- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग; 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचे आरक्षण घोषित
Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog Updates: नवनिर्वातीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ आज राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सीपी राधाकृष्णन यांना शपथ देतील. या सोहळ्याला कर्नाटकचे राज्यपाल...More
सोलापूर ब्रेकिंग :
- दक्षिण सोलापूर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरून वाहू लागले
- होटगी तलावातील मासे पाण्यासह रस्त्यावर आल्याने स्थानिक नागरिक मासेमारीचा आनंद घेतला
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर पाणी आलेय
- होटगी तलावात मोठ्याप्रमाणात मासे असल्याने पाण्यासोबत ते देखील रस्त्यावर आले
- त्यामुळे या पाण्यात चिमुकल्यासह मोठ्यांची मासे पकडण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने केलं उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन
बैठकीत काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
पंतप्रधानांनी आपल्या भावनांशी खेळ केला, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणाले आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट खेळता?
14 तारखेला आक्रमकपणे आंदोलन करा, महिला आघाडीने सिंदूर पंतप्रधानांना पाठवा
जिल्हा परिषद, नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला आतापासून लागा, निवडणुका कधीही लागू शकतात
स्थानिक पातळीवर आपण किती जागांवर लढू शकतो किंवा आपली किती ताकद आहे हे आधीच ठरवा, आघाडी कीं युती?संदर्भात स्थानिक पातळीवरील आपलं मत मांडा
स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा उशीर न करता लवकर निर्णय घ्या!
मतदार याद्या आतापासून तपासा आणि त्यावर त्याचवेळी तक्रारी करा, मतदार यादीतील घोळांकडे विशेष लक्ष द्या
गल्लीपासून दिल्लीपर्यंत +नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणा
परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस
परभणी जिल्ह्यात दोन दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावलीय दुपारपासून परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये पावसाच्या संततधारेला सुरुवात झाली होती मात्र मागच्या एक तासापासून पावसाचा जोर वाढला आहे परभणीसह जिल्हाभरामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे.या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचायला सुरूवात झाली आहे.तर दुसरीकडे खरीप पिकांना या पावसामुळे मोठा धोका निर्माण होणारा आहे.ज्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
लोकांची सेवा करा...लोकांच्या समस्या जाणून घ्या....तर मतदान मिळेल
सेवा पंधरवाडा कार्यशाळेत उपेंद्र कोठेकरांनी केलं भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
Anchor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा राज्यासह देशभरात साजरा करण्यात येणार आहे. 17 सप्टेंबरपासून ते 2 आक्टोंबर महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त हा पंधरवाडा सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्त भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. भंडारा इथं भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा पार पडली. यात सर्वांना लोकांपर्यंत पोहचा...घरोघरी जा... त्यांच्या समस्या जाणून घ्या... त्यांची काम करा...हे केल्यास भविष्यात होणाऱ्या निवडणुकीतही याचा मतदाररूपी लाभ मिळेल, असं मार्गदर्शन भाजपचे विदर्भ संघटक मंत्री उपेंद्र कोठेकर यांनी केलं.
Byte : उपेंद्र कोठेकर (विदर्भ संघटन मंत्री, भाजप)
पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Ac - बीडच्या अंबाजोगाईत पत्नीने पतीला लाथा बुक्क्यांनी गंभीर मारहाण केली यात घाव वर्मी लागल्याने पतीचा मृत्यू झालाय. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कैलास सरवदे असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे.कैलास सरवदे याचे सात वर्षांपूर्वी माया नावाच्या महिलेशी लग्न झाले होते.मायाचे हे दुसरे लग्न होते.
कैलास हा नेहमी दारू प्यायचा त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत असायचे.अशाच वादातून मायाने कैलासला मारहाण केली या तो बेशुद्ध पडला त्याला नातेवाईकांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे समोर आले याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sanjay Raut : नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. नाशिक शहरातील विविध प्रश्न आणि अवैध धंदे, शहरातील कायदा सुव्यवस्थेवर मनसे आणि ठाकरे गटाने काढलेल्या मोर्चानंतर पोलीस आयुक्तांनी संजय राऊत यांची भेट घेल्याने चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेते आणि माजी नगरसेवक उद्धव निमसे हे राहुल धोत्रे खून प्रकरणात फरार असल्याने राऊतांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मोर्चानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे.
Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाच कामकाज पुन्हा एकदा सुरू झालं असून वकील तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कोर्टात सोडण्यास सुरुवात झाली आहे. बॉम्बच्या धमकीनंतर कोर्टाचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी संपूर्ण उच्च न्यायालयाची कसून तपासणी केली आणि संशयास्पद काहीही न आढळल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेने गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन स्थळांवर समुद्रातील ओहोटीची रेषा दर्शवणारी 70 मार्गदर्शक तरंगचिन्हे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. लिटमस मरीन इन्नोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला या कामासाठी २ कोटी २२ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. गिरगाव चौपाटीवर प्रायोगिक तत्वावर यंत्रणा बसवण्यात आली असून, पुढील टप्प्यात ४३ ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. यामध्ये मूरिंग यंत्रणा आणि सोलर दिवे बसवले जाणार आहेत, ज्याचा फायदा भाविकांना मूर्ती विसर्जनावेळी होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग
महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींचे आरक्षण जाहीर
ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जाहीर
३४ जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचे आरक्षण घोषित
पुण्यात येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोड येथे कंपनी कर्मचाऱ्यावर हल्ला
शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याच सीसीटीव्ही समोर
हल्तोल्यामध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून येरवडा येथील खाजगी रुग्णालयांमध्ये त्याचा उपचार सुरू आहेत
या परिसरात अनेकवेळा या घटना घडत असल्याचा दावा
अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत
राज्य सरकारने जाहीर केलेला मराठा आरक्षणा संदर्भातील जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली... मराठा समाजाला आरक्षण मिळावे यास आमचा देखील पाठिंबा असून मात्र हे आरक्षण ओबीसी प्रवर्गातून देण्यात येऊ नये... सध्याच्या आरक्षणामुळे आम्हाला पूर्णपणे न्याय मिळत नसून मराठा समाज आमच्यात शिरकाव करण्यासाठी प्रयत्न करीत आहे... असा आरोप यावेळी महात्मा फुले समता परिषदेने केला असून हा जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महात्मा फुले समता परिषदेने दिला आहे
मंत्रालया समोरून जाणारी ६५० mm ची पाईपलाईन फुटली आहे…
अशात, मंत्रालयासमोरचा रस्ता खचल्याचं पहायला मिळत आहे
पाईपलाईन जेव्हा फुटली तेव्हा या संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळालं
सध्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे.
या पाईपलाईनच्या माध्यमातून कफ परेड आंबेडकर नगर इथल्या झोपडपट्ट्यांना पाणीपुरवठा केला जातो
पाईपलाईन फुटल्यामुळे पुढील काही तास कफ परेड आंबेडकर नगर या भागातल्या आसपासच्या परिसरामध्ये पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती दिली जातेय
सोबतच, संपूर्ण रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे…
मंत्रालया समोरून जाणारी ६५० mm ची पाईपलाईन फुटली आहे…
अशात, मंत्रालयासमोरचा रस्ता खचल्याचं पहायला मिळत आहे
पाईपलाईन जेव्हा फुटली तेव्हा या संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळालं
सध्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे.
या पाईपलाईनच्या माध्यमातून कफ परेड आंबेडकर नगर इथल्या झोपडपट्ट्यांना पाणीपुरवठा केला जातो
पाईपलाईन फुटल्यामुळे पुढील काही तास कफ परेड आंबेडकर नगर या भागातल्या आसपासच्या परिसरामध्ये पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती दिली जातेय
सोबतच, संपूर्ण रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे…
राऊतांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा मराठी दांडिया
विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये मराठी दांडियाचे आयोजन
ऑपरेशन सिंदूरवर आधारित मराठी दांडिया
२७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान मराठी दांडियाचे आयोजन
याच ठिकाणी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत आहेत आमदार
भाजपकडून लालबाग परळनंतर विक्रोळीत उत्सवाचे आयोजन
ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील आमदार खासदारांची आज 12 वाजता मातोश्रीवर बैठक...
राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटीनंतर आज मातोश्रीवर बैठक...
मुंबईतील आमदार खासदारांची बैठक पार पडल्यानंतर राज्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक मातोश्रीवर पार पडणार आहे....
राज उद्धव ठाकरे भेटीनंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच बैठकांचे सत्र सुरु
उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काय मार्गदर्शन करणार?
नांदेडच्या कंधार तालुक्यातील कौठा परिसरात एकाच दिवशी तब्बल 275 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसान ग्रस्त कौठा गावातील शेतकऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग 161 वर रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी अशी आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलनामुळे कंधार तालुक्यातील वाहतूक आज बराच काळ विस्कळीत झाली होती.
नांदेडच्या नायगांव तालुक्यातील भोपाळा गावातील महिलांनी कर्ज मंजुरी प्रकरणातील लाचखोरी उघडकीस आणलीय. महिला बचत गटांना आपल्या गटासाठी बँक कर्ज मंजूर करून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेत सी आर पी (Community Resource Person) कडून आर्थिक लाचेची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केलाय. या प्रकरणी महिलांनी गटविकास अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. कर्ज मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या या दोषी सी.आर.पी. वर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी महिलांनी केलीय.
मुंबईत पाच ते सहा दिवसाचा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पश्चिम उपनगरात जोरदार पावसाचा सुरुवात
पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव,विलेपार्ले परिसरात मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे
मागील दोन ते तीन दिवसापासून पश्चिम उपनगरात कडक ऊन होता, त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले मुंबईकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे
तर जर असच जोरदार पाऊस सुरू राहिला तर पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात होणार आहे....
माधुरी हत्तीण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
माधुरी हत्तीण प्रकरणात हत्तिणीला वनतारात पाठवणारा न्यायालयाचा आदेश बदलण्यात यावा , यासाठी राज्य सरकारकडून अर्ज केला जाणार होता
वनतराने देखील याबाबत होकार देण्यास सहमती दर्शवली होती
त्याविषयी आज सर्वोच न्यायालयात सुनावणी आहे
कोल्हापूरकरांनो जर तुम्ही रोटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमन जातीची श्वान पाळली असतील तर तुमच्यासाठी महापालिकेने नवे नियम बनवले आहेत...वरील जातीच्या श्वानांचा स्वभाव हा अतिहिंस्त्र असतो... त्यामुळे त्यांना फिरवताना काही नियम महापालिकेने बनवले आहेत.. ते नियम पाळले नाही तर थेट श्वान जप्त करून मालकावर कारवाई केली जाणार आहे... तशी जाहिरातच महापालिकेने काढली आहे... फिरवताना श्वानांना चेन किंवा बेल्ट लावणे, तोंडाला मझल लावणे...त्या मझलचा श्वानाला त्रास होणार नाही याची दक्षता घेणे...असे आदेश कोल्हापूर महानगरपालिकेने काढले आहेत... कोल्हापुरातील श्वानप्रेमी सागर पाटील यांच्याकडे तीन डॉबरमन जातीची श्वान आहेत...त्यांची काळजी कशी घेतली जाते? खरंच डॉबरमन, पिटबुल, जर्मन शेफर्ड रॉटविलर हे श्वान आक्रमक आहेत का?
नवी मुंबईतील BMTC कर्मचाऱ्यांना १० लाख रुपयांचा आर्थिक मोबदला मिळणार
तब्बल ४१ वर्षानंतर बीएमटीसी कर्मचाऱ्यांना मोबदला मिळणार
अंतिमत: ६३१ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा मोबदला मंजुर
नगरविकास विभागाकडून सिडकोच्या मोबदला प्रस्तावाला मंजुरी
काही दिवसातच आर्थिक मोबदल्याच्या चेकचे वाटप होणार
आमदार विक्रांत पाटील यांची माहिती
१९८४ पासून बससेवा बंद झाल्याने कर्मचारी झाले होते निराधार
विक्रांत पाटील यांनी सिडको तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांशी केला होता पाठपुरावा
सिडकोच्या माध्यमातून चेकचे वाटप होणार
ठाकरेंच्या शिवसेनेला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय. नागेंद्र राठोड यांनी दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय. आपलं राजीनामा पत्र त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. मात्र राजीनामा देण्यामागची कारणं या पत्रात नमूद केलेली नाहीत. विधानसभा निवडणुकीत राठोड यांच्यावर उद्धव ठाकरेंनी महत्वाची जबाबदारी टाकली होती. शिवाय शिववाहतूक सेनेचे प्रमुख संघटक म्हणून देखील ते काम पहात होते. त्याचाही त्यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेना ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय. नागेंद्र राठोड यांनी दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय. आपलं राजीनामा पत्र त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. मात्र राजीनामा देण्यामागची कारणं या पत्रात नमूद केलेली नाहीत. विधानसभा निवडणुकीत राठोड यांच्यावर उद्धव ठाकरेंनी महत्वाची जबाबदारी टाकली होती. शिवाय शिववाहतूक सेनेचे प्रमुख संघटक म्हणून देखील ते काम पहात होते. त्याचाही त्यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेना ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे.
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्याला अजित पवार यांची अनुपस्थिती
एनडीए च्या घटकपक्षांच्या प्रमुखांना उपराष्ट्रपतींच्या शपथविधीचे आमंत्रण
तरीही अजित पवार यांची अनुपस्थितीत
दुसरीकडे एकनाथ शिंदे घटकपक्षाचे प्रमुख म्हणून दिल्लीत दाखल
मात्र, उपराष्ट्रपतींच्या शपथ विधीला अजित पवार यांची अनुपस्थिती
Beed News : गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर बीड पोलिसांनी आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली आहे. शहरात विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे १५ डीजेची वाहने जप्त करण्यात आली. या वाहनांवर एकूण पाच लाख चार हजार रुपयांचा दंड आकारण्यात आलाय.
सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार गणेश विसर्जनावेळी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी बीड पोलिसांनी मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार बीड शहर, पेठ बीड आणि शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत अनेक डीजे वाहने मोठ्या आवाजात वाजत होती. या प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेल्या 15 वाहनांचा अहवाल उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आल्यानंतर आरटीओने वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
एमएच २३-५२०९ क्रमांकाच्या वाहनावर सर्वाधिक ५२ हजार रुपये, तर एमएच २३ एयु ६३५९ या वाहनाला १० हजार रुपये दंड आकारला. ही कारवाई पोलिस विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड यांच्या संयुक्त प्रयत्नातून झाली. अशी कारवाई भविष्यातही सुरू राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी शांततेत आणि नियमांचे पालन करून सण साजरे करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ताहाराबाद - मुल्हेर रस्त्यावर अंतापूर शिवारात मजुरांना घेवून जाणारे पिक अप वाहन व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तान्हाजी सोनवणे, शंकर आबीस, आशा सोनवणे हे तीन मजूर ठार झाले आहे तर 10 ते 12 मजूर जखमी झाले झाले आहेत.काल रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.आयशर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली आहे.स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य राबवून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मृत आणि जखमी सटाणा तालुक्यातील हनुमंत पाडा, बोरदैवत व असेरा परिसरातील रहिवाशी आहेत..
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळमध्ये चोरीची घटना घडली. तीन ते चार चोरट्यांनी सीसीटीव्हीवर स्प्रे मारून चक्क स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीनच चोरून नेले. त्यात १६ लाख ७७हजार १०० रुपयांची रक्कम होती. वेरूळ येथील एका हॉटेलसमोर स्टेट बँकेचे एटीएम होते. ११ सप्टेंबर रोजी रात्री १२.१० वाजता एटीएम मशीनमध्ये शेवटचा व्यवहार झाला होता. त्या वेळी मशीनमध्ये एकूण १६ लाख ७७ हजार १०० रुपये शिल्लक होते. मशीन ठेवलेल्या ठिकाणी लोखंडी नटबोल्ट उखडलेले दिसले. त्यामुळे मशीन चोरीला गेल्याची खात्री पटली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडली मुंबई भाजपची महत्वपूर्ण बैठक
मुंबई महापालिकेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'वर्षा' बंगल्यावर बैठक संपन्न
मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम होते उपस्थित
मुंबई महापालिकेच्या संदर्भात भाजपकडून सातत्याने चाचपणी
येत्या मंगळवारी मुंबई भाजपकडून विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडली मुंबई भाजपची महत्वपूर्ण बैठक
मुंबई महापालिकेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'वर्षा' बंगल्यावर बैठक संपन्न
मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम होते उपस्थित
मुंबई महापालिकेच्या संदर्भात भाजपकडून सातत्याने चाचपणी
येत्या मंगळवारी मुंबई भाजपकडून विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन
मराठवाड्यात यंदा अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. जून महिन्यापासून आत्तापर्यंत तब्बल अतिवृष्टीमुळे 98 हजार 627 शेतकरी बाधित झाले आहे. हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईसाठी विभागीय प्रशासनाने शासनाकडे तब्बल 66 कोटी 40 लाख 99 हजार 105 रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसं पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाने सरकारला पाठवलं आहे. त्यातील 14 कोटी 38 लाख 63 हजार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अजूनही 52 कोटी 2 लाख 36 हजार 105 रुपयांच्या निधीची गरज आहे. तर शासनाने लवकरात लवकर निधी देऊन नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे.
हिंगोली
बाधित शेतकरी : 3642
निधीची मागणी : 378.724 (लाखात)
मंजूर निधी : 360.45 (लाखात)
नांदेड
बाधित शेतकरी : 7498
निधीची मागणी : 1076.19135 (लाखात)
मंजूर निधी : 1076.19 (लाखात)
बीड
बाधित शेतकरी : 103
निधीची मागणी : 1.99100 (लाखात)
मंजूर निधी : 1.99 (लाखात)
धाराशिव
बाधित शेतकरी : 266
निधीची मागणी : 22.02800 (लाखात)
मंजूर निधी : अप्राप्त
परभणी
बाधित शेतकरी : 87718
निधीची मागणी : 5162.0567 (लाखात)
मंजूर निधी : अप्राप्त
भाजपचे खासदार उज्वल निकम यांना विजय पालांडेच्या विरोधातील हत्या प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून हटवण्याची मागणी
स्वतः विजय पालांडेचा सत्र न्यायालयात अर्ज
खटल्याचा निकाल आपल्याबाजून यावा म्हणून निकम त्यांच्या प्रभावाचा आणि ताकदीचा वापर करतील तसेच दोषसिद्धीसाठी ते कोणत्याही थराला जातील याचिकेत पालांडेचा आरोप
निकम यांच्याकडे राज्यातील आणि देशातील सगळ्या यंत्रणांच बळ असून सत्ताधारी भाजप सरकारचा त्यांना ठाम पाठिंबा आहे
खासदार म्हणून उज्वल निकम हे खाजगी प्रकरण हाताळू शकतात मात्र खासदार म्हणून नियुक्तीमुळे त्यांच्या विशेष सरकारी पदाच्या नियुक्तीवर परिणाम झाला आहे
सरकारी पक्षाला उत्तर देण्याच्या न्यायालयाच्या सूचना
पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला होणार
व्यावसायिक अरुणकुमार टिक्कू आणि चित्रपट निर्माता करणकुमार कक्कर यांच्या हत्येचा विजय पालांडेवर आरोप
Dharashiv News : हैदराबाद गॅझेट सरकारने मंजूर केल्यानंतर आता कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. धाराशिव मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाला असून आता लवकरच प्रत्यक्ष प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहेत. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रस्ताव तीन स्तरीय पडताळणीतून पूर्ण होणार आहे. ग्राम महसूल समितीने तयार केलेले प्रस्ताव पुढे मुशावळ समितीकडेही जाणार आहे आणि त्यांच्या मंजुरीनंतर प्रमाणपत्र वाटप करण्यासाठीची प्रक्रिया पुढे सरकणार आहे.
अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले
स्थानकाचे नाव अहिल्यानगर रेल्वे स्थानक केल्याची अधिसूचना राज्य सरकारकडून जारी
गृह मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्रानंतर अधिसूचना जारी
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गवरील पाणी पूर्णपणे ओसरलं
गुरुवारी सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे याचं महामार्गवर पूर्णपणे पाणी साचले होते
काल सकाळी या राष्ट्रीय महामार्गवर अक्षरशः नदी प्रमाणे पाणी वाहत होते
ज्याचा परिणाम आपल्याला वाहतुकीवर देखील झालेला पाहायला मिळाला
लांबच्या लांब वाहणांच्या रांगा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर काल होत्या
मात्र 24 तासाच्या आत परिस्थिती पूर्वपदावर आली आहे
काल पहाटे पासूनच पावसाने विश्रांती घेतली होती
त्यामुळे संकटात अधिकची भर न पडल्याने सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरु झालंय
सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहू लागले
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुबदुबी तलाव झाले ओव्हर फ्लो
दुबदुबी तलाव ओव्हेर फ्लो झाल्याने शिरवळ,जैनपूर या भागातील शेतीत शिरले पाणी
मुसळधार पावसाचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीला बसला फटका, पिक पूर्णतः गेली पाण्याखाली..
सोलापुरातील कुर्डू गावकऱ्यांनी आज बंदची हाक दिली आहे. कुर्डू गावाची तुलना बीडच्या प्रकरणाशी करून गावाची बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज कुर्डू बंदची हाक देण्यात आली आहे. आज संपूर्ण गाव एक मुखाने बंद पाळणार आहे. बेकायदा मुरूम उपसा प्रकरणी कुर्डू गावात कारवाईला आलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी व्हिडीओ कॉलवर धमकावलं होतं. यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डूची परिस्थिती बीडपेक्षा भयानक असून गाव दहशतीत असल्याचं म्हटलं. मात्र आपल्या गावाला बीडची उपमा दिल्याने गावकरी एकत्र आले असून त्यांनी आज गाव बंदची हाक दिलीय.
मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये कुठेही सरकरट शब्द नसून पुरावे असणाऱ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. तसंच ओबीसी समाजानं भूमिका मांडण्याऐवजी आधी जीआर नीट वाचावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्यात. तसचं हे सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहानानंतर ओबीसी नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येणार हे पहावं लागणार आहे...
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग; 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचे आरक्षण घोषित