा नारकर यांचा दावा
घरात घुसून तुम्हाला मारू अशा पद्धतीची दिली फोनवरून धमकी
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेलुखडसे गावात एक दुःखद घटना काल सायंकाळच्या सुमारास समोर आली. शनिवार शाळेला अर्धा दिवस सुट्टी असल्याने रब्बी हंगामाचे शेतीचे काम सुरू असल्याने गणेश खडसे यांनी आपल्या कुटुंबिया सोबत 9 वर्षीय वेदांत नावाच्या मुलाला मदती करिता शेतात घेऊन गेले.. या बीजवाई कांदा लागवडीचे काम सुरू असताना.. कांदा भरलेल्या पिशवीच्या बाजूला दबा धरून बसलेल्या विषारी सापाने शिकार समजून वेदांतला दंश केला.
सर्पदंश झाल्याच कळताच वेदांतने आपल्या वडिलांना प्रकार सांगितला वडिलांनी ताबडतोब सापाचा शोध घेत त्याला मारून टाकले..मात्र , सर्प दंश झालेल्या वेदांतला विष अंगात चढत असल्याने प्रथम रिसोड इथं उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले..मात्र,अंगात विष पूर्णतः पसरल्याने वाशिम इथं नेण्याचा सल्ला दिला।असता वाशिम इथं उपचाराला नेताना रस्त्यात वेदांतचा मृत्यू झाला..दरम्यान वेदांतचा मृत्यू बाबत बातमी कळताच गावात दुःखाचा डोंगर कोसळला
पुणे-बेंगलोर महामार्गावर दुचाकीचा अपघात
महामार्गावरील खड्ड्यांमुळे झाला अपघात
शिये फाटानजीक कोल्हापूरच्या दिशेने येत असताना खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली
घटनेचा व्हिडिओ कारच्या cc कॅमेऱ्यात कैद
या घटनेत महिला आणि पुरुष जखमी
महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताची संख्या वाढतीच
- नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मोठा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का...
- अजित पवारांचे दोन मंत्री असलेले माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांच्या राजकीय विरोधकांच्या भाजप प्रवेशाने नाशिकचे राजकारण बदलणार...
- शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवलेले सिन्नरचे उदय सांगळे आणि दिंडोरीच्या सुनीता चारोस्कर उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश...
- प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिंडोरी आणि सिन्नर मध्ये दोघांचा होणार शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपा प्रवेश...
- दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर देखील घेणार कमळ हाती...
- गेल्या विधानसभेत दिंडोरी मतदार संघात रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांनी युतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून केली होती उमेदवारी...
- मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कट्टर राजकीय विरोधक उदय सांगळे भाजपमध्ये करणार प्रवेश, सिन्नरचे राजकीय वातावरण बदलणार...
Bhandara Rain : 120 ते 140 दिवसाचं भातपिकांची लागवड केल्यानंतर उन्ह, वारा, पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावाचा सामना करीत ते जगवलं....भातपीक परिपक्व झालं आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळतं असतानाचं परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यात झालेल्या पाच दिवसाच्या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फेरल्या गेल्यानं शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवलं आहे. कापून ठेवलेलं भातपीक कडपा शेतातचं पाण्याखाली आल्यानं त्याची नासाडी झालीय तर, काही कडापांना अंकुर फुटलेत. काही ठिकाणी मळणी केलेल्या धानाला अंकुर फुटल्याचं विदारक वास्तव समोरं आलं आहे. अनेक ठिकाणी धनाची नासाडी झाल्यानं हजारो रुपये खर्चून लावलेलं भातपीक मातीमोल झालं आहे. परतीच्या पावसानं शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय. अस्मानी संकटांनं शेतातील उध्वस्त झालेलं पिकं बघून शेतकऱ्यांचे डोळे पाणावलेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी आता भंडारा जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.
भाजपने काल सो कॉल्ड मूक मोर्चा काढलेला त्याला परवानगी होती का? त्यांना परवानगी होती का?
एकट्या मनसे आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आम्हांला या केसेसचा फरक पडत नाही... आमच्या अंगावर अशा अनेक केसेस आहेत अस्वलाच्या अंगावर एक केस आला काय गळाला काय त्याने फरक पडत नाही, आम्ही असल्या केसेसला भिक घालत नाही आणि घाबरत नाही - संदीप देशपांडे
आपल्या जैवविविधतेसाठी जगविख्यात असलेल्या लोणार सरोवरात चक्क मासे आढळल्याने आता लोणार सरोवराची जैवविविधता धोक्यात आल्याच समोर आलं आहे. वन्यजीव विभागाने लोणार सरोवरातील आढळलेले मासे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवून अहवाल मागितला आहे.
खरंतर लोणार सरोवर हे उल्कापाताने पडलेल सरोवर... यात असलेलं पाणी हे अल्कधर्मी असल्याने यात कुठलाही सजीव प्राणी जगू शकत नाही. लोणार सरोवरातील पाण्याची पीएच नेहमी दहा किंवा अकराच्या दरम्यान असते त्यामुळे या सरोवरात जीवसृष्टी यापूर्वी कधीही आढळली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून होणारी अतिवृष्टी व लोणार शहराचे सांडपाणी हे सरोवरात मिसळल्या जात असल्याने लोणार सरोवराची जैवविविधता धोक्यात आल्याचं चित्र समोर आलं आहे. अनेक नागरिकांनी हे मासे बघितले असून काहींनी याच व्हिडिओ चित्रीकरणही केला आहे. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करून लोणार सरोवराची जैवविविधता टिकविण्याची मागणी सरोवराच्या अभ्यासकांनी केली आहे.
प्रवाशांना समृद्धी महामार्गाचा प्रवास अत्यंत सुरक्षित प्रवास असं राज्य शासनाकडून सांगितलं जात असताना वाशिमच्या मालेगाव टोल प्लाझा परिसरात गेल्या आठ दिवसापासून रात्रीला अंधाराच साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे रात्रीला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महावितरण विभागाच्या वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून मालेगाव जहांगीर येथील टोल प्लाझाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे,त्यामुळे रात्रीला प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय आहे. या ठिकाणी आपले वाहन रात्रीला थांबणे म्हणजे अपघाताला आणि डिझेल चोरीला आमंत्रण देणे अशीच परिस्थिती गेल्या आठ दिवसापासून झाली आहे. टोल प्लाझा च्या अत्यावश्यक सेवेकरिता काही काळ जनरेटर चालू करून बॅटऱ्या चार्ज करून गरज भागवल्या जातंय
Beed : महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सोमवारपासून बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवला जाणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आनंत मुळे यांनी दिली. MARD असोसिएशनच्या रेसिडंट डॉक्टरांकडुन शासकीय रुग्णालयांमधील संपूर्ण राज्यभरात बाह्यरुग्ण विभाग सोमवारपासून बंद ठेवला जाणार आहे. बाह्यरूग्ण विभाग बंद ठेवल्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास पूर्ण सेवा बंद केली जाणार असल्याची देखील माहिती यावेळी असोसिएशनकडून देण्यात आली. तसेच महिला डॉक्टरला न्याय मिळाला नाही तर 7 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत शासकीय आणि खासगी सर्व डॉक्टर्स सेवा बंद ठेवणार आहेत.
भंडारा : 27 ते 31 ऑक्टोंबर या पाच दिवसात भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. परिपक्व झालेला आणि हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल समोर आला असून यात जिल्ह्यातील 474 गावातील सुमारे 43 हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. 18 हजार हेक्टर क्षेत्रातील भातपीक आणि भाजीपाला पिकांना याचा चांगलाचं फटका बसला आहे. या परतीच्या पावसाचा भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. भंडारा जिल्हा प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतीचे तातडीनं पंचनामे करायला सुरुवात केली असून अंतिम अहवाल राज्य सरकारकडे तातडीनं पाठविण्यात येणार आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका साकोली तालुक्याला बसला असून 25,730 शेतकऱ्यांच्या 9 हजार हेक्टरमधील भातपीक आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आकडेवारीत अंतिम अहवालानुसार आणखी वाढ होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनानं व्यक्त केली आहे.
नंदुरबार : गाईच्या गोठ्यातून बनावट दारूचा साठा पोलिसांनी केला जप्त...
दारू तस्कराची अनोखी शक्कल...
शहादा तालुक्यातील चिखली येथील घटना
शहादा पोलीस स्टेशनची कारवाई...
कुणालाही संशय येऊ नये म्हणून गाईच्या गोठ्यात लपवून ठेवला होता दारू साठा
भल्या सकाळी केलेल्या कारवाईमुळे तस्करांमध्ये घाबराट...
पाच लाख 76 हजार रुपये किमतीची दारू जप्त
यंदा नोव्हेंबर महिना पावसाचा
राज्यात नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता
परिणामी, राज्यात नोव्हेंबर महिन्यात थंडीचा जोर कमी असणार
भारतीय हवामान विभागाचा अंदाज
नोव्हेंबर महिन्यात राज्याबरोबरच संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता
आॅक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीच्या ५ टक्के अधिक पाऊस
मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी आयोजित केलेल्या संयुक्त रॅली - 'सत्याचा मोर्चा'च्या आयोजकांवर प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर सभा आणि पोलिस आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल रॅली आयोजकांवर गुन्हा दाखल...
सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील ज्वेलर्सच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रयत्न
तोंडाला मास्क लावून हातात कोयता आणि पिस्तूल घेत दोन तरुण ज्वेलर्सच्या दुकानात शिरले
दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांना धमाकावत सोने लुटण्याचा केला प्रयत्न
आरटीओ ऑफिसच्या नजीक असलेल्या समर्थ ज्वेलर्स या दुकानावर दरोड्याचा प्रयत्न
विशेष म्हणजे सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात दहशत निर्माण झालीय
दरम्यान विजापूर नाका पोलिस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींच्या शोधासाठी 4 पथके रवाना करण्यात आलीत
आरोपीनी नक्की किती लूट केली याची माहिती पोलीस घेत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे
आज कार्तिकी एकादशीच्या महासोहळ्याला हजारो भाविकांचा महासागर चंद्रभागेच्या पवित्र स्नान करण्यासाठी भल्या पहाटेपासून चंद्रभागेच्या तीरावर लोटला आहे .. कार्तिकी एकादशीचे पवित्र चंद्रभागा स्नान करून या सोहळ्याला भाविकांनी सुरुवात केली आहे. आज भल्या पहाटेपासून चंद्रभागा तीरावर हजारो भाविकांचा महासागर लोटला आहे. सध्या चंद्रभागेत मुबलक पाणी असल्याने भाविकांना या स्नानाचा आनंदही घेता येत आहे. राज्यातील अतिवृष्टीचे संकट मोठे असल्याने मराठवाडा विदर्भ या भागातील भाविकांनी अडचणींमुळे यात्रेकडे पाठ फिरविल्याने आज कार्तिकी एकादशीला केवळ साडेसात ते आठ लाख भाविक दाखल झाले आहेत.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस्