Maharashtra News Live update : कराड चिपळूण राज्य महामार्गावर गॅस टँकरचा अपघात, अपघातानंतर गॕस गळती, गाव वस्तीला त्रास

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 May 2024 03:02 PM

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.....More

Aditya Thackeray : ईडी सीबीआय आता कोणता उमेदवार ठरवते हे पहावं लागेल, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

 


Aditya Thackeray :  भाजप हा महाराष्ट्र द्वेषी पक्ष , महाराष्ट्र विरोधी कारवाया होत असल्याने भाजपला एकही मत मिळणार नाही . अमित शहा यांच्या महाराष्ट्रात 40 जागा मिळणार या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची टीका . 


भाजपने आता प्रज्वल रेवन्नावर बोलावं . भाजपच्या भारतातील सर्वोच्च नेत्याने येऊन त्याचा प्रचार केला . अशा राक्षसी माणूस भारतात आला तरी भाजपा मधून त्याच्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही - चित्रा वाघ यांच्या पॉर्न स्टार टीकेवर आदित्य ठाकरेंचा टोला .


जे डरपोक लोक पळून गेली त्यांचा कुठलाही फटका आमच्या पक्षाला बसणार नाही . आम्ही लोकशाही टिकवण्यासाठी लढतोय त्यामुळे आम्ही भक्कम आहोत - आदित्य ठाकरे 


पालघर लोकसभेचा महायुतीने अजूनही उमेदवार जाहीर केला नसून ईडी सीबीआय आता कोणता उमेदवार ठरवते हे पहावं लागेल - आदित्य ठाकरे