Maharashtra Live Updates: शीतल तेजवानीला घेऊन बावधन पोलीस पिंपरीतील ऑफिसवर पोहचले, पण ऑफिसची झाडाझडती न घेताच परतले
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: मूर्ती संवर्धनाबाबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी फार पूर्वीच पाठवल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर केलेल्या...More
भाईंदर येथील तलाव रोड परिसरात आज सकाळी बिबट्याचा वावर दिसला, तेथीलच पारिजात इमारती मध्ये सकाळी ८ वाजता हा पहिल्या मजल्यावरील घरात शिरला आणि घरातील २३ वर्षीय खुशी टाक हिच्यावर हल्ला केला. यात खुशी गंभीर जखमी झाली. मात्र ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी सर्वात आधी मिरा भाईंदर महापालिका चे अग्निशमन दलाचे कर्मचारी तेथे आले आणि त्यांनी बिबट्याशी लढत देत मुलीला खिडकीच्या बाहेर ठेवलं आणि बिबट्याला रुम मध्ये कोंडून ठेवलं. त्यांच्या या धाडसामुळे बिबट्याला पकडण्यात आलं. आणि त्यांनी आणखीन कुणावर अटॅक केलं नाही.
नागपूर महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने भारतीय जनता पक्षापुढे ५० जागेची मागणी केली आहे.
शिवसेनेने आपल्या ५० उमेदवारांची यादी भाजपचे निवडणूक प्रभारी प्रवीण दटके यांच्याकडे सुपूर्त केली आहे
भाजप आपल्या पक्ष श्रेष्ठीसोबत चर्चा करून पुढील दोन दिवसानंतर यावर आपला निर्णय कळवणार असल्याचे शिवसेना आमदार कृपाल तुमाने यांनी सांगितले.
शिवसेनेच्या ५० जागेची मागणी व राष्ट्रवादीच्या ४० जागेची मागणीचा विचार करता भाजप कडे १५१ पाकी ६१ जागा शिल्लक राहतात.
एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स साठा
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी
चौकशी होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना पदावरून बाजूला करा
या प्रकरणाकडे आवश्यक तेवढ्या गांभीर्याने पाहाल आणि न्याय व राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई कराल, असा विश्वास असल्याचा पत्रात उल्लेख
या पत्रात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत
इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ साठवलेल्या ठिकाणी रिसॉर्टपासून थेट रस्ता का बांधण्यात आला?
* इतक्या मोठ्या प्रमाणावरील अमली पदार्थांची हालचाल असताना सातारा पोलीस यंत्रणेला याची माहिती कशी नव्हती?
* जर माहिती होती, तर राजकीय दबावामुळे कारवाई टाळण्यात आली का?
पत्रात नेमके काय म्हटले आहे?
सातारा जिल्ह्यातील सावरि गावात छापा टाकण्यात आला, जिथे एका दुर्गम भागात असलेले एक शेड आढळून आले आणि सुमारे ४५ किलो एमडी अमली पदार्थ (अंदाजे ₹१४५ कोटी किमतीचे) जप्त करण्यात आले. या कारवाईत अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली.
ही बाब आणखी गंभीर ठरते कारण हे शेड “तेज यश” नावाच्या रिसॉर्टपासून अवघ्या १,२०० मीटर अंतरावर आहे. रिसॉर्टपासून थेट शेडपर्यंत रस्ता बांधण्यात आलेला असून, अशा प्रवेशमार्गामागील हेतूवर गंभीर प्रश्न निर्माण होतात. तसेच संबंधित रिसॉर्ट कोयना धरणाच्या अत्यंत जवळ असल्याने तो बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे. प्रचलित नियमांनुसार मोठ्या जलसाठ्याच्या ठराविक अंतरात कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. अशा उल्लंघनाला परवानगी देणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका सखोल तपासणीस पात्र आहे.
भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 आणि 15 मध्ये उद्या मतदान होतं आहे. या दोन जागांसाठी 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग 12 मध्ये 5 तर, प्रभाग 15 मध्ये तीन उमेदवार उभे आहेत. दोन्ही प्रभागात प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत मतदारांना मतदानाचं साकडं घातलं. उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनही सज्ज झाला असून 9 मतदान केंद्रावर 45 कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सध्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि अमरावती मधे महायुती होणार नसल्याची बाब समोर आली आहे. सध्या पक्षाकडून उर्वरीत महानगर पालिकांचा आढावा घेणे सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मुंबईतील महिला विकास महामंडळाच्या कार्यालयात दोन दिवस बैठका घेत आहेत. पक्षाकडून पनवेल महानगर पालिका निवडणुकीत महायुतीत लढताना ७८ पैकी २७ जागा, नवी मुंबई महानगर पालिकेला १११ पैकी १५ जागा, नाशिक महानगर पालिकेला १२२ पैकी ४० जागा, धुळे महानगर पालिकेला १२२ पैकी ४० जागा जालना महानगर पालिकेला ६७ पैकी ३० मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या पदाधिकाऱ्यांकडून धुळे, जळगाव, जालना याठिकाणी महायुती म्हणून जाताना अडचणी येत असल्याची भावना आहे. धुळे आणि जळगाव महापालिकेला महायुती न झाल्यास ५० टक्के जागा लढण्याची तयारी पक्षाकडून करण्यात अली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर जालना महानगरपालिकेला महायुती न झाल्यास आपण स्वबळावर लढू अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोर बैठकीत मांडली आहे.
शीतल तेजवानीला घेऊन बावधन पोलीस पिंपरीतील तिच्या ऑफिसला पोहचले होते. मात्र ऑफिसची झाडाझडती न घेताचं पोलीस अवघ्या दोन मिनिटांतच परतले. त्यामुळं बावधन पोलिसांच्या कारवाईचा फार्स पुन्हा एकदा पहायला मिळाला. पिंपरी चिंचवड पालिकेच्या समोर शितलचे पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर हे ऑफिस आहे. इथल्या पत्त्याचा वापर करुन तिने पॉवर ऑफ अटर्णी बनवलेली आहे. याचं पॉवर ऑफ अटर्णीचा वापर करुन तिने मुंढवा जमीनीचा गैरव्यवहार केलाय. त्यामुळं बावधन पोलीस आज शीतलला घेऊन पिंपरीतील ऑफिसमध्ये आले होते. मात्र ऑफिसची झाडाझडती न घेता पोलीस परतले. मग बावधन पोलिसांनी शीतलला अवघ्या दोन मिनिटांसाठी ऑफिसजवळ आणून काय साध्य केलं? केवळ आम्ही काहीतरी कारवाई करतोय, हे पोलिसांना कोणाला दाखवायचं होतं का? असे प्रश्न बावधन पोलिसांवर उपस्थित करण्यात आलेत.
परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी आज काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या शहरातील शनिवार बाजार परिसरात असलेल्या काँग्रेस भवन येथे आज पक्षाचे जिल्हा प्रभारी अमिन पटेल सह प्रभारी नुरुद्दीन चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुलाखती पार पडल्या.मोठ्या संख्येने काँग्रेसकडे इच्छुकांनी आपल्या मुलाखती दिल्या आहेत.६५ जागांसाठी १७४ इच्छुकांनी अर्ज करून शक्ती प्रदर्शन करत आज पक्षाच्या नेत्यांची समोर मुलाखती दिल्या आहेत.त्यामुळे काँग्रेसही महापालिका निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागली आहे..येत्या २५ डिसेंबर रोजी मुंबईत पक्षाची बैठक होणार आहे त्या बैठकीत आघाडी करायची की स्वबळावर लढायचे याबाबतचा निर्णय निश्चित केले जाणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले आहे.
मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाला जोरदार झटका दिला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्ष मनिषा भगत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचे स्वागत केले. मुंब्रा स्टेशन परिसरात सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या मनिषा भगत यांनी सन 2023 मध्ये अजित पवार गटात प्रवेश केला होता. सध्या त्या अजित पवार गटाच्या ठाणे महिला कार्याध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. आज त्यांनी शरद पवार यांची विचारधारा आणि आ.जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या प्रसंगी मनिषा प्रधान यांनी, आ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व हे सर्वमान्य आहे. जितेंद्र आव्हाड यांनीच मुंब्रा परिसराचा विकास केला आहे. मात्र, काही लोक राजकारणासाठी या विकासात्मक कामांकडे पाहणे टाळत आहेत. ही बाब आपल्या मनाला पटत नसल्यानेच आपण विकासाच्या मार्गाने म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले.
भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर प्रज्ञा सातव आज हिंगोली मध्ये दाखल झाले आहेत भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानी प्रज्ञा सातव यांचे स्वागत करण्यात आलेला आहे राजीव सातव यांचं विकासाचा अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपमध्ये आलेलो आहोत अशी प्रतिक्रिया प्रज्ञा सातव यांनी दिली आहे
बुलढाणा जिल्ह्यात 21 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीच्या मत मोजणीच्या अनुषंघाने कोणत्याही अनुचित घटना घडू नये, यासाठी बुलढाण्यातील कारंजा चौकात बुलढाणा उपविभागीय अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोक ड्रिल आणि रूट मार्च काढण्यात आला.. यावेळी नगरपालिका मतमोजणीचे अनुषंगाने पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली आहे.. यामध्ये दंगा काबू पथकासह रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास काय खबरदारी घ्यायची याची रंगीत तालीम सुद्धा घेण्यात आली आहे.. यावेळी बुलढाणा शहरात रूट मार्च सुद्धा काढण्यात आला आहे.. आगामी मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केल.
कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपचा धक्का
कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा भाजपात पक्षप्रवेश पार पडणार
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
उद्या सकाळी ११ वाजता भाजपात पक्षप्रवेश
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला भाजपचा धक्का
मंत्री आशिष शेलार आज दिल्ली दौऱ्यावर
मंत्री आशिष शेलार नव्याने नियुक्त झालेले कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेणार
दोन्ही नेत्यांची सदिच्छा पर भेट असल्याची माहिती
सोबतच, शेलार राम सुतार यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेटणार
ज्येष शिल्पकार राम सुतार यांचे काल निधन
अशात, सांत्वनपर भेटीसाठी नोएडाला जाणार असल्याची माहिती
परळी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी आहे. नगरपरिषदेच्या इमारतीमध्येच ही मत मोजणी केली जाणार आहे. इथेच बाजूला असलेल्या ईदगाहाच्या सुरक्षेची मागणी मुस्लिम समाजाकडून एका निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांचे समर्थक गुलाल उधळत जल्लोष करत असतात.नेहरू चौक तळ परिसरात असलेल्या ईदगाहवर गुलाल अथवा इतर साहित्य पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊन शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू शकते.म्हणून निवडणूक निकालाच्या दिवशी ईदगाहला तात्पुरत्या पडद्याने झाकण्यात यावे तसेच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करून संभाव्य अनुचित प्रकार टाळावेत,अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनात करण्यात आली आहे.हे निवेदन नगरपरिषद मुख्याधिकारी, तहसीलदार,परळी शहर पोलिसांना देण्यात आलेय.
पुण्यातील भाजप ची बैठक संपली
चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी "डिनर डिप्लोमसी"
बैठकीला पुण्यातील भाजप चे सर्व आमदार यांच्यासह शहर निवडणूक प्रमुख होते उपस्थित
भाजप चे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आढावा
महापालिका निवडणुकीची तयारी, स्थानिक जागा वाटप, शिवसेनेशी झालेली युती, विजयाची रणनीती अशा विषयांवर बैठकीत विचार मंथन
मुंबईत युतीची बैठक पार पडल्यानंतर येत्या ३,४ दिवसात यादी जाहीर होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजुर
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मंजूर केला राजीनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिफारशीनुसार राज्यपालांची कारवाई
आशिया खंडातील सर्वात मोठा डान्स म्युझिक फेस्टिव्हल म्हणून ओळखला जाणारा सनबर्न फेस्टिव्हल आता या वर्षी गोव्यामध्ये न होता पहिल्यांदाच मुंबईमध्ये होणार आहे. आयोजकांनी केलेल्या अधिकृत घोषणेनुसार हा तीन दिवसांचा फेस्टिव्हल 19,20 आणि 21 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
मात्र या फेस्टिव्हल होऊ दिला जाणार नाही असा इशारा सनातन संस्थेने दिला आहे. मुंबईतून सनबर्न फेस्टिव्हल हद्दपार करा आणि युवा पिढीचे अंमली पदार्थांपासून रक्षण करा असे पत्रक जारी करत त्यांनी मुंबईकरांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मागच्या काही दिवसांपासून युवा पिढी ही अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहे.
वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातील सेंट जॉन स्कूल परिसरात मध्यरात्री रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ट्रकमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे कॅबिनला आग लागल्याचा अंदाज आहे. हा ट्रक हिंगणघाट येथील संकल्प ठोंबरे यांचा असल्याची माहिती आहे. हिंगणघाट नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, त्यामुळे परिसरात मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनाचा कॅबिन भाग पूर्णतः जळाला आहेय.
कराड तालुक्यातील नारायणवाडी येथेअघोरी प्रथेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी सातारा जिल्हा महिला शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुलोचनाताई पवार तसेच त्यांच्या काही निकटवर्ती कार्यकर्त्यांचे फोटो वापरून अघोरी प्रथा केल्याचा प्रकार समोर आला आहे.या घटनेमुळे खळबळ उडाली असून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. संबंधित ठिकाणी अघोरी प्रत, पूजासाहित्य व छायाचित्रे ठेवण्यात आल्याने हे कृत्य जाणीवपूर्वक आणि द्वेषातून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पार्थ पवारांनी मुंढवा जमीन संदर्भात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. असा दावा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारांनी 16 डिसेंबर 2025ला केला होता. त्यावेळी 1 जून 2021ला पार्थ पवारांनी त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र कुंभारांनी पत्रकार परिषद समोर आणलं होतं. मात्र आता पार्थ पवारांनी हे पत्र बनावट असल्याचं म्हटलंय. या पत्रावर माझं नाव टाकून, खोटी सही करुन हे बनावट पत्र समाजात पसरवून खोडसाळपणे माझी बदनामी केली जातीये. त्यामुळं याची चौकशी करावी अशी मागणी पार्थ पवारांनी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे केलीये. मात्र विजय कुंभार आपल्या आरोपांवर ठाम असल्याचं म्हणत, चौकशीला तयार असल्याचं म्हटलंय. फक्त माझी चौकशी करण्यापूर्वी मी आजवर केलेल्या सर्व आरोपांची ही निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी कुंभारांनी केलीये.
पार्थ पवारांनी मुंढवा जमीन संदर्भात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. असा दावा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारांनी 16 डिसेंबर 2025ला केला होता. त्यावेळी 1 जून 2021ला पार्थ पवारांनी त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र कुंभारांनी पत्रकार परिषद समोर आणलं होतं. मात्र आता पार्थ पवारांनी हे पत्र बनावट असल्याचं म्हटलंय. या पत्रावर माझं नाव टाकून, खोटी सही करुन हे बनावट पत्र समाजात पसरवून खोडसाळपणे माझी बदनामी केली जातीये. त्यामुळं याची चौकशी करावी अशी मागणी पार्थ पवारांनी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे केलीये. मात्र विजय कुंभार आपल्या आरोपांवर ठाम असल्याचं म्हणत, चौकशीला तयार असल्याचं म्हटलंय. फक्त माझी चौकशी करण्यापूर्वी मी आजवर केलेल्या सर्व आरोपांची ही निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी कुंभारांनी केलीये.
नाशिक मध्य च्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांना पक्षाने दिली नवी जबाबदारी
महापालिका निवडणूक प्रमुख पदाची फरांदे याना जबाबदारी
नाशिक भाजप मध्ये भाजप चे धक्का तंत्र
नाशिक पूर्व चे आमदार राहुल ढिकले यांना हटवून फरांदे यांची वर्णी
राहूल ढिकले च्या नेतृत्वाखाली गेल्या चार
दिवसापासून सुरू होत्या इच्छुकांच्या मुलाखती
नाशिक मध्य च्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांना पक्षाने दिली नवी जबाबदारी
महापालिका निवडणूक प्रमुख पदाची फरांदे याना जबाबदारी
नाशिक भाजप मध्ये भाजप चे धक्का तंत्र
नाशिक पूर्व चे आमदार राहुल ढिकले यांना हटवून फरांदे यांची वर्णी
राहूल ढिकले च्या नेतृत्वाखाली गेल्या चार
दिवसापासून सुरू होत्या इच्छुकांच्या मुलाखती
पुण्यातील केशवनगरमध्ये बिबट्याचा वावर
‘कोणार्क रिवा’ आणि ‘एल्कोन सिल्व्हर लीफ’ सोसायटीच्या पार्किंग परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. माहिती मिळताच वन विभाग व बचाव पथकाने तपासणी सुरू केली.
बिबट्या सापडला नसला, तरी पाण्याच्या टाकीजवळ त्याचे पायांचे ठसे आढळले. नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
परराज्यातील अवैध मद्य तस्करीवर पुणे उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य तस्करीविरोधात दोन स्वतंत्र कारवाया करत मोठा साठा जप्त केला.
उरुळी कांचन आणि भोर तालुक्यात सापळा रचून एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली.
या कारवाईत चारचाकी, ट्रकसह सुमारे ४८ लाख रुपयांहून अधिक किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई प्रदेशची आज सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या बैठकीत महाविकास आघाडी सोबत लढताना किती जागा मिळायला हव्यात याचा प्रस्ताव मुंबई अध्यक्ष राखी जाधव मांडणार
कार्यकर्त्यांकडून सध्या ठाकरे बंधूंसोबत आपण जायला हव अशी दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत भूमिका मांडण्यात आली आहे
रविवारी महाविकास आघाडीसोबत पार पडणाऱ्या बैठकीपूर्वीची ही बैठक असल्याने बैठकीला विशेष महत्व
पक्षाकडून महाविकास आघाडीत लढताना २२ जागांचा प्रस्ताव तयार असल्याची सूत्रांची माहिती
नवीन घरच्या बांधकामाचं सेंट्रिंग ठोकण्याचं काम करताना एका कामगाराचं संतुलन बिघडलं आणि दुसऱ्या माळ्यावरून बांधकाम कामगार निर्माणाधीन घरालगत असलेल्या विहिरीत पडला. विहिरीतील खोल पाण्यात त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही इथं घडली. मुकेश वाढीवे (42) असं मृत कामगाराचं नावं आहे. ग्रामस्थांच्या मदतीनं त्याला बाहेर काढण्यात आलं मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. बांधकाम ठेकेदार किंवा घर मालकानं घराचं बांधकाम करताना कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कुठलीही उपाययोजना केली नसल्यानं कामगार विहिरीत पडून मृत पडला. त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Bhandara : नवीन घरच्या बांधकामाचं सेंट्रिंग ठोकण्याचं काम करताना एका कामगाराचं संतुलन बिघडलं आणि दुसऱ्या माळ्यावरून बांधकाम कामगार निर्माणाधीन घरालगत असलेल्या विहिरीत पडला. विहिरीतील खोल पाण्यात त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही इथं घडली. मुकेश वाढीवे (42) असं मृत कामगाराचं नावं आहे. ग्रामस्थांच्या मदतीनं त्याला बाहेर काढण्यात आलं मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. बांधकाम ठेकेदार किंवा घर मालकानं घराचं बांधकाम करताना कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कुठलीही उपाययोजना केली नसल्यानं कामगार विहिरीत पडून मृत पडला. त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई प्रदेशची आज सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या बैठकीत महाविकास आघाडी सोबत लढताना किती जागा मिळायला हव्यात याचा प्रस्ताव मुंबई अध्यक्ष राखी जाधव मांडणार
कार्यकर्त्यांकडून सध्या ठाकरे बंधूंसोबत आपण जायला हव अशी दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत भूमिका मांडण्यात आली आहे
रविवारी महाविकास आघाडीसोबत पार पडणाऱ्या बैठकीपूर्वीची ही बैठक असल्याने बैठकीला विशेष महत्व
पक्षाकडून महाविकास आघाडीत लढताना २२ जागांचा प्रस्ताव तयार असल्याची सूत्रांची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई प्रदेशची आज सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या बैठकीत महाविकास आघाडी सोबत लढताना किती जागा मिळायला हव्यात याचा प्रस्ताव मुंबई अध्यक्ष राखी जाधव मांडणार
कार्यकर्त्यांकडून सध्या ठाकरे बंधूंसोबत आपण जायला हव अशी दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत भूमिका मांडण्यात आली आहे
रविवारी महाविकास आघाडीसोबत पार पडणाऱ्या बैठकीपूर्वीची ही बैठक असल्याने बैठकीला विशेष महत्व
पक्षाकडून महाविकास आघाडीत लढताना २२ जागांचा प्रस्ताव तयार असल्याची सूत्रांची माहिती
रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग असलेल्या अभ्युदयनगर परिसरातील नरहर वसाहतीत बिबट्याचा वावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या चक्क एका घराच्या आवारात शिरल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आहे. शहरात भरवस्तीत बिबट्याने प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.
या वसाहतीत राहणारे स्थानिक नागरिक संदेश कलंगुटकर यांचा पाळीव कुत्रा रात्री १ च्या सुमारास अचानक जोरजोराने भुंकू लागला. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा आणि आक्रमक असल्याने कलंगुटकर यांना संशय आला. त्यांनी तत्काळ झोपेतून उठून खिडकीतून बाहेर पाहिलं असता रस्त्यावर इतर भटकी कुत्रीही जोरात भुंकत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. संशय बळावल्याने त्यांनी आपल्या घराच्या CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. यामध्ये त्यांना बिबट्या सदृश्य एका प्राण्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला. कलंगुटकर यांनी या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिली आहे. नरहर वसाहत हा अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर असल्याने वन विभागाने तातडीने पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शालेय पोषण आहारात 1800 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा सणसणाटी आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केला. शालेय पोषण आहाराच्या करारात 134 रुपये किलोचा वाटाणा समाविष्ट आहे, प्रत्यक्षात पोषण आहारासाठी पांढऱ्या 60 रुपये किलोच्या वटाण्याचा पुरवठा केला जातो. असा आरोप करण्यात आला. शालेय पोषण आहारात पांढरा हिरवा वाटाणा दिला जातो याची पडताळणी करण्यासाठी एबीपी माझाची टीम जिल्हा परिषद शाळेमध्ये पोहोचली .
बाजारात हिरव्या वाटण्याचा 140 रुपये प्रति किलो हा दर पाहायला मिळाला तर पांढरा वाटण्याचा 60 रुपये किलो हा भाव आहे. पोषण आहाराच्या करारानुसार 134 रुपये किलो किमतीचा वाटाणा विद्यार्थ्यांना पुरवला जातो. मात्र शाळेत आढळून आलेल्या वाटाण्याची बाजारात किंमत अवघी साठ रुपये किलो अशी आहे. त्यामुळे आमदार कैलास पाटील यांनी केलेल्या आरोपानुसार शालेय पोषण आहारात 60 रुपये किलोचा वाटाणा पुरवठा केला जातो यात तथ्य आढळले. विद्यार्थ्यांना 60 रुपये किलोचा पांढरा वाटाणा पुरवठा केला जात आहे. आणि पुरवठादार 134 रुपये किलो दराने पैसे घेत आहेत. शालेय पोषण आहारात राजरोजपणे हा घोटाळा सुरू आहे.
किरकोळ बाजारात वाटाण्याचे भाव
हिरवा वाटाणा : १४० रुपये किलो
पांढरा वाटाणा: ६० रुपये किलो
शालेय पोषण आहाराच्या करारानुसार वाटाण्याचा दर
वाटाणा : १३४ रुपये किलो
बीड प्रमाणे तुळजापुरात आका संस्कृती आणायचे आहे का ? , सरपंच संतोष देशमुख यांच्या हद्यप्रमाणे हत्या करायची होती का ? एवढा उन्माद कुठून येतोय असा सवाल करत तुळजापूर गोळीबार प्रकरणानंतर खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक झाले. ड्रग्ज प्रकरणातील लोकांकडे गावठी कट्टे पिस्तूल आले कुठून ? , याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली. तुळजापुरात महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर आणि भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पिटू गंगणे यांच्यामध्ये सुरुवातीला वादावादी झाली. त्यानंतर वाद मिटल्यावर काही वेळाने अमर मगर यांचे बंधू कुलदीप मगर यांच्यावर हल्ला झाला. कुलदीप मगर यांनी दिलेल्या जबाबानुसार पिटू गंगणे यांच्या विरोधात प्रचार का केला यामुळेच मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. तलवार कोयते याने हल्ला झाला. तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार झाल्याचही जबाबात सांगण्यात आल आहे. यावरून खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक झाले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बविआला रोखण्यासाठी वसई विरारमध्ये भाजप योगी आदित्यनाथ यांना मैदानात उतरवणार
वसई-विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभा पार पडणार
लवकरच योगी आदित्यनाथ यांच्या सभांच्या तारखा निश्चित होणार
उत्तर भारतीय आणि हिंदू मते वळती करण्यासाठी भाजपची खेळी
योगी यांच्यासोबतच काही उत्तर भारतीय आणि भोजपुरी नेते आणि कलाकारही घेणार वसई-विरारमध्ये सभा
वसई विरार महापालिकेतली ठाकुरांची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपची खेळी
माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उद्या सकाळी अँजिओग्राफी केली जाण्याची शक्यता
त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय देणार.
अँजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार. सूत्रांची माहिती
'आम आदमी पक्ष' विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या चारही महापालिका स्वबळावर लढणारेय. पक्षाने अमरावतीत 13 आणि अकोल्यात महापालिकेसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर करीत निवडणुक तयारीत आघाडी घेतलीये. 23 डिसेंबरला 'आप'ची अकोला आणि अमरावतीसाठी दुसरी यादी येणारेय. तर याच दिवशी नागपूर आणि चंद्रपूरातील उमेदवार जाहीर केले जाणारेय. अकोला महापालिकेत 'आप' सर्वच्या सर्व 80 जागा लढणारेय. पक्ष विदर्भातील चारही महापालिका निवडणूका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव ढोके यांनी केलीये. पक्ष अकोला, नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती महापालिका सर्व ताकदीनिशी लढणार असून कोण्याच पक्षाशी आघाडी करणार नसल्याचं 'आप'ने स्पष्ट केलंय.
पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल कलाटे यांचा काल भाजपमध्ये प्रवेश होणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपच्या इच्छुकांनी कलाटे यांना तीव्र विरोध केला अन त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला. असं बोललं जातंय. कलाटे यांना भाजपमध्ये घेतल्यास आम्ही वेगळी भूमिका घेऊ, असा इशारा या इच्छुकांनी दिलाय. कलाटेंचा प्रवेश झाला तर ते प्रभाग 25 मधून निवडणूक लढणार हे उघड आहे.
मूर्ती संवर्धनाबाबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी फार पूर्वीच पाठवल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर केलेल्या वज्रलेपाला पाच वर्ष होत आल्याने फेब्रुवारी महिन्यात भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांनी दोन्ही मूर्तींची सखोल तपासणी करून त्यांचा अहवाल सादर केला होता. हा अहवाल त्याच वेळी म्हणजे फेब्रुवारी 2025 मध्येच राज्य सरकारकडे पाठविला असून लवकरच त्यांच्याकडून याबाबत मार्गदर्शन मिळेल असेही औसेकर यांनी सांगितले.
रोज हजारोंच्या संख्येने भावी विठ्ठलाच्या पायावर दर्शन घेत असतात. भाविकांच्या या स्पर्शामुळे देवाच्या पायाची सातत्याने झिज होत असते हे वास्तव आहे. यापूर्वी कोरोना काळात मंदिर बंद असताना 2020 मध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेपाची क्रिया केली होती. मात्र सध्या पुन्हा एकदा देवाचे पाय पूर्णपणे झिजल्याचे दिसत असून त्या तुलनेने रुक्मिणी मातेचे पाय मात्र व्यवस्थित आहेत. सातत्याने देवाच्या पायावर होणाऱ्या स्पर्शामुळे ही झीज झपाट्याने होत असल्याने आता झीज कमी होण्यासाठीचे प्रयत्नही मंदिराकडून सुरू करण्यात आले आहे.
श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या पवित्र मूर्तींच्या सुरक्षितता व दीर्घकालीन संवर्धनाच्या दृष्टीने श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्तींची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर लेखी अहवाल सादर केला आहे.भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून प्राप्त झालेल्या या अहवालास श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समितीची मंजुरी घेऊन, पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सदर अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.
सध्या दोन्ही मूर्ती पूर्णतः सुरक्षित स्थितीत आहेत. मात्र भविष्यात मूर्तींची कोणतीही झीज अथवा नुकसान होऊ नये, या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना शासनाच्या मंजुरीनंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहेत. श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित आहेत. भाविकांच्या श्रद्धेच्या दृष्टीने मूर्तींच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. मूर्तीची झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मंदिर समितीने दक्षता घेतली असल्याचे यावेळी श्री औसेकर यांनी सांगितले.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: शीतल तेजवानीला घेऊन बावधन पोलीस पिंपरीतील ऑफिसवर पोहचले, पण ऑफिसची झाडाझडती न घेताच परतले