Maharashtra Live Updates: भयावह! मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये 32 टक्के वाढ; जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान 269 शेतकरी आत्महत्या

Maharashtra Live blog: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या बातम्या आणि घडामोडींचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी

रोहित धामणस्कर Last Updated: 22 Apr 2025 05:42 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये तब्बल 32 टक्के वाढ झाली असल्याची भयावह आकडेवारी समोर आली आहे. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचं भीषण वास्तव या आकडेवारीतून समोर आले आहे. यात मराठवाड्यात जानेवारी...More

हिंदी भाषेची सक्ती नसावी...मराठी भाषेवरचे संकट आला आहे ते मागे घ्यावं यावर सुद्धा चर्चा झाली...:हर्षवर्धन सकपाळ 

हर्षवर्धन सकपाळ 


 आज काँग्रेसचे कार्यकारणी बैठक पार पडली 


 या बैठकीत संविधान बचाव या विषयाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आले 


 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सद्भावना कार्यक्रम ठरला आहे 


 याची रूपरेषा मे महिन्यापर्यंत राहील.  


 कोण केव्हा कधी कुठे कार्यक्रम करेल याचं नियोजन झालं 


 एक मे रोजी महाराष्ट्र सद्भावना दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे...


 संघटना पुनर्बंधासाठी निरीक्षक नेमले होते...


 संघटनांचे वर्ष म्हणून आपण जाहीर केला होता...


 सकारात्मक चर्चा झाली...


 पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष यांनी कशाप्रकारे काम करावे यावर चर्चा झाली...


 जिल्हाध्यक्ष यांनी स्वतःच्या जिल्ह्यात महिन्यातील प्रत्येक दहा दिवस ब्लॉक लेवल वर दौरा करावा आणि एक बैठक घ्यावी...


 अखिल भारतीय काँग्रेस स्तरावर रिपोर्ट आम्हाला लॉगिन होता येतं का हे सुद्धा चाचणी करणार...


 सलग तीन मिटींगला गैरहजर राहिला तर त्याचा पदाधिकाऱ्याचं पद सुद्धा संपुष्टात येणार...


 हिंदी भाषेची सक्ती नसावी... हिंदी भाषा सक्तीच्या नावावर मराठी भाषेवरचे संकट आला आहे ते मागे घ्यावं  यावर सुद्धा चर्चा झाली...


 संविधान आणि सद्भावना या दोन विषयांच्या अनुषंगाने  काँग्रेस कार्यरत राहील हा निर्णय झाला...