- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातल्या स्थानिक राजकारणातला चर्चेतला विषय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात...More
भाजपला दूर ठेवत कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र
चंदगड नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोमिलन
मंत्री हसन मुश्रीफ यांनी कुपेकर गट आणि राजेश पाटील यांना आणलं एकत्र
विधानसभा निवडणुकीत नंदाताई बाभुळकर आणि राजेश पाटील होते एकमेकांच्या विरोधात
राजर्षी शाहू विकास आघाडी स्थापन, काँग्रेस देखील सोबत येणार असल्याचा दावा
बीड: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबतीत हेमंत क्षीरसागर यांनीच स्पष्टता दिलीय. आजपर्यंतच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत राहिलेले त्यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांचा भाजपा प्रवेश निश्चित होतोय. विकासाचा दृष्टिकोन ठेवून भाजपा बरोबर जात असल्याचं क्षीरसागर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. आतापर्यंत बीड विधानसभा मतदार संघात हेमंत क्षीरसागर यांची संदीप क्षीरसागर यांना साथ राहिली. मात्र आता सख्ख्या भावाकडूनच संदीप क्षीरसागर यांना राजकीय आव्हान मिळणार असे चित्र दिसत आहे.
सातत्याने वादग्रस्त ठरलेले आमदार अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी
संजय राऊत यांना आज मिळणार डिस्चार्ज
संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्यामुळे डिस्चार्ज
संजय राऊत यांना मुलुंड मध्ये फोर्टीज रुग्णालयात सुरू होते उपचार
गेले चार दिवस संजय राऊत यांच्यावर मुलुंड मधील फोटोज हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार
बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहर बंद ठेवण्यात आले आहे. अडीच कोटी रुपयांची सुपारी देऊन जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला गेला प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन यातील मुख्य सूत्रधारा विरोधात कारवाई करावी अशी मागणी आजच्या बंद मधून केली जात आहे. मराठा समाजाने याबाबतचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले आहे. जरांगे पाटील यांच्या जीवितास काही झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असे देखील या निवेदनात नमूद करण्यात आल आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर शिरूर येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
बीड: मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड यांच्या माध्यमातून 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. शासकीय अंगरक्षक संतोष जाधव यांच्यासमोर ही ऑफर दिल्याचं यात बोललं जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यातील आरोपी दादा गरुड याच्या दाव्याचा हा व्हिडीओ आहे. या कथीत व्हिडिओची एबीपी माझा पुष्टी करत नाही.
कोकणातील राजकारणात आता बच्चू कडू आणि प्रहार जनशक्ती पार्टीची होणार एंट्री
प्रहार जनशक्ती पार्टी लढवणार रत्नागिरी नगरपरिषदची निवडणूक
5 ते 6 जागांवर प्रहार जनशक्ती उमेदवार उभे करणार
बच्चू कडू यांचे 'एबीपी माझा'ला माहिती
- राज्यातील १७० तहसीलदारांचे पदोन्नती होणार
- १७० तहसीलदार उपजिल्हाधिकारी होणार
- तर ८५ नायब तहसीलदार पदोन्नती होऊन तहसीलदार होणार
- तर १०० जणांना नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती होणार
सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याची आठवण करून देत आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देत सुनील तटकरेंवर आग पाखड केलीय. कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील आम्ही पाहिलाय असं म्हणत त्यांनी सुनील तटकरे यांच्या होम ग्राउंड वरून तटकरेंच्या जुन्या आठवणीं बाहेर काढत तटकरेंवर आग पाखड केलीय. शिवाय महाराष्ट्रातील परिस्थिती भयानक असून राज्यातील समोर येत असलेले घोटाळे पाहता हे घोटाळे निवडणूक पूर्वी कसे समोर आले याचा अर्थ राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा त्यांच्याच नेत्यांनी घात केल्याचा आरोप आमदार दळवी यांनी सुनील तटकरे यांचं नाव न घेता केला आहे. पार्थ पवार आणि धनंजय मुंडे प्रकरणी दळवींनी केलेलं हे आरोप गंभीर आहेत.शिवाय मंत्री भरत गोगावले हे मंत्री असल्यामुळे त्यांना काही बंधने आहेत त्यामुळे त्यांना जास्त बोलता येत नाही. त्यामुळे मी खरं बोलतो आहे. रायगडच्या कोलाड मधील एका पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रसंगी आमदार दळवी यांनी हे वक्तव्य करत तटकरेंवर टीकेची तोफ डागलीय.
सिंधुदुर्ग : तळकोकणात सध्या ओंकार हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यात ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण झाली तसेच सुतळी बॉम्ब त्यांच्यावर फेकण्यात आले. मात्र आता ओंकार हत्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ओंकार हत्तीची शेतात अचानक एन्ट्री होते. अचानक आलेल्या ओंकार हत्तीच्या एन्ट्री मुळे म्हशींनी जीव वाचवण्यासाठी अक्षरशः पळ काढला. म्हशीचा कळप घाबरून पळत सुटतो आणि काही क्षणातच सगळं दृश्य गायब होतं. तर दुसरीकडे घाटमाथ्यावर गेलेल्या हत्तींचा कळप दोडामार्ग मधील तिलारी खोऱ्यात दाखल झाला आहे. या कळपात एक मोठी मादी हत्ती, एक लहान मादी आणि दोन पिल्लांचा समावेश आहे. हत्तींच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यंदा पावसाचा हंगाम लांबल्याने भात कापणी आधीच उशिरा सुरू झाली. हत्तींचा त्रास नसल्याने शेतकऱ्यांनी उरलेली शेती कामे निर्विघ्नपणे पूर्ण करण्याची अपेक्षा धरली. परंतु आता या वन्य पाहुण्यांच्या आगमनाने शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकटात उभ राहिले आहे.
भोरच्या आमदारांच्या भावाने कला केंद्र केलेल्या गोळीबार प्रकरणात,शस्त्र परवाना रद्द
-परवानाधारी शस्त्राचा गैरवापर केला जात असल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी 2 परवानाधारी पिस्तूलाचा परवाना केला रद्द
-दोन्ही परवानाधारकांनी इतर व्यक्तींच्या जीवास व सुरक्षितेच धोका निर्माण होईल असे कृत्य करून परवाना दिलेल्या शास्त्राचा गैरवापर केला त्यामुळे हे शस्त्र रद्द करण्यात आले आहेत
-त्यामधील एक पिस्तूल हे यवत जवळील चौफुला येथील अंबिका कला केंद्रात भोरचे आमदार शंकर मांडेकर यांची बंधू बाळासाहेब मांडेकर यांनी 21 जुलै च्या रात्री गणपत जगताप यांच्या परवानाधारी पिस्तूलातून हवेत गोळीबार केला होता
-त्यासंदर्भात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता
-याच गुन्ह्याचा आधार घेत परवानाधारी पिस्तुलाचा गैरवापर झाल्याने जगताप याचं आर्म लायसन रद्द करण्याचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिला होता आणि तो शस्त्र परवाना अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी रद्द केला आहे
भोरच्या आमदारांच्या भावाने कला केंद्र केलेल्या गोळीबार प्रकरणात,शस्त्र परवाना रद्द
-परवानाधारी शस्त्राचा गैरवापर केला जात असल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी 2 परवानाधारी पिस्तूलाचा परवाना केला रद्द
-दोन्ही परवानाधारकांनी इतर व्यक्तींच्या जीवास व सुरक्षितेच धोका निर्माण होईल असे कृत्य करून परवाना दिलेल्या शास्त्राचा गैरवापर केला त्यामुळे हे शस्त्र रद्द करण्यात आले आहेत
-त्यामधील एक पिस्तूल हे यवत जवळील चौफुला येथील अंबिका कला केंद्रात भोरचे आमदार शंकर मांडेकर यांची बंधू बाळासाहेब मांडेकर यांनी 21 जुलै च्या रात्री गणपत जगताप यांच्या परवानाधारी पिस्तूलातून हवेत गोळीबार केला होता
-त्यासंदर्भात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता
-याच गुन्ह्याचा आधार घेत परवानाधारी पिस्तुलाचा गैरवापर झाल्याने जगताप याचं आर्म लायसन रद्द करण्याचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिला होता आणि तो शस्त्र परवाना अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी रद्द केला आहे
नाशिक मध्ये तापमानाचा पारा घसरला
- नाशिकचे तापमान 10.8 तर निफाड मध्ये पारा 9.5 अंशावर
- 24 तासात नाशिक आणि निफाड चा पारा 2 अंशांनी घसरला
- नाशिकचे तपमान 12. 5 अंशावरून 10.8 तर निफाड चे तपमान 11 अंश सेल्सिअस वरून 9.5अंशावर
- अचानक पारा घसरल्याने निफाड मध्ये ठीक ठिकाणी शेकोटी पेटायला लागल्या
- तर गुलाबी थंडीचा आनंद घेत विद्यार्थी शाळा महाविद्यालयात जात आहेत
उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम असून आंबेगाव तालुक्यातील थोरादळे येथे एक साथ तीन बिबटे फिरताना पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागाने तातडीने या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय गेली काही दिवसापासून बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता नागरिकांचं भर दिवसा घराबाहेर पडणं अवघड झालय त्यामुळे या बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठ आव्हान वनविभागा पुढे असणार आहे.
Weather update: राज्यात किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. सिंधुदुर्गात आज १४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. गेले काही दिवस अवकाळीचा मारा होत आहे. नोव्हेंबर महिन्यात देखील अनेक भागात पाऊस कोसळला. मात्र आता किमान तापमानात घट व्हायला सुरुवात झाली आहे. काही भागात धुक्याने देखील हजेरी लावली आहे. कोकण पट्ट्यात किमान तापमानात फरक पडत आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात अजून घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा, काजू पिकासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
बुलढाणा : सततचा कौटुंबिक वाद व अनैतिक संबंधाच्या संशयावरून विकोपाला गेलेल्या भांडणातून चिखली शहर युवक काँग्रेस अध्यक्षाने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्नीने समयसुचकता दाखवत पेटलेली साडी पाण्याने भिजवून आपला जीव वाचवला. याप्रकरणी पत्नी नमिता काकडे यांनी चिखली शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेला विशाल काकडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. काल विशाल आणि पत्नी नमिता यांच्यात सुरुवातीला कौटुंबिक कारणातून वाद झालेत तितक्यात विशाल याला अज्ञात महिलेचा फोन आला यावेळी पत्नीने कुणाचा फोन आहे असं विचारलं असता चिडून विशालने पत्नीला बेडरूम मध्ये नेले व अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले मात्र नमिताने समाज सुचकता दाखवत तात्काळ पेटलेली साडी पाण्याने भिजवली व आपला जीव वाचवला याप्रकरणी पोलिसांनी विशाल सह सासू व नंदीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Pune : पुण्यात गारठा वाढला ;रात्रीच तापमान १४ अंशावर, ऑक्टोंबर हिटपासून पुणेकरांना दिलासा.
हळू हळू मुंबईचा पारा घसरत असून थंडीची चाहूल लागण्यास सुरवात झाली आहे, शनिवारी पहाटे मुंबईच किमान तापमान २१.२ अंश इतकं होत तेच रविवारी पहाटे १८ अंशांपर्यंत खाली घसरलं, पारा अचानक तीन अंशांनी खाली घसरल्याने पहाटेच्या वेळी का होईना गारवा जाणवतोय,
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात लिपिक म्हणून काम करताना केलेल्या गैरव्यवहारा प्रकरणी एका माजी कर्मचार्याला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे
प्रथमेश पवार असे या लिपिकाचे नाव असून तो कल्याण येथील खडकपाडा परिसरात राहतो
प्रथमेशने परिवहन विभागाच्या आयडी, युझरनंबर आणि पासवर्डचा गैरवापर करून आयकर विभागाची रक्कम १४ विविध ट्रान्जेक्शन करून गैरव्यवहार केला
हा गैरव्यवहार उजेडात आल्यानंतर नागपाडा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मागील दीड वर्षापासून प्रथमेश फरार होता
या प्रकरणी नागपाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात लिपिक म्हणून काम करताना केलेल्या गैरव्यवहारा प्रकरणी एका माजी कर्मचार्याला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे
प्रथमेश पवार असे या लिपिकाचे नाव असून तो कल्याण येथील खडकपाडा परिसरात राहतो
प्रथमेशने परिवहन विभागाच्या आयडी, युझरनंबर आणि पासवर्डचा गैरवापर करून आयकर विभागाची रक्कम १४ विविध ट्रान्जेक्शन करून गैरव्यवहार केला
हा गैरव्यवहार उजेडात आल्यानंतर नागपाडा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मागील दीड वर्षापासून प्रथमेश फरार होता
या प्रकरणी नागपाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.
Kandivali : ऐन पालिका निवडणुकी पूर्वी मुंबईच्या कांदिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचा मोठा संख्यामध्ये पुरुष आणि महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश केला आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते सर्व ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करण्यात आले आहे. यावेळी आमचं पक्ष स्ट्रॉंग असल्यामुळे ठाकरे गटात खिंडार पडून आमच्याकडे त्यांच्या मोठा संख्या मध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकारी पक्ष प्रवेश करत आहेत. त्यासोबत मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकणार, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलाय.
पवई येथील 17 अल्पवयीन मुलांच्या अपहरण प्रकरणाचा तपास क्राइम ब्रॅंचकडून सुरू असून, क्राइम ब्रँचला फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) चा महत्त्वाचा अहवाल येण्याची वाट पाहिली जात आहे.
युनिट 2 आणि 8 यांनी मोबाईल डेटा, ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग्ज, डिजिटल उपकरणे आणि इतर जप्त साहित्य तपासासाठी FSL कडे पाठवले आहे.
विलंब टाळण्यासाठी पोलिसांनी FSL अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क करत असून, या तपासणीला प्राधान्य देण्यासाठी न्यायालयात अर्जही दाखल केला आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, FSL अहवालाच्या निष्कर्षांवर या प्रकरणातील पुढील कायदेशीर पावले अवलंबून असून त्यावरून आरोपपत्र तसेच न्यायालयीन कार्यवाहीचा पुढील मार्ग निश्चित होणार आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी होऊन झुडपात आडोशाला बसून राहिलेल्या बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यामध्ये जेरबंद केलं. या बिबट्याला पुणे येथे अधिक उपचारांसाठी पाठविण्यात येणार असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं. ही घटना लांजा तालुक्यातील केळंबे येथे घडली. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार केळंबे येथील सुधा-विष्णूनगर येथे जखमी अवस्थेत बिबट्या मुख्य रस्त्यापासून १०० मीटर अंतरावर एका झुडपात लपून बसलेला होता. हा बिबट्या मादी जातीचा असून, दोन वर्षांचा आहे. त्याच्या मागील दोन पायांना गंभीर दुखापत झालेली होती. त्यामुळे त्याला चालता येत नव्हतं. जखमी अवस्थेतील या बिबट्यावर सुरुवातीला जाळी फेकण्यात आली. त्यानंतर बिबट्याला पकडून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलं.
युतीच्या घोषणे आधीच खेडमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारा ठरल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता.
नव्याने भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकर यांच्याकडून त्यांची पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्ष म्हणून उल्लेख असलेले फोटो वायरल. तर शिंदेच्या शिवसेनेकडून माधवी बुटाला खेडचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार.........
महायुतीमधील दोन महत्वाच्या पक्षांकडून वेगवेगळे उमेदवार समोर आल्यामुळे राजकीय गोटात चर्चांना उधाण.
स्वतंत्र उमेदवारांची नावे समोर आल्यामुळे खेडमध्ये महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता.
वैभव खेडेकर यांनी पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्ष म्हणून उल्लेख करत व्हॉटस् अँप स्टेट्स केले अपडेट.....तर तिकडे शिंदेच्या शिवसेनेच्या माधवी बुटाला यांचे बॅनर देखील झाले वायरल.खेड मध्ये योगेश कदम विरूद्ध भाजपा संघर्ष वाढण्याची चिन्हे
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी