Maharashtra Live blog Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live blog Updates : राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog Updates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेचे सर्व जिल्हाप्रमुखांना मुंबई न येण्याबाबत खडसावले. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली भारतीय सागरी सप्ताह (IMW) निमित्त मा. केंद्रीय मंत्री, बंदरे, जहाज...More
लोकमंगल बँकेतील 34 लाख 60 हजारांची रोकड आणि 2 किलोहून अधिक सोने चोरीचा छडा
नागपूरमधून चोराच्या मुस्क्या आवळल्या, धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बँकेतील शिपाई असलेल्या दत्ता नागनाथ कांबळे याच्याकडून चोरी
अटकेनंतर आरोपीकडून 11 लाखांची रोकड आणि 2 किलो सोने जप्त
बँकेची डुप्लिकडेट चावी मिळवत चोरी केल्याची आरोपीची कबुली
दोन महिन्यांपूर्वी लोकमंगल मल्टीस्टेट बँकेच्या तुळजापूर शाखेत झाली होती चोरी
धाराशिवच्या पोलिस अधीक्षक रितू खोखर यांची पत्रकार परिषद घेऊन चोरीची माहिती
अखेर वैभव खेडेकर यांचा आज भाजप पक्षप्रवेश निश्चित.....
आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित होणार पक्षप्रवेश.
तीन वेळा मोठा गाजावाजा करत पक्षप्रवेशासाठी गेलेले वैभव खेडकर यांनी आजच्या कार्यक्रमाबाबत पाळली कमालीची गुप्तता.
पाच लोकांना सोबत घेऊन वैभव खेडकर मुंबईत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेल्याची माहिती.
पक्ष प्रवेशाबाबत गुप्तता राखण्यामागचे कारण मात्र गुलदस्त्यात.
पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे पीक कापणी प्रयोग सुरू आहेत परभणीच्या पालम तालुक्यातील खराब धानोरा या गावांमध्ये अशाच पद्धतीने एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून पीक कापणी प्रयोग करण्यात आला मात्र हा प्रयोग केल्यानंतर पिकाची मोजणी करण्यात येणाऱ्या पीक विमा कंपनीच्या काट्यामध्ये मोठी तफावत आढळली आहे.पिक विमा कंपनीच्या काट्यात शेतकऱ्यांनी काढलेले पिक हे ५ किलोच्या वर दाखवत आहे तेच पिक आणि वजन हे इतर काट्यावर केले तर ३ किलो दाखवत आहे म्हणजे पिक विमा कंपनीचा काटा २ किलो पेक्षा जास्त वजन दाखवत आहेत त्यामुळे शेतकरी चांगले संतापले असून तात्काळ या पिक विमा कंपनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यान विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केलीये काल रात्रीपासून शेतकरी कारवाईच्या मागणीसाठी पालम तहसील कार्यालय तसेच पोलीस ठाण्यामध्ये ठिया देत आहेत अद्यापही या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाही शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट या तफावतीचा प्रात्यक्षिक करायला लावून त्याचा व्हिडिओ काढलाय त्यामुळे पिक विमा कंपनीचा बनावट धंदा हा उघडकीस आलाय..
मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची अमित ठाकरे घेणार भेट
काल अभाविप आणि मनसे विद्यार्थी सेनेत झाला होता राडा
अभाविपच्या कार्यालयाला मनसेने ठोकले होते टाळे
मनसे कार्यकर्ते पोलीस आयुक्त कार्यालयात जमायला सुरुवात
मुंबईत भरणार मेरिटाइम उद्योगातील सर्वात मोठी परिषद
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात परिषदेचे आयोजन
परिषदेच्या नियोजनाच्या पूर्व तयारीसाठी बैठक
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे देखील उपस्थित असणार
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, मंत्री नितेश राणे बैठकीत राहणार उपस्थित
Beed Crime : बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरूच असून घरासमोरील रस्त्यावरून जाऊ नको.. या शुल्लक कारणावरून बीडच्या अंजनवती गावातल्या एका महिलेला गंभीर मारहाण झालीय. या मारहाणीत प्रियंका गाढवे या महिलेच्या डोक्याला शेतीच्या अवजाराने खोलवर जखम झाली. ज्यात महिलेच्या डोक्याला 14 टाके पडले आहेत. मागील आठवड्याभरापूर्वी याच अंजनवती गावात शेतीच्या वादातून एका महिलेला भावकीतील काही जणांनी मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच याच गावात महिलेला मारहाण झाल्याचा हा दुसरा प्रकार समोर आलाय. जखमी महिलेवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून महिलेची प्रकृती स्थिर झाल्यानंतर जबाब नोंदविला जाणार आहे.
Beed Crime : बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरूच असून घरासमोरील रस्त्यावरून जाऊ नको.. या शुल्लक कारणावरून बीडच्या अंजनवती गावातल्या एका महिलेला गंभीर मारहाण झालीय. या मारहाणीत प्रियंका गाढवे या महिलेच्या डोक्याला शेतीच्या अवजाराने खोलवर जखम झाली. ज्यात महिलेच्या डोक्याला 14 टाके पडले आहेत. मागील आठवड्याभरापूर्वी याच अंजनवती गावात शेतीच्या वादातून एका महिलेला भावकीतील काही जणांनी मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच याच गावात महिलेला मारहाण झाल्याचा हा दुसरा प्रकार समोर आलाय. जखमी महिलेवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून महिलेची प्रकृती स्थिर झाल्यानंतर जबाब नोंदविला जाणार आहे.
राज्य सरकारकडून आर्थिक स्थिरता आणण्यासाठी मोठी घडामोड
राज्य सरकारकडून मालमत्ता आणि कर्ज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनी स्थापना
‘MAHA ARC LIMITED’ कंपनी स्थापन करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी
राज्य शासनाच्या मालमत्ता, गुंतवणूक, आणि आर्थिक साधनांचा पुनर्वापर आणि पुनर्रचना करण्याचे काम करणार
राज्याच्या मालमत्तेचा अधिक चांगला आर्थिक उपयोग करण्यासाठी ही कंपनी मध्यस्थी आणि व्यवस्थापन करणार
महाराष्ट्राच्या राजकोषीय स्थैर्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल
अनेक मालमत्ता आणि आर्थिक साधनं निष्क्रिय आहेत किंवा त्यांचा उपयोग कमी प्रमाणात केला जातो, त्यामुळे शासनाला या संसाधनांवरून अपेक्षित परतावा (returns) मिळत नाही. अशात ह्या कंपनीच्या मार्फत त्याचे विनियोजन केले जाणार
कंपनीच्या स्थापनेसाठी वित्त आणि नियोजन विभागातील आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती
अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, प्रधान सचिव (व्यय) ओमप्रकाश गुप्ता, प्रधान सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, सचिव (वित्तीय सुधारणा) श्रीमती शेला ए., तसेच इतर सहसचिव आणि उपसचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश
मुंबईकरांसाठी महसूल विभागाची दिवाळी भेट
मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात करू शकाल दस्त नोंदणी
क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वाचा निर्णय
मुंबई आणि उपनगरातील नागरिक, व्यावसायिक व कंपनी मालक आपल्या क्षेत्रासहित मुंबईतील कोणत्याही सहा मुद्रांक कार्यालयातही दस्त नोंदणी (Adjudication of Document ) करू शकतील
ज्या भागातील रहिवासी किंवा व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत, तेथीलच मुद्रांक कार्यालयात नोंदणी करण्याची अट काढून टाकण्यात आली
आता मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांना कोणत्याही मुद्रांक कार्यालयात म्हणजे बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर तसेच ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी (अंमलबजावणी एक व दोन) या सहा कार्यालयांत मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल
या सुधारणेमुळे मुंबईकरांचा वेळ, धावपळ वाचणार आहे, सोबतच निर्णय प्रक्रिया आणि कार्यालयीन कामकाज देखील जलदगतीने होणार
यासंदर्भातील शासनाकडून राजपत्र देखील जारी करण्यात आले आहे
Nashik News : पनाशिकच्या पंचवटीतील गजानन चौकातील कोमटी गल्लीत भरदिवसा दुचाकीहून आलेल्या संशयिताने एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडलीये... काही नागरिकांनी हटकले म्हणून यात युवक बचावला असून कुठलीही गंभीर इजा झालेली नाही. हा सदर घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरे कैद तर काही नागरिकांनी मोबाईलमध्ये देखील चित्रण केले आहे... घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संशयित फरार झाल्याने सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल मध्ये चित्रण झालेल्या व्हिडीओ माध्यमातून दोघा हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय....काल दुपारी एक युवक पळत गजानन चौक कोमटी गल्लीत आला. त्याचा पाठलाग करत दोघे संशयित दुचाकीहून आले. अक्षरशः या मार्गाहून जाणाऱ्या दोन मुलींना धडक देत, स्कुल व्हॅनला धडक दिली. त्या पळणाऱ्या युवकाला रस्त्यातच गाठले व दुचाकीहून उतरलेल्या एका संशयिताने काहीतरी धारदार शस्त्राने युवकाचा पोटावर वार केला.
Beed Crime News : केज येथे बस स्टँड समोर चायनिज सेंटर चालवित असलेल्या सय्यद इर्शाद याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली आहे. चार ते पाच जणांनी हल्ला केल्याने चायनीज सेंटर चालक सय्यद इर्शाद हे गंभीर जखमी झाले. केज उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ गशासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.सय्यद अर्शद यांचा जवाब घेतल्यानंतर या प्रकरणी आज केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचना आणि मतदार यादी वरून परळी काँग्रेस आक्रमक झालेली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर सईद हनीफ यांनी निवडणूक आयोगाकडे या बाबत तक्रार केली आहे.मतदान आणि उमेदवार संख्येवर आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले असून सदरील प्रभाग रचना ही नियमबाह्य झाली असल्याचा दावा काँग्रेस कडून करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार राजकीय दबावातून झाला आहे.यामधून प्रस्थापितांना मतदार यादीतून लाभ मिळावा अशा पद्धतीने मतदार याद्या केल्या असून या याद्यांमध्येही घोळ असून याबाबत न्यायालयात ही जाणार बहादुर हनीफ यांनी सांगितले आहे.
सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार संग्राम जगताप हे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल होत या वक्तव्याच्या संदर्भात पक्षाची भूमिका अजित पवार यांनी मांडली होती
आमदार संग्राम जगताप यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून नोटीस देखील बजावण्यात आली होती
त्यामुळे आजच्या भेटीत संग्राम जगताप हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्वाच
आज संग्राम जगताप बीडच्या मोर्चाला जाणार नाही
आज सर्व पक्षीय नेते आज निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहेत…
या भेटीसाठी अनेक पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर पक्ष ही आज एकत्र असतील
पण पत्रक देऊन ही या भेटीसाठी सत्ताधारी पक्षाचे कोणतेही नेते आणि पक्ष येणार नाही…
यावरच आता संदीप देशपांडे यांनी सोशल एक्स पोस्ट केली आहे. - निवडणुका पारदर्शी पणे होणं ही जबाबदारी निवडणूक आयोग,विरोधी पक्ष याच बरोबर सत्ताधारी पक्षांची सुद्धा आहे.
पोस्ट करत देशपांडे यांनी सत्ताधारी पक्षाला टोला लगावला आहे
Maharashtra News : अजितदादा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्या... भाजपची मागणी.. म्हणे क्रीडा संघटनांवर माजी खेळाडूंनाच राहू द्या, तिथे राजकारण आणू नका... अजित पवारांच्या मागील तीन टर्म मध्ये महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राचा मोठा नुकसान झाला आहे.. अजित पवार यांच्या समितीने महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या खर्चाचा हिशोबही नाही दिला.. भाजप नेते व महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांचा गंभीर आरोप...
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच भाजप खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहे.. भाजपने मात्र अजितदादा ने या निवडणुकीतून काढता पाय घेत माघार घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजित दादांच्या काळात महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राचा नुकसान झाल्याचा आरोप करत त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील हिशोबही देण्यात आलं नाही असं आरोप केला आहे.. अजितदादांनी निवडणुकीतून बाजूला होऊन क्रीडा क्षेत्राचा हा महत्त्वाचा संघटन एका माजी खेळाडूच्या (मुरलीधर मोहोळ माजी कुस्तीपटू आहेत) नेतृत्वात काम करेल अशी संधी निर्माण करावी अशी अपेक्षाही रामदास तडस यांनी व्यक्त केली आहे.
Pune News : पुण्यात 24 तास फटाक्यांची दुकानं सुरु राहणार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात फटाक्यांच्या विक्रीला हिरवा कंदील देण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, परवानाधारक विक्रेत्यांना 11ऑक्टोबर ते 21ऑक्टोबर 2025 या कालावधीत फटाक्यांच्या स्टॉल आणि दुकाने 24 तास खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे या काळात शहर, महानगरपालिका, नगरपरिषद आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी फटाक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते.
पोलिसांनी सर्व परवाना धारकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहेत, कुणीही नियमभंग केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.
Maharashtra News Updates : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये जी एन साईबाबाची पुण्यतिथी साजरी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशविघातक कृत्य, भाषण करणे विना परवानगी गर्दी करण्याबाबत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Maharashtra News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेचे सर्व जिल्हाप्रमुखांना मुंबई न येण्याबाबत खडसावले....
शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी नुकतीच व्हिसीद्वारे पश्चिम पूर्व/पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथील आमदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली
या बैठकीत अकार्यक्षम जिल्हाप्रमुखांना मोरेंनी चांगलेच खडेबोल सुनावले, तसेच बोलवल्याशिवाय मुंबईत यायचं नाही असा दमचं भरल्याची माहिती सूत्रांनी दिली
जिल्हाप्रमुखांनी वारंवार मुंबईत भेटीला न येता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्षाच्या कामाकडे लक्ष द्यावं.
रिक्त पदनियुक्ती करून पक्षाची बांधणी करावी. विनाकारण मुंबईत येऊ नये.
याशिवाय अकार्यक्षम जिल्हा प्रमुखांना लवकरच डच्चूही दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
या शिवाय शिवसेनेकडून ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी सुरू करण्याबाबतच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्याचे कळते.
रायगड, ठाणे, नाशिक, सातारा सांगली यासह इतर जिल्ह्यांमध्ये मित्र पक्षाकडूनच पाय खेचला जात असल्याने या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेकडून स्वतंत्र निवडणूकीसाठी पदाधिकारी आग्रही असल्याची माहिती
Maharashtra News : मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर, २०२५ चा कार्यक्रम
सकाळी १०.३० वा.
मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली भारतीय सागरी सप्ताह (IMW) निमित्त मा. केंद्रीय मंत्री, बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग यांच्यासमवेत आंतर-एजन्सी समन्वय बैठक.
स्थळ :- मंत्रिमंडळ सभागृह, सातवा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई.
सकाळी ११.०० वा.
हरित दिपावली संकल्प अभियान-२०२५ शपथ समारंभ.
स्थळ :- त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय, मुंबई.
दुपारी १२.०० वा.
राज्य मंत्रिमंडळ बैठक.
स्थळ :- मंत्रिमंडळ सभागृह, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई.
दुपारी ०२.३० वा.
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प भूमिपूजन समारंभ.
स्थळ :- कामराज नगर, ६० फुटी रोड सर्व्हिस रोडच्या बाजूला, घाटकोपर (पू.), मुंबई.
Shahapur News : शहापूर आसनगाव परिसरात लागलेली आग अजूनही आटोक्यात आलेली नाही. 20 तास उलटून गेले आहेत मात्र प्लास्टिक कंपनीला लागलेली आग अजूनही सुरुच आहे. भिवंडी आणि कल्याण येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...