- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Breaking LIVE News Updates: देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Live Blog Updates 1 September 2025 : राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली. मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या...More
वसई : लालबागचा राजा गणेशोत्सव पंडालातील व्हीआयपी आणि सामान्य दर्शन या वेगळ्या व्यवस्थेविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवर राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
अॅडव्होकेट आशीष राय आणि ॲड पंकज मिश्रा यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी करताना आयोगाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिस आयुक्त, लालबाग मंडळ सचिव, मंत्रालय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यांना नोटीस बजावली आहे.
आयोगाने सर्व संबंधितांना लवकरात लवकर लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
तक्रारदारांचा आरोप आहे की, सार्वजनिक गणेशोत्सव असूनही दर्शन व्यवस्थेत व्हीआयपी आणि सामान्य भक्तांमध्ये भेदभाव केला जातो. या पद्धतीमुळे सामान्य नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागते, तर काहींना विशेष सवलत मिळते. हे भाविकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
मानवाधिकार आयोगाच्या हस्तक्षेपामुळे आता राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांना आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
बाईट - ॲड. आशिष राय (तक्रारदार)
Anchor : दुपारच्या सुमारास भंडाऱ्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात आलेल्या या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भात पिकाची लागवड केल्यानंतर पावसानं उसंत घेतली होती. त्यामुळं अनेक भागातील भातपीक करपायला लागलं होतं. तर, शेतीला मोठंमोठ्या भेगा पडल्या होत्या. या मुसळधार पावसामुळं आता भातपिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. दुपारी 2 वाजता सुरू झालेला पाऊस तब्बल अडीच तासानंतरही सुरूचं आहे.
सोलापूर ब्रेकिंग
--
सोलापुरात काल गॅस गळतीमुळे 5 जणांचं कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याचे प्रकरण
घरगुती गॅस गळती प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीचाही दुर्दैवी मृत्यू
या घटनेत चिमुकल्या बहिण भावासह आता आज्जीचाही दुर्दैवी मृत्यू झालाय
सोलापुरातील लष्कर भागातील धक्कादायक घटना समोर आलीय
पाच जणांच्या या कुटुंबात शनिवारी माध्यरात्री घरगुती एलपीजी गॅस लीक झाल्यामुळे कुटुंबातील पाचही लोक अत्यवस्थ होते
एलपीजी गॅसमुळे या कुटुंबातील सदस्यांच्या शरीरात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण वाढले आणि फुफुसं निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे
‘’आम्ही त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र यातील 3 जणांचा मृत्यू झालाय तर आणखी एक जण अत्यवस्थ आहे‘’
‘’हर्ष बलरामवाले (6), अक्षरा बलरामवाले (4), विमल मोहनसिंग बलरामवाले (60) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय‘’
तर युवराज मोहनसिंग बलरामवाले (वय : 40), रंजना युवराज बलरामवाले (35), यांच्यावर उपचार सुरू आहेत
सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. ऋत्विक जयकर यांची माहिती
बाईट : डॉ. ऋत्विक जयकर (अधिष्ठाता, शासकीय रुग्णालय
जेट्टी प्रकल्पाविरोधात सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
मुंबई - ०१ सप्टेंबर २०२५ : गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टी प्रकल्पाविरोधातील सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या असून या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.भारताचे मुख्य न्यायाधीश बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती के.विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते व महाराष्ट्र सागरी मंडळ या दोन्ही बाजूंची सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर निर्णय सुनावला. त्यामुळे तब्बल ₹२२९ कोटींच्या या जेट्टी प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
मंत्री नितेश राणे आणि महायुती सरकारच्या या महत्वकांक्षी जेट्टी प्रकल्पामुळे मुंबईकरांना समुद्री प्रवासासाठी आधुनिक, सुरक्षित आणि जलद सुविधा मिळणार आहेत. टर्मिनलमध्ये प्रतीक्षालय, तिकीट काउंटर, प्रशासकीय कार्यालये, तसेच पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यमान जेट्टी टप्प्याटप्प्याने बंद करून त्याठिकाणी नवीन जेट्टी कार्यान्वित केली जाणार आहे.
हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर गेटवे परिसरातील जलवाहतूक क्षेत्र अधिक बळकट होऊन सागरी प्रवासाला चालना मिळेल. शिवाय मुंबईकरांना गर्दी व वाहतूक कोंडीत दिलासा मिळून प्रवाशांना आधुनिक टर्मिनल, सोयीस्कर प्रतीक्षालय आणि सुरक्षित प्रवासाचा नवा अनुभव मिळणार आहे.
राज्याचा युक्तिवाद
गेटवे परिसरातील रेडिओ जेट्टीविरोधात याचिकाकर्त्यांकडून विविध आक्षेप घेण्यात आले होते. ह्या प्रकल्पाचा परिसरातील नागरिकांना फायदा नसल्यामुळे आणि हा मोठा प्रकल्प असल्यामुळे गेटवे वस्तूला त्याची बाधा पोहोचेल असेही याचिकेत म्हटले होते. परंतु महाराष्ट्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की हा प्रकल्प फक्त काही रहिवाश्यांसाठी नसून, संपूर्ण मुंबईकरांसाठी आहे. मुख्य न्यायाधीश श्री.गवई यांनीही नमूद केले की “मुंबई ही फक्त ताज हॉटेल परिसरापुरती मर्यादित नसून ठाणे, डोंबिवली व आसपासच्या नागरिकांनादेखील ह्या जेट्टीचा वापर करता येणार आहे." याचिकाकर्ते आणि महाराष्ट्र सागरी मंडळ अशा दोन्ही बाजूंची सुनावणी घेतल्यानंतर मा.सर्वोच्च न्यायालयाने जेट्टी विरोधातील सर्व याचिका फेटाळण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
००००
भंडारा : मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे. त्यासाठी मराठा समाज बांधवांचं मागील चार दिवसांपासून मुंबईत आंदोलन सुरू झालाय. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी संघटनांनी प्रखर विरोध केलाय. नागपुरात मागील तीन दिवसांपासून ओबीसी बांधवांचं आंदोलन सुरू असतानाच आता भंडाऱ्यातही ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देवू नये आणि त्यांना ओबीसीमधून आरक्षण देवू नये, अशी भूमिका भंडाऱ्यातील ओबीसी जनजागरण परिषदेनं घेतली आहे. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी बुधवारपासून भंडाऱ्यात साखळी उपोषण सुरू करण्यात येत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यास राज्यभरात त्याचे पडसाद उमटतील आणि वेळप्रसंगी संपूर्ण ओबीसी समाज बांधव मुंबईत पोहोचतील, असा इशारा ओबीसी जनजागरण परिषदेनं दिला आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत सुरू झाली आहे. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समीर भुजबळ, पंकज भुजबळ, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित आहेत. बैठकीत, मराठ्यांना सरसकट कुणबी ग्राह्य धरून ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी रणनीती ठरवली जाणार आहे. बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे.
फलटण : येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये ओबीसी समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी बांधव दाखल झाले होते. दरम्यान ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आला. यामुळे काही वेळासाठी या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किरीट सोमय्या यांना दाखवले काळे झेंडे.
किरीट सोमय्या सिल्लोड येथील बनावट जन्म प्रमाणपत्र तपासणी साठी सिल्लोड येथे आले असता घडला प्रकार
किरीट सोमय्या यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न तर दाखवले काळे झेंडे पोलिसांनी वेळेतच आंदोलकांना धरपकड करत घेतले ताब्यात
बनावट जन्म प्रमाणपत्र, बांगलादेशी यांची घुसखोरी असे सोमय्या यांनी सिल्लोड येथे केले होते आरोप.
बीडच्या परळी येथील रेल्वे स्थानक परिसरात बालकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रेल्वे स्टेशन तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासले होते यामध्ये सदर आरोपी बालिकेला सोबत घेऊन जाताना दिसून आला होता त्यानुसार परळी शहरातील बरकत नगर भागातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पंढरपूर येथून कामाच्या शोधात परळीत आलेल्या दांपत्याच्या चार वर्षाच्या बालिकेवर रेल्वे स्थानक परिसरात अत्याचार केल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती पीडित बालिकेवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पंढरपूर येथील एक दांपत्य कामाच्या शोधामध्ये परळीत आले होते. रेल्वेतून उतरल्यानंतर वडील काही वेळासाठी तेथून बाहेर गेले होते तर आईची तब्येत ठीक नसल्याने रेल्वे स्टेशन परिसरातच आराम करत होती.यावेळी सहा वर्षाची बालिका देखील तिच्यासोबत होती.आईला झोप लागताच या बालिकेला अज्ञात व्यक्तीने त्या ठिकाणाहून बाजूला नेत अत्याचार केला यानंतर मुलगी रडत रडत आईकडे आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.यानंतर संभाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बीड : रस्त्यावरील खड्डा चुकविताना विटांची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला. घटना पाटोदा तालुक्यातील राज्य महामार्गावरील राजुरी परिसरात घडली आहे. या अपघातात चार मजूर गंभीर जखमी झाले आहे. टेम्पो पलटी झाल्यानंतर चालक अडकला होता. त्याला जेसीबीच्या सहायाने बाहेर काढण्यात आले. स्थानिकांनी प्रसंगावधान राखत मदत केल्याने मजुरांचे प्राण वाचले आहे. राजुरी परिसरात रस्त्यावरच अनेक खड्डे पडल्याने असे अनेक अपघात पाहायला मिळतात. रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी जोर धरत आहे.
सायन - पनवेल हायवे सकाळ पासून जाम
दुपार झाली तरी वाहतूक कोंडी कायम
मानखुर्द येथे मुंबई पोलीसांनी नाकाबंदी केली असल्याने वाहतूक कोंडी
मराठा आंदोलक गाड्या आडवण्यात आल्या आहेत.
फक्त जेवण , जीवनावश्यक गोष्टी असलेल्या मराठा गाड्या सोडल्या जातात. कार्यकर्त्यांना मात्र गाडीतून उतरवून परत नवी मुंबईत पाठवले जात आहे.
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मध्ये भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तणाव...
आंदोलनाच्या नावावर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर ...
काल काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली असा काँग्रेसचा आरोप आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस कढून आज पूर्व नागपूरचे भाजप चे आमदार कृष्णना खोपडे यांच्या घरापुढे आंदोलन केले जात आहे.
काँग्रेचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे व अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जात आहे.
अभिजित वंजारी हे विधान परिषदच्या नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार आहे. त्याचे नागपूरच्या वर्धमान नगर भागात 2020 पासून जनसंपर्क कार्यालय आहे.
या कार्यालयाच्या पाटीवर आमदार अभिजित वंजारी यांचे जनसंपर्क कार्यालय, पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र असा उल्लेख आहे. त्याला भाजप कार्यकर्त्यांचा आक्षेप होता.
त्यातून भाजप कार्यकर्त्यांनी शाईफेक केली असा काँग्रेसचा आरोप आहे
ठाण्यातील आनंदनगर जकात नाका टोल इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मराठा आंदोलनासाठी येणाऱ्या गाड्या आणि वाहतूक कोंडी यासाठी लावण्यात आला बंदोबस्त...
मुंबई पोलीस, वाहतूक विभाग तसेच ठाणे पोलीस, राज्य राखीव दल पोलिसांचा कडे कोड बंदोबस्त...
मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने वाहतूक सुरळीत...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी
नाशिकमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फुंकणार रणशिंग
नाशिकमधे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निघणार शेतकरी मोर्चा आणि पार पडणार पक्षाचे शिबिर
१४ व १५ सप्टेंबर दोन दिवस शरद पवार यांच्यांसाह पक्षाचे वरीष्ठ नेते नाशिक जिल्हा दौऱ्यावर
१४ सप्टेंबरला नाशिकमध्ये होणार कार्यकर्त्यांचे शिबिर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती आखली जाणार
१५ सप्टेंबरला नाशिक शहरात भव्य शेतकरी मोर्चा
कर्जमाफी, हमीभाव, कांदा प्रश्न, पीक विमा आदी विषयासंदर्भात काढणार मोर्चा
शरद पवारांच्या दोन दिवसीय नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार
खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेणार
खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील मानाच्या गणपतीसह महत्त्वाच्या गणपतीचे आज सकाळी दर्शन घेणार
प्रमुख पाच मानाचे आणि इतर प्रमुख गणेश मंडळासह कार्यकर्त्यांच्या मंडळांनाही भेटी देणार
१०:३० वाजता त्या कसबा गणपती पासून दर्शनाला सुरुवात करणार
भंडारा : फोन लावण्याच्या शाब्दिक वादातून दोन बंदीवानांमध्ये वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात एक बंदीवान जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात घडली. दिनेश अग्रवाल असं जखमी झालेल्या बंदिवानाचं नावं असून त्याच्यावर सम्येत उर्फ पोंग्या दाभणे या स्थानबद्ध केलेल्या बंदिवानानं हल्ला करून जखमी केलं. बंदीवानांना त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून बोलता यावं याकरिता कारागृह परिसरात अँलन कार्ड लावण्यात आलेले आहे. इथे या दोघांमध्ये ही मारहाण झाली. या प्रकरणाचा आता भंडारा पोलीस अधिक तपास करीत आहे.
भंडारा : फोन लावण्याच्या शाब्दिक वादातून दोन बंदीवानांमध्ये वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात एक बंदीवान जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात घडली. दिनेश अग्रवाल असं जखमी झालेल्या बंदिवानाचं नावं असून त्याच्यावर सम्येत उर्फ पोंग्या दाभणे या स्थानबद्ध केलेल्या बंदिवानानं हल्ला करून जखमी केलं. बंदीवानांना त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून बोलता यावं याकरिता कारागृह परिसरात अँलन कार्ड लावण्यात आलेले आहे. इथे या दोघांमध्ये ही मारहाण झाली. या प्रकरणाचा आता भंडारा पोलीस अधिक तपास करीत आहे.
भरधाव आय ट्वेंटी कार चालकानं राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित झालेली कार महामार्गावर असलेल्या बस थांब्यावर वर धडकल्यानं बसथांब्याचा काही भाग क्षतिग्रस्त झाला. तर, अपघातात कार आणि दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी झालेत. या अपघातात दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील कोकणागड इथं घडला. इंद्रजित सिंग रंधावा (36) असं गंभीर कार चालकाचं नावं असून त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आलं आहे. तर, खुशाल चोले (४०) असं दुचाकीस्वाराचं नावं असून त्यांच्यावर भंडारा इथं उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणी कारधा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहे.
रविवारी रात्री उशिरा पाकिस्तान सीमेजवळ पूर्व अफगाणिस्तानमध्ये 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला. यूएसजीएसनुसार, भूकंपाचे केंद्र नांगरहार प्रांतातील जलालाबादजवळ होते आणि त्याची खोली 8 किलोमीटर होती. माहितीनुसार, पूर्वेकडील नांगरहार प्रांतात 9 जणांचा मृत्यू झाला आणि 25 जण जखमी झाले.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE News Updates: देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...