Maharashtra Live blog Updates: लक्ष्मण हाके वांगदरीत दाखल, भरत कराड यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

मुकेश चव्हाण Last Updated: 13 Sep 2025 04:01 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मे 2023 मध्ये मेईतेई आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा असेल. या दौऱ्यात...More

साताऱ्यात पुन्हा पावसाची दमदार बॅटिंग; जनजीवन विस्कळीत 

सातारा : जिल्ह्यात पावसाची पुन्हा एकदा दमदार बॅटिंग सुरू झाली आहे. शहर परिसरासह ग्रामीण भागात पावसाच्या सरी धोधो कोसळत असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रस्त्यांवर पाणी साचलं आहे, तर शेतकऱ्यांची खरीप हंगामातील काढणीची कामं अडथळ्यात आली आहेत. कोसळधार पावसाचा खेळ जिल्ह्यात सुरूच असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.