- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog Updates: नंदुरबारमध्ये खळबळजनक हत्या प्रकरणानंतर अघोषित संचारबंदी; शहरात भीतीचं वातावरण
Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog Updates: संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झालाय. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर पहायला मिळत आहे. दरम्यान आणखी काही दिवस मुंबईत हलक्या सरी बरसण्याची शक्यता...More
जत चा माजी आमदार जयंतच्या सांगण्यावरून कंत्राटदार आत्महत्या प्रकरणात मला खेचू पाहत आहे. जयंत बिनडोक माणूस आहे. याला अक्कल नाही. मुळात कंत्राटदाराकडे आमदारच काम काय असतं. केवळ मला बदनाम करण्याच षडयंत्र इतक्या माजी आमदाराला सोबत घेऊन करत आहे. असे खूप प्रकार अंगावर घेतले. यांच्या खोट्या केसेस मुळे २-२ महिने जेल मधे काढले. मला वाटतय जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटतं नाही, काही तर गडबड आहे ?
जळगाव जिल्ह्यात पाचोर्याच्या सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण !
सुज्ञ तरुणाने प्रत्यक्ष धरणावर जाऊन चित्रीकरण करत अफवेला दिला पूर्णविराम !
Ancr: जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली होती. घाटनांद्रा व जोगेश्वरी खोऱ्यातून आलेल्या पुरामुळे स्थानिक ग्रामस्थ आधीच संकटात असताना, आज अचानक सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा पसरली. या अफवेचा परिणाम असा झाला की परिसरातील ग्रामस्थांनी जीव वाचवण्यासाठी घरं सोडली, काहींनी डोंगरकडे धाव घेतली, तर काही गाव सोडून बाहेर पळाले. या अफवेने संपूर्ण परिसरातील गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र एका जागरूक तरुणाने धाडस करून प्रत्यक्ष धरणावर जाऊन चित्रीकरण केलं आणि कोणतंही धरण फुटलेलं नाही, असे सांगणारा व्हिडिओ व्हायरल केला. त्यामुळे काही तासांनी ग्रामस्थांना दिलासा मिळाला असला, तरी या अफवेने मोठी खळबळ उडवून दिली होती.
Byte ग्रामस्थ
धुळे
फेरीवाला धोरण ठरवण्यासाठी बैठक...
जिल्हाधिकारी कार्यालयात फेरीवाले त्याचबरोबर खासदार आमदार पोलीस प्रशासन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक..
काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांना मुख्य आग्रा रोड वरून आलो होतो उठवण्यात..
फेरीवाल्यांचा पुनर्वसन करण्यासाठी घेण्यात आली बैठक..
बैठकीमध्ये झाला गदारोळ..
समर्थन करणाऱ्यांच्या घराजवळ लोड गाड्या लावा भाजपाच्या माजी नगरसेवकांनी केली टिपणी.
या वाक्यावरून शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील आणि भाजपाचे माजी नगरसेवक हिरामण गवळी यांच्यात झाला वाद..
भाजपाचे जिल्हाध्यक्ष गेले शुभांगी पाटील यांच्या वर गेले धावून
उपजिल्हाधिकारी आमदार यांच्या विनंतीवरून वाद शमला...
परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा
जून ते ऑगस्ट ३ महिन्यातील नुकसानी पोटी १२८ कोटी रुपये मदत मंजूर
शासनाने निधी मंजुरीचा काढला जीआर
सप्टेंबर मधील नुकसानीचे ही भरपाई मिळणार पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती
परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय कारण जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये झालेल्या पावसाने शेती पिकांच्या नुकसानी पोटी सरकारने 128 कोटी 55 लक्ष रुपये मंजूर केले आहेत याचा जीआर काढण्यात आला असुन जिल्ह्यात सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानीची ही भरपाई मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे तसेच त्यांनी या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले आहेत
BYTE:- मेघना बोर्डीकर palakamntri परभणी
नाशिक ब्रेकिंग...
- नाशिकमध्ये पावसाला सुरुवात, नाशिकला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अलर्ट...
- नाशिकच्या घाटमाथयासह शहरी भागात देखील गेल्या तासाभरापासून पावसाचा जोर वाढता...
- ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढल्याने धरणांतील पाणी साठ्यात वाढ
- गंगापूर धरणातून गोदापत्रात पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा...
- नाशिकच्या शहरी भागात देखील पावसाचा जोर कायम, शहरातील ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात...
आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी...WKT...vis
#nashik rain WKT... Feed send by Live U.
Breaking
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार
२ सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका जनहित याचिकाच असल्यावर याचिकाकर्ते ठाम
याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याच सांगत मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधातील पहिली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
२ सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात ऍड विनीत धोत्रे यांनी दाखल केली होती जनहित याचिका
२ सप्टेंबरच्या शासन निर्णयाला रीट याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं असून यासंदर्भातील जनहित याचिका ऐकण्याची गरज नसल्याच केलं होत उच्च न्यायालयाने स्पष्ट
मात्र याचिकेकर्ताला रिट याचिका म्हणून सक्षम कोर्टा समोर दाद मागण्याची कोर्टाने मुभा दिली आहे
मुंबईचा अरबी समुद्र सध्या अभूतपूर्व पर्यावरणीय संकटाला सामोरे जात आहे. दररोज कोट्यवधी लिटर असंशोधित सांडपाणी आणि औद्योगिक रसायने समुद्रात मिसळत आहेत.
पर्यावरणवादी राजेश रूपारेल यांनी सांडपाणी आणि औद्योगिक उत्सर्जन नियंत्रणासंबंधी माहिती मागवली होती. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) “संपूर्ण आकडेवारी उपलब्ध नाही” असे सांगून अपूर्ण माहिती दिला.
परंतु सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखवून दिले की, 17 जून 2025 रोजी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (NGT) मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रात MPCB नेच तपशीलवार आकडेवारी दिली होती—128 चेतावणी नोटिसा, 39 कारणे दाखवा नोटिसा, 22 प्रस्तावित आदेश, 4 बंदी आदेश व 42 आंतरिम कारवाई 2024-25 मध्ये करण्यात आल्याचे स्पष्ट नमूद केले होते. हीच माहिती रूपारेल यांनी मागितली होती.
घाडगे म्हणाले, “ही लोकांचा विश्वासघात करणारी कृती आहे. मंडळ नागरिकांना व माध्यमांना चुकीचे चित्र दाखवते, आणि खरी माहिती फक्त न्यायालयीन दबावाखाली उघड करते. मग त्यांच्या देखरेखीवर आपण कसा विश्वास ठेवायचा?”
खरा प्रश्न : सांडपाणी प्रक्रिया मागेच
RTI द्वारे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई दररोज 2,814 MLD सांडपाणी तयार करते, त्यापैकी फक्त 1,475 MLD शुद्ध केले जाते. जवळपास 1,338 MLD सांडपाणी थेट समुद्र व खाड्यांमध्ये मिसळते.
मुंबईतील बहुतांश सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STPs) प्रदूषण मानकांचे उल्लंघन करतात. वर्ली STP मध्ये तर मागील वर्षभर BOD व SS मूल्ये राष्ट्रीय मानकांच्या दहा पट जास्त आढळली.
रूपारेल म्हणाले, “यामुळे मासेमारी कोसळली आहे, किनारपट्टीवर दुर्गंधी पसरली आहे, पावसाळ्यात जलजन्य रोग वाढतात, आणि महत्त्वाचे म्हणजे मँग्रोव्ह व खाड्या—मुंबईचे नैसर्गिक पूरप्रतिबंधक—अपरिवर्तनीयरीत्या नष्ट होत आहेत.”
आणखी धक्कादायक वास्तव
NGT मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात MPCB ने मान्य केले की तारापूरसारख्या औद्योगिक भागातील CETP प्रकल्प 60% वेळा मानके पाळण्यात अपयशी ठरले. COD पातळी 1,600 mg/l इतकी—मानकांच्या सहापट जास्त—आढळली. त्यामुळे पसथळ गावापर्यंत भूजल व पृष्ठभागीय पाणी प्रदूषित झाले असून समुद्री जीवसृष्टी व सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येत आहेत.
ब्रेकिंग
मुंबई महापालिकेसाठी भाजपच्या बैठकांचा सिलसिला सुरुच
मुंबई भाजपकडून संघटनात्मक आढावा बैठका
संध्याकाळी ५ वाजता मुंबई अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक
तर संध्याकाळी ६ वाजता आमदार, जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्षांची बैठक
दादर वसंत स्मृती कार्यालयात बैठक पार पडणार
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी बोलवली बैठक
हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधातील पहिली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
२ सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात ऍड विनीत धोत्रे यांनी दाखल केलेली जनहित याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली
सदर याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याच न्यायालयाच निरीक्षण
२ सप्टेंबरच्या शासन निर्णयाला रीट याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं असून यासंदर्भातील जनहित याचिका ऐकण्याची गरज नाही
मात्र याचिकेकर्ताला रिट याचिका म्हणून सक्षम कोर्टा समोर दाद मागण्याची कोर्टाने मुभा दिली आहे
भिवंडी ब्रेकींग
मुंबई नाशिक महामार्गावर पडघ्याजवळ साईधाराच्या समोर दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात
ट्रक व दुचाकी मध्ये भीषण अपघात दुचाकी वरील दोघांचा मृत्यू एक जखमी
वडील व सहा वर्षाची मुलीचा दुर्दैव मृत्यू तर आई गंभीर जखमी असल्याने खाजगी रुग्णालयात केले दाखल
नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर घडला अपघात
दुचाकी ला मागून ठोकर दिल्याने घडला अपघात
मोहतसीम खोत (४८) असे मयताचे नाव आहे
शाखा प्रमुखांच्या बैठकीनंतर उद्या महिला पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवन येथे बैठक
उद्या दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महिला पदाधिकाऱ्यांची बैठक
काल शाखाप्रमुख आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवन येथे पार पडली होती
यामध्ये आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारीच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या
Flash
हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णविरोधातील याचिकेवर काही वेळातच होणार सुनावणी
ऍड विनीत धोत्रे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरच सकाळच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने सवाल उपस्थित
ओबीसी संदर्भातील शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे? असा सवाल उपस्थित करत जनहित याचिकेच्या ग्राह्यतेवरच (maintanablity) मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित
जनहित याचिका ग्राह्य धरण्यास पत्र नसल्याच मत मुंबई उच्च न्यायालयाने सकाळच्या सुनावणीत व्यक्त केलं होत
जनहित याचिका मागे घेऊन योग्य त्या खंडपीठाकडे रीट याचिका दाखल करण्याच मुंबई उच्च न्यायालयाने सुचवलं होत
जनहित याचिका ग्राह्य कशी धरली जाऊ शकते यासंदर्भात याचिकाकर्त्यांच्या वकिलांना आता न्यायालयाला पटवून द्यावं लागणार
यासंदर्भात अनेक याचिका दाखल झाल्या असून एकाच खंडपीठासमोर सुनावणी घेण्याची इतर याचिकाकर्त्यांची करायची मागणी
Ac - बीड सह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांना विचारले असता यावर त्यानी प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी शेतकऱ्यांविषयी सरकारला पूर्ण सहानुभूती असल्याचं मंत्री पंकजा मुंडे म्हणल्या आहेत.जालन्याची पालकमंत्री म्हणून मी तिथे ग्रामीण शहरी भागात पाहणी केली.मी बीडमध्ये देखील मी पाहणी करणार आहे.आता पाणी उचलून गेले आहे याचे अहवाल अधिकाऱ्यांकडून मागवले आहेत. अधिकाऱ्यांना आम्ही तात्काळ पंचनामे करायला सांगितले आहेत.या सगळ्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याचे पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितय.
बाईट - पंकजा मुंडे,पर्यावरण मंत्री
सुप्रिया सुळे-
(ॲान भुजबळ )
- भुजबळ साहेब म झ्या वडिलांच्या वयाचे आहेत त्यांचा पूर्ण मान राखून सांगते की सगळ्या जातींसाठी जेंव्हा आरक्षण मुद्दा येतो तेंव्हा मी सर्वोच्च सभागृहात माझे म्होनणे मांडले आहे. मग ते धनगर असो की लिंगायत मुस्लिम सगळ्यांसाठा मी मागणी करते. मी हा डेटावर आधारीत माहिती सांगते.
- भुजबळ साहेब यांनी माझी भाषणे ऐकली नसावी.
मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांना सांगणे आहे की त्यांनी सगळ्या पत्रकार परिषद घेऊन सांगावे कोणाला काय दिले. त्यांनी जाहीरात केलीच सगळ्यांना सगळे दिले. कोणाला काय दिले ते त्यांनी जाहीर करावे. किंवा ज्ञान पार्टी मिटींग बोलवावी.
- मी एक महिन्यापूर्वी अमित शहा साहेब यांना भेटून विनंती केली की महाराष्ट्रात खूप पाऊस झाला आहे. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा. मी काही आज बोलत नाहीए. धनगर बंजारा, मुस्लिम लिंगायत असे सगळ्यांच्या आरक्षणाबाबत सोलूशन काढावे. त्यांनी पीस बाय पीस काढू नये. आम्ही त्याला विरोध करणार नाही आम्ही त्यांना सोबत करू..
- विनोद पाटील यांची केस आहे तेंव्हाच कन्फुजन वाढले भुजबळ साहेब एक बोलत आहेत त्यामुळे कन्फुजन झाले. मुख्यमंत्री यांनी हे सांगितले पाहीजे.
-ही सगळी माहिती डेटा ड्रीव्हन आहेत. पवार साहेब आज बोलले की काही घडले असेल तर ते करेक्ट करता येईल. लोकांच्या मनातील संभ्रम दूर केला पाहीजे.
आरक्षणावर तर घ्याच पण आर्थिक परिस्थितीवर पण यांची परिस्थिती यावर अधिवेशन घेतले पाहीजे. महाराष्ट्राची परिस्थिती खूप गंभीर आहे.
मी विरोधक म्हणून टिका करत नाही तर देशात अश्या बातम्या येतात तेंव्हा आपल्या राज्याचे नाव खराब होते. देशभरातून लोक येतात पुण्यात तीथे अश्या घटना घडणे योग्य नाही. पुणे जिल्हात तर वाढलाच आहे.
मालेगाव ( नाशिक ) : ब्रेकींग...
- मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण याचिका अपिलावर आज झाली सुनावणी...
- साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहितसह 7 जणांना नोटीस
- स्फोटाचा तपास करणाऱ्या एनआयएलाही हायकोर्टाची नोटीस..
- सहा आठवड्यानंतर होणार पुढची सुनावणी..
- बॉम्बस्फोटातील मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांनी केले समाधान व्यक्त..
- आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास केला व्यक्त..
Anchor - २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपीच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणाऱ्या अपिलावर आज मुंबईं उच्च न्यायालयात सुनावणी झाली..या सुनावणीत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहितसह 7 जणांना नोटीस देत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले..तर स्फोटाचा तपास करणाऱ्या एनआयएलाही हायकोर्टाने नोटीस बजावली..सहा आठवड्यानंतर या प्रकरणी पुढची सुनावणी होणार आहे..या सुनावणीनंतर स्फोटातील मृत्यू झालेल्यांचा कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले..याचिका दाखल करत निर्दोष मुक्त केलेल्या सात आरोपींची पुन्हा चौकशी होणार असल्याने आम्हाला न्याय मिळेल अशी आशा ७७मृतांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली..
• बाईट - उस्मान खान ( ग्रे कलर शर्ट, सफेद दाढी)
• बाईट - सय्यद यासीन ( दाढी वाढलेले, सफेद टोपी )
• बाईट - मौलाना कय्यूम कासमी ( काळी टोपी )
हिंगोली
Slug - एकदाची शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे
शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर झिरवाळ यांची प्रतिक्रिया
अँकर
अँकर-मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा धक्कादायक आकडा पुढे आला असून मागील आठ महिन्यात शेतकऱ्यांनी 707 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. कर्जबाजारीपणा आणि नापिकील कंटाळून आत्महत्या करणे हा पर्याय नाहीये,माझी विंनती असेल जनतेला कुणीही आत्महत्या करू नये,संकटा मागून संकट येत आहेत,पण त्यातून मार्ग काढला पाहिजेत या मताचे आम्ही सुद्धा आहेत,यातून मार्ग काढण्यासाठी एकदा तरी शेतकर्यांची कर्ज माफी केली पाहिजेत , कर्जामुळे आत्महत्या झाली हे ऐकणं कोणासाठी ही शोभनीय नाही अस म्हणत नरहरी झिरवाळ यांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीला दुजोरा दिलाय...
बाईट- नरहरी झिरवाळ- पालकमंत्री, हिंगोली
सातारा
नामदेव वाडी येथील झोपडपट्टीमध्ये झालेल्या हाणामारीनंतर उपचारासाठी रुग्णालयात आलेले दोन्ही गटात पुन्हा तुफान हाणामारी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
साताऱ्यातील नामदेव वाडी येथे जुन्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये सात ते आठ जण गंभीरित्या जखमी झाले आहेत... दोन्ही गटातील व्यक्ती उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाले असता त्या ठिकाणी देखील पुन्हा दोन्ही गट समोरासमोर भिडल्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली... या प्रकरणात दोन्ही बाजूने परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाले आहेत.... रुग्णालयाच्या आवारात झालेल्या दगडफेकीमध्ये ॲम्बुलन्स आणि रुग्णालयाचे नुकसान झाले आहे
वाशिम: वाशिमच्या देवठाणा बुद्रुक येथील चंद्रभागा नदीवरिल पुलाची उंची कमी असल्याने विद्यार्थ्यांना येथील पुलावर पुराचं पाणी असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना पूल ओलांडून शिक्षण घेण्यासाठी जीवघेणा प्रवास करावं लागतं असल्याचं चित्र आहे..गेल्या काही दिवस पासून बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे नदी- नाले ओसंडून वाहत आहे छोटेमोठे पूल पावसाच्या।पाण्याने पूर येऊन रस्ते बंद होत आहेत त्या मूळे या नदी वर मोठा पूल तयार करून कायम।स्वरूपी प्रश्न निकाली काढावा अशी मागणी होऊ लागली आहे..
बीड: बंजारा समाजापाठोपाठ बीडमध्ये धनगर समाज रस्त्यावर
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुंबरान आंदोलन करून वेधले लक्ष
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा या मागणीसाठी आंदोलन
Anc:बंजारा समाजा पाठोपाठ बीडमध्ये आज धनगर समाज रस्त्यावर उतरला. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश केला जावा.. या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर घोषणाबाजी करत सुंबरान आंदोलन करण्यात आले. सध्या राज्यातील धनगर समाज एनटी प्रवर्गात आहे.. मात्र इतर राज्यात धनगर समाज एसटी प्रवर्गात असल्याने राज्यातील धनगर समाजाचा देखील एसटी प्रवर्गात समावेश केला जावा.अशी मागणी यावेळी करण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत आंदोलनामध्ये धनगर समाज सहभागी झाला.
सोलापूर ब्रेकिंग :
अक्कलकोट तालुक्यातील खैराट गावात एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला
खैराट गावात मागील आठवडाभरापासून मुसळधार पावसामुळे गावात अनेक भागात पाणी शिरले आहे.
शिवराज रोडगे असे या वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे
शिवराज वाहून जातानाची दृश्य मोबाईल कॅमेरात कैद झालीय
सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती
खैराट गावात झालेल्या पावसामुळे एकीकडे शेताच आणि घरातील अन्न धान्याचे मोठे नुकसान झालेय
त्यातच ओढ्याला आलेल्या पुरामुळे पाण्यातून वाट काढत जाणारा व्यक्ती पाण्यात वाहून गेला.
मात्र असं असलं तरी अद्याप गावात प्रशासन पोहीचलेले नाही.
गावकरी शिवराज रोडगे या व्यक्तीचा शोध घेत आहेत
सोलापूर ब्रेकिंग :
अक्कलकोट तालुक्यातील खैराट गावात एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला
खैराट गावात मागील आठवडाभरापासून मुसळधार पावसामुळे गावात अनेक भागात पाणी शिरले आहे.
शिवराज रोडगे असे या वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे
शिवराज वाहून जातानाची दृश्य मोबाईल कॅमेरात कैद झालीय
सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती
खैराट गावात झालेल्या पावसामुळे एकीकडे शेताच आणि घरातील अन्न धान्याचे मोठे नुकसान झालेय
त्यातच ओढ्याला आलेल्या पुरामुळे पाण्यातून वाट काढत जाणारा व्यक्ती पाण्यात वाहून गेला.
मात्र असं असलं तरी अद्याप गावात प्रशासन पोहीचलेले नाही.
गावकरी शिवराज रोडगे या व्यक्तीचा शोध घेत आहेत
नवी दिल्ली
प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेस
- महाराष्ट्राचं उदाहरण त्यांनी दिलं त्यांना माहिती असलं पाहिजे
- महाराष्ट्रात प्रत्येक बूथवर काँग्रेसचा एजंट हजर असतो
- त्याने तक्रार दिली होती का ?
- त्याने बाहेर देऊन मीडियाला बाईट दिली होती का ?
- किंवा कोणी मृत व्यक्ती आहे आणि त्याने मतदान केलं असं काँग्रेसचा बूथ एजंट म्हणाला का
- मग आता ते असं काय म्हणतात
- SIR दर काही वर्षांनी निवडणूक आयोग करतात
- *गोबेल्स ची थिअरी सारखं हे प्रकरण*
- सर्वोच्च न्यायालयाने SIR चालू ठेवला पाहिजे असा निर्णय सखोल सुनावणी नंतर दिला पाहिजे
- *तुम्हाला कशावरही विश्वास नसेल तर मग कशाला निवडणुकीत सहभागी होतात ?*
- *मोदी साहेबांना व्होट चोरी करायची होती तर त्यांच बहुमत का कमी झालं ?*
- लोकांनी गैरसमजाला महत्व देण्याची आवश्यकता नाही
- माझी विनंती आहे
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने नुकतेच हैदराबाद गॅझेट लागू केलय. याच हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे आता बंजारा समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करावा या मागणीसाठी किनवट तालुक्यात महामोर्चा काढण्यात आला. किनवट हा तालुका आदिवासी आणि बंजारा बहुल असलेला तालुका आहे. येत्या 29 तारखेला नांदेड मुख्यालयाला यापेक्षाही मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा सकल बंजारा समाजाने यावेळी केली आहे.
मालेगाव स्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह ७ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. विशेष एनआयए न्यायालयाच्या निर्णयाला स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तपास एजन्सी एनआयएलाही कोर्टाने नोटीस बजावली आहे.
मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत याचिकादारांनी असा दावा केला की, कटकारस्थानात गुप्तता पाळल्याने थेट पुरावे नसले तरी आरोपी निर्दोष ठरवता येणार नाहीत. पुढील सुनावणी ६ आठवड्यांनी होणार आहे.
बीड : बंजारा समाजापाठोपाठ बीडमध्ये आज धनगर समाज रस्त्यावर उतरला. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश केला जावा, या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. सध्या राज्यातील धनगर समाज एनटी प्रवर्गात आहे.. मात्र इतर राज्यात धनगर समाज एसटी प्रवर्गात असल्याने राज्यातील धनगर समाजाचा देखील एसटी प्रवर्गात समावेश केला जावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत आंदोलनामध्ये धनगर समाज सहभागी झाला.
नंदुरबार : शहरातील सिंधी कॉलनी परिसरात खाजगी वादातून जय वळवी यांच्यावर सूर्यकांत मराठे यांनी भर बाजारात धारदार शस्त्राने हल्ला केला होता. उपचारादरम्यान सुरत येथे जय वळवी याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरले असून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत, तसेच शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. सध्या नंदुरबार शहरात अघोषित संचारबंदी लागू असून, अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अहिल्यानगर : शहरातील झेंडीगेट परिसरात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलखान्यावर आज सकाळी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे कारवाई करत जेसीबी फिरवली. दोन दिवसांपूर्वी शहरात रस्त्यावर गोमांस सापडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आमदार संग्राम जगताप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी रस्ता रोको आंदोलन केलं होतं. तसेच आमदार जगताप यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज अखेर प्रशासनाने अवैध कत्तलखाने हटवण्याची मोहीम राबवली, ज्यामुळे परिसरात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मुंबई : गणपती उत्सवासाठी मुंबई,ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तथापि, आप-आपल्या गावी, वाडया-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक -अधिकिरी अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी केले.
बीड : जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून झालेल्या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून 631 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. मराठवाड्यात तुलनेने कमी पाऊस पडणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र यावर्षी तब्बल 631 मिलिमीटर पाऊस बरसला. वार्षिक सरासरी 566 मिलिमीटर इतकी आहे. अवघ्या महिनाभरात तसेच आठवडाभरापासून सुरू असलेल्या दमदार पावसाने शेतीसह पिण्याच्या पाण्याची सोय झाली. बीड जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 566 मिलिमीटर आहे. बीड जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस पडतो तर काही तालुक्यांमध्ये जास्त पाऊस पडतो. त्यामुळे पावसाचे प्रमाण एकसारखे नसते. मात्र यंदा पावसाने वार्षिक सरासरी ओलांडल्याने पाण्याचा प्रश्न पूर्णतः मार्गी लागला आहे.
मराठवाड्यातील (Marathwada) महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी आंदोलनस्थळी भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर समाज बांधवांनी उपोषण मागे घेतले.
जळगाव : जिल्ह्यात दोन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आज पाहणी दौऱ्यावर आहेत. दरम्यान, जळगाव तालुक्यातील बिलवाडी गावात दोन कुटुंबांत झालेल्या हाणामारीत एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावात दगडफेक व जाळपोळ झाली, त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. पालकमंत्री पाटील हे या गावालाही भेट देणार असून, स्थानिक प्रशासनासोबत परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
भंडारा : शहरातून मध्यप्रदेशकडं जाणाऱ्या मुख्य महामार्गावर भंडारा ते तुमसर दरम्यान मोठमोठे जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांना अक्षरश: जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. भंडारा ते तुमसर महामार्गावर वर्डी इथं भंडारा शहराचं रेल्वे स्थानक आहे आणि सोबतच स्टील उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर जाणारे प्रवाशी आणि सनफ्लॅग कंपनीत जाणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात असल्यानं या महामार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. जीवघेणे खड्डे पडले असल्यानं या महामार्गावरून जात असताना वाहनधारकांना रस्ता अक्षरश: शोधावा लागतोय. या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांचे अनेक अपघात घडलेत अनेकांना अपंगत्व आलं तर कित्येकांचा जीवही गेलाय. ज्याप्रमाणे खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली तशीच परिस्थिती या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांच्या शरीराचीही झाल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या महामार्गाची तातडीने दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आता नागरिकांकडून देण्यात येत आहे.
शासकीय कार्यालयांकडे ३४२ कोटींची पाणीपट्टी थकबाकी; नागरिकांकडून वेळेत वसुली केली जात असताना शासकीय खात्यांकडून रक्कम वसूल न केल्याबद्दल सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली नाराजी व्यक्त
पुण्यात पावसामुळे डासांची वाढ झाल्याने शहरात डेंगी, मलेरिया, झिका, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढले;१३ दिवसांत डेंगीचे २८५ संशयित रुग्ण
पुणे शहरातील पाच भागांतील अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; कोथरूड, बाणेर- बालेवाडी, विवेकानंद नगरमधील अतिक्रमण हटवलं
कृषी अभ्यासक्रमांचे प्रवेश हाऊसफुल; १६ हजार ८२९ पैकी १४ हजार ४१७ विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्री समितीची बैठक; यंदाच्या ऊसगाळाप हंगामाचे धोरण ठरणारं
बीड-परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढलीय, त्यामुळे नांदेडमध्ये गोदावरी नदी सध्या धोक्याच्या पातळीजवळून प्रवाहित झालीय. जुन्या नांदेड शहरातील होळी भागात असणारा नदीवरचा पूल पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. गोदावरीचे बॅकवाटर नदीकाठच्या अनेक गावात शिरल्याने पूर सदृश्य स्थिती निर्माण झालीय. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देत काळजी घेण्याचे आवाहन केलय.
नागपूर इथून छत्तीसगडच्या डोंगरगड इथं जाणाऱ्या दोघांच्या दुचाकीला अज्ञात वाहनांनं जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. हा भीषण अपघात भंडारा येथील वैनगंगा नदीच्या कोरंभी देवस्थानजवळ बायपास महामार्गावर घडला. द्वारकादास साहू (54) आणि देव दास (25) असं मृत व्यक्तीचं नावं आहे. हे दोघेही डोंगरगड जवळील लामानीन येथील रहिवासी आहेत. या भीषण अपघाताची माहिती मिळताच कारधा पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कारधा पोलीस करीत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत महसूल सेवा पंधरवडा कार्यक्रम सुरू करण्यात आलाय या कार्यक्रमाचा शुभारंभ रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी रायगड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या अभियानातून अनेक योजनेचा लाभ देण्यात आला. त्यामुळे अनेक नागरिकांना या अभियानातून अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निमित्ताने कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एम गावात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या ग्रामसभेला बायोमेट्रिक पध्दतीने गावाचे सरपंच, उपसरपंच, अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ आणि अधिकारी उपस्थित होते. बायोमेट्रिक पध्दतीने ग्रामसभा घेणारी राज्यातील ही पहिली अलकुड एम ग्रामपंचायत ठरली आहे. या ग्रामसभेत गावातील अनेक प्रश्नावर चर्चा झाली तसेच पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून गावात राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती या ग्रामसभेच्या माध्यमातून देण्यात आली.
मराठा,ओबीसी,बंजारा,आदिवासी,
गाडीला साईड दिली नाही म्हणून पुण्यातील कोथरुड भागात गोळीबार करण्यात आलाय . निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झालाय. पुण्यातील कोथरुड मधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत. घायवळ टोळीतील मुसा शेख , रोहीत आखाड ,गणेश राऊत आणि मयुर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. मध्यरात्री कोथरुड भागात ही घटना घडलीय.
विरार : विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरात बुधवारी सायंकाळी “वेस्ट फर्निचर” या फर्निचर दुकानाचे भव्य उद्घाटन झाले. या उद्घाटन कार्यक्रमात झालेला ऑर्केस्ट्रा डान्स आणि नोटांचा वर्षाव यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली उद्घाटनावेळी आयोजकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी स्टेजवर भोजपुरी गायकाच्या “सैयाँजी दिलवा मांगेले गमछा बिछाई” या हिट गाण्यावर एक महिला नर्तकी थिरकत होती. कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गाण्याच्या ठेक्यावर नर्तकीने केलेल्या नृत्यामुळे उपस्थितांना थबकायला लावले.
संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झालाय. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर पहायला मिळत आहे. दरम्यान आणखी काही दिवस मुंबईत हलक्या सरी बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्कवलाय.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog Updates: नंदुरबारमध्ये खळबळजनक हत्या प्रकरणानंतर अघोषित संचारबंदी; शहरात भीतीचं वातावरण